आषाढी एकादशी: उपवास, महत्व, कथा.
हिंदू धर्मात एकादशी ला खूप महत्व आहे. या पोस्ट च्या माध्यमातून आपण आषाढी एकादशी म्हणजे काय या विषयी माहिती घेणार आहोत.
![]() |
आषाढी एकादशी |
आषाढी एकादशी ची पूजा/उपवास कशी करतात
आषाढी एकादशीचे महत्व
आषाढी एकादशीची दंतकथा
हिंदू पंचांगाप्रमाणे एकादशी हि प्रतिपदेपासून सुरु होणाऱ्या पक्षातील आकारावा दिवस असतो,म्हणजे महिन्यात दोन पंधरवाडे असतात,त्यातील दोन्ही पंधरवाडे मध्ये एक एक म्हणजे एकूण दोन एकादशी एका महिन्यात येतात. म्हणजे वर्षात 12 महिने असून एकून वर्षात २४ एकादशी असतात.तसेच प्रत्येक एकादशीचे स्वतः चे वेगळे महत्व असते.
आषाढ महिन्यात शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी असे म्हणतात.
नावाप्रमाणे भगवान श्रीहरी विष्णू चार महिने योगनिद्रेत जातात,कार्तिक महिन्यात येणारी एकादशी देवउठनी एकादशी असते.तेव्हा देव जागे होतात. देवशायनी एकादशी पासून भगवान विष्णू चार महिने सागरात विसावतात या दिवसापासून लग्न ,मुंज इत्यादी शुभ कार्य केली जात नाहीत. आषाढी एकादशीला विशेष महत्व आहे कारण यादिवशी केलेल्या पूजनाने आपल्याला आपल्या हातून काळात नकळत घडलेल्या पापापासून मुक्ती मिळण्यास मदत होते.
आषाढी एकादशी ची पूजा/उपवास कशी करतात.
आषाढी एकादशी सकाळी लवकर उठावे,अंघोळ करून घर स्वच्छ करावे. घरात सगळीकडे गंगाजल शिंपडावे.ईशान्य दिशेला भगवान श्रीहरी विष्णुंची मूर्ती अथवा प्रतिमा स्थापन करून प्रतिमेला नवीन पिवळे वस्र अर्पण करून ,फुले,टिलक,तुलसीपत्र,पंचामृत,अगरबत्ती,इ अर्पण करावे.
आषाढी एकादशी व्रताची कथा ऐकावी,पूजा झाल्यावर आरती करावी. मंत्रजप करून श्रीहरी विष्णू यांना झोपवले जाते. या दिवसापासून भगवान विष्णू चार महिने योग निद्रेत जातात असे सांगितले जाते. योग निद्रा जप करून देवाला झोपवायचे असते. म्हणून या एकादशीला पद्मएकादशी,हरीशयनी एकादशी,देवशयनी एकादशी असे म्हणतात.
आषाढी एकादशीला धार्मिक महत्व असून,या आषाढी एकादशी च्या दिवशी उपवास केला जातो. मराठी बांधव लहान मोठे सार्वजन घरातील मंडळी उपवासाचे व्रत करून पूजा करतात. आषाढी एकादशीला वारकरी पायी दिंडीला जातात.
महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून वारकरी संप्रदायाच्या असंख्य दिंड्या पंढरपूर च्या दिशेने पायी चालत निघतात,आळंदी या ठिकाणापासून संत ज्ञानेश्वर ,देहूहून संत तुकाराम महाराज व नाशिक त्र्यंबकेश्वर हून निवृत्तीनाथ महाराज तसेच उत्तर भारतातून संत कबीर यांच्या दिंड्ड्या उन,वारा,पाऊस,पूर या सारख्या नैसर्गिक संकटांवर मात करत विठ्ठलाच्या नामाचा जयघोष करत,भजन,कीर्तन करत पायी चालत असतात.प्रत्येक जन्मात विठ्ठलाच्या भक्तीचा लाभ मिळावा आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्या,म्हणून हे सर्व भक्त मंडळी दिंडीत सामील होतात.
आषाढी एकादशीचे महत्व:
आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरु होतो,चातुर्मास हा चार महिन्याचा कालावधी असतो. जो आषाढी एकादशीपासून सुरु होऊन कार्तिकी एकादशीपर्यंत असतो.चातुर्मास हा श्रावण,भाद्रपद,अश्विन,कार्तिक असे चार महिन्यांचा मिळून असतो. चातुर्मास महिन्याच्या सुरवातीलाच देवशायनी आषाढी एकादशी असते,आणि शेवटी कार्तिक एकादशी असते.
या चातुर्मास कालावधीत देव निद्रेत असतात,अशा वेळी काही असुरी शक्ती जाग्या होऊन मानव जातीला त्रास देतात,म्हणून या कालावधीत देव धर्म,पूजा पाठ,भजन कीर्तन,विठ्ठलाच्या नामाचा जप व भगवान विष्णू ची पूजा केली जाते,जेणेकरून असुरी शक्ती पासून बचाव केला जातो.
अध्यात्मिक दृष्ट्या आषाढी एकादशीला खूप महत्व आहे,या चातुर्मास कालावधीत ध्यान धारणा,उपासना केली जाते. तसेच आरोग्याच्या दृष्टीने हे महिने खूप महत्वाचे मानले जातात. या दिवसात खाण्यापिण्याचे पथ्य पाळले जातात,कारण पावसाला सुरु असतो.आरोग्याच्या दृष्टीने आहार चांगला असावा लागतो,म्हणून उपवास,किंवा खाद्यपदार्थातील लसून,कांदा,वांगे,मांस असे अन्न वर्ज केले जातात.
आषाढी एकादशीची दंतकथा.
पूर्वी एक कुभदैत्य नावाचा राक्षस होता,त्याच्या मुलाचे नाव मृदुमान्य होते. त्याने भगवान शंकर यांची आराधना केली आणि भगवान शंकराकडून अमरत्व प्राप्त केले. त्यामुळे तो लोकांना त्रास देऊ लागला. ब्रम्हा विष्णू महेश या देवांना तो अजिंक्य झाला,त्याने या दिन देवांना देखील त्रास द्यायला सुरवात केली.
त्याच्या भीतीने सर्व जन चित्रकुट पर्वतावर गेले. तेथे असलेल्या धात्री या वृक्षतळी गुहेत लपून बसले. तो दिवस आषाढी एकादशीचा होता,त्या दिवशी सर्वाना उपवास घडला. पाऊस पडत असल्याने पावसात स्नान घडले. गुहेत सर्व देव एकत्र येऊन त्यांच्यापासून एक शक्ती निर्माण झाली.
त्या शक्तीने गुहेच्या बाहेर टपून बसलेल्या मृदूमान्य दैत्याचा वध केला. हि जि शक्ती आहे तीच एकादशी आहे असे मानले जाते. एकादशी व्रतात ब्रम्हा, विष्णू, महेश यादेवा बरोबर अनेक देवांची शक्ती एकवटलेली असते. म्हणून सगळे शैव व वैष्णव एकादशीचे व्रत करतात.
असुरी शक्ती पासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाने एकादशीचे व्रत करावे असे सांगितले जाते. या व्रताने सर्व पापांचा नाश होतो अशी वारकर्यांची भावना आहे. या दिवशी भगवान विष्णू ची श्रीधर या नावाने पूजा करतात. या दिवशी तुळस वाहण्याचे विशेष महत्व आहे तसेच अखंड दिवस भर तुपाचा दिवा लावला जातो. तुळस हि मंजिरी असून भगवान विष्णूला जागृत करणारी आहे त्यामुळे तुळशीला खूप महत्व आहे.
अशा प्रकारे आपण आषाढी एकादशी विषयी माहिती घेतली.
वाचा:
पदभरती..
नवीन नवीन पोस्ट्स मिळवण्यासाठी आमचा What's app group join करा.