मूल्यशिक्षण म्हणजे काय? मूल्यशिक्षणाचे प्रकार,मूल्यशिक्षणाचे उद्दिष्टे,मूल्यशिक्षणाचे महत्त्व,मूल्यशिक्षण काळाची गरज.

मूल्यशिक्षण: प्रकार, उद्दिष्ट्ये, महत्व, उपयोग.


मूल्यशिक्षण!

Table Of Content :

Table Of Content(toc)

Mulyashikshan mhanje kay Marathi Mahiti मूल्य शिक्षणाने एक परिपूर्ण व्यक्तिमत्व तयार व्हाव म्हणून प्रयत्न केला जातो.चांगले किंवा वाईट या दोन्हीतील सापेक्ष संकल्पना आहेत. एखादी चांगली वाटणारी गोष्ट इतरांना चांगली वाटेल तसे नसते. आज प्रत्येक व्यक्तीला मुल्यशिक्षणाची गरज असून ते शिक्षण मिळणे आवश्यक आहे.


मूल्यशिक्षण म्हणजे काय? 


बालवयापासून,आपल्या,आई-वडील,आजी,आजोबा इत्यादी कुटुंबातील मोठे आपल्याला जे संस्कार किंवा चांगले वागण्यास भाग पडतात त्यालाच मूल्यशिक्षण असे म्हणतात.

 

मूल्य शिक्षणाचे 10 प्रकार:

मूल्यशिक्षणाचे एकूण दहा प्रकार आहेत.

1.नीटनेटकेपणा।Neatness.

प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वामध्ये अंतर्बाह्य चांगला बदल घडवून नीटनेटकेपणा हा महत्त्वाचा असून नीटनेटकेपणा म्हणजे, 

एखाद्या व्यक्तीचे राहणीमान, बोलणे, वागणे, तसेच केशभूषा वेशभूषा किंवा घरातील आपल्या इतर कुटुंबातील व्यक्ती सोबत राहणे घरातील किंवा ऑफिसमधील, शाळेतील वस्तूंची योग्य व्यवस्थित मांडणी, आपले आचार, विचार योग्य रीतीने मांडणी नेटकेपणा ची सवय प्रत्येकाने आपल्या जीवनात लावली पाहिजे.

 

आपण आपल्या घरात कसे राहतो याचे मूल्यमापन प्रत्येकाने करणे आवश्यक आहे. तसेच सामाजिक समारंभ, कार्यक्रम या ठिकाणी आपण कसे वागतो, कसे बोलतो, यावर सुद्धा लक्ष देणे गरजेचे असते. यशस्वी जीवन जगण्यासाठी प्रत्येकाच्या जीवनामधील नीटनेटकेपणा ला महत्त्व आहे. 


आपली विचारसरणी कशी आहे, यावर आपण विचार करणे गरजेचे आहे. "साधी राहणी आणि उच्च विचारसरणी" हे तत्व बाळगणे आवश्यक आहे. नीटनेटकेपणा हा दैनिक जीवनाचा भाग आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये नीटनेटकेपणा ची सवय किंवा महत्त्व जाणून घेणे व अंगिकारने खूप महत्त्वाचे आहे. वेगवेगळ्या विचारांचा प्रभाव शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांच्या मनावर होतो.


त्यासाठी त्यांना बालवयात नीटनेटकेपणा चे महत्व पटवून देणे आवश्यक आहे.त्यामध्ये बोलणे,वागणे, वक्तशीरपणा या गोष्टीचा अंतर्भाव होतो.तसेच शाळेमधील वस्तूची, नीटनेटकेपणाने मांडणी करणे शाळेतील स्वच्छता करणे,गावातील,परिसरातील स्वच्छता करणे, घरातील वस्तूंची व्यवस्थित मांडणी करणे, इत्यादी या सर्व गोष्टी नेटकेपणा मध्ये येतात. 


नीटनेटकेपणा मध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टींनी आपण विद्यार्थ्यांना सवयी लावू शकतो. नीटनेटकेपणा आणि टापटीपपना यामध्ये विद्यार्थ्यांचे दप्तर, दप्तरा मधील वह्या व्यवस्थित लावणे, पुस्तक व्यवस्थित लावणे, कंपास पेटीतील साहित्य व्यवस्थित ठेवणे, आपल्या वस्तूची काळजी घेणे, तसेच आपल्या वस्तू खराब होणार नाहीत याकडे लक्ष देणे. इत्यादी छोट्या छोट्या गोष्टींपासून आपण नीटनेटकेपणा विद्यार्थ्यांमध्ये वाढ करू शकतो.


2.राष्ट्रभक्ती।Patriotism.


आपला राष्ट्रध्वज, आपले राष्ट्रगीत, आपल्या देश, समाज, आपली परंपरा, आपल्या देशाची संस्कृती, तसेच कला साहित्य,इतिहास आपल्या देशाची भौगोलिक स्थान, निसर्ग याबद्दल योग्य तो आदर बाळगणे म्हणजेच राष्ट्रभक्ती होय.

 

सर्व राष्ट्राच्या नागरिकांच्या जीवनातील हे सर्वात श्रेष्ठ मूल्य आहे. आपल्या राष्ट्राचे संवर्धन,संरक्षण करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य असून राष्ट्रासाठी समर्पणाची भावना बाळगणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे समजले जाते.आपल्या देशाची नैसर्गिक साधन संपत्तीचे संरक्षण करणे व त्याचा काटकसरीने वापर करणे.


राष्ट्रभक्ती मध्ये हे मूल्य जोपासले जाणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी देशाच्या उन्नतीसाठी सतत आपल्याला कार्यरत राहणे अपेक्षित असते. तसेच देशाच्या संरक्षणासाठी आपण सदैव तत्पर असले पाहिजे.राष्ट्र भक्तांच्या चरित्रांचा आदर करणे,अभ्यास करणे व आपल्या सभोवताली असणाऱ्या समाजबांधवांना त्यात सहभागी करून घेणे, हेसुद्धा महत्त्वाचे आहे.


देशाचा इतिहास तसेच भूगोल, परंपरा यांचे संवर्धन करत राहणे,त्याविषयी इतरांना महत्व पटवून देणे. हे एक राष्ट्रभक्तीचे उदाहरण आहे.संविधानाबद्दल आदर बाळगने सहलीच्या माध्यमातून,शेजारी राज्यांना भेटी देऊन सण-उत्सव साजरे करणे, ऐतिहासिक ठिकाणी भेटी देऊन त्या ठिकाणी उपक्रम घेणे,विद्यार्थ्यांना माहिती देणे इत्यादी राष्ट्रभक्ती वाढण्यास व राष्ट्रभक्तीची जोपासना करण्यासाठी महत्वाचे ठरते.


3.राष्ट्रीय एकात्मता।National Integration.

राष्ट्रातील व्यक्तीचे एकमेकांचे मध्ये राष्ट्राच्या समाजाच्या हितासाठी सतत झटत राहणे. आपण सामाजिक-आर्थिक किंवा जात धर्म यांच्यातील भेद भाव न करण्यासाठी प्रयत्नशील राहणे आवश्यक असते.


एकसंघ व भारतीयत्वाचा पुरस्कार करणे अपेक्षित आहे. राष्ट्रीय एकात्मते मध्ये बाधा न आणता आपण सर्वजण एक आहोत, गावात अशी भावना प्रत्येकामध्ये रुजवणे अपेक्षित असते. 


शाळेतील शालेय उपक्रमामध्ये 15 ऑगस्ट, 26 जानेवारी या दिवशी वेगवेगळ्या भाषांमधील कार्यक्रमात तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून आपण सर्वजण एक आहोत ही भावना जागृत होणे गरजेचे असते. एकमेकांच्या वस्तूंची शाळेमध्ये देवाण-घेवाण करणे, तसेच एकमेकांच्या विषयी आपुलकी निर्माण करणे यासाठी शासनस्तरावर प्रयत्न होणे अपेक्षित असते.


4.वक्तशीरपणा।Punctuality.

 

वक्तशिरपणा म्हणजे आपण एखादी हाती घेतलेले काम नियोजनानुसार यशस्वीपणे पार पाडणे किंवा वेळेमध्ये ठरलेल्या वेळेमध्ये काम करणे काम पूर्ण करणे.

 

स्वतःच्या आणि इतरांच्या बाबतीत जाणीव ठेवून वर्तन करणे, बोलणे, राहणे ,वागणे, आपल्या शाळेची वेळ, कामाच्या वेळा,गाड्यांच्या वेळा, समारंभांचे वेळापत्रक,तसेच वेगवेगळ्या भेटीचे वेळापत्रक किंवा वक्तशीरपणा यामध्ये दिसून आला पाहिजे.व्यक्तीगत यश राष्ट्रीय पातळीवरील यात वक्तशीरपणा हा खूप महत्त्वाचा घटक आहे. विद्यार्थी अवस्थेमध्ये लागलेल्या सवयी आयुष्यभर आपल्या सोबत राहत असतात.


यासाठी प्रत्येक काम वेळेवर करणे ही सवय किंवा हे सर्व घटक वक्तशीर पणा या घटकांमध्ये समाविष्ट होतात. दुसऱ्याला वेळ पाळायला लावणे आणि आपण उशीर करणे हे योग्य नसून याला वक्तशीरपणा म्हणता येणार नाही.त्यासाठी दुसऱ्याच्या वेळेचेही महत्त्व आपल्याला समजणे आवश्यक आहे. 


आयुष्यात यशस्वी झालेल्या थोर व्यक्तींना आपण त्यांच्या यशाचे रहस्य विचारल्यास स्वक्तशीरपणा हेच मूल्य आपल्याला आढळून येते. यशस्वी होण्यामागे वक्तशीरपणा हे खूप महत्त्वाचा घटक आहे.आयुष्य मध्ये वेगवेगळे मोठे मोठे काम करताना वक्तशीरपणा उपयोगी येतो. 


शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांना वक्तशीरपणा ची सवय लावणे आवश्यक असते. विद्यार्थी शालेय वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन करणे,विद्यार्थ्याच्या स्वतःची वेळेचे महत्त्व जाणून दुसऱ्याची वेळेलाही महत्त्व दिले जाणे योग्य असते, हे सर्व विद्यार्थ्यांना पटवून देणे अपेक्षित असते,दैनंदिन म्हणजेच रोज रोजच्या दिनक्रमानुसार त्या त्या वेळेला आपले काम पार पडण्याची सवय लावून घेतली पाहिजे.


5.वैज्ञानिक दृष्टीकोन।Scientific Approach.

वैज्ञानिक दृष्टिकोन हा प्रत्येकाच्या जीवनातला आवश्यक घटक आहे. 


वैज्ञानिक दृष्टीकोन म्हणजे एखाद्या घटनेचा अभ्यास करताना तिचा कार्यकारणभाव समजून घेऊन प्रयोगाच्या आधारे माहिती सिद्ध करणे म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोन होय.

 

किंवा 

वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे कोणत्याही घटनेकडे पाहण्याचा बुद्धिनिष्ठ दृष्टिकोन होय.

 

विशिष्ट उद्दिष्ट समोर ठेवून ते उद्दिष्ट सिद्ध करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करणे, प्रयत्न करणे गरजेचे असते. तसेच त्याचे निरीक्षण करून निष्कर्ष काढणे म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोन होईल. वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारे व्यक्तीच्या अंगी पुढील काही गुण असणे आवश्यक असते.


एक मनमोकळेपणा,बुद्धी प्रामाणिकपणा,निरीक्षण क्षमता, चिकित्सक विचारसरणी,पूर्वग्रहरहित दृष्टिकोन,जिज्ञासू वृत्ती सत्याचा आग्रह,नवीन कल्पनांचा स्वीकार करण्याची तयारी,कार्यकारणभाव जाणून घेण्याची वृत्ती,वस्तुनिष्ठ दृष्टिकोन समस्या, निराकरण करण्यासाठी तर्कशुद्ध विचारसरणीचा वापर करणे वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगण्याने मिळाल्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन यामुळे खगोलशास्त्र, पदार्थविज्ञान,रसायनशास्त्र, शरीरशास्त्र इत्यादी ठिकाणी अनेक वेगवेगळे शोध लागलेल्या आहेत. 


अपेक्षित वर्तनाबद्दल उपक्रम माणसाचे वैशिष्ट्य म्हणजे अपेक्षित वर्तन बदल व उपक्रम आपल्या समोर असणाऱ्या प्रत्येक समस्येचे तो विचार करत असतो. त्यावर प्रयोग करत असतो. वेगवेगळ्या पूर्व अनुभवातून तो शिकत असतो आणि आपल्याला जो योग्य निर्णय घेता येईल तो घेत असतो. प्रत्येक समस्येला का? कसे ?केव्हा ?कधी ? असे प्रश्न विचारणे आवश्यक असते. यातून आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी मदत होते.


विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर बदल घडून येतात.यांच्यासंदर्भात नवे विचार अधिकाधिक प्रगती कडे जाण्याचा प्रयत्न केला जातो तसेच वेगवेगळ्या विषयावर बोलताना साधार बोलले जाते.


यासाठी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्यासाठी गाव,तालुका,शहर,जिल्हा स्तरावर विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करणे, वैज्ञानिक उपकरणे तयार करण्यासाठी प्रोत्साहन देणे, विज्ञान प्रसार मंडळ स्थापने, प्रत्येक शाळेत स्वतःचे छोटीशी शास्त्र विषयक ग्रंथालय उभारणी आपल्या परिसरातील भेटी देऊन वेगवेगळ्या ठिकाणी निरीक्षण करणे. स्वतःच्या घरी वनस्पती विषयी छोटेसे प्रयोग करणे टाकाऊतून टिकाऊ अशा आशयाचे स्पर्धाचे आयोजन करणे, इत्यादी.


6.श्रमप्रतिष्ठा।Labor Reputation.


श्रमप्रतिष्ठा म्हणजे व्यक्ती समाज व राष्ट्र यांचा निकोप विकासासाठी श्रमांना सर्वांची मान्यता असणे व ती मान्यता आचरणात आणणे यालाच श्रमप्रतिष्ठा असे म्हणतात.

कोणतेही काम कमी दर्जाचे न मानता मन लावून ते काम पूर्ण करणे, तसेच त्या बद्दल आदर दाखवणे म्हणजे श्रमप्रतिष्ठा होईल.आपल्या रोजच्या जीवनातील स्वतःची कामे स्वतः करणे, तसेच सामाजिक कार्यामध्ये सहभागी होणे. त्याचे महत्त्व इतरांना पटवून देणे स्वतःचा घर,परिसर, शाळा, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता बाळगणे आपल्या रोजच्या जीवनातील स्वतःची कामे स्वतः करण्याकडे भर देणे श्रम करणाऱ्या श्रमिकांच्या चेहऱ्यावर केज असते ते अन्यत्र अन्यत्र नसते हे लक्षात ठेवावे.


7.स्री पुरुष समानता।Gender Equality.

स्रीयांना सर्व क्षेत्रामध्ये समान संधी दिली गेली आहे.त्यामुळे सर्वांनी तिचा स्वीकार करून स्त्रियांना स्वावलंबी होण्यासाठी,पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांना जीवनाच्या सर्व क्षेत्रात व्यक्तिमत्व विकासाची समान संधी म्हणजे स्री पुरुष समानता होय. पुरुषालाच सुखदुःख आहेत तशी स्त्री ला सुद्धा आहेत, याची जाणीव स्त्री-पुरुषात जागृती करणे म्हणजे स्त्री-पुरुष समानता.स्री पुरुषांना जीवनाच्या सर्व क्षेत्रात समान हक्क आणि अधिकार आहेत. 



स्रीयांना विकासाच्या सर्व संधी उपलब्ध करून देणे त्यांना सहकार्य देणे,स्त्रियांना सामाजिक क्षेत्रातही विकासाच्या संधी उपलब्ध करून देणे ,संयुक्त राष्ट्रांनी सुद्धा स्त्री-पुरुष समानतेचे विचारासाठी पाठिंबा दिलेला आहे,संयुक्त राष्ट्रांनी 8 मार्च हा दिवस "आंतरराष्ट्रीय महिला दिन" म्हणून घोषित केला आहे.


संविधानाने भारतीय स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने दर्जा दिलेला आहे.स्री पुरुष समानता म्हणजे सारखेपणा नाही, तुलना नाही तर स्त्रियांच्या योग्य सन्मान होईल , राष्ट्राच्या विकासाला हातभार लावायचा असेल तर,सगळ्यांना समान संधी मिळाली पाहिजे. तसेच राष्ट्र प्रगतीपथावर न्यायचं असेल तर या कार्यात राष्ट्रातील सर्व नागरिकांच्या सक्रिय सहभागाची अपेक्षा असते. स्रीपुरुष यांचे तत्व पटल्याने वर्तनात बदल दिसू लागतात. 


भारतीय संविधानाने स्त्री-पुरुषांना समान मूलभूत अधिकार देण्याची विद्यार्थी जाणतात. स्त्रियांचा दर्जा सुधारण्याचे प्रयत्न करणाऱ्या समाजसुधारकांची माहिती विद्यार्थ्यांमध्ये दिली जाणे अपेक्षित आहे. तसेच आपल्या घरामध्ये आई ,बहीण, आजी यांचे कौटुंबिक योगदान विद्यार्थी लक्षात घेतात.


स्री पुरुष समानता या संदर्भात वेगवेगळे उपक्रम शाळा स्तरावर होणे अपेक्षित असते. उदाहरणार्थ राष्ट्रीय व राज्यस्तरीय महिला धोरणाची माहिती घेणे.स्त्री-पुरुष समानतेला प्राधान्य देणाऱ्या कार्यक्रमांची आखणी करणे.कर्तृत्ववान स्त्रियांची चरित्रे वाचणे. माहिती गोळा करणे, स्री पुरुष यांच्या कर्तृत्वाच्या बातम्यांची वर्तमानपत्रातील कात्रणे गोळा करणे, इत्यादी


8.सौजन्यशीलता।Courtesy.

आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही एखाद्याची गैरसोय होणार नाही असे वागणे, आपल्याला बरोबरीच्या व्यक्तीशी विनयाने वागणे, इतरांचे म्हणणे ऐकून घेणे, दुसऱ्या व्यक्ती बद्दल आदर भाव प्रकट करणे, म्हणजे सर्जनशीलता होईल. दुसऱ्याचे स्वागत करणे, त्यांच्या सुखदुःखाची समरस होणे, म्हणजेच सौजन्यशीलता होईल.यात विनम्रता या गुणांना फार महत्व असते. हे गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न करणे अपेक्षित असते.



आपल्याकडून जर एखादी चूक झाली तर आपण त्याबाबत क्षमा मागणे अपेक्षित असते. कोणी मदत मागितली तर त्याला मदत करणे. एखाद्याने मदत केली तर त्याबाबत कृतज्ञता व्यक्त करणे, आभार मानणे हा सर्जनशीलतेचा भाग असतो. शालेय जीवनामध्ये सुद्धा याला खूप महत्त्व दिले गेलेले आहे.


आपल्या दैनंदिन जीवनात आपला ज्यांच्या ज्यांच्याशी संबंध येतो त्यांच्याशी नम्रपणे वागणे, सामंजस्याने वागणे सर्जनशीलतेला आजच्या जगात पर्याय नाही. विद्यार्थी अवस्थेमध्ये शाळेत परिसरातील सर्व ज्येष्ठ व्यक्तींशी या भावनेने वागणे. 


भाषण करताना संभाषणात विद्यार्थी युवक, शिष्टाचार, यांचा वापर करतात म्हणजेच सर्जनशीलता होय. शालेय पातळीवर यासाठी वेगवेगळे उपक्रम घेणे अपेक्षित असते. विद्यार्थी दैनंदिन जीवनात कोणकोणते शिष्टाचार यांना केव्हा स्थान देऊ शकतो.याचा तक्ता वर्गात लावून अपेक्षित आहे . 


विद्यार्थ्यांचे वागणुकीचे नियम दर्शनी भागात लावणे.अभिरूप मुलाखत,अभिरूप न्यायालय, अभिरूप विधानसभा, अभिरूप संसद, अभिरूप ग्रामसभा, अभिरूप महानगरपालिका या सर्व उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांसाठी आयोजित करणे उपक्रम आयोजित करणे. 


आपल्याला एखाद्या भागाला भेट द्यायला जायचे असेल तर त्या ठिकाणी परराज्यातील, राष्ट्रातील लोकांना त्यांच्या रीतीरिवाज त्यांची माहिती देण्यासाठी शाळेत आवर्जून निमंत्रण देणे शिष्टाचार यासंबंधी कृती विद्यार्थ्यांकडून करून घेणे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये लहान वयापासूनच अपेक्षित बदल होतात आणि सर्जनशीलता वाढीस लागते.


9.सर्वधर्मसहिष्णुता।Universal Tolerance.


सर्व धर्मांविषयी सारखाच भाव असणे म्हणजेच सर्वधर्मसहिष्णुता व विविध धर्मांनी सांगितलेले तत्व किंवा सिद्धांत उपासनेचा मार्ग चालीरीती जीवन पद्धती या विषयाचे आकलन करून घेणे व त्याविषयी आदरभाव बाळगणे म्हणजे सर्वधर्मसहिष्णुता होय.

 

सर्वधर्मसहिष्णुता म्हणजे मला माझा धर्म जितका प्रिय आहे तितकीच इतर धर्मात प्रिय आहेत. असे महात्मा गांधी यांनी सांगितलेले आहे आपल्या भारतामध्ये हिंदू मुस्लिम, ख्रिश्चन,बुध्द, जैन शीख इत्यादी वेगवेगळ्या धर्माचे लोक एकत्र राहतात. आपल्या धर्माप्रमाणे दुसऱ्यांच्या धर्माविषयी सुद्धा आदर भाव दाखवने एकमेकांच्या आदर करणे, आपल्या धर्माचे आचरण करून इतर धर्मांविषयी आदर व स्वागतशील भावना व्यक्त करणे. 


आपल्या देशातील विविध धर्मीय लोकांमध्ये एकता राहते. त्याचे कारण म्हणजे सर्वधर्मसहिष्णुता होईल. सर्वधर्मसहिष्णुता व राष्ट्राची शांतता व समृद्धी अवलंबून असते. धर्माच्या अनेक व्याख्या करता येतात. समाज जीवनाला धारण करणारे जीवन पद्धती म्हणजेच धर्म. अशी एक व्याख्या करता येते. 


भारतासारख्या खंडप्राय देशात विविधतेत एकता असे म्हटले जाते. ते केवळ सर्वधर्म सहिष्णू त्यामुळे शक्य आहे. या मूल्यावर देशातील शांतता आणि विकास अवलंबून असतो म्हणून याला विशेष महत्त्व दिले गेले आहे. लहान वयामध्ये सर्व धर्म व सहिष्णुता ही मूल्ये रुजवणे त्यासाठी सर्व धर्माबद्दल आदर याची भावना व्यक्त करण्याची वेगवेगळे उपक्रम शाळेमध्ये राबवणे अपेक्षित असते. 


विविध धर्माचे प्रमुख ग्रंथ ग्रंथालयात वाचनासाठी उपलब्ध करून ठेवणे, विविध धर्माच्या प्रमुख ग्रंथांचे अनुवाद राष्ट्र भाषांमध्ये उपलब्ध करून ठेवणे ,वर्तमानपत्रात वेळोवेळी विविध धर्माची सणांची माहिती दिलेली लेखांची कात्रणे शाळेमध्ये ग्रंथालयांमध्ये चिटकवणे वहीमध्ये चिटकवणे, इत्यादी उपक्रम शाळेमध्ये घेऊन लहान वयातच शालेय जीवनामध्ये सर्वधर्मसहिष्णुता हे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजू शकतो.

10.संवेदनशीलता।Sensitivity.


एखादी व्यक्ती अन्यायाविरुद्ध उभे राहते प्रामाणिक पणा दाखवत असते अशा व्यक्ती विषयी उदारमतवादी स्वागतशील आणि निर्भय दृष्टिकोन म्हणजे संवेदनशीलता होय.

विधायक कार्य व सेवा करण्यासाठी साहाय्य करणे, त्यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या सहभागी होणे, यात संवेदनशीलता दिसून येते.शेजारी-पाजारी यांना ताप, अंग दुखी, कष्टी यांचे जीवन समजून घेण्यासाठी आपले मन तयार करून किंवा आपल्या मनाची तयारी दाखवणे मानवी जीवनात सुख आणि दुःख यश आणि अपयश सतत चालू असतात. 


त्यांच्यामध्ये समतोल दृष्टीने पाहावे निसर्ग समजून घेण्यासाठी त्याप्रमाणे आपलं मन कविमन असणे आवश्यक असते. शिक्षणाचे सामर्थ्य संवेदनशील विद्यार्थी करण्याकरिता हे संवेदनशील विद्यार्थी निर्माण होणे हा शिक्षकांचा गौरव समजला जातो.माणसांना माणसांविषयी संवेदनशीलता असते हीच आपल्या माणुसकीपणाची ओळख असते.
कृतज्ञता हा मानवी जीवनातील प्रमुख बाब आहे. 



माणसे एकमेकांच्या आनंदात दुःखात सहभागी होतात, नाट्य काव्य संगीत नृत्य चित्र साहित्यामधून म्हणजे आनंद घेतात आणि जीवन समृद्ध करतात. संवेदनशीलतामुळेच मानव प्रगती करु शकला. या मूल्य द्वारे विद्यार्थ्यात पुढील अपेक्षित बदल होऊ शकतात. तर ते आपल्या आजूबाजूच्या परिसराचे निसर्गाचे शाळेचे, त्याला बाधा येईल असे कोणतेही कृत्य करत नाही. 



वर्गातील इतर विद्यार्थ्यांच्या अंगी असणारे गुण बद्दल अभिनंदन करतो व इतर विद्यार्थ्यांची चांगले गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो. साहित्य चित्र काव्य नाट्य व त्यांचे रसग्रहण करून समस्या संमेलनामध्ये त्याचे प्रदर्शन घडवतो. 



त्यासाठी शाळा स्तरावर विविध उपक्रम घेणे अपेक्षित असते त्यामध्ये वर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी सामूहिकरीत्या त्यांचे अभिनंदन करणे शाळेच्या ग्रंथालयात,वृत्तपत्रातील चांगल्या बातम्याची कात्रणे चिटकवणे, शाळेतील अथवा परिसरातील विशेष मुलांची आपुलकी दाखवणे. शहरातील सेवा कार्य करणाऱ्या संस्थेला जमेल त्या पद्धतीने मदत करणे.


मूल्य शिक्षणाची उद्दिष्टे।Objectives of value Education.

 मूल्यशिक्षणाचे काही ठराविक उद्दिष्ट असतात. 

1.व्यक्ती म्हणून निरोगी आणि निरामय जीवनाचा विकास करता येणे शक्य असते.
2.सामाजिक बांधिलकी जपणे आणि एकमेकांमध्ये आदरभाव वाढीस लागतो.
3.आपल्या परिसरातील निसर्ग प्राणी यांना जमेल ती मदत करून करणे आणि त्यांची जोपासना करणे हे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे समाजाचे ऋण म्हणून वागणे त्याची परतफेड करणे.हे मूल्यशिक्षण यामुळे शक्य होते.
4.स्वतंत्र राष्ट्राचा एक नागरिक म्हणून राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रीय मूल्यांचा स्वीकार करणे महत्त्वाचे असते.
5.कुटुंबात आदरपूर्वक वागणे भारतीय राज्यघटनेमध्ये लोकशाही, समाजवादी समाजरचनेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शालेय स्तरावर मूल्यशिक्षणाचे खूप महत्त्व निर्माण झालेले आहे. 
6.मूल्यशिक्षण शालेय जीवनामध्ये मुलांमध्ये रुजवणे खूप आवश्यक झाले असून यासाठी शासन स्तरावर मी प्रयत्न केले जात आहेत. 7.सदाचार, नैतिकता,सभ्यता,सुसंस्कृतपणा इत्यादी गुणांची वाढ होणे मूल्यशिक्षण मुळे शक्य आहे. 
8.ज्या परिसरात आपण वाढतो लहानाचे मोठे होतो त्या परिसराबद्दल सक्रिय प्रेम वाढीस लागणे हे एक महत्त्वाचे उद्दिष्ट पूर्ण होण्यास मदत होते.


मूल्यशिक्षणाचे फायदे किंवा उपयोग।Benefits or benefits of value Education:

मूल्यशिक्षण हे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये जीवन जगताना एक माणूस म्हणून खूप उपयोगी असते. त्यासाठी मूल्य शिक्षणाचे आपल्याला प्रत्येक ठिकाणी फायदे असतात.


शिक्षणामुळे मानवत शिक्षणामुळे माणूस प्रगत होतो. अलीकडच्या काळात साक्षरतेच्या टक्केवारी वाढ झालेली असली तरी विचार करणे, शिकणे, ऐवजी केवळ वाचन-लेखन करण्यात सक्षम करण्यावर लक्ष केंद्रित केले जात आहे. 


आजच्या शिक्षणामध्ये मूल्य शिक्षणाचा वापर खूप कमी प्रमाणात आढळतो आणि ह्याचा प्रत्यय वाढलेले शहरीकरण आधुनिकीकरणामुळे लोकांची नैतिक मूल्ये दिवसेंदिवस कमी होत चाललेले आहेत. 


वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला स्पर्धा पाहायला मिळत आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या जीवनातील आनंद कमी होत चाललेला आहे. प्रत्येक जण पैसा कमावण्याच्या मागे लागलेला असल्याने विश्वास, अखंडता, प्रेम आणि बंधुत्व या सर्व गोष्टी काळानुसार लुप्त होत चाललेल्या असल्याने हे नैतिक मूल्य आपल्याला या ठिकाणी वाचू शकतात. म्हणून प्रत्यक्षात नैतिक शिक्षणाचा अर्थ आपण लक्ष देणे अपेक्षित आहे. 


विद्यार्थी आणि समाज आणि राष्ट्राच्या भविष्याचा पाया मूल्यशिक्षणाचा आहे कोणताही ते यशस्वी होण्यासाठी त्याची नागरिक नैतिक दृष्ट्या सुसज्ज असणे महत्त्वाचे असते. घर शाळा आणि महाविद्यालयात शिक्षक आणि मार्गदर्शक पालक यांच्याद्वारे नैतिक शिक्षण लहानपासून दिले जाऊ शकते. मुलांसमोर आचरण विचार चांगले नैतिक मूल्य रुजवणे अपेक्षित असते.मूल्यशिक्षण सर्वांसाठी एक महत्त्वाचे आणि गरजेचे झालेले आहे. मुल्यशिक्षणाची जीवनामध्ये खूप महत्त्व आहे. 


मूल्यशिक्षण वाईट सवयींवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते.स्वतःमध्ये सकारात्मक विचारसरणी तयार करणे, सकारात्मक दृष्टिकोन विकसित करण्यास मदत करते . 


व्यक्तिमत्व विकसित करण्यामागे मूल्यशिक्षणाचा खूप मोठा वाटा आहे. मानवी जीवनामध्ये मूल्य रुजवण्यासाठी हे 10 नैतिक मूल्य खूप आवश्यक आहेत स्वच्छतेचे आणि वेळेचे गुणधर्मात शिकण्यासाठी मूल्यशिक्षण खूप महत्त्वाचे ठरते. 


भावनिक, बौद्धिक, शारीरिक विकास घडवून आणण्यामागे मूल्य शिक्षणाचा खूप महत्त्वाचा वाटा आहे. एक चांगला माणूस होण्यासाठी मूल्यशिक्षणाचे खूप मदत होत असते.


मूल्य शिक्षण काळाची गरज:

मूल्यशिक्षण सध्या समाजामध्ये खूप महत्त्वाचे असून आज आपण वर्तमानपत्र उघडले तर वेगळ्या बातम्या आपल्याला वाचायला मिळतात. त्यामध्ये अल्पवयीन मुलांनी केलेले गुन्हे, खून, चोरी, बलात्कार, वाईट व्यसने या सर्वांमध्ये अल्पवयीन मुले सहभागी झालेले आपल्याला दिसून येतात, ही मुले वाईट विकृतींना बळी पडताना दिसत असतात किंवा समाजामधील वेगळे जे कृत्य घडले जातात.


वाईट कृत्य घडले जातात वाईट घटना घडल्या जातात यामागे सामाजिक स्तरावर दिवसेंदिवस वाढत चाललेल्या हा एक सामाजिक भूकंप आहे. त्याचे दुष्परिणाम भयानक असून हे सर्व मूल्यशिक्षण शाळांमधून मिळाले तर अशा वाईट कृत्यांना आळा बसण्यासाठी मूल्यशिक्षण विद्यार्थ्यांमध्ये रुजवणे अपेक्षित आहे.
 

मूल्यशिक्षण ही मुख्यतः काळाची गरज झालेली आहे. अध्ययन अध्यापन ते सहजपणे साध्य करता येऊ शकते. इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत आपण ही 10 मूल्य प्रातिनिधिक मांडली असली तरी सदाचाराचे वळण लावण्याचा उद्देश लक्षात घेता मूल्यविचार मर्यादित राहू शकत नाही. 


आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल, संगणक यांचा उपयोग करू शकतो. मुल्यशिक्षणाची खऱ्या अर्थाने गरज आहे व्यक्ती म्हणून निरोगी आणि निरामय स्वरूपाचे जीवन हे मूल्य शिक्षणामुळे सहज शक्य आहे. त्यामुळे आजच्या दृकश्राव्य साधनाचा वापर करून मूल्यशिक्षण हे सहजपणे देऊ शकते.


आमचा What's App Group मध्ये सामील होण्यासाठी खाली क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने