पुस्तकांचे ओझे कमी करण्यासाठी पायलट प्रोजेक्ट
प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शासन स्तरावर नेहमी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. प्राथमिक शाळेतील विद्यार्थी यांना शाळेत जाताना त्यांचे दप्तराचे ओझे कमी व्हावे,यासाठी इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तक मंडळाने एकात्मिक पुस्तकाचा प्रयोग हाती घेतला असून,यात पहिली व दुसरीत शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना आता जास्त पुस्तके शाळेत घेऊन जावे लागणार नाही.
कारण बालभारतीने प्रयोगिक तत्वावर प्रत्येक जिल्ह्यातील दोन तालुके निवडून त्यात पायलट प्रोजेक्ट राबवला जाणार आहे.
म्हणजे एका जिल्ह्यातील दोन तालुक्यात हा प्रयोग राबवला जाणार आहे.पायलट प्रोजेक्ट अंतर्गत एकाच पुस्तकात मराठी,इंग्रजी,गणित,हिंदी इत्यादी विषय असणार आहेत.बालभारतीने अशा पुस्तक निर्मितीचे काम हाती घेतले आहे.
विद्यार्थ्यांना हसत खेळत शिक्षण देण्याचा प्रयत्न यात केला जाणार आहे.तसेच इयत्ता तिसरी ते सातवीतील विद्यार्थ्यांसाठी सुद्धा पाठीवरील पुस्तकाचे ओझे कमी करण्याचा मानस दिसून येत आहे.
ही पुस्तके यू डायस नुसार विद्यार्थ्यांची नोदं झालेल्या ठिकाणी पोहच होणार आहेत. या पायलट प्रयोगाने नक्कीच विद्यार्थ्यांचे पाठीवरील पुस्तकाचे ओझे कमी होण्यासाठी मदत होईल अशी अशा बाळगायला काही हरकत नाही.