अपंग योजना महाराष्ट्र।महाराष्ट्र अपंग पेन्शन सरकारी योजना - 2022.

अपंग पेन्शन सरकारी योजना 2022 विषयी माहिती.


अपंग योजना महाराष्ट्र।महाराष्ट्र अपंग पेन्शन सरकारी योजना -2022
अपंग (दिव्यांग) पेंशन योजना 


अपंग योजना महाराष्ट्र।महाराष्ट्र अपंग पेन्शन सरकारी योजना -2022

महाराष्ट्र अपंग पेन्शन सरकारी योजना 2022 - महाराष्ट्र शासनाकडून तसेच केंद्र शासनाकडून वेळीवेळी विविध प्रकारच्या पेन्शन योजना राबवल्या जातात.ज्याद्वारे सरकार देशातील नागरिकांना आर्थिक मदत करत असते.


अपंग  विधवा आणि वृद्ध नागरिकांनाही पेन्शन दिली जाते.आता आपण अशाच दिव्यांग बांधवांसाठी शासनाकडून राबवण्यात येणार्‍या योजनेची माहिती घेऊया. 

अपंग पेन्शन सरकारी योजना 2022.

अपंग व्यक्तींना अपंग न म्हणता दिव्यांग हा शब्द वापरण्यात येतो.विकलांग पेन्शन योजनेच्या माध्यमातून देशातील दिव्यांग नागरिकांना आर्थिक मदत दिली जाणार आहे.या लेखाच्या माध्यमातून अपंग (दिव्यांग) पेन्शन योजनेची संबंधित सर्व माहिती देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जाईल.


अपंग (दिव्यांग) पेन्शन योजनेचा उद्देश फायदे,वैशिष्ट्ये,अपंग (दिव्यांग) पेन्शन योजनेसाठी पात्रता,तसेच त्यासाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे,अर्ज करण्याची प्रक्रीया कशी,या विषयावर माहिती देण्याचा प्रयत्न करूया. 


अपंग पेन्शन सरकारी योजना महाराष्ट्र 2022 माहिती .

अपंग (दिव्यांग) लोकांना त्यांचे जीवन जगण्यासाठी इतरांवर अवलंबून राहावे लागते.असे शासनाच्या लक्षात आले आणि त्यांना आपले जीवन जगत असताना येणार्‍या आर्थिक अडचणी वर उपाय योजना म्हणून अपंग (दिव्यांग) पेन्शन सरकारी योजना राबवण्यात येते. 


अपंगत्व प्रमाण हे तीव्र स्वरूपाचे असेल तर, ती व्यक्ती नोकरी करू शकत नाही.त्यांच्या हलन चलन हे मर्यादित असते.


दिव्यांगांना  मदत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र अपंग पेन्शन योजना 2022 मध्ये सुरू केली आहे.या योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्तींना सरकारकडून दरमहा 600 रुपये पेन्शन म्हणून दिली जाते.अपंग पेन्शन सरकारी योजना 2022 योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी चे वय 18 ते 65 वर्षे असणे आवश्यक आहे.तसेच किमान 80 % अपंगत्वाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.


महाराष्ट्र अपंग पेन्शन सरकारी योजना 2022 चे उद्दिष्टे काय आहेत. 

  • अपंग निवृत्ती वेतन योजनेचा मुख्य उद्देश दिव्यांगांना आर्थिक मदत करणे असून,दिव्यांग लोकांना त्यांचे जीवन जगण्यासाठी परावलंबी किंवा इतरांवर अवलंबून राहू लागू नये यासाठी दिली जाते.
  • तसेच दिव्यांग व्यक्तींचा आत्मविश्वास कमीहोऊ नये,या लोकांना आत्मविश्वास निर्माण करणे आणि त्यांचे दैनंदिन जीवन जगण्यासाठी आर्थिक मदत करणे,हे सरकारचे मुख्य उद्दिष्ट आहे.
  • आता अपंगांना पैशासाठी इतरांसमोर हात पसरण्याची गरज भासणार नाही.कारण आता अपंग पेन्शन योजना विकलांग व्यक्तींसाठी सुरू करण्यात आलेली शासनाची महत्त्वपूर्ण योजना आहे.


महाराष्ट्र अपंग पेन्शन सरकारी योजना साठी आवश्यक पात्रता काय आहे 

  • महाराष्ट्र अपंग पेन्शन योजनेत केवळ 80 टक्के अपंगत्व असलेल्या व्यक्तीच अर्ज करू शकतात.
  • लाभार्थीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न पस्तीस हजार पेक्षा जास्त नसावे. 
  • तसेच  सरकारी नोकरी करत असेल तर तुम्ही या योजनेसाठी विहित नमुन्यात अर्ज करू शकत नाही. 
  • अर्जदाराचे वय 18 ते 65 वर्षाच्या दरम्यान असाव लागते. 
  • महाराष्ट्र अपंग पेन्शन सरकारी योजनेसाठी  80% अपंगत्व असलेल्या व्यक्तीचा अर्ज करू शकते.


अपंग पेन्शन सरकारी योजनेचे मिळणारे फायदे

  • दिव्यांग लोकांना रोजगार उपलब्ध होऊन, ते सहज आपला उदरनिर्वाह करू शकतील. 
  • राज्यातील दिव्यांगांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
  • महाराष्ट्र अपंग पेन्शन सरकारी  या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला दरमहा 600 रुपये पेन्शन दिली जाईल.
  • महाराष्ट्र अपंग पेन्शन सरकारी योजने मध्ये 80 टक्के अपंगत्व प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या  लोकांना या योजनेचा लाभ मिळेल.
  • अपंग निवृत्ती वेतन योजना महाराष्ट्र अंतर्गत दिलेली रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात हस्तांतरित केली जाईल, त्यामुळे लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक असेल. 


अपंग पेन्शन सरकारी योजनासाठी आवश्यक कागदपत्रे

अपंग पेन्शन योजनेसाठी खालील प्रमाणे कागदपत्रे आवश्यक असतात.
  • आधार कार्ड 
  • निवासी प्रमाणपत्र 
  • अपंगत्वाचे प्रमाणपत्र 80% असावे.➧पासपोर्ट आकाराचा फोटो 
  • उत्पन्नाचा दाखला  
  • वयाचे प्रमाणपत्र 
  • बँक खाते पासबुक 
  • मोबाईल क्रमांक आधार कार्ड ला जोडलेला असावा.


अपंग पेन्शन सरकारी योजना महाराष्ट्र साठी फॉर्म कसा भरावा.

  • अपंग पेन्शन योजनेसाठी विहित नमुन्यातील फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती अचूक भरून,नंतर तुमची कागदपत्रे जोडा आणि संबंधित विभागाकडे जमा  करा.
  • तुमच्या अर्जाची पडताळणीनंतर तुम्ही जर पात्र झालात तर तुमचे अपंग पेन्शन सरकारी योजना सुरू होईल.अपंग पेन्शन सरकारी योजना साठी तुम्ही ऑनलाईन अर्ज देखील करू शकतात.त्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा. 


अपंग पेन्शन सरकारी योजनासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया.

  • सर्वप्रथम तुम्ही अपंग पेन्शन च्या अधिकृत वेबसाईट जाऊन तेथे होमपेज वर जावे. 
  • त्यानंतर तुम्हाला अपंग पेन्शन अंतर्गत अर्ज करण्याच्या पर्यायावर क्लिक करून अर्ज नमूना ओपन होईल.
  • अर्जाचा नमूना ओपन झाल्यानंतर विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरावी लागेल . 
  • तुम्हाला सर्व महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
  • त्यानंतर सम्मीट ऑप्शन वर क्लिक करावे लागेल.
  • अशा प्रकारे तुम्हाला महाराष्ट्र अपंग पेन्शन सरकारी योजना साठी अर्ज करता येईल.
  • अधिक माहिती साठी सबंधित कार्यालयात जाऊन माहिती विचारू शकता. 
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने