विशेष गरजाधारक मुले (Children With Special Needs).

Children With Special Needs -Marathi


Children With Special Needs -Marathi
विशेष गरजाधारक मुले 


Table Of Content:

Table Of Content(toc)

विशेष गरजा असणारी मुले म्हणजे काय ?


विशेष गरजाधारक मुले, या मुलांना सर्वसामान्य मुलांप्रमाणे आपली कार्य पार पडण्यात अनेक अडथळे पार करावे लगतात.त्यासाठी पालक,शिक्षक आणि समजतील प्रत्येक घटकांनी विशेष मदतीची व सहानुभूती ची गारज असते. उदा.भावनिक,शारीरिक,तसेच वर्तन समस्या,शिकण्यात अडचणी येणे इत्यादी प्रकारच्या समस्या या बालकांमध्ये दिसून येतात. त्यांनाच विशेष गरजा असणारी बालके असे संबोधले जाते. 

 

विशेष गरजा असणारी बालकेहे सर्व सामान्य बालकापेक्षा शारीरिक,बौद्धिक,सामाजिक कौशल्य इ.विषयी मार्गदर्शन करण्याची गरज भासत असते.

Or 

 

"सर्वसामान्य बालकांपेक्षा भिन्न क्षमता व  गरजा असणाऱ्या बालकास  विशेष गरजा असणारी बालके असे संबोधले जाते." 

Or

 

"Children with different abilities and needs than normal children are called special needs children."


विशेष गरजा असणारी बालके हे दिव्यांग बालक म्हणून देखील ओळखले जाते. RPWD Act 2016 दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम 2016 नुसार हे दिव्यांग 21 भिन्न प्रकारात विभागले गेलेले आहेत. त्यातील प्रत्येक बालकाची गरज आणि क्षमता या त्यांच्या अपंगत्व नुसार वेगवेगळ्या असतात. म्हणून या 21 दिव्यांग प्रकारातील हे सर्व विशेष गरजा असणारी मुले म्हणून संबोधले जातात ते पुढीलप्रमाणे.


Join : Whats App Channel (medium-bt)


21 दिव्यांग प्रकार:


  • Blindness -पूर्णतः अंध 
  • Low Vision -अंशतः अंध 
  • Hearing Impaired -कर्णबधिर 
  • Speech And Language Disability -वाचादोष 
  • Locomotor Disability -अस्थिव्यंग 
  • Mental Illness -मानसिक आजार 
  • Learning Disability -अध्ययन अक्षमता 
  • Cerebral Palsy - मेंदूचा पक्षाघात 
  • Autism Spectrum Disorder -स्वमग्न 
  • Multiple Disability Including Deaf-blindness -बहुविकलांग 
  • Leprosy Cured Person -कुष्ठरोग 
  • Dwarfism -बुटकेपणा 
  • Intellectual Disability -मतिमंद 
  • Muscular Dystrophy -अविकसित मांसपेशी
  • Chronic Neurological Conditions -मज्जासंस्थेचे तीव्र हजार 
  • Multiple Sclerosis -मेंदूतील चेतासंस्था संबंधीच्या हजार 
  • Thalassemia -रक्तसंबंधी कॅन्सर 
  • Hemophilia -रक्तवाहिन्या संबंधी आजार 
  • Sickle Cell Disease -रक्तसंबंधी रक्ताचे प्रमाण कमी असणे 
  • Acid Attack Victim।हल्ल ग्रस्त पीडित 
  • Parkinson's Disease।कंपवात रोग


वरील सर्व दिव्यांग प्र्करातील विद्यार्थी/मुले  हे विशेष गरजा धारक विद्यार्थी/मुले (Children With Special Needs) म्हणून ओळखले जातात. 


विशेष गरजा असणाऱ्या मुलांच्या समस्या.


वैयक्तिक कौशल्य (Personal Skills).


विशेष गरजा असणार्‍या मुलांना स्वतःच्या हाताने व्यवस्थित जेवण करता येत नाही Eating Disorders.तसेच शारीरिक व्यंग असल्याकारणाने या मुलांना स्वतः च्या हाताने जेवण करणे अवघड जाते.तसेच मतिमंद बालकांना मेंदुवर ताबा नसल्याने किती खावे? कसे खावे? काय खावे? हे सुद्धा समजत नाही. 


वर्तन समस्या असणाऱ्या बालकांमध्ये जेवताना कसे जेवण करावे?याबाबत सुसूत्रता नसते.एखाद्या गोष्टीचा हट्ट धरणे,अंध मुलांना स्वतःच्या हाताने न सांगता जेवण करणे अवघड असते. सेरेब्रल पाल्सी मेंदूचा पक्षघात असणारे मूल हे पूर्णपणे झोपून असल्याकारणाने किंवा शरीरावर कुठल्या प्रकारचे नियंत्रण नसल्याने त्यांना स्वतःजेवण करता येत नाही.


स्वमग्न मुले हे स्वतःचे विश्वात रममाण होताना दिसतात.अस्थिव्यंग मुलांना त्यांच्या हलनचलण साठी दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागते. यामध्ये  काही दिव्यांग प्रकार असे आहेत की ते पूर्णतः परावलंबी जीवन जगत असतात. उदाहरणार्थ मेंदूचा पक्षाघात असणारे बालक हे पूर्णपणे परावलंबी असते. यासाठी विशेष थेरपी सेवा कार्यक्रम राबवून त्यांच्यामध्ये बदल करण्यासाठी प्रयत्न केला जातो.


कर्णबधिर मुलांना ऐकायला येत नसल्या कारणाने त्यांचा भाषा व वाचा विकास होत नाही. त्यांना बोलता येत नाही.  इत्यादी वेगवेगळ्या समस्या या विशेष गरजा असणार्‍या मुलांमध्ये आढळून येतात.


सामाजिक कौशल्य.


Autism (स्वमग्न) सारख्या अपंगत्व प्रवर्गातील मुले स्वतःच्या विश्वात रममाण असतात. त्यांना सभोवताली काय घडत आहे? याचे भान नसते.त्यांना भूक लागलेली कळत नाही तसेच त्यांच्यावर सतत लक्ष ठेवावे लागते.त्यांना आपल्या आवडी निवडी समजत नाहीत तसेच एखाद्या गोष्टीवर आपले मत व्यक्त करता येत नाही.त्यांना काही विचारले तर ते वेगळ्याच विषयावर बोलायला सुरवात करतात. म्हणजे बोलण्यात ताळमेळ नसतो. 


विशेष गरजा धारक मुले हे शाळेत प्रवेश घेतल्यानंतर वर्ग डिस्टर्ब करत असतात.कारण त्यांचे राहणे बोलणे वागणे इत्यादी दैनंदिन ऍक्टिव्हिटीज या नॉर्मल विद्यार्थ्यांपेक्षा वेगळे असतात.या मुलांमध्ये काही दिव्यांग प्रकरतील मुले आपले अवधान किंवा लक्ष एका ठिकाणी केंद्रीत करण्यात असमर्थ असतात.विशेष गरजाधारक  काही  मुले हायपर असतात. 


शैक्षणिक कौशल्य.


Learning Disorders शिकण्यात दोष असणे,म्हणजे जसे सर्वसामान्य मुलांची विविध कौशल्य व  शिकण्याचा वेग असतो,त्या पेक्षा विशेष गरजा असणारी मुले मागे पडतात.यांना विशेष मदतीची आवश्यकता असते.त्यातील त्यांचे दोष ओळखून त्यावर उपाययोजना करणे आवश्यक असते.


विशेष गरजा धारक मुलांच्या विकासासाठी पालक व शिक्षक हे महत्वाचे घटक असतात. Learning Disability हा एक दिव्यांग प्रकार असून त्यात गणितातील विशिष्ट संकल्पना न समजणे,उलट सुलट अक्षरे लिहणे,वाचन लेखन न करता येणे,एकच गोष्ट वारंवार सांगावी लागते,इत्यादि.


या मुलांना Special Education किंवा Resource Teacher च्या मदतीने शिकवणे आवश्यक असते.त्यात वेगवेगळ्या शिकवण्याची पद्धत अवलंबून शिकवले जाते.तसेच वेगवेगळ्या शारीरिक व्यंग असणाऱ्या मुलांना शाळेत जाण्यासाठी अडथळे येतात.वेगवेगळ्या साहित्य साधने वापरून त्यांना शाळेपर्यंत पोहविण्यासाठी आवश्यक त्या सुविधा पुरवणे गरजेचे असते.


विशेष गरजा असणाऱ्या मुलांमध्ये वर्तन समस्या असू शकतात.ते स्वतः बरोबर इतरांना इजा करू शकतात.मतिमंद मुले असतील तर त्यांना केअर टेकर आवश्यक असतो.अंध मुले, दिसत नसल्यानं त्यांना शिक्षणातच नाही तर दैनंदिन कौशल्य अविकसित असतात. तसेच मतिमंद बालक मेंदूवर नियंत्रण नसल्याकारणाने त्यांचे स्वतःवर नियंत्रण नसते. 


Behavioral Problems ।वर्तन समस्या.


वर्तन समस्या असणाऱ्या मुलांमध्ये वेगवेगळे प्रकारचे शारीरिक हावभाव करणे. लज्जा उत्पन्न होईल असे वागणे.कितीही संगितले तरी लक्षात न ठेवणे. 


दुसऱ्यांच्या खोडी काढणे.एका ठिकाणी शांत न बसणे.


स्वतःला इजा करणे त्याचबरोबर दुसऱ्यांना इजा करणे. इत्यादी वेगवेगळे विचित्र कृत्य करत असल्याने सर्वसामान्य मुलांसोबत राहणे कठीण होऊन बसते.त्यामुळे या मुलांना खूप त्रास देतो अशा प्रकारच्या टोमणे सतत ऐकावी लागत असतात.


विशेष गरजा असणार्‍या मुलांच्या समस्या कमी करण्यासाठी.


आपल्याला विशेष गरजा असणार्‍या बालकाला कशी मदत करता येईल ? How can you help a special Child यासाठी पालक,शिक्षक,सामाजिक संघटना,समाज,शाळा,संस्था,इत्यादि सर्वांनी सक्रिय होऊन त्यांना येणार्‍या अडचणी जाणून घेऊन सामोरे जाणे आवश्यक असते. विशेष गरजा असणार्‍या मुलांविषयी सकारात्मक दृष्टीकोण (Positive attitude towards children with special needs) ठेवणे आवश्यक आहे. 


विशेष गरजा असणार्‍या पालकांची भूमिका.


विशेष गरजा असणार्‍या मुलांना खूप मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागते म्हणून त्यांना भावनिक आणि मानसिक आधार द्या.एक जबाबदार पालक यांनी आपली जबाबदारी स्वीकारून त्याच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी नेहमी तयार असावे लागते.आपले मूल हे आपल्याला ओझे वाटू नये म्हणून आव्हानाला सामोरे जा,आपल्या मुलाला दिव्यांगत्व आलेले आहे,आपल्याला समाजात नाव ठेवतील हे मनातून काढून टाका. 


सर्वात महत्वाचे म्हणजे आपले मूल हे दिव्यांग आहे हे समजल्यास,त्याचा स्वीकार करा.आपल्या मुलाचा त्यात दोष नाही किंवा आई वडील यांचा दोष नसून दिव्यांगत्व का आले त्याचे कारण शोधा.


ज्यावेळी तुमच्या लक्षात येईल की आपल्या मुलाला दिव्यांगत्व आलेले आहे त्यावेळी जेवढ्या लवकर त्याला वैद्यकीय चाचणी करून उपचार करण्यासाठी प्रयत्न करा. 


काही अपंगत्व हे शश्रक्रिया करून ठीक करता येतात,तर काही औषोधोपचार करून अपंगत्वावर मात करता येते.परंतु त्यासाठी लवकरात लवकर उपाय करणे आवश्यक असते. शक्यतो 6 वर्षाच्या आतील बालकांवर हे उपचार करणे शक्य असते. 


विशेष गरजा असणार्‍या मुलांसाठी शीघ्र हस्तक्षेप Early Intervention कार्यक्रम राबवला तर अपंगत्वावर मात करता येते अथवा अपंगत्व कमी करता येते. 


Role of teacher or school For CWSN Child।शिक्षक किंवा शाळेची भूमिका.


शाळेत येणारे प्रत्येक मूल हे वेगळे आहे.प्रत्येकाची शिकण्याची किंवा कौशल्य आत्मसात करण्याची क्षमता विभिन्न असून प्रत्येकाची गरज ओळखता येणं हे महत्वाचे आहे.


विशेष गरजाधारक  विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी दोन वेगवेगळ्या पद्धती आहेत. There are two different approaches to educating students with special needs.


सर्वसामान्य शाळा।General school.


शाळेत जेव्हा विशेष गरजा असणारे विद्यार्थी प्रवेश घेतात तेव्हा आपली भूमिका ही सर्वांना समान संधी,समान हक्क,भेदभाव विरहित वातावरण राखणे आवश्यक आहे. 


शाळेत शिक्षण घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे आनंदाने आणि आपल्यासमोरील आव्हाने यांचा स्वीकार करा. 


दिव्यांग विद्यार्थ्यांबाबत शिक्षकाने आपली शाळा ही समवेशित शाळा तसेच वर्गशिक्षकांनी आपला वर्ग हा समावेशित वर्ग म्हणून पाहणे आवश्यक असते,तसेच सर्व विद्यार्थ्यांना समान संधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. Support a child with learning difficulty in school शाळेत विशेष गरजधारक विद्यार्थ्यांना सर्वसामान्य विद्यार्थ्यांसोबत शिक्षण हे खूप फायद्याचे ठरते.


भारतात समग्र शिक्षा अभियान ,समवेशित शिक्षण या उपक्रमांतर्गत विशेष गरजाधारक विद्यार्थ्यांना सर्वसामान्य विद्यार्थ्यांसोबत शिक्षण दिले जाते,त्याचबरोबर अडथळविरहित वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो.तसेच समवेशित शिक्षण या उपक्रमांतर्गत विशेष शिक्षकांमार्फत संदर्भ सेवा,साहित्य साधने,अध्ययन अध्यापन संदर्भात मार्गदर्शन केले जात आहे. शासनाने शस्रक्रिया करण्यापासून साहित्यासाधने देण्यासाठी मोफत उपचार केलेले आपण पाहत आहोत. 


विशेष गरजा असणार्‍या दिव्यांग विद्यार्थ्याला शिक्षकांनी अध्ययन शैली Learning Style चा वापर करून अध्यापन केल्यास त्याचा जास्त फायदा हा सर्वसामान्य शाळेत शिकणार्‍या दिव्यांग विद्यार्थ्यांना होतो.


अध्ययन शैली चे प्रकार।Types of study style.


दृश्य अध्ययन शैली,श्राव्य अध्यययन शैली,क्रियात्मक अध्ययन शैली,बहू अध्ययन शैली,स्पर्श अध्ययन शैली. 


  • 1.Visual Learning Style
  • 2.Audio Learning Style
  • 3.Functional Learning Style
  • 4.Multidisciplinary Learning Style
  • 5.Tactile Learning Style.


इतर शाळेतील सर्वसामान्य मुलांसोबत शिकल्याने त्याच्यातील न्युंनगंड कमी होतो.सर्वसामान्य मुलांसोबत शिकण्याची संधी मिळाल्याने त्यांच्यातील सुप्त गुणांचा झपाट्याने विकास होतो.तसेच आपल्यात कोणतीही गोष्ट कमी नाही ही भावना निर्माण होण्यास मदत मिळते. दिव्यांग विद्यार्थ्यांचे सर्वसामान्य शाळेत समावेशन करण्यासाठी शाळेने व वर्गशिक्षकांनी प्रयत्न करणे आवश्यक असते. 


विशेष शाळा।Special School.


विशेष गरजा असणार्‍या दिव्यांग मुलांसाठी वेगवेगळ्या दिव्यांग प्रकारानुसार विशेष शाळा उपलब्ध आहेत. 


जसे कर्णबधिर मुलांना शिक्षण घेण्यासाठी कर्णबधिरांचे विशेष शाळा असते. त्याठिकाणी फक्त कर्णबधिर मुलांनाच प्रवेश दिला जातो.तसेच अंधमुलांसाठी अंधाची विशेष शाळा,मतिमंद मुलांसाठी मतीमंदाची विशेष शाळा अशा प्रकारे त्या त्या शाळेत दिव्यांग प्रकारानुसार विशेष शाळा प्रत्येक ठिकाणी उपलब्ध आहेत. 


विशेष शाळेत सर्वसामान्य विद्यार्थ्यांसोबत शिकण्याची संधि मितल नाही. त्याठिकाणी दिव्यांग प्रकारानुसार विशेष प्रशिक्षित शिक्षक असतो. Resource Teachers असे आपण त्यांना म्हणतो किंवा Special Teachers असेही म्हणतो. मराठीत विशेष शिक्षक म्हणतात. 


विशेष शाळेत या मुलांना त्यांच्या गरजा ओळखून शिक्षण दिले जाते. 


अपंगत्वाविषयी समाजाची भूमिका .


समाजात विविध संस्था ,संघटना,तसेच लोकप्रतिनिधी इत्यादि सर्व घटकांनी दिव्यांग व्यक्तीकडे लक्षं देणे गरजेचे आहे,त्यांना समाजात सन्मानाने कसे जिवण जागता येईल या दृष्टीने प्रयत्न करने अपेक्षित आहे. 


आपण समाजात वावरत असताना अनेक ठिकाणी विशेष गरजा धारक मुलांशी संपर्क येतो.अशा वेळी आपण या मुलांना समजून घेतले पाहिजे. 


दिव्यांग हे सुधा समाजाचा घटक असून त्यांना सुद्धा सन्मानाने जागता यावे ही समाजाची भूमिका असावी. त्यांच्या अपांगत्वाचा स्वीकार समाजाने करून त्यांना सशक्त करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे अपेक्षित असते. 


विशेष गरजा असणार्‍या मुलांकडे सर्वसामान्य मुलांप्रमाणे पाहण्याचा दृष्टीकोण असावा,त्यांच्याविषयी सहानुभूती आणि प्रेम व आदर असावा.


सार्वजनिक ठिकाणी त्यांना प्राधान्य असावे. येणार्‍या अडथळा दूर करण्यासाठी समाजाने प्रयत्न करावेत. 


अनेक ठिकाणी गर्दी च्या ठिकाणी त्यांना प्रथम प्राधान्य द्यावे व दिव्यांग व्यक्तीसाठी असलेले शासनांचे कायदे व नियम तसेच सवलती त्यांना देण्यासाठी प्रयत्न व त्या नियमांचे पालन करणे आवश्यक आसते. जेणेकरून दिव्यांग व्यक्तींना न्याय मिळेल. 

Join : Whats App Channel (medium-bt)

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने