भूगोल म्हणजे काय? What is Geography?

भूगोल म्हणजे काय?

भूगोल म्हणजे काय?What is Geography? 



भूगोल म्हणजे काय?What is Geography-वाचन मित्र?
भूगोल


Table Of Content:
Table Of Content(toc)


भूगोल या विषयाशी निगडीत नेहमी विचारले जाणारे प्रश्न म्हणजे भूगोल म्हणजे काय भूगोलाचे स्वरूप स्पष्ट करा. भूगोल म्हणजे काय व्याख्या मराठी, bhugol mhanje kay,तर या लेखाच्या माध्यमातून भूगोल विषयी संविस्तार माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.भूगोल हे शास्त्रांचे शास्त्र समजले जाते.


भूगोलात अणु पासून ब्रह्मांड पर्यंत घटक व घटनांचा शास्त्रीय अभ्यास करण्यात येतो. विविध विषयांची सखोल माहिती प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष या विषयाची जोडलेली असते. भूगोला शिवाय मानवाची ओळख अशक्य समजली जाते.प्राचीन काळापासून भूगोल अभ्यासला गेला आहे. 


मानवाची जिज्ञासा पूर्ण करणारा हा विषय असून,रूरुतीच्या काळामध्ये मानवाचे जीवन भटक्या स्वरुपाचा असल्याने, भूगोल विषय केवळ स्थळ नामावली म्हणून ओळखला जात असे. त्यानंतर काही कालावधीनंतर शेतीची माहिती झाल्यावर मानवी जीवनाला काही अंशी स्थिरता लाभली. त्यामुळे भूगोल विषयास विवरणात्मक आणि वितरण आत्मकथा स्वरूप प्राप्त झाले. परंतु या वितरणाच्या अभ्यासात वर्णनावर जास्त भर होता.कालांतराने पुढे मानवाने विकास केल्यावर भूगोलात वेगवेगळ्या नैसर्गिक घटकांबरोबरच मानवी घटकांचाही शास्त्रीय व संख्यात्मक दृष्टीने अभ्यास समाविष्ट झाला. 


विविध विषय व घटनांमधील कार्यकारण संबंधाचा विचार आणि अभ्यास केला जाऊ लागला.मराठीतील भूगोल हा शब्द संस्कृत भाषेमधून जशाच्या तसा घेतला आहे भूगोल म्हणजे पृथ्वीचा गोल हा शब्द भूगोलाचा अभ्यास या अर्थाने सुद्धा वापरला जातो. 

 

🎯भूगोलाची व्याख्या

भूगोल म्हणजे काय व्याख्या,भूगोलाच्या वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. 


1.Vidal de la blanche - 

स्थळाचा वैज्ञानिक अभ्यास म्हणजे भूगोल होय.


2.Bowman- 

कोठे काय आहे?ते का आहे? ते कशाने बनले आहे?हे सांगणारा विषय म्हणजे भूगोल होय.


 3.Marthe- 

भूगोल हे वितरणाचे शास्त्र आहे.


 4.Karl Sauer- 
भूगोल हा क्षेत्राचा अभ्यास आहे.ज्यात विशिष्ठ क्षेत्राला घटक मानून अभ्यास केला जात नाही तर स्थानामधील समानता आणि पुनरावृत्ती अभ्यासली जाते त्यामुळे सामान्यीकरणास चालना मिळते.


5.Alfred Gertner- 

पृथ्वीच्या पृष्ठभागावरील विविध भागाशी सबंधित घटकातील भिन्नतेचा अभ्यास भूगोल विषयात केला जातो.


 6.Welpton- 

मानवाचे घर म्हणून पृथ्वी चा अभ्यास म्हणजे भूगोल होय.


 7.Jemes Fairgrieve- 

भूगोल म्हणजे पृथ्वीचे वर्णन होय.


 8.F.J.Monkhouse- 

संपूर्ण पृथ्वी हे मानवाचे घर असून त्या पृष्ठभागावरील विविध अभीक्षेत्रीय घटकांचा व मानवाच्या परस्पर संबंधाचा अभ्यास म्हणजे भूगोल होय.  


9.Merriam Webster Dictionary- 

भूगोल असे एक शास्त्र आहे जे पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या विविध भौतिक, जैविक आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांचा वर्णन, वितरण आणि आंतरक्रियाशी संबंधित आहे .


10.Immanuel Kant - 

अभीक्षेत्रीय भिन्नतेचा अभ्यास म्हणजे भूगोल होय.


11.अलेक्झांडर वॉन हम्बोल्ट - 

"भूगोल हे अभी क्षेत्रीय वितरणाचे शास्त्र आहे" 



12.फर्डिनांड वान रिखतोफेन-  

भूपृष्ठ व त्याच्याशी संबंधित वैशिष्ट्यांचे शास्त्र म्हणजे भूगोल होय.


पृथ्वीपृष्ठभागाचा व त्यावर निवास करणाऱ्या घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे भूगोल होय. 

थोडक्यात भूगोल म्हणजे पुढील तीन घटकांचा शास्त्रीय अभ्यास होय. 

 


1.स्थान - 

2.प्रादेशिक आकृतिबंध /स्वरूप - 

3.पर्यावरणीय संबंध -


🎯भूगोलाच्या प्रमुख शाखा -

भूगोल विषयामध्ये निसर्ग व मानव या दोन महत्त्वाच्या घटकांचा समावेश होतो.त्यामुळे भूगोलाच्या प्राकृतिक भूगोल व मानवी भूगोलाच्या दोन मुख्य शाखा पडतात.काळानुसार विस्तारणाऱ्या अभ्यास क्षेत्रांचा सविस्तर अभ्यास करण्यासाठी प्राकृतिक भूगोल व मानवी भूगोल या प्रमुख शाखांमध्ये वेगवेगळ्या उपशाखा निर्माण झालेल्या आहेत.आंतरराष्ट्रीय स्तरावर भूगोल च्या मान्यताप्राप्त शाखांची संख्या 80 ते 90 इतकी असली तरी प्रत्यक्षात भूगोलाच्या शाखा 100 पेक्षा जास्त आहेत.


☀प्राकृतिक भूगोल म्हणजे काय -

प्राकृतिक भूगोल ही भूगोलाची अतिप्राचीन व विकसित शाखा आहे. या शाखेमध्ये नैसर्गिक घटक व घटनांचा वैज्ञानिक पद्धतीने किंवा शास्त्रीय दृष्टीने अभ्यास केला जातो.


🎯प्राकृतिक भूगोलाच्या शाखा -

💡खगोलीय भूगोल

💡भूरूपशास्त्र

💡हवामान शास्त्र

💡वातावरण शास्त्र

💡जलशास्त्र

💡सागरी भूगोल

💡भूगर्भशास्त्र

💡मृदा भूगोल

💡पर्यावरण भूगोल

💡जैव भूगोल


📍मानवी भूगोल -

मानवी भूगोल ही भूगोलाची आधुनिक व वेगाने विकसित होणारी शाखा आहे. या शाखेत मानवी उत्क्रांती विकास, आर्थिक क्रिया, सामाजिक व सांस्कृतिक वैशिष्ट्य पद्धतशीररीत्या अभ्यासली जातात .

🔰मानवी भूगोलाच्या शाखा -

✔मानव वंश भूगोल

ऐतिहासिक भूगोल

सांस्कृतिक व राजकीय भूगोल

सामाजिक व आर्थिक भूगोल

वस्ती भूगोल

लोकसंख्या भूगोल

आरोग्य भूगोल

लष्करी भूगोल


🎯प्राकृतिक भूगोल म्हणजे काय?What is Physical Geography?

प्रस्तावना- 

प्राकृतिक भूगोल म्हणजे प्रकृती संदर्भातील अभ्यास, या अभ्यासामध्ये हवामान, डोंगररांगा, धबधबे, अभयारण्य, नदीप्रणाली, मृदा, महासागर, पर्वत, निसर्गनिर्मित घटकांचा अभ्यास प्राकृतिक भूगोल यामध्ये करण्यात येतो. प्राकृतिक भूगोल यामध्ये विविध प्रश्नांची उकल होते. प्राकृतिक भूगोल हे भूगोल शास्त्राची एक मूलभूत शाखा असून, पृथ्वीच्या नैसर्गिक वैशिष्ट्यांचा त्यामध्ये अभ्यास करणे या शाखेचा मुख्य उद्देश असतो. 


या शाखेत प्रामुख्याने शिलावरण, जलावरण, वातावरण आणि जीवावरण याच्यावर यांचा समावेश केला गेला असून, मानवाची जीवनपद्धती व कार्य तसेच नैसर्गिक घटकांशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध असतो. त्यामुळे कोणत्याही प्रदेशातील मानवी जीवन अभ्यासण्यासाठी किंवा निसर्गाचा अभ्यास करण्यासाठी प्राकृतिक भूगोलाचे ज्ञान महत्त्वाचे असते. 



भूगोल हा विषय मुळातच ज्ञानरुपी वृक्ष आहे. याच्या वेगवेगळ्या उपशाखा पडतात. प्राकृतिक भूगोलाची वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. 


निल - 

"प्राकृतिक भूगोल म्हणजे भूपृष्ठाची निगडित असलेल्या नैसर्गिक घटकांचा अभ्यास होय." 

स्ट्रालर- 

"विविध नैसर्गिक किंवा पृथ्वी शास्त्रांचा वर्णनात्मक अभ्यास म्हणजे प्राकृतिक भूगोल होय." 


वेबस्टर शब्दकोष- 

"बाह्य प्राकृतिक घटक आणि पृथ्वीवरील भूमी, जलाशय व हवा यातील बदलांचा अभ्यास करणारी भूगोलाची शाखा म्हणजे प्राकृतिक भूगोल होय ." 


ऑर्थर होम्स-

"प्राकृतिक पर्यावरणाचा अभ्यास म्हणजे प्राकृतिक भूगोल असून त्यामध्ये भूपृष्ठ समुद्र व महासागर आणि वातावरणाचा अभ्यास समाविष्ट होतो ." 


इतर काही व्याख्या- 


 "भूपृष्ठावरील विविध वैशिष्ट्यांचा भूरूपे यांचा व त्यांच्या क्षेत्रीय वितरणाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे प्राकृतिक भूगोल होय." 


"प्राकृतिक भूगोल म्हणजे पृथ्वीवरील नैसर्गिक पर्यावरणाचा सुसंगत अभ्यास होय."


 "भूपृष्ठरचना, हवामान, जलाशय, मृदा ,वनस्पती, प्राणी यासारख्या नैसर्गिक घटकांचा व शास्त्रीय दृष्टिकोनातून केलेला अभ्यास म्हणजे प्राकृतिक भूगोल होय." 


💡पायाभूत विषय- 

प्राकृतिक भूगोलाच्या स्वरूपामध्ये पायाभूत विषय हा घटक खूप महत्त्वाचा असून, त्यामध्ये भूरूपे हवा पाणी मृदा खानिजे वनस्पती प्राणी इत्यादी नैसर्गिक घटकांवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या मानवाच्या गरजा त्यामध्ये अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा आर्थिक क्रिया अवलंबून असतात. प्राकृतिक भूगोलात या मूलभूत नैसर्गिक घटकांची निर्मिती व त्यांच्यातील परस्पर संबंध शास्त्रीय पद्धतीने अभ्यासले जातात. त्यामुळे प्राकृतिक भूगोल हा पायाभूत विषय असून प्राकृतिक भूगोल हा भूगोलाचा आत्मा आहे. त्याशिवाय भूगोलाचा अभ्यास करणे अशक्य असते. 


💡गतीमान शास्त्र- 

नैसर्गिक पर्यावरणातील वेगवेगळ्या घटकांमध्ये स्थळ व काळानुसार भिन्नता आढळून येते. काही घटकांमध्ये स्थायी तर काही घटकांमध्ये सतत बदल होत असतात . या बदलांचा प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासात समावेश होत असतो. तसेच पृथ्वीवर घडणाऱ्या वेगवेगळ्या घटना भूकंप व ज्वालामुखी ,चक्रीवादळे यासारख्या घटनांचाही प्राकृतिक भूगोलात अभ्यास केला जातो त्यामुळे प्राकृतिक भूगोल एक गतिमान व काळानुसार बदलणारे शास्त्र आहे . 


💡नैसर्गिक शास्त्र- 

प्राकृतिक भूगोलमध्ये निसर्गनिर्मित वेगवेगळ्या घटनांमधील कार्यकारण भाव समजून घेतले जाऊन, त्यामध्ये निरीक्षण व अनुभवावर आधारित वेगवेगळे सिद्धांत तयार केले जातात. त्यांची प्रत्यक्ष पडताळणी करून त्या आधारे नैसर्गिक घटनांविषयी पूर्वानुभव केले जातात. पूर्वानुमान केले जातात. प्राकृतिक भूगोल आदर्शवादी नसून वास्तववादी नैसर्गिक शास्त्र आहे . 


💡विद्याशाखेय शास्त्र - 

या शास्त्रामध्ये घटक अभ्यासताना इतर नैसर्गिक व सामाजिक शास्त्रांची जवळचा संबंध येत असतो. प्राकृतिक भूगोल हे देखील एक आंतरविद्याशाखीय शास्त्र आहे. कारण प्राकृतिक भूगोलाचा रसायनशास्त्र ,जीवशास्त्र ,भूगर्भशास्त्र ,भौतिकशास्त्र इत्यादी जवळचा संबंध येतो . उपयोजित शास्त्र बदलत्या काळात प्राकृतिक भूगोलातील वेगवेगळ्या ज्ञानाचा पर्यावरणीय समस्या सोडवण्यासाठी उपयोग होतो. नैसर्गिक आपत्ती मध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली किंवा सुनामी पूर्वसूचना बाबत रस्ते, रेल्वे, लोहमार्ग, धरणे ,वनीकरण विकासाच्या योजना तयार करण्यासाठी प्राकृतिक भूगोलाचे ज्ञान दिशादर्शक ठरते. त्यामुळे प्राकृतिक भूगोल हे उपयोजित शास्त्र आहे.


💡मानवाशी निगडित शास्त्र -

प्राकृतिक भूगोल मध्ये नैसर्गिक घटक व पर्यावरणीय अभ्यासाबरोबर मानवाशी निगडित असणाऱ्या काही गोष्टी आहेत. त्यामुळे मानवास त्याचा फायदा झाला आहे.

💡उपयोजितशास्त्र -

आलिकडील काळात आपण पाहतो आणि अनुभवतो आहोत की मानवावर अनेक नैसर्गिक संकटे येत आहेत,त्यात महापूर,अतिवृष्टी,भूकंप,ज्वालामुखी,वादळे, इ. याचा अंदाज  व उपाययोजना करण्याच्या दृष्टीने प्राकृतिक भूगोल हे खूप महत्त्वाचे असते.त्यामुळे प्राकृतिक भूगोल हे उपयोजित शास्त्र आहे .

प्राकृतिक भूगोल व पृथ्वी प्रणाली Earth system

प्राकृतिक भूगोल व पृथ्वी प्रणाली Earth system


🎯जीवावरण,वातावरण,जलावरण,शिलावरण

प्राकृतिक भूगोल व पृथ्वी प्रणाली-जीवावरण,वातावरण,जलावरण,शिलावरण -Earth system
 पृथ्वी प्रणाली


मानव आणि त्यांच्या सभोवतालचे नैसर्गिक घटक हवा, पाणी, जमीन, वनस्पती आणि प्राणी यांच्यातील परस्पर संबंधाचा अभ्यास प्राकृतिक भूगोल मध्ये केला जातो व प्राकृतिक भूगोलाच्या व्याप्तीमध्ये शिलावरण, जलावरण, वातावरण आणि जीवावरण या चार प्रमुख आवरणांचा समावेश होतो. यावर आवरणांना प्राकृतिक भूगोलाच्या अंगे म्हणतात.


पृथ्वीच्या प्रणाली याविषयी माहिती घ्यायची असेल तर "प्रणाली" हा शब्द खूप जटिल असून, तो अनेक लहान भागांद्वारे चालणाऱ्या एकत्रित कार्यासाठी वापरला जातो. प्रणालीच्या एखाद्या भागातील बदल किंवा बिघाड झाला तर त्याचा परिणाम इतर भागांवर होतो. म्हणूनच संपूर्ण प्रणालीला देखील तो प्रभावित करू शकतो. पृथ्वीसुद्धा हा काही वेगळा घटक नसून पृथ्वीसुद्धा एक गतिशील आणि एकात्मिक प्रणाली आहे.


या ठिकाणी प्रणाली शब्द वापरण्याचा उद्देश म्हणजे सर्व घटक एकमेकांवर अवलंबून असतात. पृथ्वी प्रणाली ही संकल्पना पृथ्वीच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक प्रक्रियांच्या आंतरक्रिया साठी वापरले जाते. पृथ्वीचे प्रमुख चार भागांमध्ये जर अभ्यास करायचा असेल तर शिलावरण वातावरण ,जीवावरण आणि जलावरण या चार भागाचा अभ्यास करणे सोयीचे ठरेल. पृथ्वी प्रणाली ही संपूर्णतः जीवावरण,वातावरण,जलावरण, शिलावरण या चार घटकांवर अवलंबून आहे.




🎯जीवावरण म्हणजे काय?


सजीव सृष्टीचे अस्तित्व असलेल्या पृथ्वीच्या भागाला "जीवावरण" म्हणतात. 

 

जीवावरणाचा विस्तार वरपासून खालीपर्यंत सुमारे वीस किलोमीटर मानला जातो. तरी बहुतांशी सजीव समुद्रसपाटीपासून सहा किलोमीटरवर उंचीपर्यंत आणि महासागर व पृष्ठभागापासून सुमारे पाचशे मीटर खोलीपर्यंत आढळून येतात. जीवावरण यामध्ये मुख्यतः प्राणी, वनस्पती, मानव यांचा समावेश व सभोवतालच्या नैसर्गिक पर्यावरणातील विविध क्रिया प्रक्रियांचा अभ्यास केला जातो. 


तसेच प्राणी व वनस्पती चे प्रकार त्यांचे वितरण व त्यांच्यावर पडणारे प्रभाव यांचा अभ्यास पर्यावरणीय व आर्थिक दृष्ट्या महत्वाचा मानला जातो .जीवावरणचे हे मुख्य घटक असून त्याचा अभ्यास करणे आवश्यक असते.जिथे आपण आपले वास्तव्य करतो म्हणजेच यामध्ये मानव, प्राणी, वनस्पती इतर सजीव यांचा समावेश होतो. वनस्पती, मानव व प्राणी यांना जगण्यासाठी ऑक्सिजन व अन्न पुरवतात. प्राणीदेखील मानवांसाठी व इतर प्राण्यांसाठी अन्नाचा एक महत्त्वाचा स्रोत आहे. जीवावरणामध्ये अन्नसाखळी हा एक महत्त्वाचा घटक असून सर्व सजीव एकमेकांवर अवलंबून असतात, हे आपल्या लक्षात येते.


💡जीवावरणाची वैशिष्टे- 

जीवावरणाला अतिशय लघु तरंगलांबीच्या सौर प्रारणाशिवाय दीर्घ तरंग लांबीचे प्रारण मिळते. त्यामुळे प्रकाश संश्लेशन क्रिया वनस्पति करतात व  ऑक्सीजन तयार होण्यास मदत मिळते. पृथ्वीवरील सजीव सृष्टी जीवंत राहण्यासाठी याचा महत्वाचा वाटा आहे. जीवावरणात पाणी हा महत्वाचा घटक असल्याने त्यामुळे सर्वच सजीवांची जडण घडण पाण्यामुळे होते. या आवरणात द्रव घन व वायु आणि वायु द्रव वस्तु विभागणारी आंतरे पृष्ट अस्तीत्वात आलेले असतात. सुक्ष जीवजंतु यांच्या वसाहती विशुद्ध असलेल्या पाण्यात आढळून येतात. 


🎯वातावरण म्हणजे काय?


"पृथ्वीभोवतालच्या हवेच्या आवरणास "वातावरण" असे म्हणतात. "

 

वातावरनात वायू ,बाष्प, धूलिकण ,हवेचा दाब, आद्रता, वृष्टीचे प्रकार ,ढगांचे प्रकार ,हवेचे तापमान, वारे व वाऱ्याचे प्रकार तसेच वायुराशी व तिचे प्रकार हवा व हवामान विषय घटकांचा अभ्यास  केला जातो.


पृथ्वी सभोवतालच्या हवेच्या आवरणामध्ये म्हणजेच वातावरणामध्ये ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड ,नायट्रोजन हायड्रोजन  इत्यादी जीवनासाठी आवश्यक असलेले घटक आहेत. वातावरणाचे वरील जे थर असतात ते जीवनातील सजीवांची अतिनील किरणांपासून रक्षण करत असतात. उष्णतेचे शोषण व उत्सर्जन करतात. त्यामुळे औष्णिक संतुलन साधले जाते. जलचक्र कार्यरत राहते.


💡वातावरणाचे स्तर -  


1. तपांबर -


भूपृष्ठापासून 13 किलोमीटर उंची पर्यंत हवेच्या थराला "तपांबर" असे म्हणतात. 


तपांबराची विषुववृत्त वरील जाडी जवळजवळ 16 किलोमीटर असून ध्रुवावर ती सहा किलोमीटरच्या दरम्यान असते. समुद्रसपाटीपासून जसे उंच जावे तसे तापमान कमी होत जाते. या कारणामुळे समुद्रसपाटीपासून उंच ठिकाणी थंड हवेचे ठिकाणे निर्माण झालेली आपण पाहतो. 


या थरामधील हवेत खालील वेगवेगळे प्रकारचे वायू आढळून येतात.1.नायट्रोजन 2.ऑक्सिजन 3.कार्बनडाय-ऑक्साइड 4.ऑरगन वायू 5.पाण्‍याची वाफ, 6.धूळ व इतर घटक 7.हायड्रोजन


2. तपस्तब्धी -


जमिनीपासून जवळजवळ दहा किलोमीटरच्या उंचीपर्यंतच्या वातावरणाच्या तापमानात सतत घट होत जाते ,त्यामुळे तीन किलोमीटरच्या थरातील तापमानात कोणताही बदल होत नसल्यामुळे वातावरणाचा हा तर स्थिर तापमानाचा स्थर म्हणून ओळखला जातो या थराला "तपस्तब्धी" असे म्हणतात.


3. स्थितांबर -

तपस्तब्धीनंतर वातावरणाच्या या थराला सुरुवात होते. स्थितंबराच्या या भागाची जाडी जवळजवळ पंधरा ते पन्नास किलोमीटर पर्यंत असते. या थरातील सुरुवातीच्या 32 ते 40 किलोमीटर उंचीच्या भागात तापमान एक सारखेच आढळून येते. स्थितांबर मध्ये खालील तर आढळून येतात.

✔ओझोनोस्पिअर - 

स्थितांबर याच्या खालच्या भागात ओझोन वायूचा थर असून हा स्तर "ओझोनोस्पियर" या नावाने ओळखला जात असून, या थरांमध्ये सूर्यापासून आलेली अल्ट्राव्हायोलेट किरणे शोषली जातात .

मध्यांबर - 

स्थितांबर याचा वर "मध्यांबर" असून या भागात तापमानाचे प्रमाण सर्वात कमी आहे.

आयनांबर -

 मध्यांबराच्या पलीकडील हवेच्या भागास "आयनांबर" म्हणतात. या थराची जाडी 80 ते 500 की मी पर्यंत आहे. या भागात हवेचे अत्यंत विरळ असून सूर्यापासून आलेल्या अल्ट्रावायलेट किरणांची हवेच्या अनुवर प्रक्रिया होऊन तेथे आयनांबर निर्माण झालेला असतो यामध्ये खालील स्तर आढळतात .

ई लेअर

या थरातील शंभर ते दोनशे किलोमीटरचा भाग "ई लेअर" म्हणून ओळखला जातो.

एफ लेअर

त्यानंतर चा थर "एफ लेअर" म्हणून ओळखला जातो.यातून रेडिओ लहरी प्ररवर्तीत होतात.


3 बाह्यांबर

आयनंबरच्या पलिकडील हवेच्या भागास "बाह्यांबर" म्हणतात. या थरात उंचीनुसार तापमान वाढत जात असते या भागात हायड्रोजन सारखे हलके वायूचे अस्तित्व आढळून येते.


🎯जलावरण म्हणजे काय? 


पृथ्वीवरील पाण्याच्या अस्तित्वास "जलावरण" असे म्हणतात.


जलावरण ने जवळजवळ 70.0%भाग व्यापला असून त्यात महासागर,हिमनद्या,नद्या,सरोवरे,समुद्र,भूमिजल,बर्फ इ घटकांचा समावेश होतो.या मध्ये प्रामुख्याने समुद्र, महासागर ,वितरणाचा अभ्यास समाविष्ट केला गेलेला आहे .त्याचबरोबर सागर जलाचे तापमान ,सागर जलाची क्षारता ,घनता ,सागरी हालचाली ,सागर तळ रचना, सागरी निक्षेप इत्यादी भौतिक व रासायनिक गुणधर्मांचा अभ्यास करून त्यातील  कारणमीमांसा केली जाते.पृथ्वीवरील सर्व अवस्थेतील पाण्याचा सर्व आवरणाचा समावेश होतो. 


नद्या नाले ,सरोवरे, समुद्र ,महासागर, जलावरण याचे प्रमुख भाग असून पृथ्वीवरील हिमनद्या पाण्यामुळे तयार झालेल्या आहेत. सर्व सजीवांचे अस्तित्व पाण्यावरच अवलंबून आहे .कारण पाणी पिण्यासाठी निर्मितीसाठी आवश्यक असते. पाणी, जल, वाहतूक व जलविद्युत निर्मितीसाठी सुद्धा उपयुक्त असते.


🎯शिलावरण म्हणजे काय?

पृथ्वीवरील भुजन्य घनरूप पदार्थांचे आवरणास "शिलावरण" असे म्हणतात. किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून शंभर किलो मीटर खोलीपर्यंत च्या भागात शिलावरण म्हणतात.


शिलावरणात भूकवच, पृथ्वीचे अंतरंग, भूकंप व ज्वालामुखी, प्रस्तरभंग ,वलीकरण, प्राथमिक श्रेणीची भूरूपे बाह्य शक्तींचे कारकांचे खनन ,वहन व संचयन कार्य भूपृष्ठ उतार ,भूकवच इत्यादी घटकांचा अभ्यास केला जातो. शिलावरण हे पृथ्वीचा खडक व खनिजे यांनी बनलेला भाग म्हणजे शिलावरण होय.पृथ्वीचा पृष्ठभाग आसमान आहे कारण पर्वत,मैदान,दरी,पठार,महासागर अशा विविध रूपांचा समावेश होतो.


शिलावरण ज्वालामुखी, भूकंप प्रस्तरभंग, विदारण व पुष्टी या क्रिया घडत असतात. शिलावरनातील मृदेचा थर सजीवांना विविध पोषक घटक उपलब्ध करून देतो.त्यामुळे विविध सजीवांना आधार प्राप्त होऊन परिसंस्था विकसित होतात. मानवाला शेती करणे शक्य होते. तसेच शिलावरण यामधूनच मानवाला विविध खनिजे व जीवाश्म इंधने उपलब्ध होतात.


नवीन नवीन पोस्ट्स मिळवण्यासाठी आमचा What's app group join करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने