विशेषण।Visheshan In Marathi.
विशेषणाची व्याख्या:
नामा बद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला "विशेषण" असे म्हणतात.
विशेषणाचे प्रकार किती व कोणते?
विशेषणाचे एकूण 6 प्रकार आहेत ते खालीलप्रमाणे.
- गुणवाचक विशेषण.
- संख्यावाचक विशेषण.
- गणवाचक संख्या विशेषण.
- आवृत्तीवाचक संख्या विशेषण.
- पृथकवाचक संख्या विशेषण.
- सार्वनामिक विशेषण.
विशेषण म्हणजे काय?
विशेषणाची व्याख्या:
नामा बद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला "विशेषण"असे म्हणतात.
विशेषणाचे उदाहरणे:
या वाक्यामध्ये कुत्रा कसा आहे ,याबद्दल विशेष माहिती देणारा शब्द आहे ,काळा तर ,"काळा" हे विशेषण म्हणून वापरण्यात आलेले आहे.कारण ते नामाबद्दल विशेष माहिती सांगतो.
- प्रिया ही एक हुशार विद्यार्थिनी आहे.
वरील वाक्य मध्ये प्रिया कशी विद्यार्थिनी आहे,या बद्दल विशेष माहिती देण्यात आली आहे. म्हणजेच नामाबद्दल विशेष माहिती देण्यासाठी "हुशार" हे विशेषण वापरण्यात आलेले आहे.
विशेषणाचे प्रकार किती व कोणते?
1.गुणवाचक विशेषण
एखाद्या वाक्यामध्ये नामाचा विशेष गुण दाखवण्यासाठी विशेषणाचा उपयोग केला जातो त्याला "गुणवाचक विशेषण" असे म्हणतात.
- अभिषेक खूप धाडसी मुलगा आहे.
वरील वाक्यात "धाडसी" हे गुणवाचक विशेषण वापरण्यात आले आहे.
2.संख्यावाचक विशेषण म्हणजे काय?
व्याख्या:
एखाद्या वाक्यामध्ये नामाची संख्या दर्शवण्यासाठी ज्या विशेषणाचा उपयोग केला जातो त्याला "संख्यावाचक विशेषण" म्हणतात.
यामध्ये उपप्रकार पडतात क्रमवाचक संख्या विशेषण म्हणजे पहिला,दुसरा,दहावा,बारावा इत्यादी विशेषणांचा वापर केला जातो.
3.गणवाचक संख्या विशेषण म्हणजे काय?
गनसंख्यावाचक विशेषणामध्ये सात पन्नास-शंभर इत्यादी विशेषणाचा समावेश होतो.
4.आवृत्तीवाचक संख्या विशेषण म्हणजे काय?
यात दुप्पट चौपट इत्यादी विशेषणाचा समावेश होतो
5.पृथकवाचक संख्या विशेषण म्हणजे काय?
पृथकवाचक संख्या विशेषणयामध्ये वापरलेल्या शब्दाचा अर्थामधून एक वेगळेच अर्थाचा बोध होतो.
6.सार्वनामिक विशेषण म्हणजे काय?
मराठीतील कोणत्याही सर्वनामा पासून तयार होणाऱ्या विशेषणाला "सार्वनामिक विशेषण" असे म्हणतात.
क्रियाविशेषण अव्यय व त्याचे प्रकार:
व्याख्या:
क्रियापदाची विशेष माहिती सांगून क्रियापदाची व्याप्ती मर्यादीत करणाऱ्या शब्दाला "क्रियाविशेषण अव्यय" असे म्हणतात.
ज्याप्रमाणे विशेषण हे नामाबद्दलची विशेष माहिती देत असते, त्याच प्रमाणे क्रियाविशेषण हे क्रियापद बद्दल विशेष माहिती देते. क्रियाविशेषणाचे अव्ययाचे प्रमुख दोन प्रकार पडतात.क्रियाविशेषण अव्ययाचे स्वरूपावरून पडणारे प्रकार स्वरूपावरून पडणारे प्रकार पुढीलप्रमाणे.
1.सिद्ध क्रियाविशेषण अव्यय:
काही मूळ शब्द क्रियाविशेषण असतात,त्यांना "सिद्ध क्रियाविशेषण" असे म्हणतात.
क्रियाविशेषण अव्ययाचे काही उदाहरणे पुढील प्रमाणे.
- आम्ही येथे थांबतो.
- तू मागे गेला. तो पुढे गेला.
- तू पुढे पळ.
2.साधित क्रियाविशेषण अव्यय:
नाम,विशेषण,क्रियापद,शब्दयोगी अव्यय यांच्यापासून झालेल्या क्रियाविशेषण यांना "साधीत क्रियाविशेषण" असे म्हणतात.
साधितक्रियाविशेषण दोन भागात विभागणी होते.
1.नामसाधित
रात्री,दिवस,आज,सकाळी,व्यक्तीच्या वस्तूत:
2.सर्वनामसाधित
त्यामुळे,यावरून,अनेकदा ,
3.विशेषणसाधित
मोठ्याने,एकत्र,एकदा,
4.धातुसाधित
खेळताना,हसू,झोपताना,रडताना ,
5.अव्ययसाधित
तिकडून, खालून, कुठून ,तिकडून,
6.प्रत्यायसाधित
मनपूर्वक ,कालानुसार, शास्त्रदृष्ट्या
उदा
- तो दिवस आला.
- मी त्यांना व्यक्तीश: भेटलो.
- तो कित्येकदा खोटे बोलला.
- तू हसताना छान दिसतोस.
- तिने सर्व हसून सांगितले.
2.सामासिक क्रिया विशेषण अव्यय व त्याचे प्रकार
काही जोड शब्द किंवा सामासिक शब्द क्रियाविशेषण अव्यययाचे काम करतात.अशा दोन शब्दांना "सामासिक क्रियाविशेषण" अव्यय म्हणून ओळखले जाते.
उदा.गावोगाव,समोरासमोर,यथाशक्ती,दररोज,गैरकारभार इ.
- आज राजू वर्गात गैरहजर आहे.
- पाऊस दररोज पडतो.
- विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करतात.
अर्थावरून
1.कालदर्षक क्रियाविशेषण अव्यय-
वाक्यातील क्रिया केव्हा घडली हे दर्शविणारा शब्दांना कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात.
उदा.
- मी आज शाळेत गेलो होतो.
- मी उद्या मुंबईला जाईल.
- तुम्ही कधी ये.
2.सातत्य दर्शक क्रियाविशेषण अव्यय -
वाक्यातील क्रियेचे सातत्य दर्शवणारे शब्दांना "सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय" म्हणतात.
उदा.
- येणार आहात ?
- रात्री लग्न झाले.
- अमित आजकाल अभ्यास करत नाही.
- पोलिसांनी अद्याप चोराला पकडले नाही.
- धबधबा सतत कोसळत होता.
3.आवृत्ती दर्शक क्रियाविशेषण अव्यय -
वाक्यात घटनेची पुनरावृत्ती दर्शवणाऱ्या शब्दांना "आवृत्ती दर्शक क्रियाविशेषण अव्यय" म्हणतात.
उदा.
- सीता वारंवार मंदिरात जाते.
- राजू क्षणोक्षणी चुकत असतो.
- तुम्ही रोज पुन्हा तोच मुद्दा उपस्थित करत असतात.
- राजू वारंवार आजारी पडतो.
स्थलवाचक क्रिया विशेषण अव्यय व त्याचे प्रकार
वाक्यातील ज्या क्रियाविशेषणाचाद्वारे क्रियेचा स्थळाचा किंवा ठिकाणाचा बोध होतो, अशा अव्ययाला "स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय" असे म्हणतात.
स्थल वाचक क्रियाविशेषण अव्यय याचे दोन प्रकार पडतात.
अ.स्थितीदर्शक
- तो खाली बसला.
- मी अलीकडेच थांबलो.
- मी येथे उभा होतो.
- जिकडे तिकडे पाऊस सुरू आहे.
ब.गतिदर्शक
- बॉल दूर गेला.
- घरी जाताना तिकडून ये.
- झाडीतून जाताना पुढे सिंह आला.
3.रिती वाचक क्रियाविशेषण अव्यय
वाक्यातील क्रिया कशी घडते किंवा तिची रीत दाखवण्यासाठी जो शब्द वापरतात त्यांना रितीवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. याचे तीन उपप्रकार पडतात.
अ.प्रकारदर्शक
- राहुल सावकाश चालतो.
- तो जलद पळतो.
- सौरभ हळू बोलतो.
यामध्ये असे,तसेच,उगीच,व्यर्थ,फुकट ,आपोआप सावकाश,जलद,हळू इत्यादी शब्द वापरले जातात.
ब.अनुकरण दर्शक
- तिने झटकन कामा आवरले.
- दीपा पटपट पळू लागली .
- त्याने जेवन पटकन आटोपले.
क.निश्चय दर्शक
उदा.
- तुम्ही खरोखर जाणार आहात.
- तू खुशाल घरी निघून जा.
- तुम्ही खरोखर येणार आहात?
- तुम्ही नक्की जेवण केलं का?
ड.संख्यावाचक /परिणाम वाचक क्रियाविशेषण अव्यय
वाक्यातील ज्या क्रियाविशेषणमुळे क्रिया कितीवेळ घडली याचा बोध होतो,अशा अव्यायास "परिणाम वाचक क्रियाविशेषण अव्यय" असे म्हणतात.
उदा.
- मी क्वचित शेतामध्ये जातो.
- राजू अतिशय प्रामाणिक मुलगा आहे.
- तुम्ही जरा शांत बसा.
- तो मुळीच हुशार नाही.
इ.प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय
वाक्यातील ज्या क्रियाविशेषशनातून प्रश्नाचा बोध होतो त्या क्रियाविशेषणला "प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय" असे म्हणतात.
उदा.
- तुम्ही सिनेमा ला याल?
- तुम्ही जेवण करणार का?
- तुम्ही गावाला जाणार का?
- तू सफरचंद खाणार का ?
- तुम्ही सर्वजण अभ्यास करणार का?
ई.निषेधार्थ क्रियाविशेषण अव्यय
वाक्यातील ज्या क्रियाविशेषनावरून निषेधात्मक बोध होत असेल त्या विशेषणाला निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात.
उदा.
- मी न चुकता तुला भेटेल .
- तो न चुकता आला.
- त्याने खरे सांगितले तर ना
उदा. त्याची, त्याचे, तिचे ,तिचा ,माझे, माझ्या, तुझ्या, त्याच्या, तिच्या, माझ्या, इत्यादी.
शब्दाच्या जाती-शब्दयोगी अव्यय व त्याचे प्रकार
शब्दयोगी अव्यय व त्याचे प्रकार
व्याख्या-
जे शब्द नाम किंवा सर्वनामांना जडून येतात व त्या शब्दाचा वाक्यातील इतर शब्दांशी असलेल्या सहसंबंध दाखवतात त्यांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात.
उदा.
- घरावर पक्षी आहेत.
- फळ्यावर चित्र काढा.
शब्दयोगी अव्यययाचे प्रकार-
1.कालवाचक शब्दयोगी अव्यय-
आधी, नंतर, पूर्वी ,आता, पुढे, पर्यंत ,आतून, खालून ,मधून, पासून इत्यादी.
2.स्थलवाचक शब्दयोगी अव्यय-
अलीकडे, समोर, मागे,पुढे, बाहेर, जवळ,नजीक, समीप,समक्ष, इत्यादी.
3.करणवाचक शब्दयोगी अव्यय -
हाती करवी मुळे कडून योगी इत्यादी.
4.हेतूवाचक शब्दयोगी अव्यय -
कारणे,निमित्त, अर्थी ,साठी, करिता,इत्यादी.
5.तुलनावाचक शब्दयोगी अव्यय-
तम,परिसर, पेक्षा, मध्ये इत्यादी.
6.व्यतिरेकवाचक शब्दयोगी अव्यय -
वाचून,शिवाय,व्यक्त, याव्यतिरिक्त, परता इत्यादी.
7.योग्यतावाचक शब्दयोगी अव्यय -
समज,प्रमाणे,सारखा योग्य,जोगा, इत्यादी.
8.नांसाधित शब्दयोगी अव्यय -
नामपसून तयार होणार्या शब्दाला नामसाधित शब्दयोगी अव्यय म्हणतात.
उदा .कडे,प्रमाणे ,मध्ये , पूर्वी इत्यादि.
9. भागवाचक शब्दयोगी अव्यय-
उदा पैकी,आतून,पोटी इत्यादि.
10.दिकवाचक शब्दयोगी अव्यय-
प्रती,कडे,लागी,प्रत इत्यादि .
11.संबंधवाचक शब्दयोगी अव्यय-
विषयी, संबंधी इत्यादी.आणखी काही शब्दयोगी अव्यय प्रकार आहेत. याठिकाणी सर्वाचा उल्लेख याठिकाणी केलेला नाही.
शब्दाच्या जाती
उभयान्वयी अव्यय व त्याचे प्रकार
उभयान्वयी अव्यययाची व्याख्या:
दोन किंवा अधिक शब्द अथवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
अव्ययाचे दोन प्रकार
- प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय.
- गौनत्वसुचकसुचक उभयान्वयी अव्यय.
1.प्रधानत्वसूचक उभयान्वयी व्ययय
दोन स्वतंत्र आणि अर्थपूर्ण वाक्य जोडणाऱ्या शब्दाला प्रधानत्वसुचक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. या प्रकारातून तयार होणारे वाक्य संयुक्त असतात. याचे काही उपप्रकार पुढीप्रमाणे
अ.समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय-
समुच्चय म्हणजे मिळवणे किंवा बेरीज करणे. जी उभयान्वयी अव्यय पहिल्या विधानात अधिक भर टाकण्याचे काम करतात. त्यांना समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
उदा.व आणि, अन, आणखी आणि नि समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय आहेत.
उदा. सकाळ झाली नि बाबा शेताकडे निघाले.
ती भेटली आणि चटकन निघून गेली.
राजुने आज डब्यात पुरी अन् भाजी आणली होती.
ब.विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय-
जी उभयान्वयी अव्यय पर्यायी दर्शवतात म्हणजे दिलेल्या गोष्टींपैकी एकाची निवड करणे हीच अपेक्षा असते.त्यांना विकल्पबोधक अव्यय म्हणतात.
उदा. मी आणि माझी मुलगी या कागदपत्रांवर सह्या करेल.
विचार कर वा ना कर तुझे नुकसान होणार.
तुला ज्ञान हवे की धन हवे.
क.नुनत्वबोधक उभयान्वयी अव्यय-
न्यूनत्व म्हणजे कमीपना पहिल्या वाक्यातील कमतरता,उणीव ,दाखवणारे दुसरे वाक्य ज्या शब्दाने दाखवले जाते त्याला न्यूनात्वबोधक उभयानयी अव्यय असे म्हणतात.
उदा.
1.माई ला थोडा ताप होता.
2.मरावे,परी किर्ती रुपी उरवे.
ड.परिणामबोधक उभयान्वयी अव्यय-
पहिल्या वाक्यातील घटनांमुळे किंवा कृत्यामुळे दुसऱ्या वाक्यावर परिणाम होतो ते दर्शवणाऱ्या अव्ययाला परिणाम बोधक अव्यय म्हणतात.
उदा. 1.राजूने खूप त्रास काढला म्हणून तर आता सुखात जगतायेत.
2.गाडी वाटेत बंद पडली;सबब मी उशिरा पोहचलो.
2.गौनत्वसुचक उभयान्वयी अव्यय-
जी उभयान्वयी अव्यय एक प्रधान वाक्य व दुसरे गौण वाक्य यांना एकत्रित जोडण्याचे कार्य करतात त्यांना गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. या प्रकारापासून बनलेली वाक्य मिश्र स्वरूपाची असून याचे पुढील चार प्रकार पडतात
1. स्वरूप उभयान्वयी अव्यय-
जी उभयान्वयी अव्यय दोन वाक्यांचा संबंध जोडतात व प्रधान वाक्याचे स्वरूप घेऊन गौण वाक्यात उलगडून सांगतात ,त्यांना स्वरूप बोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात .
उदाहरणार्थ म्हणजे म्हणून ,की, हे स्वरूप बोधक उभयान्वयी अव्यय याचे उदाहरणे आहेत.
1.राजू म्हणाला की,आज पाहुणे येणार आहेत.
2.एक हजार ग्रॅम म्हणजे एक किलो ग्रॅम होय.
2. कारणबोधक उभयान्वयी अव्यय-
उभयान्वयी अव्यय प्रधान वाक्य मध्ये घडलेली घटना व घटनेचे कारण दर्शवणाऱ्या गुण वाक्याला जोडते त्यांना कारण बोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
उदा .1.त्याला प्रथम क्रमांक मिळाला कारण त्याने खूप अभ्यास केला होता.
2.माझ्या आईच्या हातचे जेवण मला आवडते कारण की ती खूप मन लावून स्वयंपाक करते.
3. उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय-
गौण वाक्य हे प्रधान वाक्याचा उद्देश किंवा हेतू आहे ,असे ज्या अव्ययाने दर्शवली जाते त्यांना उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
उदा.म्हणून सभा, कारण, यास्तव ,ही उद्देश बुद्ध उभयान्वयी अव्यय याचे उदाहरणे आहेत .
उदा.चांगले शिक्षण मिळावे म्हणून तो दिल्लीला गेला.
4.संकेतबोधक उभयान्वयी अव्यय-
प्रधान वाक्य व गौण वाक्यातील परस्परसहसबंध दाखवणाऱ्या अव्ययला संकेत बोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
उदा.जर तर, जरी तरी इ.
1. जर आई लवकर घरी आली तर मंग आपण फिरायला जाऊ.
2.जसे करतो,तसे भरतो.
शब्दाच्या जाती-शब्दयोगी अव्यय व त्याचे प्रकार
शब्दयोगी अव्यय व त्याचे प्रकार
व्याख्या-
जे शब्द नाम किंवा सर्वनामांना जडून येतात व त्या शब्दाचा वाक्यातील इतर शब्दांशी असलेल्या सहसंबंध दाखवतात त्यांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात.
उदा. घरावर पक्षी आहेत. फळ्यावर चित्र काढा.
1.कालवाचक शब्दयोगी अव्यय-आधी, नंतर, पूर्वी ,आता, पुढे, पर्यंत ,आतून, खालून ,मधून, पासून इत्यादी.
2.स्थलवाचक शब्दयोगी अव्यय-अलीकडे, समोर, मागे,पुढे, बाहेर, जवळ,नजीक, समीप,समक्ष, इत्यादी.
3.करणवाचक शब्दयोगी अव्यय - हाती करवी मुळे कडून योगी इत्यादी.
4.हेतूवाचक शब्दयोगी अव्यय - कारणे,निमित्त, अर्थी ,साठी, करिता,इत्यादी.
5.तुलनावाचक शब्दयोगी अव्यय-तम,परिसर, पेक्षा, मध्ये इत्यादी.
6.व्यतिरेकवाचक शब्दयोगी अव्यय -वाचून,शिवाय,व्यक्त, याव्यतिरिक्त, परता इत्यादी.
7.योग्यतावाचक शब्दयोगी अव्यय - समज,प्रमाणे,सारखा योग्य,जोगा, इत्यादी.
8.नांसाधित शब्दयोगी अव्यय-नामपसून तयार होणार्या शब्दाला नामसाधित शब्दयोगी अव्यय म्हणतात.उदा कडे,प्रमाणे ,मध्ये , पूर्वी इत्यादि.
9. भागवाचक शब्दयोगी अव्यय-उदा पैकी,आतून,पोटी इत्यादि.
10.दिकवाचक शब्दयोगी अव्यय- प्रती,कडे,लागी,प्रत इत्यादि .
11.संबंधवाचक शब्दयोगी अव्यय- विषयी,संबंधी इत्यादी.आणखी काही शब्दयोगी अव्यय प्रकार आहेत. याठिकाणी सर्वाचा उल्लेख याठिकाणी केलेला नाही. अपडेट होत आहे.
उभयान्वयी अव्यय व त्याचे प्रकार
व्याख्या-
दोन किंवा अधिक शब्द अथवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
अव्ययाचे दोन प्रकार-
1.प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय.
2.गौनत्वसुचकसुचक उभयान्वयी अव्यय.
प्रधानत्वसूचक उभयान्वयी व्ययय -
दोन स्वतंत्र आणि अर्थपूर्ण वाक्य जोडणाऱ्या शब्दाला प्रधानत्वसुचक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. या प्रकारातून तयार होणारे वाक्य संयुक्त असतात. याचे काही उपप्रकार पुढीप्रमाणे
अ.समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय-
समुच्चय म्हणजे मिळवणे किंवा बेरीज करणे. जी उभयान्वयी अव्यय पहिल्या विधानात अधिक भर टाकण्याचे काम करतात. त्यांना समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
उदा.1.व आणि, अन, आणखी आणि नि समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय आहेत.
उदा.1.सकाळ झाली नि बाबा शेताकडे निघाले.
2. ती भेटली आणि चटकन निघून गेली.
3.राजुने आज डब्यात पुरी अन् भाजी आणली होती.
ब.विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय-
जी उभयान्वयी अव्यय पर्यायी दर्शवतात म्हणजे दिलेल्या गोष्टींपैकी एकाची निवड करणे हीच अपेक्षा असते.त्यांना विकल्पबोधक अव्यय म्हणतात.
उदा. 1.मी आणि माझी मुलगी या कागदपत्रांवर सह्या करेल.
2.विचार कर वा ना कर तुझे नुकसान होणार.
3.तुला ज्ञान हवे की धन हवे.
क.नुनत्वबोधक उभयान्वयी अव्यय-
न्यूनत्व म्हणजे कमीपना पहिल्या वाक्यातील कमतरता,उणीव ,दाखवणारे दुसरे वाक्य ज्या शब्दाने दाखवले जाते त्याला न्यूनात्वबोधक उभयानयी अव्यय असे म्हणतात.
उदा.1. माई ला थोडा ताप होता.
2.मरावे,परी किर्ती रुपी उरवे.
ड.परिणामबोधक उभयान्वयी अव्यय-
पहिल्या वाक्यातील घटनांमुळे किंवा कृत्यामुळे दुसऱ्या वाक्यावर परिणाम होतो ते दर्शवणाऱ्या अव्ययाला परिणाम बोधक अव्यय म्हणतात.
उदा.1.राजूने खूप त्रास काढला म्हणून तर आता सुखात जगतायेत.
2.गाडी वाटेत बंद पडली;सबब मी उशिरा पोहचलो.
इ.गौनत्वसुचक उभयान्वयी अव्यय-
जी उभयान्वयी अव्यय एक प्रधान वाक्य व दुसरे गौण वाक्य यांना एकत्रित जोडण्याचे कार्य करतात त्यांना गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. या प्रकारापासून बनलेली वाक्य मिश्र स्वरूपाची असून याचे पुढील चार प्रकार पडतात
1.स्वरूप उभयान्वयी अव्यय-
जी उभयान्वयी अव्यय दोन वाक्यांचा संबंध जोडतात व प्रधान वाक्याचे स्वरूप घेऊन गौण वाक्यात उलगडून सांगतात ,त्यांना स्वरूप बोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात .
उदा 1.म्हणजे म्हणून ,की, हे स्वरूप बोधक उभयान्वयी अव्यय याचे उदाहरणे आहेत.
2.राजू म्हणाला की, आज पाहुणे येणार आहेत.
3.एक हजार ग्रॅम म्हणजे एक किलो ग्रॅम होय.
2.कारणबोधक उभयान्वयी अव्यय-
उभयान्वयी अव्यय प्रधान वाक्य मध्ये घडलेली घटना व घटनेचे कारण दर्शवणाऱ्या गुण वाक्याला जोडते त्यांना कारण बोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
उदा .1.त्याला प्रथम क्रमांक मिळाला कारण त्याने खूप अभ्यास केला होता.
2.माझ्या आईच्या हातचे जेवण मला आवडते कारण की ती खूप मन लावून स्वयंपाक करते.
3. उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय-
गौण वाक्य हे प्रधान वाक्याचा उद्देश किंवा हेतू आहे,असे ज्या अव्ययाने दर्शवली जाते त्यांना उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
उदा.1.म्हणून सभा,कारण,यास्तव,ही उद्देश बुद्ध उभयान्वयी अव्यय याचे उदाहरणे आहेत .
उदा.2.चांगले शिक्षण मिळावे म्हणून तो दिल्लीला गेला.
4.संकेतबोधक उभयान्वयी अव्यय-
प्रधान वाक्य व गौण वाक्यातील परस्परसहसबंध दाखवणाऱ्या अव्ययला संकेत बोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
उदा.जर तर, जरी तरी इ. 1.जर आई लवकर घरी आली तर मंग आपण फिरायला जाऊ.2.जसे करतो,तसे भरतो.