मराठी शब्दांच्या जाती।Marathi shabdanchya jati.
शब्द म्हणजे काय?शब्दाच्या जाती |
मराठी व्याकरण - शब्द म्हणजे काय।शब्दाच्या जाती किती व कोणत्या।शब्दाच्या 8 जाती
शब्द म्हणजे काय ? |
---|
व्याख्या -"ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांचा समूहाला एक ठराविक अर्थ प्राप्त होत असेल तर त्याला शब्द असे म्हणतात." |
🔰शब्द म्हणजे काय।Shabd mhanje kay in Marathi
शब्दांची व्याख्या
"ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांचा समूहाला एक ठराविक अर्थ प्राप्त होत असेल तर त्याला शब्द असे म्हणतात."
उदा-घर,डोळा,नाक,वापर हे वेगवेगळे शब्द आहेत.
वरील शब्दापैकी "डोळा" हा एक अक्षराचा समूह असून जर आपण तो शब्द "ळाडो" असा लिहिला तर, त्याला काही अर्थ प्राप्त होत नाही.त्यामुळे "ळाडो" या अक्षराच्या समूहाला शब्द म्हणता येत नाही. त्याच प्रमाणे "वापर" हा एक अक्षराचा समूह आहे. त्याचा पण "रवाप" असा झाला, तर त्या समूहाला एक "शब्द" म्हणता येणार नाही .
अर्थपूर्ण शब्द तयार होण्यासाठी अक्षरांचा क्रम खूप महत्त्वाचा असतो. तसेच शब्दाचा अर्थ समजण्यासाठी अक्षरे योग्य क्रमाने आली पाहिजेत तरच त्या शब्दाला अर्थ प्राप्त होतो.
"मराठी भाषा तयार होताना, वाक्य हे विविध शब्दापासून तयार होते. वाक्य आणि शब्द यांचा अभ्यास करणे सोपे व्हावे, तसेच सोयीचे व्हावे म्हणून मराठी भाषेत शब्दाचे एकूण आठ भाग केले आहेत.या भागांना शब्दांच्या जाती असे म्हणतात."
🔰शब्दांच्या जाती किती व कोणत्या। |
---|
1.नाम |
2.सर्वनाम |
3.विशेषण |
4.क्रियाविशेषण |
5.क्रियाविशेषण अव्यय |
6.शब्दयोगी अव्यय |
7.उभयान्वयी अव्यय |
8.केवलप्रयोगी अव्यय |
शब्दाच्या जाती या वेगवेगळे असल्याने त्याबद्दल माहिती घेणे महत्वाचे ठरते. शब्दाच्या जाती माहिती झाल्याने वाक्यरचना करणे सोपे होते आणि वेगवेगळ्या शब्दांमधील फरक समजायला मदत मिळते.मराठी भाषेतील आठ शब्दांच्या जाती पुढीप्रमाणे आहेत.
1.नाम म्हणजे काय।Naam mhanje kay in Marathi
"एखाद्या वस्तूला,व्यक्तिला किंवा स्थळाला ठेवलेल्या नावास नाम असे म्हणतात. "
2.सर्वनाम म्हणजे काय।Sarvanam mhanje kay in Marathi
"वाक्यातील किंवा वाक्य समूहातील वारंवार होणार्या नामाचे उच्चारण टाळण्यासाठी नामा ऐवजी ज्या शब्दाचा उपयोग केला जातो त्याला सर्वनाम असे म्हणतात."
3.विशेषण म्हणजे काय।Visheshan mhanje kay in Marathi
"नामाबद्दल विशेष माहिती सांगणार्या शब्दाला विशेषण असे म्हणतात."
4.क्रियापद म्हणजे काय।क्रियापद इन मराठी
"वाक्याचा अर्थ पूर्ण करणार्या क्रियावचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. "
5.क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय
"मराठी वाक्यात क्रियापदाने दर्शवलेल्या क्रियेबद्दल अधिक माहिती सांगणार्या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. "
6.शब्दयोगी अव्यय म्हणजे काय
"जे शब्द नाम व सर्वनाम यांना जोडून येतात व त्या शब्दाचा इतर शब्दाशी असलेला संबंध दाखवतात त्यांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात.
7.उभयान्वयी अव्यय म्हणजे काय
"दोन किंवा अधिक शब्द अथवा वाक्य जोडणार्या अविकारी शब्दांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. "
8.केवलप्रयोगी अव्यय म्हणजे काय
"आपल्या मनातील दु:ख ,आनंद , इत्यादि भावना व्यक्त करणार्या शब्दांना केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात."
🔰शब्दाच्या जाती।Shabdachya Jati।नाम व नामाचे प्रकार किती व कोणते
नाम व नामाचे प्रकार |
शब्दाच्या जाती- 1)नाम व नामाचे प्रकार- नाम म्हणजे काय?
💡नाम म्हणजे काय।नामाची व्याख्या |
---|
नामाची व्याख्या "एखादी व्यक्ती वस्तू किंवा ठिकाण यासंबंधी वापरला जाणारा जो शब्द असतो त्याला नाम असे म्हटले जाते. किंवा एखाद्या वस्तूला,व्यक्तीला किंवा स्थळाला जे विशिष्ट नाव ठेवलेले असते त्याला नाम असे म्हणतात." |
💡नामाचे प्रकार किती व कोणते
1.सामान्य नाम -
सामान्य नामाची व्याख्या
"एकाच जातीच्या पदार्थाच्या समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला जे नाव दिले जाते, त्या नावाला सामान्य नाम असे म्हणतात."
ज्या नामामुळे एकाच प्रकारच्या तसेच एकाच जातीच्या सारख्या गुणधर्मामुळे त्या वस्तू,पदार्थाचा यांचा बोध होतो, त्यांना सामान्य नाम असे म्हणतात. सामान्य नाम हे जातिवाचक असते. त्याचे बहुधा अनेक वचन होते.सामान्य नामामुळे एखादी वस्तू, प्राणी ज्या नावाने ओळखले जाते त्या प्रकारचा जातीचा अर्थबोध होतो.सामान्य नामे जातीवाचक असते.सामान्य नामाची काही उदा.शाळा ,शेतकरी ,मांजर कुत्रा ,नदी, गाय, मुलगी ,घर इ.
2.विशेष नाम नाम म्हणजे काय।विशेष नामाची व्याख्या
व्याख्या -
"ज्या नामातून एखाद्या विशिष्ट व्यक्तीचा किंवा पाण्याचा वस्तूचा बोध होतो ,त्यांना विशेष नाम असे म्हटले जाते."
विशेष नामामध्ये नेहमी व्यक्ती वाचक शब्दांचा उल्लेख असतो. विशेष नामामुळे जातीचा किंवा प्रकाराचा उल्लेख होत नाही. त्या जातीतील एखादी विशिष्ट व्यक्ती वस्तू प्राणी इत्यादींचा अर्थबोध होत असतो. विशेष नाम व्यक्ती वाचक असल्यामुळे त्याचे कधीही अनेकवचन होत नाही. विशेष नाम हे नेहमी एखाद्या व्यक्ती वाचक किंवा एखाद्या व्यक्तीविषयी ठेवलेले नाव असते. विशेष नामाची काही उदाहरणे पुढील प्रमाणे पाहूया.उदा. मुंबई, सचिन ,गंगा, नर्मदा, लंडन, राजेश इ.
3.भाववाचक नाम म्हणजे काय
भाववाचक नामाची व्याख्या -
"ज्याला आपण स्पर्श करू शकत नाही किंवा डोळ्यांनीही बघू शकत नाही त्याला भाववाचक नाम असे म्हणतात."
ज्यांना नामातून व्यक्ती, प्राणी अथवा वस्तू मधील भाव ,गुण, धर्म यांचा बोध होतो, त्यांना भाववाचक नाम असे म्हणतात.मनातील भावना बद्दल अधिक माहिती सांगण्याचे काम भाववाचक नाम करते. ज्याला आपण बघू शकत नाही किंवा ज्याला आपण स्पर्श करू शकत नाही त्यालाच भाववाचक नाम असे म्हणतात. त्याची काही उदाहरणे पुढील प्रमाणे चांगला, दुःख ,उत्तम, आनंद,अप्रतिम, इ.
🔰सर्वनाम व त्याचे प्रकार।Sarvanam in Marathi
सर्वनाम |
सर्वनाम म्हणजे काय।Sarvanam in Marathi |
---|
सर्वनामाची व्याख्या- "वाक्यातील किंवा वाक्य समुहातील वारंवार होणारा नामाचा उच्चार टाळण्यासाठी ज्या शब्दाचा उपयोग केला जातो त्याला सर्वनाम असे म्हणतात."किंवा "नामा ऐवजी जो शब्द वापरला जातो त्याला सर्वनाम असे म्हणतात. " |
💡सर्वनामचे प्रकार किती व कोणतेसर्वनामचे एकूण 6 प्रकार आहेत खालीलप्रमाणे 1.पुरुषवाचक सर्वनाम 2.दर्शक सर्वनाम 3.सबंध दर्शक सर्वनाम 4.प्रश्नार्थक सर्वनाम 5.सामान्य सर्वनाम 6.आत्मवाचक सर्वनाम |
🔰मराठी व्याकरण - शब्दाचा जाती - सर्वनाम
सर्वनाम म्हणजे काय?
सर्वनामाची व्याख्या -
"वाक्यातील किंवा वाक्य समुहातील वारंवार होणारा नामाचा उच्चार टाळण्यासाठी ज्या शब्दाचा उपयोग केला जातो त्याला सर्वनाम असे म्हणतात."किंवा "नामा ऐवजी जो शब्द वापरला जातो त्याला सर्वनाम असे म्हणतात. "
सर्वनामाचे उदाहरणे
1.राजू सकाळी उठतो.
2.राजू शाळेत जातो .
3.राजू अभ्यास करतो.
वरील वाक्य समूहांमध्ये राजू या नावाचा वारंवार उल्लेख केलेला आहे, हा वारंवार होणारा उच्चार टाळण्यासाठी सर्व नामाचा वापर करण्यात येतो.
वरील वाक्य मध्ये प्रत्येक वेळी राजू या नामा ऐवजी "तो" या सर्व नामाचा उपयोग पुढीलप्रमाणे करता येऊ शकतो.
उदा -
2.तो शाळेत जातो.
3.तो अभ्यास करतो.
काही नेहमीच्या वापरातील सर्वनामे तो, ती ,ते, मी, हा ,तिने, कुठे, त्याला ,कोणाला, आपण, काय ,इथे
💡सर्वनामाचे प्रकार
सर्वनामाचे मराठी व्याकरण मध्ये पुढील सहा प्रकार पडतात .
सर्वनामाचे प्रकार
1.पुरुषवाचक सर्वनाम
2.दर्शक सर्वनाम
3.सबंध दर्शक सर्वनाम
4. प्रश्नार्थक सर्वनाम
5. सामान्य सर्वनाम
6. आत्मवाचक सर्वनाम
1.पुरुषवाचक सर्वनाम
पुरुष वाचक सर्वनाम म्हणजे काय?
"मराठी वाक्य मध्ये पुरुषवाचक नामा ऐवजी जो शब्द वापरला जातो त्याला पुरुष वाचक सर्वनाम असे म्हणतात."
पुरुषवाचक सर्वनामाचे पुढील प्रमाणे एकूण तीन प्रकार पडतात
✔प्रथम पुरुषवाचक सर्वनाम
वाक्यामध्ये जेव्हा प्रथल्यास तो त्या वाक्यामध्ये फक्त स्वतःचा उल्लेख करतो.प्रथम पुरुषी करता हा अनेकवचनी असल्यास तो त्या वाक्यामध्ये स्वतःबरोबर इतरांचाही उल्लेख करत असतो. मी, स्वतः ,एक वचनी प्रथमपुरुषी सर्वनामाचे उदाहरणे आहेत.तर आम्ही हे,अनेकजणी प्रमपुरुषी सर्वनाम वापरलेले असते तेव्हा वाक्याचा कर्ता हा स्वतः बद्दल बोलत असतो.प्रथम पुरुशी करता हा एक वचनी असथमपुरुषी सर्वनामाचे उदाहरणे आहेत.
उदा . मी ,आम्ही,आपण इ.
✔द्वितीयपुरुषवाचक सर्वनाम
वाक्य मध्ये जेव्हा द्वितीयपुरुषवाचक सर्वनाम वापरले जाते तेव्हा त्या वाक्य मध्ये एखादी व्यक्ति ज्यांच्याशी बोलते त्यांच्याशी वापरलेले सर्वनाम होय .
उदा."तू" एकवचनी तृतीयपुरुषी सर्वनामाचे उदाहरण आहे तर, "तुम्ही" आणि "आपण" ही अनेकवचनी तृतीयपुरुषी सर्वनामाची उदाहरणे असतात.
उदा . तू , तुम्ही,आपण,स्वत:इ.
✔तृतीयपुरुषवाचक सर्वनाम
वाक्य मध्ये जेव्हा तृतीयपुरुषी सर्वनामे वापरलेले असतात तेव्हा ते वाक्य मध्ये तिसऱ्या एखाद्या समोर उपस्थित नसलेल्या व्यक्तीला संबोधून उल्लेख केलेला असतो.तृतीय पुरुषी वाक्यात अनेकवचनी असल्यास त्या वाक्यामध्ये एकापेक्षा अनेक व्यक्तींना संबोधून उल्लेख केलेला असतो.तसेच तृतीयपुरुषी कर्ता हा एक वचनी असल्यास, त्या वाक्यामध्ये एकाच व्यक्तीला संबोधून उल्लेख केलेला असतो.
उदा,तो,ती,त्या,इ.
2.दर्शक सर्वनाम
जवळच्या किंवा दूरच्या व्यक्ति किंवा वस्तु दाखवण्यासाठी वापरल्या जाणार्या सर्वनामाला दर्शक सर्वनाम असे म्हणतात .
उदा.हा,ही,हे,तो,ती,ते,इ.
3.सबंध दर्शक सर्वनाम
नामाऐवजी येणार्या आणि दोन वाक्य जोडण्याचे काम करणार्या सर्वनामास सबंधदर्शक सर्वनाम असे म्हणतात.
उदा .जो,जी,ज्या,जे इ.
4. प्रश्नार्थक सर्वनाम
प्रश्न विचारण्यासाठी वापर होणार्या सर्वनामांना प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात.
उदा. कोणाला,काय,कोण इ .
5. सामान्य सर्वनाम
वाक्यात येणारे सर्वनाम वाक्यातील कोणत्या नामसाठी वापरले आले जर ते निश्चित सांगता येत नसेल तर त्यास सामान्य सर्वनाम असे म्हणतात.
उदा. कोण ,काय ,कोणी इ.
6. आत्मवाचक सर्वनाम
स्वत:विषयी उल्लेख करताना वापरले जाणारे सर्वनाम म्हणजे आत्मवाचक सर्वनाम होय .
उदा. स्वत: आणि आपण
🔰क्रियापद व क्रियापदे प्रकार
क्रियापद |
क्रियापद व क्रियापदे प्रकार :-
"वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात."
1.सकर्मक क्रियापद म्हणजे काय
सकर्मक क्रियापदाची व्याख्या
ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची आवश्यकता असते, त्याला सकर्मक क्रियापद असे म्हणतात.
उदा . राजूने लाडू खाल्ला. (या वाक्याला पूर्ण अर्थ आहे) जर राजुने 'खाल्ला' एवढेच वाक्य दिले असते, तर त्याचा अर्थ पूर्ण झाला नसता.म्हणून 'लाडू' या कर्माच्या आवश्यकता आहे. म्हणूनच 'खाल्ला' हे सकर्मक क्रियापद आहे.
2.अकर्मक क्रियापद म्हणजे काय
अकर्मक क्रियापदाची व्याख्या
ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माiची आवश्यकता नसते, त्याला अकर्मक क्रियापद असे म्हणतात.
अकर्मक क्रियापदाची उदाहरणे
राजू गाडीत बसतो. राजू बसतो. याला पूर्ण अर्थ आहे. बसतो या क्रियापदाला कर्माची आवश्यकता नाही म्हणून हे अकर्मक क्रियापद आहे.
3.संयुक्त क्रियापद म्हणजे काय
संयुक्त क्रियापदाची व्याख्या
वाक्यातील मुख्य क्रिया दाखवणार्या शब्दाच्या रूपाला जोडून जे दुसरे क्रियापद येते त्यास सहाय्यक क्रियापद असे म्हणतात.
संयुक्त क्रियापदाची उदा .आम्ही जेवत आहोत. तू जाताना बॉल घेऊन जा. तर मुख्य क्रियापद दाखवणार्या रूप व सहाय्यक क्रियापद या दोन्हीला मिळून होणार्या क्रियापदाला संयुक्त क्रियापद असे म्हणतात. उदा. आम्ही जेवत आहो तू जाताना चेंडू घेऊन जा. क्रीडांगणावर मुले खेळू लागली.
4.साधित क्रियापद म्हणजे काय
साधित क्रियापदाची व्याख्या
नाम,विशेषण, क्रियापद, अव्यय यांना प्रत्यय लावून आलेल्या क्रियापद यांना साधित क्रियापद असे म्हणतात.
उदा. हाताळने म्हणजे त्या ठिकाणी हात या नामाला प्रत्यय आलेला आहे. फिरवणे या ठिकाणी फिरणे या विशेषणाला प्रत्यय आलेला आहे. अनवली आणि या धातूला प्रत्यय आहे. पुढारली पुढे या अव्ययाला प्रत्यय आलेला आहे.
5.प्रायोजक क्रियापद म्हणजे काय
प्रायोजक क्रियापदाची व्याख्या
जेव्हा कर्ता एखादी क्रिया स्वत: न करता दुसर्याकडून करून घेतो तेव्हा ती क्रिया दर्शवणार्या क्रियापदाला प्रायोजक क्रियापद असे म्हणतात.
प्रायोजक क्रियापदाची उदा.आई बाळाला खेळवते. मायने बहिणीला हसवले.
6.शक्य क्रियापद म्हणजे काय
शक्य क्रियापदाची व्याख्या
ज्या क्रियापदवावरून कार्याच्या संदर्भात शक्यता आणि सामर्थ्य यातील बोध होतो तेव्हा त्या क्रियापदला शक्य क्रियापद असे म्हणतात.
7.भावकर्तू क्रियापद म्हणजे काय
भावकर्तू क्रियापदाची व्याख्या
एखाद्या शब्दाच्या क्रियेतील मूळ अर्थ म्हणजे भाव तोच त्याचा कर्ता मानावा लागतो (त्याचा कर्ता हा स्वतंत्र वाक्यात आलेला नसतो)अशा क्रियापदाला भावकर्तू क्रियापद असे म्हणतात.
उदा. मला घरी जाण्यापूर्वी सांज होईल - सांज होईल हा अर्थ.