मराठी शब्दार्थ (Marathi semantics)

मराठी शब्दार्थ (Marathi semantics)

असे म्हटले जाते की मराठी भाषा जशी वळवावी तशी वळते,जेवढी पळवावी तेव्हढी पळते,मराठी भाषेचे खूप वेगवेगळे वैशिष्ठ्ये संगितले जातात,मराठी ग्रामीण भागात बोलली जाणारी भाषा आणि शहरी भाषा यातील शब्दातील फरक तसेच अर्थ एक पण शब्द अनेक अशा पद्धतीचे काही शब्द आपल्याला दिसून येतात. तसेच मराठी काव्यातील वापरले जाणारे शब्द यात काहीसा फरक आढळून येतो. तसेच नवीन बदलत्या काळाप्रमाणे भाषेत सुद्धा बदल होत चालला असून त्यात नवीन शब्दाची भर व जुने शब्द नाहीसे होत चाललेले आहेत. 
तसेच इतर भाषेचा प्रभाव वेगवेगळ्या भाषेतील वेगवेगळे शब्द मिश्र पद्धतीने वापरले जातात.यामागचे मुख्य कारण म्हणजे समाजव्यवस्था होय. कारण अनेक वेगवेगळ्या परदेशाततिल लोक एकत्र वास्तव्यास राहिल्याने एकमेकांची भाषा मिसळली जाऊन त्यातून नवीनच शब्द निर्मिती होत असते. हे आपण पाहत आलेलो आहेत. मराठी भाषेचा अन्य भाषेवर कसा प्रभाव पडतो आणि अन्य भाषेचा मराठी भाषेवर कसा प्रभाव पडतो हा मुद्दा वेगळा आणि विस्तृत अभ्यासाचा असून आपण आपल्या दैनंदिन वापरतील काही  मराठी शब्दार्थ पाहूया.


मराठी शब्दार्थ

मराठी शब्दार्
पांगणे-विखुरणे
बाप-वडील
माची-चार पायाची तयार केलेली जागा.
सावली-छाया
खोड्या-मस्करी
थोबाड-तोंड,चेहरा
खोपटे-घरटे
आग-अग्नि
रात-रात्र
डोईवर-डोक्यावर
हुडकणे-शोधणे
वाटचाल-प्रवास
व्याकूळ होणे- कासावीस होणे
दोरखंड- जाड दोरी
पलटी होणे - उलटने
भेदरणे- भिती वाटणे
धाट- ज्वारी ,बाजरी कणीस कापून शिल्लक राहिलेला भाग
पाणवठा - जंगलातील पाणी पिण्यासाठी असलेले ठिकाण
जातं - धान्य दळण्यासाठी वापरण्यात येणारे दगडाचे साधन
सोजी - रवा
माग काढणे - शोध घेणे
वसाहत - राहण्याचे ठिकाण
पळ काढणे - निघून जाणे
दाह होणे - आग होणे
गंध - वास
बेधुंदपणे-भान हरपून
आसमंतात- सभोवताली
पाजूनी- धार लावणे
चोपणी-कणसे बडवण्याचे साधन
मार्गेसर-मार्गशीर्ष महिना
खये-खळे
बळीराजा - शेतकरी
प्रजा- जनता
गाव पांढरी - मूळ गाव
हेळसांड- दुर्लक्ष
छावण्या- तापुरते बांधलेले छप्पर
कृपा - दया
हालहवाला- सद्यस्थिती
हुडकणे - शोधणे
आसूड -चाबूक
कटुता-कडवटपणा
उत्तुंग-खूपच उंच
युग-काळ
निर्झर-झरा
बेंदूर-बैलपोळा
ऐट-तोरा
वाकळ-गोधडी
कांबट्या-बांबूच्या बारीक काड्या
गाडगी-मातीचे भांडे
भान-जाणीव
ऊत्तेजना देणे-प्रोस्तहान देणे
निजणे-झोपे
उरकणे-आवरणे
पाख-पंख
शुभ्र-पांढरे
इवलीशी-लहान
गलबलुन येणे-मन भरून येणे
विराणी-दू:खी गाणे
आर्त -व्याकूळ
अळणी-चव नसलेल
कुतूहल-उसुकता
मनमुराद-मनसोक्त
फुलोरा - फुलांचा बहर
संगे-बरोबर
लकेर-गाण्याची तान
शेतसारा-शेतावरील कर
कष्ट-काम
किताब-पदवी
ठायी-ठिकाणी
चौफेर-सगळीकडे
कोसळणे-जोरात पडणे
अनवाणी-पायात चप्पल न घालणे
सत्य- खरे



टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने