केस स्टडी (Case Study): प्रकार आणि फायदे.
केस स्टडी (Case Study) |
केस स्टडी (Case Study) म्हणजे एखाद्या व्यक्तीचा,समुहाचा,किंवा विशिष्ट काळात केलेला तपशीलवार अभ्यास म्हणजेच केस स्टडी होय.
केस स्टडी (Case Study) वेगवेगळ्या विषयांमध्ये, वेगवेगळ्या घटकांमध्ये, वेगवेगळ्या परिस्थितीची संपूर्ण माहिती घेऊन तयार करता येते.शक्यतो केस स्टडी ही एखाद्या व्यक्तीची किंवा हॉस्पिटलमध्ये एखाद्या रुग्णाची केली जाते.
केस स्टडी करण्यासाठी त्या गोष्टीचा इतिहास,म्हणजेच भूतकाळ,वर्तमानकाळ,आणि भविष्यकाळाचा अंदाज लावला जातो.(उदा.जर एखाद्या दिव्यांग व्यक्तीची केस स्टडी करायची असेल तर त्या व्यक्तीची जन्मापूर्वी ची माहिती सुद्धा जमा करावी लागते.त्यानंतर त्याला दिव्यांगत्व येण्यामागे काय कारणे आहेत.
याचा अभ्यास करणे आवश्यक ठरते.तसेच त्याला अपंगत्व येणाचे कारणे ठरलेल्या गोष्टी,त्याच्या सभोवताली असणारे वातावरण,आई वडील इत्यादी गोष्टीची माहिती जमा करावी लागते.
त्याला हे अपंगत्व जन्मापूर्वी ,जन्मावेळी,की जन्मानंतर आलेलं आहे.याची खात्री करावी लागते.म्हणजेच त्याची संपूर्ण अभ्यासपूर्ण माहिती गोळा करून त्यावर निष्कर्ष लावण्यासाठी त्या केस स्टडी महत्वाची ठरते.)
2.केस स्टडी (Case Study) कशी करावी?
- केस स्टडी कशाची करायची आहे हे अगोदर ठरवावे.कारण केस स्टडी ही कोणत्याही साजिवाची करू शकतो असे नाही की फक्त माणसाचीच करावी. केस स्टडी म्हणजेच एखाद्या विशिस्ट गोष्टीचा परिपूर्ण अभ्यास किंवा नोंदी होय.
- केस स्टडी कोणत्या व्यक्तीची किंवा कोणत्या गोष्टीची करायची आहे त्यासाठी त्या व्यक्तीविषयी अथवा त्या गोष्टीविषयी लागणारे साहित्याची यादी किंवा त्याची उपलब्धता तपासणे गरजेचे असते.
- केस स्टडी साठी आवश्यक माहिती कोणत्या स्वरूपात जमा करून ठेवायची याचे नियोजन करणे आवश्यक असते.
- केस स्टडी करण्यासाठी किती कालावधी द्यायचा आहे हे कारणांसहित स्पष्ट करणे आवश्यक असते.
- केस स्टडी साठी आवश्यक ठिकाणी आवश्यक त्या व्यक्ती यांची माहिती घेऊन ठेवणे गरजेचे असते.
- अनुमान काढण्याच्या वेळी केस स्टडी चा उद्देश सफल होत आहे का नाही? याची खात्री व्हायला हवी,म्हणून ठरविलेले उद्दिष्ट किंवा मिळालेल्या निकाल संतोषजनक असल्यास केसस्टडी अपयशी होऊ शकते. त्यासाठी पडताळणी विश्लेषण आणि निकाल हे प्रत्येक स्तरावर जतन करून ठेवले पाहिजे.
- जतन करून ठेवलेला डाटा याची वेळोवेळी पडताळणी आणि विश्लेषण त्यातील दोष किंवा त्रुटी या कमी करून त्यामध्ये वास्तविकता कशी येईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असते.उदाहरणार्थ-आपल्याला वर सांगितल्याप्रमाणे एखाद्या दिव्यांग व्यक्ती ची किंवा CWSN विद्यार्थी यांची केस स्टडी करायचे असेल तर आपल्याला त्या व्यक्तीचा पूर्वइतिहास म्हणजेच त्याचे आई-वडील त्यांना असलेल्या सवयी,त्यांचे आहार,राहणीमान तसेच त्यांची आर्थिक परिस्थिती सामाजिक,परिस्थितीचा आढावा घेणे गरजेचे असते. तसेच जन्मापूर्वी जन्मवेळ आणि जन्मानंतर असे वेगवेगळे टप्पे करून अभ्यासासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो.
- केसस्टडी करत असताना एखाद्या व्यक्तीची कौटुंबिक परिस्थिती तसेच त्यांची अनुवंशिकता या घटकाचा अभ्यास करणे महत्त्वाचे ठरते.
- केस स्टडी कशाची आहे तरी कशाची करायची एखाद्या प्राण्याची करायची असेल किंवा एखाद्या व्यक्तीची करायचे असेल किंवा एखाद्या पक्षाची करायचे असेल किंवा एखाद्या वनस्पतीची करायची असेल तरीही आपण कुठल्याही गोष्टीची करू शकतो. त्यासाठी पूर्वनियोजन करणे आवश्यक असते. तसेच प्रत्येक गोष्टीसाठी लागणारी माहितीही वेगवेगळी किंवा भिन्न स्वरूपाची असते. म्हणून केस स्टडी करताना त्या त्या व्यक्तीवर किंवा त्या त्या वस्तूवर अवलंबून असते.
- केस स्टडी मध्ये समाविष्ट करण्यासाठी आवश्यक मुद्दे हे बदलत असतात. कारण एखाद्या व्यक्तीची केस स्टडी करायचे असेल तर ते व्यक्तीची पूर्व अवस्था किंवा त्याच्या पाठीमागे असलेली सर्व परिस्थितीचा अभ्यास आढावा घेऊन योग्य त्या मुद्द्याच्या आधारे केस स्टडी करणे फायद्याचे ठरते.
- एखादी घटना घडलेली असेल त्या घटनेचा अभ्यास करायचा असेल तर केस स्टडी खूप महत्त्वाचे करू शकते. त्या परिस्थितीमध्ये त्यावेळची परिस्थिती तिचा पूर्व इतिहास हा खूप महत्त्वाचा मुद्दा केस स्टडी मध्ये असतो.
3.केस स्टडी (Case Study) चे फायदे
- एखाद्या वस्तूचा किंवा परिस्थितीचा किंवा व्यक्तीचा अभ्यास करण्यासाठी केस स्टडी खूप महत्त्वाची असते.
- केस स्टडी मुळे एखाद्या व्यक्तीचे तिच्या जीवनाविषयी चा इतिहास तसेच त्या व्यक्तीची सर्व वैयक्तिक माहिती जमा करून,त्या माहितीची व्यवस्थित योग्य त्या क्रमाने मांडणी करून घडलेल्या घटनांचा अंदाज लावण्यास किंवा अभ्यास करण्यासाठी उपयोग होतो.
- प्रयोगशाळेमध्ये किंवा एखाद्या संशोधकाला एखाद्या विशिष्ट घटकातून उद्भवलेल्या विशिष्ट घटनेचा अभ्यास करण्यासाठी केस स्टडी उपयोगी पडते.
- एखाद्या आजारी व्यक्ती का आजारी पडला ? त्याची संपूर्ण केस स्टडी डॉक्टर करतात.म्हणजेच केस स्टडी ही संशोधन करण्यासाठी खूपच उपयोगी आहे.
- केस स्टडी मधून नवीन नवीन माहिती मिळते.नवीन गोष्टीचा शोध लागतो.
- एखाद्या परिस्थितीत प्रयोग करणे अशक्य असेल त्यावेळी केस स्टडी खूप महत्वाची कामगिरी पार पडते
- मानसशास्त्रीय अभ्यासासाठी के स्टडीचा खूप फायदा होतो.
- एखाद्या विषयाची केस स्टडी केली म्हणजे त्या विषयाची संपूर्ण माहिती आपल्याला मिळते.त्यामुळे आपल्याला योग्य तो निर्णय घेणे शक्य होते.
- केस स्टडी पूर्ण केल्यावर आपल्याला एखाद्या गोष्टीची परिपूर्ण माहिती मिळते
4.केस (Case Study) स्टडी चे प्रकार:
1.सामुहिक केस स्टडी.
2.व्यक्तिगत केस स्टडी.
3.स्पष्टीकरनात्मक केस स्टडी.
या प्रकारची केस स्टडी ही सहसा कारण आत्मक तपासणी करण्यासाठी वापरले जाते संशोधकांना अशा घटनांकडे पाण्यात स्वारस्य आहे त्यामुळे काही गोष्टी प्रत्यक्षात घडलेल्या असतात त्याचे संशोधन करून अंदाज बांधण्यासाठी किंवा स्पष्ट करून सांगण्यासाठी या केस स्टडी चा वापर केला जातो.
5.एक्सप्लोरेटरी केस स्टडी.
अधिक सखोल संशोधन करण्यासाठी एक्सप्लोरेटरी केस स्टडी वापरली जाते हे संशोधकांना त्यांचे संशोधन प्रश्न आणि गृहीतके विकसित करण्यासाठी आणि अधिक माहिती गोळा करण्यासाठी महत्त्वाची ठरते.
6. इंस्टूमेंटल केस स्टडी.
या प्रकारांमध्ये जेव्हा व्यक्ती किंवा गट संशोधकांना अधिक स्पष्ट समजून घेण्यासाठी महत्व महत्त्वाचे असते.तेव्हा इंस्ट्रुमेंटल केस स्टडी महत्त्वाची ठरते.
वाचा:
पदभरती..
नवीन नवीन पोस्ट्स मिळवण्यासाठी आमचा What's app group join करा.