मुलांच्या अभ्यासाविषयी महत्वाचे 10 मुद्दे.
अभ्यासाविषयी 10 मुद्दे |
अभ्यासाविषयी 10 मुद्दे:
Top 10 points about children's studies Marathi information बर्याच पालकांसाठी मुलांकडून अभ्यास कसा करून घ्यावा हे समजत नाही.
कारण काही मुले अभ्यासाचा कंटाळा करत असतात.त्यामुळे ते सतत इतर मुलांच्या तुलनेत अभ्यासात मागे पडत असतात. काही मुले हे सतत काहीतरी वेगवेगळ्या खेळात रममाण झालले दिसतात.त्यांना कितीही अभ्यास करायला संगितले तरी ते ऐकत नाहीत.
अशा वेळी पालकांना त्याचा त्रास होतो. कारण मुलांच्या भवितव्याची चिंता पालकांना असते. कधी कधी सतत पालकांना ओरडून सांगावे लागते.परंतु मुले ही तेवढ्यापुरते पुस्तक घेऊन बसतात.
अभ्यासाची सवय लावणे पालकांसाठी तारेवरची कसरत होऊन जाते.मुलांमध्ये अभ्यासाची सवय लावण्यासाठी तसेच मुलांच्या काही समस्या जाणून घेणे आवश्यक असते.तसेच त्यांना अभ्यासाचे महत्व पटवून देणे आवश्यक असते.सतत त्यांच्या शिक्षकांशी चर्चा व समन्वय ठेऊन राहणे आवश्यक असते.मुलांना अभ्यासासाठी वातावरण निर्मिती करणे गरेजचे असते. काही महत्वाच्या गोष्टी आपण पुढीलप्रमाणे पाहूया.
अभ्यासाचे वेळापत्रक।Study schedule:
अभ्यासाचे वेळापत्रक तयार करणे हे प्रत्येक विद्यार्थी व पालकांसाठी महत्वाचे आहे.कारण कोंतिथी गोष्ट करताना नियोजन खूप महत्वाचे आसते.त्यामुळे काम करणे सोपे होते. ज्यावेळी आपला मुलगा शाळेत जातो.त्यावेळी तो जर दिवसभर शाळेत जात असेल तर त्याला शाळेतून आल्यावर लगेच अभ्यासला बसवू नका.
कारण त्याने दिवसभर शाळेत अध्ययन केलेले असल्याने,त्याला संध्याकाली शाळेतून आल्यावर लगेच अभ्यासाला बसने कंटाळवाणे वाटू लागते.अभ्यास किती तास केला यापेक्षा केलेला अभ्यास किती समजला हे महत्वाचे असते.अभ्यासतील काही मुद्दे समजले नसतील तर त्याची यादी तयार करून तिचा वेळापत्रकात समावेश करा .
प्रत्येक विषयानुसार त्याप्रमाणे कोणत्या विषयाला किती वेळ द्यावा हे लक्षात घेऊन अभ्यासाचे वेळापत्रक तर करावे. तासह सुट्टीच्या दिवशी अभ्यासाची वेळ वाढवून द्यावी.वेळापत्रकाचा उपयोग केल्याने मुलांना अभ्यासाची सवय लागण्यास मदत होते. तसेच रोज सर्व विषयांचा अभ्यास करणे सोपे होते.मुलांमध्ये गोंधळ होत नाही.
मनाची एकाग्रता।Concentration of mind:
अभ्यास करायला घ्यायच्या अगोदर मनाची एकाग्रता असणे आवशयक असते.त्यासाठी मुलांना त्यांच्या असणार्या तक्रारी यावर उपाय काढा.त्यांना एखादी गोष्ट पाहिजे असेल तर त्याबाबत त्यांची समजूत काढा. कारण मुले त्यांच्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडली तर त्याच गोष्टीचा वारंवार विचार करत बसतात.
त्यामुळे अभ्यास करताना मन लागत नाही. त्यांचे मन एकाग्र होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक असते.ते ज्या गोष्टीचा हट्ट करत आहेत ती गोष्ट आपल्याला पूर्तता करणे शक्य नसेल तर तशी त्याची समजूत काढणे किंवा त्याला त्याचे फायदे तोटे समजावून सांगणे आवश्यक असते.
अभ्यासला बसण्याची जागा।Seating for study:
अभ्यासाला बसण्याची जागा अशी निवडा की तिथे बसल्यानंतर त्याचे मन विचलित होणार नाही. ज्या ठिकाणी गोंगाट कमी असेल,सूर्यप्रकाश किंवा पुरेशा प्रमाणात उजेड असेल तसेच त्या ठिकाणी त्याचे मन रमेल त्याला अभ्यास करताना त्याला इतरांचा त्रास होणार नाही.
त्यामुळे अभ्यासाला बसताना त्याला त्रास होणार नाही.किंवा खेडेगावातील मुले असतील तर शेतात ज्याठिकणी निवांत झाड असेल त्या ठिकाणी अभ्यासाला व्यत्यय येणार नाही अशी जागा निवडली तरी चालेल. परंतु आपल्या भोवताली आपल्या कुटुंबातील मोठे व्यक्ति असणे किंवा त्यांना आपण या ठिकाणी अभ्यास करत आहोत हे माहिती असणे अपेक्षित असावे.
मुलांचा रोजचा आहार।Children's daily diet:
आपला आहार हा आपल्या जीवनातील खूप महत्वाचा मुद्दा आहे. आपल्या आहाराचा आपल्या सर्व च कामावर प्रभाव असतो.कारण आपण आपल्या आवडीप्रमाणे आहार घेतल्याने आपले मन स्थिर राहते.शाळेत जाणार्या मुलांचे सुद्धा मला ही भाजी आवडत नाही किंवा मला तीच भाजी आवडते अशा अनेक तक्रारी असतात.
त्यामुळे त्यांचे मन शांत राहत नाही. त्याचा विपरीत परिणाम त्याच्या अभ्यासावर पडतो. आपला आहार चौकस असेल तर आपले आरोग्य चांगले राहते. आरोग्य चांगले असेल तर त्याची मदत आपण आपले कोणतेही काम सहजपणे पार पडू शकतो.
शाळेतील वातावरण।The school atmosphere:
ज्या शाळेत आपण आपल्या मुलाला शिक्षण घेण्यासाठी पाठवतो ती शाळा त्याच्या साथी योग्य आहे की नाही घरापासून किती दूर आहे,तसेच त्या ठिकाणी त्याचे शिक्षक अथवा केअर टेकर त्याची काळजी घेणारे आहेत का याची खात्री करावी.
अभ्यासासाठी शाळेचे वातावरण स्टाफ पुरेसा आहे का,तसेच त्या शाळेतील भौतिक सुविधा कशा आहेत ,त्याठिकाणी त्याचा शिकण्यात अडथळा आणणार्या काही गोष्टी आहेत का याची माहिती घेणे अपेक्षित असते.शाळेतील त्याचे मित्र,मैत्रिणी यांच्यापासून त्याला काही त्रास आहे का याची माहिती ठेवणे गरजेचे असते.
मुलांचे आरोग्य।Children's health:
आपल्या मुलाचे आरोग्य चांगले असावे त्यासाठी त्याचा आहार,व्यायाम,त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयी यावर लक्षं देणे आवशयक असते. तो आजारी असेल तर त्याला तज्ञ डॉक्टर कडे घेऊन जाणे आणि उपचार घेणे महत्वाचे असते.
आरोग्याच्या तक्रारी असतील तर त्यावर लवकर उपाययोजन करणे आवश्यक असते कारण त्याचे आरोग्य चांगले असेल तर तो अभ्यास करणार आहे आणि त्याचे मन अभ्यासात लागणार आहे म्हणून मुलांच्या अभ्यासाचा विचार करताना आरोग्य खूप महत्वाचे आहे.
अभ्यास करताना त्याच्या अडचणी लक्षात घेऊन त्या सोडवण्यावर भर द्यावा. तसेच अभ्यास करताना त्याच्या मनावर दडपण येणार नाही या दृष्टीने उपाय करणे आवश्यक असते. अवघड वाटणारा विषय त्याला सोपा करून सांगावा.
मुलांची आवड निवड।Children's favorite choice:
आपल्या मुलाला काय आवडते याचे परीक्षण करावे,त्याचा कल लक्षात घेणे आवश्यक असते. कोणत्या विषयात परीक्षेला त्याला जास्त गुण मिळाले. या गोष्टीकडे लक्ष देणे आवश्यक आसते. त्याला ज्या विषयामध्ये आवड असेल त्याच विषयाची पुढील करियर च्या दृष्टीने निवड करणे महत्वाचे असते. त्याला त्याची आवड लक्षात घ्यावी.त्याची आवड निवड ,राहणे,खाणेपिणे या गोष्टी त्याच्या अभ्यासवर नक्कीच परिणाम करणार्या असतात.