शिक्षणातील Computer (संगणक ) चे महत्व व उपयोग.

शिक्षणातील Computer (संगणक ) चे महत्व मराठी निबंध.

शिक्षणातील Computer (संगणक ) चे महत्व व उपयोग
संगणक चे महत्व 

Importance and use of computer in education all information in Marathi शिक्षण क्षेत्रात अध्ययन  अध्यापन प्रभावी होण्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे.सध्याचे युग तंत्रज्ञानाचे असून संगणकाचा (Computer) प्रभावी वापर केला जात आहे.संगणक किंवा कॉम्प्युटर हे एक इलेक्ट्रिक उपकरण असून  मानवाने त्याचा उपयोग अत्यंत प्रभावीपणे केला आहे.

संगणकाचा शिक्षण प्रणालीत खूप मोठा वापर केला जात असून मोठ्या मोठ्या संस्था व शाळा याठिकाणी विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यासाठी कॉम्प्युटर चा वापर प्रभावीपणे करत आहेत.तरी भारतासारख्या ठिकाणी त्याचा पाहिजे तेवढा वापर जगाच्या तुलनेत कमी आहे. परंतु आता कोरोनासारख्या महामारीत संगणकाचा ऑनलाईन अध्ययन अध्यापनात खूप वापर केला गेला.

Computer (संगणक) चे शिक्षणातील वैशिष्ट्ये:

1.कॉम्प्युटर च्या कामाचा वेग हा अतिप्रचंड असल्याने संगणकाची मुख्य स्मरणशक्ती मर्यादित असली तरी दुय्यम स्मरणशक्ती साधने वापरून खूप मोठ्या प्रमाणावर संगणकात माहिती साठवता येऊ शकते .


2.संगणक किंवा कॉम्प्युटर हे अचूकपणे काम करते. 

3.तसेच दिलेल्या कमांड अतिशय अचूकतेने पाळत असते.

4.अध्यापनात किंवा अध्ययनात Computer।संगणक हे खूप महत्त्वाचे आहे .

5.Computer।संगणक हे एक अष्टपैलू साधन आहे.

6.Computer।संगणकामध्ये वेगवेगळ्या प्रकारे कामे पार पडू शकतो. 

7.मोठमोठ्या कंपन्यांमध्ये, बँकेमध्ये तसेच शासकीय कार्यालयामध्ये माहिती देवाण-घेवाण छपाई इत्यादी कामे संगणकाच्या मदतीने अचूकपणे करता येतात.

8.संगणकात  न थकता किंवा न कंटाळता अचूक पणे काम करण्याची क्षमता असते.

9.संगणकाचे  उपयोग मोठे आणी खर्च खूप कमी प्रमाणात असतो.

10.अध्ययन अध्यापनामध्ये कॉम्प्युटर/संगणकाचा वापर करून PPT, Slide Show, MS-Word, Excel, PowerPoint सारख्या टुल्स च्या साह्याने विद्यार्थ्यांच्या अध्ययन अध्यापनात गति व मनोरंजकता आणता येते. 

Computer (संगणक) चे शिक्षणातील महत्व:

  • शिक्षण क्षेत्रात Computer(संगणक) हे एक वरदान असून त्याच्या साह्याने अनेक विद्यार्थी व शिक्षक यांचे काम सोपे झालेले आहे. 
  • Computer(संगणक) चा वापर केल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील आनंद वधू लागला आहे.
  • Computer(संगणक) चा वाढता वापर पाहता अनेक विद्यार्थ्यांना आपल्याला हवी ती माहिती व अभ्यास करताना येणार्‍या अडचणी इंटरनेट चा वापर करून आपले स्वत:च्या अडचणी सोडू लागले आहेत त्यांना शाळेतील शिक्षकांची गरज भासत नाही.
  • विद्यार्थ्यांना व शिक्षकांना आपल्या नोट्स ,प्रकल्प ,तसेच विविध माहित्या जतन करून त्याचा हवा तेव्हा उपयोग करता येऊ लागला. 
  • ऑनलाईन अध्ययन अध्यापन करणे Computer/संगणकामुळे सहज आणि सोपे झाले आहे. 
  • आता विविध नवीन नवीन सॉफ्टवेअर चा उपयोग करून तसेच शैक्षणिक अॅप्लिकेशन च्या साह्याने विद्यार्थ्यांचे अध्ययन आणि शिक्षकांचे अध्यापन डिजिटल झालेले आहे. 
  • Computer(संगणक) चा वापर आता शाळेत व शिक्षण क्षेत्रात अनिवार्य झालेला आहे.
  • एखादी ऑफिस मधील माहिती जतन करून ठेवण्यासाठी Computer(संगणक) चा वापर खूप होताना दिसून येतो. ही माहिती हवी तेव्हा आपण वापरू शकतो. 
  • Computer(संगणक) मुळे अध्ययनात व अध्यापणात अचूकता आलेली आहे. 
  • एखादा अवघड वाटणारा भाग सोपा करून सांगण्यासाठी Computer(संगणक) ची खूप मदत होते. 
  • Computer(संगणक) हे ह शिक्षणातील एक महत्वाचे साधन असून त्यामुळे जगभरात त्याचा वापर वाढलेला आहे. 

आमचा What's App group जॉईन करू शकता:

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने