समावेशित शिक्षण: व्याख्या, इतिहास, वैशिष्ट्ये, फायदे, मर्यादा.

समावेशित शिक्षण विषयी संपूर्ण माहिती.

समावेशित शिक्षण विषयी संपूर्ण माहिती/Complete information about inclusive education.
समावेशित शिक्षण!

Table Of Content:

Table Of Content(toc)

स(caps)मावेशित शिक्षण म्हणजे असे शिक्षण जेथे सर्व विद्यार्थी अध्ययन प्रक्रियेमध्ये समान सहभाग घेतील व सर्वांना शिक्षणाची समान संधी मिळेल त्यालाच समावेशित शिक्षण असे म्हणतात. - समावेशित शिक्षण हा हक्क भारतीय राज्यघटनेने नमूद केलेला आहे.

 

समावेशक शिक्षणाविषयी मुद्दे:

  • समावेशित शिक्षण म्हणजे काय ?
  • समावेशित शिक्षणाची व्याख्या.
  • समावेशित शिक्षणाचा इतिहास.
  • समावेशित शिक्षणाची वैशिष्ट्ये.
  • समावेशित शिक्षणाचे फायदे.
  • समावेशित शिक्षणाच्या मर्यादा.


दिव्यांग विद्यार्थ्यांचे सर्वसामान्य शाळेत समावेशन का करावे ?

समावेशित शिक्षण म्हणजे सर्वांसाठी असे शिक्षण ज्यामध्ये सर्व विद्यार्थी अध्ययन प्रक्रियेत समान सहभाग घेतील.विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना समावेशक शिक्षणाची सुविधा पुरवणे हे या विश्वासावर आधारित आहे की सर्वांसाठी उपलब्ध असलेल्या शैक्षणिक साधनांचा उपक्रमांचा व कृतींचा त्यांना लाभ मिळावा व या विशेष मुलांना केवळ विशेष सेवा वर अवलंबून  राहावे लागू नये.

 


समावेशकता तेव्हाच राखली जाईल जेव्हा गटातील सर्व विद्यार्थी उपक्रमात सहभागी होऊ शकतील. म्हणजेच यात सर्व सभासदांचा विचार केला गेला आहे आणि केवळ काही विशिष्ट गटातील सभासदांचा किंवा फक्त विशेष क्षमता किंवा गरज असलेल्यांचा केलेला नाही.एका वर्गात वा समूहात सभासद म्हणून सर्वांना सहभागाचा समान हक्क व उपक्रम किंवा कृती सर्वसमावेशक असतील. 


सर्व भारतीयांना समान दर्जा व समान संधीचा हक्क मिळायला पाहिजे. यात भारतीय घटनेने मान्यता दिली आहे. म्हणून सर्व समाजाची जबाबदारी आहे की सर्वांचा समान सहभाग घेऊन सर्वांना समान वर्तणूक किंवा वागणूक दिली पाहिजे.


समावेशित शिक्षणाचा इतिहास:

समावेशित शिक्षण ही संकल्पना ही दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाची असून केंद्र शासनाने तिचा अवलंब संपूर्ण भारतभर "सर्व शिक्षा अभियान" म्हणजेच आता सुरू असलेले "समग्र शिक्षा अभियान" या कार्यक्रमांतर्गत "समावेशित शिक्षण" या उपक्रमात केलेला आहे. या कार्यक्रमांतर्गत शाळेत सर्व विद्यार्थ्यांचे समायोजन करणे शक्य झालेले आहे.


समावेशित शिक्षणाची संकल्पना तयार होण्याअगोदर भारतात वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब हा दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी केला गेला.कारण प्राथमिक शिक्षण यशस्वी करण्यासाठी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना समान शिक्षण मिळणे आवश्यक आहे.हे शासनाच्या लक्षात आले.


परंतु त्यापूर्वी भारतात वेगवेगळे प्रयत्न करण्यात आलेले आपण पाहतो.ते प्रयत्न म्हणजे दिव्यांगांच्या शिक्षणासाठी इ.स.1887 मध्ये अमृतसर येथे अंधाची पहिली शाळा , डॉ.कोठारी आयोग,जागतिक स्तरावरील इ.स.1970 मध्ये मानवी हक्क ची संकल्पना मान्य केली होती.तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986,सर्वांसाठी शिक्षण 1990, प्रा.राम मेघे प्राथमिक शिक्षण आयोग1992, इत्यादी वेगवेगळ्या प्रकारे अभ्यासपूर्वक  प्रयत्न करण्यात आले.


समावेशित शिक्षणाची वैशिष्ट्ये: 

  • समावेशित शिक्षण हा कार्यक्रम केंद्र शासनाने प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरनाचे उद्दिष्ट कालबद्ध रीतीने गाठण्यासाठी तयार केलेला हा कार्यक्रम असून,दिव्यांग प्रकारानुसार प्रत्येक दिव्यांग विद्यार्थ्यांना सुयोग्य वातावरण अडथळा विरहित शिक्षण संधी देण्यात याव असे या मोहिमेमध्ये अपेक्षित असून,यात प्रत्येक विशेष गरजाधारी विद्यार्थ्यांसाठी किंवा प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आर्थिक तरतूद केली जाते. 
  • समावेशित शिक्षण उपक्रमांमध्ये सामान्य शाळेतच इतर सर्वसामान्य मुलांबरोबर  दिव्यांग किंवा विशेष गरजाधारक विद्यार्थी शिक्षण घेऊ शकेल हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे. तसेच त्याला इतर सर्वसामान्य मुलांबरोबर समान संधी व समान हक्क मिळेल,त्याचा समाजात सहजतेने समावेश होईल या दृष्टीने खूप महत्वाचे आहे.
  • समावेशित शिक्षणामध्ये जवळच्या शाळेत दिव्यांग मुलांना त्यांच्या सोयीनुसार 18 वर्षे वयापर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण मिळते.
  • समावेशित शिक्षणामध्ये सर्वसामान्य शाळेत सर्वसामान्य मुलांसोबत शिकण्याची संधी मिळते.त्यांना कुठेही घरापासून दूर असणाऱ्या विशेष शाळेत जाण्याची आवश्यकता नसते.
  • समावेशित शिक्षणामध्ये कोणत्याही विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळा प्रवेश नाकारू शकत नाही.
  • समावेशित शिक्षणामध्ये विविध शासनाच्या योजनाचा मोफत लाभ या विद्यार्थ्यांना मिळतो.
  • समावेशित शिक्षणामध्ये विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य देण्यासाठी विशेष शिक्षक,विशेष तज्ञ यांची नेमणूक केली गेलेली आहे.त्यामुळे त्यांना शासनाच्या विविध संदर्भ सेवा व वेळोवेळी मार्गदर्शन शाळेत मिळते.
  • समावेशित शिक्षणामध्ये शाळेतील प्रशिक्षित शिक्षकांचे अध्ययन अध्यापन ही सुविधा सहजतेने उपलब्ध होते.
  • दिव्यांग ना शासनाच्या विविध योजना चा लाभ मिळतो.


समावेशित शिक्षणाचे दिव्यांग विद्यार्थ्यांना होणारे फायदे: 

  • समावेशित शिक्षण या कार्यक्रमांतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण होते.
  • अपंगत्वाचे लवकर निदान व उपचार करणे शक्य होते.
  • वैद्यकीय सुविधा,मोफत शस्त्रक्रिया,शिबिरे,तसेच मोफत साहित्य साधने व मोजमाप शिबिरे,मदतनीस,प्रवास, प्रोत्साहन भत्ता,वाचक,लेखनिक सुविधा, व संदर्भ सेवा मोफत पुरवल्या जातात.
  • शिक्षणाची सुयोग्य व्यवस्था,तसेच अडथळा विरहित वातावरण निर्मिती करण्यासाठी उपाययोजना केल्या जातात.
  • विशेष शिक्षक,विशेष तज्ञ,थेरपिस्ट यांची सेवा दिली जाते.
  • पालकांना गृहभेटीतून मार्गदर्शन हे विशेष शिक्षक व विशेष तज्ञ करतात.
  • शाळेत शिक्षक हे दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांच्या अध्ययन शैली ओळखून आपल्या अध्यापनात बदल करून शिकवतात.
  • पालकांना व शिक्षकांना वेळोवेळी त्यांचे गरजेनुसार मार्गदर्शन व प्रशिक्षण तज्ञांमार्फत दिले जाते .
  • शाळेकडून जिल्हा रुग्णालये व तालुका ग्रामीण रुग्णालय यांचे सहकार्यातून वैद्यकीय मोफत सुविधा पुरवल्या जातात.दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्यासाठी शिफारस करणे सोयीचे होते.
  • सर्वसामान्य मुलांबरोबर शिकण्याची व त्यांना सहभागी करून घेण्यासाठी संधी मिळते.


समावेशित शिक्षणाच्या मर्यादा:

समावेशित शिक्षणाला काही मर्यादा सुद्धा आहेत.

  • भारत हा देश कृषीप्रधान असून सर्व खेड्या पाड्यात पसरलेला आहे.
  • ग्रामीण भाग जास्त असल्याने सर्व सेवा लवकर उपलब्ध करून देणे,तसेच अवलंब करणे यासाठी वेळ लागतो.
  • विविध नैसर्गिक संकटे,तसेच दळण वळण सेवा,वीज,आधुनिक तंत्रज्ञान इत्यादीचा प्रभावी वापर करणे शक्य होत नाही.
  • शासनाचे ध्येय धोरणे ,सुविधा, इ प्रभावी वापर करणे व योग्य त्या वेळी बदल करणे आवश्यक असते.
  • शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात कंत्राटी कर्मचारी भरती प्रक्रिया राबवणे,त्या कंत्राटी कर्मचारी यांना तुटपुंज्या मानधनावर राबवून घेऊन त्यांना योग्य तो मोबदला न देणे हे शिक्षण क्षेत्रातील अधोगतीचे कारण होत जाते.यामुळे भारतीय शिक्षण व्यवस्थेत मरगळ येते.
  • सरकारी शाळेची प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी प्रयत्न केले जात नाही किंवा त्यात पारदर्शकता नाही.
  • इतर देशांमध्ये ज्या पद्धतीचा अवलंब केला जातो त्याचे अभ्यास करून आपल्याला ती राबवता येईल का? याचा विचार करणे आवश्यक आहे.
  • महाराष्ट्रातील सरकारी शिक्षण व्यवस्था या सतत विविध माहिती ,तसेच कागदी पाठपुरावा यालाच जास्त महत्व देत आहे. त्यामुळे शाळेतील तसेच शिक्षण क्षेत्रातील कर्मचारी विद्यार्थ्यांना न्याय देऊ शकत नाही.
  • शिक्षण क्षेत्रातील कर्मचारी यांच्यावर येणारा कामाचा ताण यांचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.
  • समग्र शिक्षा अभियान या केंद्र आणि राज्यशासनाच्या कार्यक्रमात भरती केलेले कर्मचारी (विशेष शिक्षक) यांना तुटपुंज्या मानधनावर राबवून घेतले जाते.त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांचा उदरनिर्वाह चालणे कठीण होऊन बसले असून, त्यांची मानसिकता शिक्षण क्षेत्रात काम करताना टिकून राहील याची शास्वती नाही.


दिव्यांग विद्यार्थ्यांचे सर्वसामान्य शाळेत समावेशन का करावे ?

  • सर्व विद्यार्थी अध्ययन अध्यापन प्रक्रियेत समान सहभागी होतील तसेच विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वसामान्य विद्यार्थ्यांसोबत शिकण्याची संधी मिळेल.
  • सर्वसामान्य मुलांच्या मनात तुझा भाव निर्माण होणार नाही किंवा दिव्यांग मुलांबाबत त्यांना प्रेम आपुलकी वाटेल या दृष्टीने विचार करून सर्वसामान्य मुलांना सोबत दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षण मिळण्याची वेगवेगळे कौशल्य सुधारण्यासाठी उपयोग होईल.
  • सर्वसामान्य शाळेमध्ये विशेष गरज असणारी विद्यार्थी शिक्षण घेत असताना त्यांना आपण वेगळे आहोत किंवा आपल्या मध्ये काही गोष्टीची कमतरता आहे याची जाणीव होणार नाही. तसेच त्यांना सर्वसामान्य मुलांसोबत शिकण्याची संधी मिळेल. तसेच त्यांना आपण वेगळे नाहीत.याची भावना वाढीस लागेल.
  • विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना समावेशक शिक्षणाची सुविधा पुरवणे सोयीचे होईल.तसेच शैक्षणिक संसाधनाचा उपक्रमांचा व कृतींचा त्यांना सर्वसामान्य मुलांसोबत लाभ घेता येईल. विशेष गरजा आधारे विद्यार्थ्यांना केवळ विशेष सेवांवर अवलंबून राहून जगावे लागणार नाही.
  • समावेशकता तेव्हाच राखली जाईल, जेव्हा गटातील किंवा वर्गातील सर्व विद्यार्थी एखाद्या खेळात सामुदायिक सामुहिक उपक्रमात सहभागी होऊ शकतील.जेणेकरून त्यात सर्व विद्यार्थ्यांचा विचार केला जाईल.
  • सर्व भारतीयांना समान दर्जा व समान संधी चा हक्क मिळाला पाहिजे. याच भारतीय घटनेने मान्यता दिली आहे. म्हणून सर्व  समाजाची ही जबाबदारी आहे की सर्वांचा समान सहभाग घेऊन सर्वांना समान वर्तणूक दिली पाहिजे.
  • 2009 चा शिक्षण हक्क कायदा आर टी ई असे सांगतो की प्राथमिक शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार आहे. हा कायदा शासकिय व खाजगी शाळा साठी फार महत्त्वाचा आहे.आपल्या शाळेतून वर्गातून प्रत्येक बालकाच्या या सामाजिक संविधानिक व कायदेशीर हक्काबद्दल चा समावेश शैक्षणिक क्रियेतून व कृतीतून दिसून आला पाहिजे .
  • अशा विविध पार्श्वभूमीच्या विविध गरजा व क्षमता असणाऱ्या बालकांचा समावेश करण्यासाठी आता अभूतपूर्व तयारी दाखवली पाहिजे. आपल्या वर्गांनी परिवर्तनशील व फलदायी अशी पार्श्वभूमी पुरवले पाहिजे. जिथे कल्पना अज्ञान मुले माहिती यांचे वहन व संक्रमण होते.
  • समावेशन म्हणजे सर्व विद्यार्थ्यांचे सामान्य वर्गात समावेश होईल.त्यामुळे जेव्हा वर्गात CWSN मुलांचा समावेश असावा. त्याचा अर्थ सर्व मुलांचा समावेश यासाठी वर्ग तयार करणे असा आहे.
  • दिव्यांग विद्यार्थी किंवा विशेष गरजाधारक विद्यार्थी यांना त्यांच्या घराजवळ वरील शाळेमध्ये प्रवेश देणे शाळेला बंधनकारक असून विद्यार्थ्याच्या घराजवळील नॉर्मल शाळेमध्ये प्रवेश मिळाल्याने पालकांना व विद्यार्थ्यांना आपल्या जवळच्या शाळेत ने आण  करण्याचा त्रास होत नाही.
  • समावेशित शिक्षण या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांचे मोफत शिबिरे आयोजित केले जातात. त्यामध्ये विविध संदर्भ सेवा पुरवल्या जातात. तसेच प्रमाणपत्र आवश्यक असेल तर त्याबाबत विद्यार्थ्यांना सांगितले जाते.म्हणजेच वैद्यकीय सुविधा आणि शैक्षणिक सुविधा तसेच साहित्य साधने इत्यादी तसेच अडथळा विरहित शाळेतील वातावरण निर्मितीसाठी शाळा स्तरावर प्रयत्न केले जातात आणि विद्यार्थ्यांना नॉर्मल मुलांबरोबर शिकण्याची संधी मिळते.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने