अध्ययन।अध्यापन।मूल्यमापन म्हणजे काय?

अध्ययन।अध्यापन व मूल्यमापन याविषयी माहिती मराठी.

अध्ययन/अध्यापन/मूल्यमापन म्हणजे काय?Adhyayan/Adyapan/Mulyamapan mahanje kay
अध्ययन/अध्यापन/मूल्यमापन


अध्ययन/अध्यापन/मूल्यमापन.


अध्ययन म्हणजे काय? व्याख्या.

 

सराव किंवा अनुभव यांच्याद्वारे वर्तनात घडून येणारे सापेक्षता टिकाऊ स्वरूपाचे बदल म्हणजे अध्ययन होय.


या व्याखेवरून आपल्याला लक्षात येईल की अध्ययनामुळे वर्तनात सुधारात्मक बदल होत असतात. अध्ययनाने घडणारे बदल ही टिकाऊ स्वरूपाचे असतात.


अध्ययनाचे प्रकार:

  • शाब्दिक अध्ययन -Verbal Learning.
  • कारक अध्ययन -Motor Learning.
  • समस्या परिहार -Problem Solving.


1.शाब्दिक अध्ययन -Verbal Learning:

 

शब्दाचा वापर भाषेच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या अध्ययनाला भाषिक अध्ययन असे म्हणतात.


शाब्दिक अध्ययनात लिहिणे, वाचणे, बोलणे, उतारा वाचन करणे, कविता पाठांतर करणे, हे शाब्दिक अध्ययनाचे उदाहरणे आहेत. शाब्दिक अध्ययन मानवला मिळालेले एक वरदान आहे. कारण मानवाजवळ शब्दसंपत्ती किंवा शब्दसंग्रह असतो. म्हणून याचा वापर करून, शाब्दिक अध्ययन करणे सोपे जाते. शालेय जीवनात महाविद्यालयांमध्ये शाब्दिक अध्ययनाला याला खूप महत्व असून त्याशिवाय अध्ययन प्रभावी होत नाही.


2. कारक अध्ययन।Motor Learning:

 

शारीरिक हालचालीमधून किंवा स्नायूंच्या हालचाली च्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या अध्ययनाला कारक अध्ययन असे म्हणतात.


या अध्ययन प्रकारात विविध क्रीडा प्रकार, वाद्य वाजवणे, यंत्र हाताळणी, भरतकाम ,विणकाम इ. कारक अध्ययनाचा वापर यामध्ये होतो. कारकअध्ययन पद्धती मानवेतर प्राणी यांना जास्त प्रमाणात उपयोग करताना आढळून येते.


3.समस्या परिहार:


आपल्याला शाब्दिक अध्ययन आणि कारक अध्ययन या दोन्ही पद्धतीमध्ये योग्य प्रतिक्रिया कोणती आणि योग्य प्रतिक्रिया कोणती याची ओळख लगेच होते. परंतु 

 

समस्या परिहार या अध्ययन पद्धतीमध्ये अनेक प्रतिक्रियांमधून अचूक प्रतिक्रिया शोधून काढावी लागते आणि त्याच्या वरील प्रश्नांची उकल शोधून उत्तर शोधून काढावे लागते. यालाच समस्या परिहार अध्ययन पद्धती असे म्हटले जाते.


म्हणजे अनेक वेगवेगळे गुंतागुंतीचे प्रश्नांमधून योग्य त्या त्या प्रश्नाचे उत्तर शोधून उत्तर किंवा मार्ग काढावा लागतो. यालाच समस्या पर्याय परिहार अध्ययन पद्धती असे म्हणतात.


What is self-study।स्वयंअध्ययन म्हणजे काय?

 

स्वयंअध्ययन म्हणजे स्वतःचा अभ्यास स्वतः करणे म्हणजेच अभ्यासासाठी दुसर्‍यावर अवलंबून न राहता स्वतःचा अभ्यास स्वतः करणे म्हणजे स्वयंअध्ययन करणे होय.


परंतु आता आपण पाहतोय की वेगवेगळ्या खाजगी शिकवण्या तसेच पालकांचे अधिक लक्ष विद्यार्थ्यांवर असणे त्यांना स्वतः अभ्यास करून न देता एखाद्या प्रश्नाचे उत्तर लगेच सांगितले जाते त्यामुळे विद्यार्थ्यांची स्वयं अध्ययन हे कमी होत चाललेले आहे.


अध्ययन निष्पत्ती म्हणजे काय?

 

कोणत्याही अनुभवामुळे व्यक्तींच्या वर्तनात बदल घडतो. विद्यार्थ्यांना विषय शिकल्यानंतर काय साध्य झाले पाहिजे. त्याला कोणते कौशल्य आत्मसात झाले पाहिजे. कुठल्या क्षमतांचा विकास होणे आवश्यक आहे. यालाच अध्ययन निष्पत्ती असे म्हणतात.


अध्यापन म्हणजे काय?


सध्याचे जग हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीने झपाट्याने बदलत चालले आहे.आज आपण पाहत आहोत की इंटरनेट च वाढता वापर आणि त्यामध्ये झालेली क्रांती त्यामुळे संपूर्ण जगाचा चेहरा मोहरा बदलत चालला आहे.


त्यामुळे त्याचप्रमाणे प्राचीन काळामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये अध्ययन आणि अध्यापन चे वेगवेगळ्या पद्धती होत्या. परंतु सध्या शिक्षण क्षेत्रात सुद्धा झपाट्याने बदल होत आहे. 


अध्ययन आणि अध्यापन हे शब्द खूप मोठ्या प्रमाणावर आणि विस्तारित आहेत. पूर्वीच्या काळी होणारे अध्यापन पद्धती बदलून आता नव्याने पद्धती उदयास येत आहेत.

 

अध्यापनाची विशिष्ट अशी व्याख्या न करता अध्यापन म्हणजे शिक्षण होय.
शिकावयास प्रेरणा देणे म्हणजे अध्यापन होय.


असे म्हणणे योग्य असे वाटते.


कारण मनुष्य हा सर्वात बुद्धिवान असून तो सतत आपल्या ज्ञानामध्ये आपल्या पंचेंद्रियांच्या मार्फत वेगवेगळे अनुभव घेत असतो. त्यातून शिकत असतो ,प्रत्येक गोष्ट शिकवण्याची गरज नाही, तर काही गोष्टी अशा आहेत की त्या माणूस स्वयं अध्ययनातून शिकत असतो. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या बाबतीतही वेगळं असं काही नसतं, विद्यार्थीही अनुकरणीय आणि सतत नवीन नवीन गोष्टी शिकणारे असतात. त्यांना फक्त प्रेरणा देणे हे गरजेचे असते. योग्य दिशा देणे आवश्यक असते,म्हणून शिकण्यासाठी प्रेरणा देणे म्हणजेच अध्यापन होय असे म्हणता येईल.


मूल्यमापन म्हणजे काय?

 

शैक्षणिक उद्दिष्ट्ये किती प्रमाणात साध्य झालेली आहेत हे ठरवण्याची सूत्रबद्ध पद्धत म्हणजे मूल्यमापन होय- दांडेकर

किंवा 

 

शैक्षणिक उद्दिष्ट्ये साध्य झाली याचे अवलोकन करणे म्हणजे मूल्यमापन होय.


मूल्यमापनचे।Evaluation tools साधने:

  • संख्यात्मक साधने - या साधनातून मुलांचे संख्यात्मक चित्र समजण्यास मदत होते. 
  • गुणात्मक साधने - यातून विद्यार्थ्यांमधील गुणाची माहिती मिळते. 
  • वरील दोन्ही प्रकारात साधारणपणे खालील प्रकारे मूल्यमापन केले जाते. 


Examination system।परीक्षा तंत्र:

  • तोंडी- तोंडी प्रश्न विचारून मूल्यमापन केले जाते.
  • लेखी - लेखी प्रकारचे म्हणजे लघुत्तोरी,दिर्घोत्तोरी,निबंध वजा प्रश्न विचारले जातात. 
  • प्रात्यक्षिक- प्र्त्यक्षिक ,प्रयोग , कृती करण्यास लावले जाते. 


अंतर्गत मूल्यमापन।Internal evaluation म्हणजे काय?


अंतर्गत मूल्यमापनात विद्यार्थ्यांची अध्ययन किती प्रमाणात झाली ते सध्या कोणत्या पातळीपर्यंत आहेत. विद्यार्थ्यांच्या देण्यात कोणत्या घटकाचे अध्ययन व्यवस्थित झालेले आहे किंवा नाही त्यावर काय उपाययोजना करणे आवश्‍यक आहे की नाही त्यासाठी वेगवेगळ्या चाचणी घेणे आवश्यक आहे किंवा नाही याची पडताळणी अंतर्गत मूल्यमापन यामध्ये करता येणे शक्य असते.


अंतर्गत मूल्यमापनाचे टप्पे:


1.स्वाध्यायाचे अवलोकन 


दररोज केलेल्या अध्ययनाचा व विद्यार्थ्यांच्या स्वाध्यायाचे अवलोकन करून त्यांच्या प्रगतीची नोंद ठेवणे आवश्यक असते.


2.सततचे मूल्यमापन.


गुणात्मक व संख्यात्मक मूल्यमापन नोंदी।Qualitative and numerical evaluation records अध्यापक व मुख्याध्यापक यांच्या अभिप्रायांसह संकलित नोंदवहीत करतात. अशा प्रकारे सतत वर्षभर विकासाचे मूल्यमापन करणे सोयीचे ठरते.


3.उद्दिष्टांची पूर्ती. 


विद्यार्थ्यांमध्ये किती प्रगती झालेले आहे याचा परीक्षेद्वारे अभ्यास करून त्याचे उद्दिष्टपूर्ती ठरवले जाते.याचा आढावा घेतला जातो. यावरून अंतर्गत मूल्यमापनाच्या नोंदी घेतात.


4.अवलोकनात्मक तंत्रांचा वापर.


पदनिश्चयनश्रेणी, पडताळासूची चा वापर, प्रासंगिक नोंदी ठेऊन अवलोकनात्मक तंत्रांचा वापर करून त्यातून कौशल्य, अभिरुची, वृत्ती अशा विकासात्मक बाबी विचारात घेऊन अंतर्गत मूल्यमापन करण्यात येते.


अंतर्गत मूल्यमापनाचे फायदे आणि महत्व:

  • अंतर्गत मूल्यमापन केल्याने विद्यार्थ्याची केवळ पाठांतर करून पास होण्याची सवय कमी होऊन संबंधित पाठातील ज्ञान तो आत्मसात करीत असतो.
  • अध्यापन-अध्ययनप्रक्रियेत सुधारणा करता येते.
  • अध्यापकांना विद्यार्थ्यांच्या अडचणींचे निदान करणे सुलभ जाते.
  • वर्तनबदलाची तपासणी या मूल्यमापनाद्वारे होत असते.
  • विद्यार्थ्यांना परीक्षेची वाटणारी भीती कमी होते.
  • विद्यार्थ्यांच्या झालेल्या चुका त्यांना सुधारणा करण्यासाठी सांगता येतात.


सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन।Continuous Comprehensive Evaluation.


सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन म्हणजे सध्या आपण पाहत आहोत, की शासनाच्या नियमानुसार बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009।Right to Education Act 2009 या कायद्याने विद्यार्थ्यांना आठवीपर्यंत नापास न करण्याचा शासनाचा आदेश असल्याने सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करणे सर्व शिक्षकांना बंधनकारक आहे.सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन हा शिक्षणातील महत्वाचा निर्णय आहे. 


या निर्णयामुळे विद्यार्थांमधील विविध कौशल्यातील सुधारणा होण्यास मदत झालेली आपणाला दिसून येत आहे. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन म्हणजे सतत मूल्यमापन असा होतो. त्यासाठी प्रत्येक जिल्हास्तरावर तालुकास्तरावर प्रशिक्षणे शिक्षकांना दिले आहेत. 


सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन म्हणजे "जेव्हा जेव्हा विद्यार्थी-शिक्षक यांचा संबंध येईल तेव्हा तेव्हा त्या त्या विद्यार्थ्यांचे निरीक्षण करून तसेच पडताळणी करून त्याची नोंद घेणे होय." शासन या मध्ये वेळोवेळी बदल करून शिक्षकांना व विद्यार्थी यांच्या अडचणी कमी करताना दिसत आहे. तसे वेळोवेळी बदल आणि मार्गदर्शन केले जात आहे. 


सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन।Continuous comprehensive evaluation


Dimensional Evaluation। Compiled evaluation (आकारिक मूल्यमापन।संकलित मूल्यमापन) हे दोन प्रकार पडतात.


आकारिक मूल्यमापन।Dimensional evaluation


यामध्ये विद्यार्थ्यांच्या शारीरिक,बौद्धिक, मानसिक असा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास (Personality Development) होत असताना त्याचे मूल्यमापन (Evaluation) केले जाते.


म्हणजेच आकारिक नोंदी घेतल्या जातात.विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष वर्गात शिकत असताना मूल्यमापन सुरू असते.


विद्यार्थ्यांच्या त्यावेळी त्याच्या चुका लक्षात आणून दिले जातात.अध्यापनात गटचर्चा नाट्यीकरण, गटकार्य, उपक्रम प्रयोग, प्रात्यक्षिक ,यामुळे विद्यार्थी आनंददायी शिक्षणातून शिकत असतो.


संकलित मूल्यमापन:


आकारिक मूल्यमापनतील प्रगती टिकून आहे की नाही,याचे मूल्यमापन संकलित मूल्यमापन।Compiled evaluation  ठेवले जाते. 


संकलित मूल्यमापन वर्षातून दोनदा केले जाते. म्हणजे प्रथम सत्राच्या शेवटी आणि द्वितीय सत्राच्या शेवटी अशाप्रकारे दूरगामी उद्दिष्टांचा जास्त विचार केला जातो. 


यात लेखी, तोंडी, प्रात्यक्षिक साधनांचा वापर केला जातो. याचे प्रश्न ज्ञान आकलन, कौशल्य ,वस्तुनिष्ठ, लघुत्तरी दीर्घोत्तरी यांचा विचार करून अपेक्षित प्रगती व त्रुटी याची नोंद घेतली जाते.


अशा प्रकारे सातत्य पूर्ण सर्वंकष मूल्यमापन केले जाते.


आमचा What's App group जॉईन करू शकता:

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने