अध्ययन शैली म्हणजे काय? अध्ययन अध्यापनात अध्ययन शैलीचा उपयोग.

Learning style information in Marathi : अध्ययन शैली नुसार शिकवल्याने अध्ययन शैलीचा अध्ययनअध्यापनात वापर केला तर सर्वच विद्यार्थी हे चांगल्या प्रकारे शिकतील.कारण प्रत्येक बालक हे वेगळे असते. इंग्रजीत अध्ययन शैलीला Learning Style म्हणतात. प्रत्येकाची Learning Style वेगवेगळी असते.

विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना अध्ययन अध्यापनात अध्ययन शैली चा उपयोग फायद्याचा ठरतो. समावेशित उपक्रमात सर्वसामान्य मुलांसोबत विशेष दिव्यांग मुले यांचा समावेश असल्याने अध्ययन शैली नुसार अध्यापन खूप फायद्याचे ठरते.


अध्ययन शैली म्हणजे काय?


अध्ययन शैली Learning style म्हणजे काय?

अध्ययन शैली नुसार शिकवल्याने अध्ययन शैलीचा अध्ययन अध्यापनात वापर केला तर सर्वच विद्यार्थी हे चांगल्या प्रकारे शिकतील. कारण प्रत्येक बालक हे वेगळे असते. इंग्रजीत अध्ययन शैलीला Learning Style म्हणतात. प्रत्येकाची Learning Style वेगवेगळी असते.




प्रत्येकाची Learning Style ही वेगळी असते.जसे प्रत्येकाची आवडी,निवडी,वेगवेगळ्या तशाच शिकण्याची पद्धत सुधा वेगळी असते. शक्यतो विशेष गरजा धारक विद्यार्थी यांना हे जास्त उपयोगी ठरते.
अध्ययन शैली म्हणजे काय आणि अध्ययन शैलीचा वापर करणे कोणाला जास्त फायद्याचे असेल याविषयी संविस्तर माहिती घेऊया.


अध्ययन शैली म्हणजे विद्यार्थी शिकत असताना दृश्य,श्राव्य,स्पर्श,कृती व बहू अध्ययन शैलीचा वापर करून शिकत असेल तर त्याला अध्ययन शैली Learning Style असे म्हणतात.


साधारणपणे सर्वच विद्यार्थी हे वेगवेगळ्या पद्धतीने शिकणारे असतात.परंतु दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांच्या शारीरिक व्यंगामुळे शिकण्यात अडथळे येतात त्यावेळी त्यांना या अध्ययन शैलीचा वापर करून शिकवणे फायद्याचे ठरते.

अध्ययन शैली चे प्रकार।Types of Learning style.

  • दृश्य अध्ययन शैली
  • श्राव्य अध्ययन शैली
  • स्पर्श अध्ययन शैली
  • क्रियात्मक अध्ययन शैली
  • बहु अध्ययन शैली


दृश्य अध्ययन शैली (Visual Learning Style) म्हणजे काय ?

पंचज्ञानेंद्रियापैकी डोळा ( दृश्यातून ) या अवयवाचा जास्तीत जास्त शिकताना वापर करणे म्हणजे दृश्य अध्ययन शैली होय.




दृश्य अध्ययन शैली या पद्धतीने शिकणारे मुले हे दृश्य स्वरुपात पाहिलेल्या व अनुभवलेल्या गोष्टीतून जास्त ज्ञान प्राप्त करतात आणि त्यांना तेच लवकर समजते.यांना दृश्य अध्ययन अध्ययन शैलीतून शिकणारे विद्यार्थी (Visual Learner) म्हटले जाते.

दृश्य अध्ययन शैलीचा अध्यापनात उपयोग.

  • दृश्य अध्ययन शैली कानाने ऐकता येत नाही किंवा जे विद्यार्थी कर्णबधिर असतात त्यांना दृश्य अध्ययन शैलीचा जास्त फायदा होतो.
  • त्यांना जास्त दृश्य स्वरूपात शिकवले तर लवकर समजते कारण कानाने ऐकण्याची क्षमता नसल्या कारणाने ते डोळ्याने किंवा दृश्य स्वरूपामध्ये जास्त ज्ञान ग्रहण करत असतात.
  • कर्णबधिर विद्यार्थ्यांना शिकवत शिकवताना दृश्य अध्ययन शैली चा वापर केल्यास हे मुले चांगल्या प्रकारे शिकू शकतात.
  • जे विद्यार्थी पूर्णतः कर्णबधिर आहेत ज्यांना श्रवण यंत्र Hearing Aids वापरून सुद्धा ऐकायला येत नाही या मुलांना दृश्य अध्ययन शैली खूप फायदेशीर ठरते.
  • दृश्य अध्ययन शैली मध्ये शिकवताना विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारे दृश्य स्वरूपात मध्ये वस्तूंचा,चित्रांचा,प्रोजेक्टर, टीव्ही,व्हिडिओ,देहबोली,नकाशे,रंगीत पेन ,रंगीत खडू इ. चा अध्ययनअध्यापनात वापर करून शिकवण्यास कर्णबधिर।मुलांना दृश्य अध्ययन शैली च्या विद्यार्थ्यांना चांगला फायदा होतो.

श्राव्य अध्ययन शैली म्हणजे काय।Auditory Learning style.


  • पंचज्ञानेंद्रियांपैकी कानाचा जास्त वापर करून ऐकून शिकण्यावर जास्त भर देणे म्हणजे श्राव्य अध्ययन शैली होय.
  • श्राव्य अध्ययन शैली या पद्धतीने शिकणारे मुले हे श्राव्य/श्रवण करून जास्त ज्ञान प्राप्त करतात आणि त्यांना तेच लवकर समजते.यांना श्राव्य अध्ययन अध्ययन शैलीतून शिकणारे विद्यार्थी (Auditory Learner) म्हटले जाते.
  • श्राव्य अध्ययन शैलीचा अध्यापनात उपयोग.
  • श्राव्य अध्ययन शैली असणारे विद्यार्थी ऐकून शिकत असतात.
  • यामध्ये प्रमुख्याने ज्या विद्यार्थ्यांना डोळ्याने दिसत नाही जी फक्त ऐकूनच शिकू शकतात.अशा मुलांना श्राव्य अध्ययन शैली खूप फायदेशीर ठरते.
  • श्राव्य अध्ययन शैली मध्ये अध्ययन अध्यापनात वेगवेगळी ऑडिओ स्वरुपात संगीत,गोष्टी,व्याख्याने ,कविता गायन यांचा वापर करणे सोयीस्कर ठरते.
  • श्राव्य अध्ययन शैली प्रकारातील विद्यार्थी पूर्णत अंध किंवा अल्पदृष्टी ची असल्याने ऐकून शिकण्यावर किंवा श्रवण कौशल्याचा वापर करून शिकत असतात. म्हणून या मुलांना श्राव्य अध्ययन शैली (Auditory Learner) असणारे विद्यार्थी म्हटले जाते.

स्पर्श अध्ययन शैली म्हणजे काय?।Tactile Learning Style.



  • पंचज्ञानेंद्रियांपैकी शिकण्यासाठी स्पर्शज्ञानाचा वापर करणे म्हणजे स्पर्श अध्ययन शैली होय.
  • अंध किंवा अल्प दृष्टी असणारे विद्यार्थी स्पर्श ज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून शिकत असतात.स्पर्श अध्ययन शैली मध्ये विद्यार्थ्यांना स्पर्शातून काही संकल्पना शिकवणे आवश्यक असते.
  • स्पर्श अध्ययन शैलीचा Tactile Learning अध्यापनात वापर.
  • स्पर्श अध्ययन शैलीचा वापर करून शिकणार्‍या विद्यार्थ्यांना Tactile Learner असे म्हणतात.
  • स्पर्श अध्ययन शैलीतून शिकणार्‍या विद्यार्थ्यांना स्पर्शज्ञान किती आहे,तसेच ते वाढवण्यासाठी वेगवेगळ्या अनुभूतीचा उपयोग करावा लागतो.
  • गार, गरम,मऊ, खडबडीत यासारख्या संकल्पना प्रत्यक्ष अनुभूती किंवा स्पर्श देऊन अध्ययन शैली स्पर्शज्ञान शैलीचा वापर करता येतो.
  • मुलांना प्रत्यक्ष स्पर्शाचे अनुभूती दिले जाते,दिव्यांग विद्यार्थ्यांमधील पूर्णतः अंधआणि पूर्णतः अंध व कर्णबधिर हे दोन्ही दिव्यांगत्व एकाच व्यक्तीला किंवा विद्यार्थ्याला असेल म्हणजेच ज्या मुलांना ऐकायला येत नाही आणि डोळ्यांनी दिसतही नाही.
  • अशा मुलांसाठी स्पर्श अध्ययन शैलीचा वापर करून शिकवने फायद्याचे ठरते.फक्त अंध मुलांना देखील स्पर्श अध्ययन शैली चा वापर केला जातो.

क्रियात्मक अध्ययन शैली म्हणजे काय?


  • क्रियात्मक अध्ययन शैली मध्ये शरीराच्या सर्व अवयवांचा वापर शिकण्यासाठी जास्तीत जास्त केला जातो.त्यांना क्रियात्मक अध्ययन शैली असे म्हणतात.
  • क्रियात्मक अध्ययन शैलीतील विद्यार्थी मध्ये विद्यार्थ्यांना कृतीयुक्त तसेच ज्ञानरचनावादी शिक्षण पद्धतीने जास्तीत जास्त शैक्षणिक साहित्याचा वापर करून, प्रयोग प्रात्यक्षिक कृती व उपक्रम यांचा समावेश करून मुलांना शिकवले जाते.
  • क्रियात्मक मध्ये वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना एकत्रित रित्या शिकवता येते, क्रियात्मक अध्ययन शैली मध्ये विद्यार्थ्यांना हसत खेळत तसेच मनोरंजनात्मक शिक्षण मिळते.
  • क्रियात्मक अध्ययन शैलीत विद्यार्थ्यांना वेगवेगळे कोडे,कृतीयुक्त खेळातून शिकवणे फायद्याचे ठरते.
  • वेगवेगळ्या ठिकाणी क्षेत्रभेट घेऊन त्याठिकाणी प्र्त्यक्ष अध्यायनात अनुभूति तसेच प्रात्यक्षिके,प्रयोग करून अध्यापन करणे सोयिस्कर ठरते.

बहु अध्ययन शैली म्हणजे काय?


  • बहु अध्ययन शैली मध्ये सर्वच अध्ययन शैलीचा वापर एकत्रितरीत्या करून शिकवले जाते.
  • बहू अध्ययन शैलीचा अध्यापनात वापर करणे.
  • बहू अध्ययन शैली मध्ये दृश्य,स्पर्श,श्राव्य व क्रियात्मक अध्ययन शैलीचा वापर करून म्हणजे सर्व पंचज्ञानेंद्रिय याचा वापर कमी अधिक प्रमाणात केला जातो. यात पूर्ण अंध ,कर्णबधिर,मतिमंद , c w s n (विशेष विद्यार्थी) शिकतात.
  • दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये कर्णबधिर,अंध आणि पूर्णतः कर्णबधिर तसेच मतिमंद इत्यादी अपंगत्वाच्या मुलांना त्यांच्या गरजेनुसार शैक्षणिक साधने उपलब्ध करून अध्ययन अध्यापन करताना बहु अध्ययन शैली चा वापर करून शिकवणे फायद्याची होत आहे.
  • मतिमंद विद्यार्थ्याला जर डोळ्याने दिसते म्हणजे तो दृश्य तसेच कानाने ऐकू शकतो म्हणजे श्राव्य आणि स्पर्श ही समजतो म्हणजे तो सर्वच अध्ययन शैलीचा वापर करून अध्ययन अध्यापन घडवून आणू शकतो,परंतु तो जास्त कशावर भर देतो हे ओळखणे आवश्यक आहे.
  • अशा प्रकारे वेगवेगळ्या अध्ययन शैलीचा उपयोग अध्यापनात करणे दिव्यांग विद्यार्थ्यांना सोयीस्कर ठरेल तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांची अध्ययन शैली कोणती आहे हे महत्वाचे असून विशेष गरजधारक विद्यार्थी यांचे सर्वसामान्य शाळेत अध्ययन शैलीचा वापर करून अध्ययन अध्यापन घडून आणता येते.


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने