स्वमग्नता (Autism) : लक्षणे, कारणे, उपाययोजना.

Autism spectrum disorder meaning in marathi : Autism या शब्दाला मराठीमध्ये स्वमग्नता असे म्हणतात. स्वमग्नता हे 21 दिव्यांग प्रकारांपैकी एक अपंगत्व असून हे अपंगत्व मेंदूशी सबंधित आहे. स्वमग्नता।Autism या अवस्थेविषयी अधिक जाणून घेण्यासाठी संपूर्ण पोस्ट वाचन करावी.
(ads1)

(ads1)

स्वमग्नता (Autism) व्याख्या :

"Autism ही एक अवस्था असून Autism म्हणजे स्वतःच्या विश्वात गुंतवून राखणे म्हणजे आपल्या आजूबाजूला काय चालले आहे याचे भान नसणे तसेच मुलांच्या मनोबौद्धिक विकासात अडथळा येतो,यालाच Autism असे म्हणतात.या आजाराला Autism spectrum Disorder ( ASD) असेही म्हणतात."


ऑटिझम।स्वमग्नता या दिव्यांगत्वाबाबत समाजामध्ये जनजागृती निर्माण होण्यासाठी शासनाने 2 एप्रिल हा दिवस ऑटिझम दिन म्हणून साजरा करत आहे.

ऑटिझम ही समस्या लहान मुलांमध्ये वाढून वाढत असून ही एक चिंतेची बाब आहे त्यासाठी पालकांमध्ये जनजागृती माहिती व्हावी यासाठी ऑटिझम दिन Autism Day साजरा करण्यात येतो.

(ads2)

ऑटिझम।स्वमग्नता ची लक्षणे.

ऑटिझम ची लक्षणे साधारणपणे पुढील प्रमाणे दिसतात.
  • सर्व सामान्य मुले आणि ऑटिस्टिक मुले यांच्यामध्ये स्वमग्न असणारे मुले ओळखणे अवघड असते.
  • स्वमग्न मुले ओळखण्यासाठी पालकांनी लक्ष देणे आवश्यक असते.कारण स्वमग्नता ही समस्या 1 ते 3 वर्ष या वयामध्ये आढळून किंवा लक्षात येते.
  • स्वमग्नता असलेली मुले लहान असताना यांच्यामध्ये आक्रमकपणा किंवा त्यांच्या नियोजनात अचानक केलेले बदल यामुळे ते चिडचिडेपणा आक्रमक पणा दाखवतात.
  • छोट्या छोट्या गोष्टी वरून चिडचिडेपणा करतात.
  • त्यांच्या नियोजनात झालेले बदल त्यांना सहन होत नाहीत.
  • ऑटिस्टिक मुलांचे वागणे,बोलणे,कपडे घालण्याची पद्धत,विशिष्ट प्रकारचे रंगा आवडणे,विशिष्ट वस्तूशी खेळणे इत्यादी गोष्टीवर लहान वयामध्ये पालकांनी लक्ष देणे आवश्यक असते.
  • त्यामुळे हि मुले ओळखता येऊ शकतात. सर्वसामान्यपणे ऑटिस्टिक किंवा स्वमग्न मुले ओळखण्यासाठी पुढील काही मुद्दे विचारात घेता येतील.

स्वमग्नतेची लक्षणे.

(ads2)
  • सर्वात महत्त्वाचे लक्षण म्हणजे स्वमग्न मुले हे इतर मुलांमध्ये मिसळत नाहीत.ते त्यांच्या भावविश्वामध्ये रममाण असतात.सभोवतालच्या वातावरणाशी ते एकरूप होत नाहीत.
  • आपल्या आजूबाजूला काय चालले आहे याचे भान त्यांना नसते.
  • आपण हाक मारल्यास उत्तर न देणे,कमी बोलणे,आपण काय विचारले आणि त्याने विचारलेल्या प्रश्नाला काय प्रत्युत्तर दिले यामध्ये तफावत आढळून येते.
  • स्वमग्न मुले ऐकून न ऐकल्यासारखे दिसतात.
  • पुन्हा पुन्हा त्याच वस्तूशी खेळणे,त्याच रंगाचे कपडे घालने, वेगवेगळे बदल केलेले न आवडणे.
  • तीन वर्षे पूर्ण होऊनही हे मुले अर्थपूर्ण शब्द,वाक्य बोलू शकत नाहीत.
  • पुन्हा पुन्हा एक शब्दाचे उच्चारण करणे.
  • बोलत असताना समोरच्या व्यक्तीच्या नजरेला नजर देऊन न बोलणे.
  • इतर सर्वसामान्य मुलांच्या तुलनेमध्ये या मुलांचा बौद्धिक विकास हा खूप मंद असतो.

स्वमग्नतेची Autism।ऑटीझम ची कारणे.

  • ऑटिझमचे कारण अद्याप स्पष्ट सांगू शकत नाही,परंतु साधारण स्वमग्न हा आजार होण्यासाठी अनुवंशिकता व जेनेटिक फॅक्टर कारणीभूत असतात.
  • अपूर्ण दिवसात मातेची प्रसूती होणे .
  • बाळाचे वजन जन्मावेळी खूपच कमी असणे .
  • गर्भावस्थेत झालेल्या गंभीर समस्या .
  • गरोदर मातेचे वय जास्त असल्यास .
  • ऑक्सिजनचा पुरवठा बाळाला जन्मावेळी न होणे .
  • मेंदूतील संसर्गजन्य आजार इत्यादी वेगवेगळी कारणे असू शकतात .
(ads1)

Autism अपंगत्वावरील वरील उपाययोजना.

Autism।स्वमग्न।ऑटिझम हा मेंदूशी संबंधित असून त्यावर औषध उपचार उपलब्ध नाहीत.परंतु या मुलांना योग्य वेळी निदान म्हणजेच लवकरात लवकर निदान व उपचार हे एक प्रभावी तंत्र आहे.

म्हणजेच लवकरात लवकर निदान झाल्यानंतर डॉक्टरांचा योग्य वेळी सल्ला घेणे महत्त्वाचे असते.तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आपण वेगवेगळ्या थेरपी सेवा त्यासाठी देऊ शकतो.

ऑटिझम मुलांसाठी थेरपी

  • Screening Tool
  • Behavioral Therapy
  • Physiotherapy
  • Speech Therapy

इत्यादी चा उपयोग होतो ,तसेच या मुलांसाठी आहार हा चांगल्या दर्जाचा असणे आवश्यक आहे


Autism।स्वमग्न मुलांच्या पालकांची जबाबदारी.

(ads1)

प्रथम पालकांनी मुलांची समस्या समजून घेणे आवश्यक असते.आपली मुल सर्वसामान्य नसून ते स्वमग्न आहे आणि त्याचे हे अपंगत्व स्वीकारणे आवश्‍यक असते.

त्यासाठी स्वमग्न मुलांवर चिडून किंवा राग व्यक्त करून काहीही उपयोग नसतो.याउलट स्वमग्न मुलांना नवीन नवीन गोष्टी शिकवणे आवश्यक असते.स्वमग्न मुले स्वावलंबी होतील याकडे पालकांनी लक्ष देणे आवश्यक असते.


तसेच वेगवेगळे तज्ञ मार्गदर्शक व त्यांचे मार्गदर्शन घेणे गरजेचे असते.या मुलांना इतर सर्वसामान्य मुलांसोबत समाविष्ट करण्यासाठी प्रयत्नशील राहणे आवश्यक असते.

इतर मुलांमध्ये आणि स्वमग्न मुलांमध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव होणार नाही तसेच या मुलांसाठी वेगवेगळ्या थेरपी सेवा देणे आवश्यक असते.

Autism।स्वमग्न मुलांचे शिक्षण.

स्वमग्न मुलांना शाळेत प्रवेश देणे बंधनकारक असून या मुलांना त्यांच्या अध्ययन शैलीनुसार शिक्षण देणे आवश्‍यक असते. त्यासाठी शाळेने किंवा शिक्षकांनी इतर मुलांसोबत या मुलांना सामावून घेणे आवश्यक असते.

मुलांमधील कमतरता ओळखून त्यांना अध्यापन करणे महत्त्वाची असते.या मुलांना त्यांचे कौशल्य विकसित करण्यासाठी शिक्षकांनी महत्वाची भूमिका पार पडणे आवश्यक असते.

(ads2)

Autism।स्वमग्न।ऑटिझम मुलांसाठी समाजाची जबाबदारी.


स्वमग्न मुलांना इतर सर्वसामान्य मुलांप्रमाणेच समाजामध्ये वागणूक मिळणे आवश्यक आहे.त्यासाठी समाजाने त्यांच्यासाठी प्रयत्नशील राहणे आवश्यक असते.

स्वमग्न मुलांचा समाजाने स्वीकार करून त्यांच्यातिल उणीव दूर करण्यासाठी आणि त्यांचे दैनंदिन जीवन सुखकर होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

तसेच स्वमग्न या दिव्यांगाबाबत समाजामध्ये जाणीव आणि जागृती होणे आवश्यक असते.

(ads2)

स्वमग्नता।Autism।ऑटिझम विषयी ठेवण्यासाठी आवश्यक गोष्टी

ऑटिझम (स्वमग्न) मुलांना Speech Disorder नसते, परंतु ऑटिझम पिडीत मुले किंवा व्यक्ति सर्व सामान्य प्रमाणे आपल्या भाव भावना व्यक्त करू शकत नाहीत. मुले तोच तोच शब्द पुन्हा पुन्हा उच्चारत असतात. त्यामुळे त्यांचा संवाद अर्थपूर्ण नसतो.

ऑटिझम (स्वमग्न) मुलांसाठी Interdisciplinary Intervention Coordination ची आवश्यकता असते.यात पालकांना प्रशिक्षण घेऊन ते आपल्या मुलामध्ये सुधारणा घडवून आणू शकतात.

विशिष्ट औषधे,मशरूम,ओक्सिजन थेरेपी,किलेशन थेरेपी,इ फायदेशीर असू शकतात.

ऑटिझम हा कोणताही रोग नाही.

कोणताही उपचार ऑटिझम पुर्णपणे बरा करू शकत नाही.

योग्य थेरेपी,कुटुंब,शिक्षण,व सामाजिक सहयोग,ऑटिझमग्रस्त मुलांना संतुष्ट,स्वतंत्र,जीवन देऊ शकतात.अशा प्रकारे आपण ऑटिझम म्हणजे काय या विषयी माहिती घेतली.


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने