संत तुकाराम महाराज: जन्मकथा, बालपण, कार्य.

संत तुकाराम महाराज यांचा जीवन परिचय.

संत तुकाराम महाराज यांची माहिती-Sant Tukaram Maharaj
संत तुकाराम महाराज

संत तुकाराम महाराज यांची माहिती Sant Tukaram Maharaj

मूळ नाव-तुकाराम बोल्होबा अंबिले 
जन्म- इस 1598 देहू, महाराष्ट्र 
संप्रदाय- वारकरी संप्रदाय, चैतन्य संप्रदाय 
गुरु- केशव चैतन्य वतुर 
शिष्य -निळोबा, बहिणाबाई, भगवान बाबा, 
भाषा- मराठी 
साहित्य रचना- तुकारामाची गाथा, पाच हजारांवर अभंग लिहिलेले आहेत. 
कार्य- समाजसुधारक, कवी, विचारवंत, लोकशिक्षक, 
तीर्थक्षेत्र- देहू 
व्यवसाय- वाणी 
वडील- बोल्होबा अंबिले 
आई- कनकाई 
पत्नी- आवळाबाई

संत तुकाराम महाराज यांचा जन्म कथा 

संत तुकारामांचे वडील बोल्होबा यांची गोष्ट थोडक्यात सांगत आहे. संत तुकारामांचे वडील बोल्होबा पांडुरंगाचे निस्सीम भक्त होते. ते दरवर्षी न चुकता पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात असत आणि दरवर्षी त्यांची पत्नी कनकाई माऊली त्यांच्या मागे लागत असे, की मला मी पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला येऊ द्या. 

Join : Whats App Channel

बोल्होबा त्याचे ऐकत नसत. अशी अकरा वर्षे गेली बाराव्या वर्षे ते पंढरपूरला जाण्यास निघाले . तेव्हा ही माऊली काही ऐकेच ना तेव्हा ती म्हणाली की जरी या वेळी तुम्ही मला पांडुरंगाच्या दर्शनाला नेले नाही, तरी मी तुमच्या मागून येणारच. बोल्होबाचा नाईलाज झाला. कारण स्रि आणि बालहट्ट टाळता येत नाही ना! ते म्हणाले, मी तुला माझ्याबरोबर घेऊन जाईल पण मंदिरात गेल्यानंतर पांडुरंगाकडे काही म्हणजे काही मागायचे नाही. 

माऊली आनंदी झाली. तिने सांगितले की मी काहीच मागणार नाही. पती-पत्नी पंढरपुरास निघाले. तिथे पोहोचल्यानंतर काही माऊली मनाशी विचार करीत चालली होती. आलोच आहोत तर पांडुरंगाचे दर्शन घेऊ आणि पंढरपूर येथे यात्रेतले बांगड्यांचे, खेळण्यांची दुकाने, हरखून पाहता येतील .कनकाबई त्यांच्या मागून चालत असल्याने त्या दोघांमधे अंतर पडले. बोल्होबा पुढे निघून गेले आणि कनकाई माऊली मागेच राहिली. 

मंदिरात पोचल्याबरोबर पांडुरंगाचे मान वर होती, ती खाली झोपली आणि रखुमाई ने पांडुरंगा विचारले ,की इतर लोक दर्शनाला येतात, तेव्हा तुमची मान वर असते आणि बोल्होबा आल्यानंतर तुमची मान खाली खाली झुकते? यावर पांडुरंगाने रखुमाईला उत्तर दिले. 

बोल्होबा दर्शनाला आलेला आहे. तो सावकार आहे त्याचे आपण देणेकरी आहोत आणि सावकार जेव्हा आपल्या घरी येतो तेव्हा आपली मान खाली झुकलेली असावी. म्हणजे बघा बोल्होबा हा माणूस असून पांडुरंगाला सुद्धा त्याच्या भक्तीमुळे झुकावे लागते.त्याने पांडुरंगाचे निस्वार्थपणे इतकी भक्ती केली. इतकी भक्ती केली की प्रत्यक्ष देवच त्यांचा देणेकरी झाला. त्यांनी देवाची भक्ती केली पण त्याच्याकडे कधीच काहीच मागितले नाही. 

परमेश्वराची भक्ती करावी तर अशी, इकडे बोल्होबा पांडुरंगाचे दर्शन घेऊन मागच्या दाराने बाहेर पडले. आणि पुढच्या दाराने पाहतात तर अजून कनकाई माऊली देवळात आहे. ते पांडुरंगा समोर हात जोडले आहेत आणि एक टक देवा कडे पाहत राहिली. पांडुरंगाने तिला विचारले , बोल तुला काय पाहिजे परंतु बोल्होबाने सांगितले होते की, देवाकडे काय मागू नकोस.पण हे कुठे सांगितले की देव जर स्वतःहून काही देत असेल तर घेऊ नकोस ते! पांडुरंगाला म्हणाली खूप वर्ष लग्नाला झाली पोटी संतान नाही. 

देव म्हणाला, निश्चिंतपणे तुला मुलगा होईल ; कनकाई ला आनंद झाला.तिने देवाला बऱ्याच प्रदक्षिणा घातल्या. तिकडे बोल्होबा बाहेर वाट पाहत होते. त्यांच्या मनात विचार आला की आपल्या पत्नीला बाहेर यायला इतका वेळ लागला म्हणजे नक्कीच काही तरी मागितले असणार. 

असा विचार करीत असताना कनाकाई माऊली समोरून येताना त्यांना दिसली. तिने त्यांना देवळातल्या सगळा वृत्तांत सांगितला. बोल्हबा कनाकाई ला घेऊन पुन्हा देवळाकडे निघाले. पांडुरंगा कडे बोट दाखवून म्हणाले.तुम्ही आशीर्वाद देताना की मुलगा होईल!मग त्याला सांग," की पुत्र व्हावा ऐसा ,गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा". जर तुम्हाला पुत्र देणार असशील तर तुझी भक्ती करणारा श्वासागणिक तुझेच नाम जपणारा अखंड व निस्वार्थीपणे तुझी सेवा करणारा आज्ञाधारक पुत्र दे. 

नंतर तुकोबारायांचा जन्म झाला. ज्यांच्या नावाचा डंका आजही संपूर्ण जगामध्ये वाचतोय. फळाची आशा धरून देवाचे भक्ती कधीच करू नये आणि जर काही मागण्याची वेळ आलीच तर मागणी असावी तर बोल्होबा सारखी.अशा प्रकारे संत तुकारामाची जन्माची कथा सांगितली जाते.

संत तुकाराम महाराज यांचे कार्य व जीवनचरित्र 

"जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधु ओळखावा देव तेथेची जाणावा. तोचि साधु ओळखावा देव तेथेची जाणावा!" 

संत तुकाराम हे सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम बोल्होबा अंबिले त्यांचा जन्म वसंतपंचमीला माघ शुद्ध पंचमीला झाला तुकारामांचे वडील बोल्होबा व आई कनकाई होत त्यांना सावजी हा मोठा भाऊ व कान्होबा धाकटा भाऊ होता. त्यांचे घराणे मोरे आणि आडनाव अंबिले आहे. 

त्यांच्या घरात पंढरीची वारी करण्याची परंपरा होती. तुकोबांना त्यांच्या प्रापंचिक जीवनात आपत्तीचे तडाखे सहन करावे लागले आणि प्रापंचिक दुःख भोगावे लागले. ते सतरा-अठरा वर्षांचे असताना त्यांच्या आई वडील मरण पावले. महेंद्र दुष्काळाचा त्यांना सामना करावा लागला. 

संतू नावाचा त्यांचा मोठा मुलगा दुष्काळातच गेला. गुरे, ढोरेही गेली. महाजनकी बुडाली, मन उदास झाले. संसारात विरक्ती आली या परिस्थितीत त्यांनी श्रीविठ्ठलावरची आपली परमभक्ती कायम ठेवत देहू गावाजवळील भंडारा डोंगरावर उपासना सुरु केले. चिरंतनाचा शाश्र्वताचा शोध घेत असताना त्यांना साक्षात्कार झाला परब्रह्मस्वरूप श्रीविठ्ठल त्यांना भेटला असे मानले जाते. 

तुकारामांचा सावकारीचा परंपरागत व्यवसाय होता. परंतु एकदा दुष्काळ पडला असता त्यांनी सर्व कुळांना त्यांच्या सावकारीच्या पाशातून मुक्त केले. जमिनी ची कागदपत्रे इंद्रायणी नदीत टाकून दिली व प्रवचने कीर्तने करताना तुकारामांना अभंगांची रचना स्फुरू लागले. त्यांचा बालपणीचा मित्र संताजी जगनाडे यांनी तुकारामांच्या अभंग कागदावर टिपून घेण्याचे काम केले.    

पंढरपुरचा विठ्ठल हे तुकारामांचे आराध्य दैवत होते. तुकारामांना वारकरी जगद्गुरु म्हणून ओळखतात. जगद्गुरु तुकाराम महाराजानी वारकरी संप्रदायाची एक अखंड परंपरा त्यांनी निर्माण केली. सतराव्या शतकामध्ये सामाजिक प्रबोधनाचे मुहूर्तमेढ रोवणारे समाजसुधारक संत म्हणून तुकाराम महाराजांचा उल्लेख करावा लागेल. 

संत तुकाराम महाराज वास्तववादी निर्भीड आणि वेळ प्रसंगी समाजातील दांभिकपणा शब्दांमध्ये प्रहार करणारे संत होते. महाराष्ट्राच्या भूमीमध्ये त्या काळात अनागोंदी निर्माण झाली होती. अशा काळामध्ये संत तुकाराम आणि समाजाला अचूक मार्गदर्शन करण्याचे काम सर्व कीर्तनातून केले. तुकाराम महाराज हे साक्षात्कारी निर्भीड संत कवी होते. विशिष्ट वर्गाची पारंपरिक मक्तेदारी असलेला वेदान्त तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनतेपर्यंत प्रवाहित झाला.

अभंग म्हटला की तू फक्त तुकाराम माणसाच एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाले. संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग हे अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत. त्यांचे अभंग खेड्यांतील अशिक्षित लोकांच्याही नित्य पाठांत आहेत. 

भागवत धर्माचा कळस होण्याचे महात्मा कीर्तना लागले. महाराष्ट्राच्या हृदयात अभंग रूपाने ते स्थिरावले आहेत. त्यांच्या अभंगांत परतत्त्वाचा स्पर्श आहे. मंत्रांचे पावित्र्य यांच्या शब्दकळेत पाझरते त्यांच्या काव्यातील गोडवा व भाषेची रसाळता अतुलनीय आहे संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात लेखनाबरोबरच गवळणी रचल्या. 

महाराजांची गाथा ही अखंड ज्ञानाचा स्त्रोत म्हणून जनसामान्याचा मुखामध्ये कायम आहे. समाज मनावरील अंधश्रद्धेचा पगडा दूर करून लोकांना नवा धर्म, नवी भाषा देण्याचे काम संत तुकाराम आणि केले. संत तुकारामांचे धर्म क्रांतीचे, समाज प्रबोधन विचार आजही समाजाला मार्गदर्शक ठरले आहे. 

त्यांचे अभंग मानवी जीवनाला उपकारक ठरले आहेत. लौकिक अर्थाने संत तुकाराम हे आठव्या पिढीतील नायक होते 19 मार्च 1650 मध्ये असलेल्या तमाम जनतेच्या समक्ष त्यांचा जीव विठ्ठल त्यांना सदैव वैकुंठी घेऊन गेला असे मानले जाते. हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो. 

जगाचा संसार सुरळीत चालविण्यासाठी त्यांनी अभंगाद्वारे मानवाला व एकूणच तत्कालीन समाजाला मार्गदर्शन केले. त्यांचे मार्गदर्शन समाजाच्या दृष्टीने मौलिक ठरले. 

Join : Whats App Channel


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने