कोजागिरी पौर्णिमा: कहाणी, महत्व, पूजाविधी, कथा.

कोजागिरी पौर्णिमाची कहाणी.

कोजागिरी पौर्णिमा ची माहिती मराठीत Kojagiri Pornima Mahiti
कोजागिरी पौर्णिमा

कोजागिरी पौर्णिमे चे महत्व:

कोजागिरी म्हटलं की रात्री गच्चीवर जाऊन मौजमजा करीत मसाला दूध आटवून त्यात चंद्र पाहुन ते आनंदाने पिणे. हे आपले सर्वांचेच कोजागिरी बदलाची कल्पना मात्र, मित्रहो कोजागिरी साजरी करण्यामागील कारणे शास्त्र परंपरा त्याचे महत्त्व इत्यादी बाबी आपल्याला क्वचितच माहिती असतात. 

चार महिन्यांचा पावसाळा संपल्यानंतर ची पहिली पौर्णिमा येते ती म्हणजे कोजागिरी पौर्णिमा होय. म्हणून तिला कोणी "शरद पौर्णिमा" आश्विन महिन्यात येते म्हणून तिला कोणी शास्त्रसंमत भाषेत "आश्‍विन पौर्णिमा" असं सुद्धा म्हणतात.

कोजागिरी पौर्णिमा म्हणजे काय?

 आपण भारतीय कालनिर्णय मध्ये अमावस्या, पूर्णिमा, संकष्ट चतुर्थी,चंद्रग्रहण ,सूर्यग्रहण या सारख्या गोष्टी आपल्याला आढळून येतात. त्यातील पोर्णिमा म्हणजे ज्या दिवशी आकाशात पूर्ण चंद्रबिंब असते त्याला "पौर्णिमा" असे म्हणतात तसेच पौर्णिमा ला "पूर्णमाशी" असे म्हणतात. 

पौर्णिमा हा एक क्षण असून त्या वेळी चंद्र व सूर्य पृथ्वीच्या विरुद्ध बाजूला असतात व त्यांच्यातील पृथ्वीवरून मोजलेले अंतर 180 अंश सेल्सिअस असते म्हणजे ते प्रतिनिधी प्रतियूती मध्ये असतात. 

पोर्णिमा एक महिन्याने येत असते. जय दिवशी आकाशात पुर्ण चंद्र झालेला असेल त्यादिवशी आपण समजून जायचे की आज पौर्णिमा आहे.कृषी संस्कृतीत या दिवसाला विशेष महत्त्व आहे. 

इंग्रजी महिन्याप्रमाणे कोजागरी पौर्णिमा बहुधा ऑक्टोबरमध्ये असते. कोजागिरी पौर्णिमा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. ही पौर्णिमा पावसानंतर ची पहिली पौर्णिमा असते. पावसात आकाश स्वच्छ नसते ,परंतु या पौर्णिमेला आकाश स्वच्छ दिसते.काही दिवसानंतर स्वच्छ आणि सुंदर दिसते, त्यामुळे याचा आनंद घेता यावा व याचे स्वागत करावे, म्हणून हा सण साजरा करतात. 

आश्विन महिन्यात पावसाळा संपून आकाश निरभ्र होते. अशावेळी इष्टमित्रांसह चांदण्या रात्रीची मजा अनुभवता यावी म्हणून हा उत्सव प्रचारात आला असावा. मजेदार गोष्ट म्हणजे कोजागिरीच्या रात्री लोकांना चांदण्याचा आनंद मिळावा म्हणून अनेक शहरातील, महानगरपालिका रस्त्यावरचे दिवे लावत नाहीत. 

शेतकरी या दिवसात आपली सर्व कामे संपवून घरी बसून आराम करत असतो. या दिवशी रात्री दूध गरम करून त्यामध्ये चंद्राचा पाहतात. त्या दिवशी 99.99% प्रकार असतो. त्यामुळे या रात्री वातावरण छान असते आकाश खुले असते. लक्ष्मीचंद्र मंडळातून उतरून धरतीवर भ्रमण करते.आणि कोण कोण जागे आहे ते पाहत असते. 

कोजागृती असा प्रश्न विचारते असं मानलं जातं कोजागर्ती याचा अर्थ कुणी जागी आहे का? असा होईल. त्यामुळे या पौर्णिमेला कोजागरी असे म्हणतात.या रात्री जे जागी असतात त्यांना लक्ष्मी चा आशीर्वाद मिळतो मात्र याचा अर्थ रात्रभर जागे राहणे असा होत नाही. 

अनिरुद्ध बापू जी यांनी म्हटले आहे की संपूर्ण रात्र जागरण करणे बंधनकारक नसून श्रद्धावान पहाटे साडेतीन वाजेपर्यंत जागरण करू शकतात. या रात्री मसाला दूध तयार करतात आणि चंद्राचे चांदणे पडले ते प्राशन करतात. मसाला दूध पिण्याची काही शास्त्रीय कारणे आहेत शरद ऋतूमध्ये मसाला दूध आरोग्याला चांगले असते. असे आयुर्वेदात सांगितले आहे. त्यामुळे कोजागिरीच्या दिवशी मसाला दूध पिण्याची प्रथा आहे. उत्तररात्रीपर्यंत जागरण केले जाते. या दिवशी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ अपत्याला ओवाळून त्याची किंवा तिची आश्विनी साजरी करतात. 

कोजागिरी पौर्णिमेला पूजा कशी करतात?

या दिवशी बळीराजाची पूजा करतात. मानवाला सूर्य लोकात प्रतिष्ठा मिळते असे शास्त्र सांगते. लक्ष्मी व बळीराजाची पूजा झाल्यावर व नारळाचे पाणी देऊन आप्तेष्टांना देऊन स्वतः सेवन करतात. चंद्राला आटीव दूधाचा नैवेद्य दाखवतात. दुसऱ्या दिवशी बळीराजा व लक्ष्मीची पूजा करून व सर्वांना पोशाख दिला जातो. 

जे काय असेल ते पूजा ते पूजन कसे केले जाते कोजागिरी पौर्णिमा व त्या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करावे व संकल्प करावा आपल्या आराध्य देवाला स्नान घालून सुंदर वस्त्रे परिधान करून त्यांना सुंदर सजवावे व पूजन करावे गंध धूप नैवेद्य प्रसाद फुले-फळे यांनी पूजन करावे. 

त्यानंतर रात्री खीर बनवावी मध्ये साजूक तुपाचा वापर करावा किंवा नुसते दूध आठवावे त्यात केशर व साखर टाकावी चंद्रप्रकाशात छान आठवावे असेल तर ते एका पसरट भांड्यात काढून चंद्रप्रकाशात ठेवून द्यावी रात्री बारानंतर चंद्रदेव डोक्यावर आल्यानंतर त्यांचे पूजन करावे त्यांना खिरीचा नैवेद्य अर्पण करावा. त्यानंतर देवघरातील देवांना त्या दुधाचा किंवा खीर चा नैवेद्य अर्पण करावा.

रात्रभर चंद्रप्रकाशात दूध अशीच राहू द्यावं, दुसऱ्या दिवशी सकाळी ते खीर प्रसाद म्हणून वाटावे व आपण स्वतः तो प्रसाद ग्रहण करावा या दिवशी उपवास करावा एका तांब्यात पाणी व ग्लासात घ्यावे व नागवेलीची पाने मांडून हळद कॉल अक्षता टाकून त्यांचे पूजन करावे व दक्षिणा अर्पण करावी त्यानंतर कथा वाचावी किंवा ऐकावी या दिवशी देवाधिदेव महादेव पार्वती व कार्तिक स्वामींचे ही पूजन केले जाते.

कोजागिरी पौर्णिमा कथा 

प्राचीन काळात एक मगध देशात वलीत नावाचा एक सुसंस्कारी असणारा पण दरिद्री ब्राह्मण राहत असे. ब्राह्मण जेवढा संस्कारी होता, त्याची पत्नी तेवढीच वाईट होती. ती ब्राह्मणाच्या गरिबीमुळे दररोज त्याला त्रास देत असत. एवढेच नव्हे तर पैशाच्या हव्यासापोटी ती तिच्या पतीला चोरी करण्यासाठी प्रोत्साहित करत असे.

एकदा काय झालं शरद श्राद्ध करताना ब्राह्मणाच्या पत्नीने पूजेमध्ये ठेवलेले सर्व पिंड उचलून एका विहिरीत फेकून दिले. पत्नीची अशी वर्तणूक पाहून ब्राह्मण नाराज होऊन जंगलात निघून गेला. जंगलात गेल्यानंतर त्याला तेथे एक नागकन्या भेटली. त्या दिवशी अश्विन मासातील पौर्णिमा होती. त्या नगकण्येने ब्राह्मणाला रात्री जागरण करून, लक्ष्मीला प्रसन्न करायचे, कोजागरी व्रत करण्यास सांगितले. 

ब्राह्मणाने विधी नुसार पूजा करून कोजागरी व्रत केले.रात्री देवी लक्ष्मी ने येऊन ब्राम्हणाला प्रसन्न होऊन त्याला दरिद्रीतून मुक्त केले. या व्रताच्या प्रभावाने ब्राह्मणाला खूप मोठी धनसंपत्ती प्राप्त झाली. भागवती महालक्ष्मीच्या कृपेने त्या ब्राम्हणाच्या पत्नीची ही बुद्धी ठिकाणावर आली तिला आपली चूक कळली आणि ते दांपत्य सुखाने संसार करू लागले.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने