कर्णबधिर।कर्णबधिरत्वाची ओळख, व्याख्या।कर्णबधिर ची लक्षणे।कर्णबधिरत्वाचे कारणे।कर्णबधिर मुलांचे शिक्षण


कर्णबधिरत्व: ओळख,लक्षणे,उपाययोजना.

Hearing Impairment : कर्णबधिरत्व हे 21 दिव्यांग प्रकारांपैकी एक असून या अपंग प्रकारात कानाने ऐकण्याची क्षमता कमी असणे किंवा ऐकायला न येणे हे प्रमुख लक्षणे असतात. ऐकायला न आल्याने भाषा आणि वाचा हि दोषपूर्ण असते. त्यामुळे कर्णबधीर म्हणजे काय, कर्णबधीर कोणाला म्हणावे, तसेच कर्णबधीर मुलांविषयी सर्वसामान्य प्रश्न याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण या पोस्ट च्या आधाराने घेणार आहोत.




सर्वसाधारणपणे कर्णबधिर म्हणजे एखाद्या व्यक्तीचे दुसऱ्याशी बोलणे व वातावरणातील इतर ध्वनी ऐकण्याविषयी अक्षमता म्हणजे कर्णबधीर होय.



कर्णबधिरत्व - Hearing impairment कानातील एखाद्या भागाला इजा झाल्याने किंवा एखाद्या रोगामुळे कानाच्या अनैसर्गिक विकासामुळे जन्माआधी किंवा जन्मानंतर आलेली असते.ऐकण्याच्या क्षमतेला मर्यादा पडतात.पण त्याच बरोबर बोलण्यात व उच्चारणात वाचादोष निर्माण होतो. कर्णबधीर हा 21 दिव्यांग प्रकारांपैकी एक दिव्यांग अपंगत्वाचा प्रकार आहे.

ऐकू येणारे मूल त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या कुटुंबातील व्यक्तीचे बोलणे ऐकून हे भाषा शिकत असते.कुटुंबातील व्यक्ती कडून यशस्वी Communication साधायला शिकत असते. पण कर्णबधिर मुलाच्या मात्र कर्णदोषामुळे भाषा कानावर पडत नसल्याने त्यांचे बोलने किंवा त्यांच्या मध्ये वाचदोष निर्माण किंवा Defective speech आढळून येते.


कर्णबधिरत्वाची व्याख्या।Definition for Hearing Impairment

ज्या व्यक्तींच्या चांगल्या कानाचा श्रवणऱ्हास Hearing loss हा 60 DB किंवा त्यापेक्षा अधिक असेल अशा व्यक्तींना कर्णबधिर व्यक्ती Deaf person असे म्हणतात."

किंवा

ज्या व्यक्तींचा दोन्ही ही कानाचा श्रवणऱ्हास 70 DB किंवा त्यापेक्षाही जास्त असतो त्यांना कर्णबधिर म्हणून ओळखले जाते.

किंवा

People with a good hearing loss of 60 dB or more are called deaf people." Or "People with both Hearing Impairments of 70 DB or more are known as deaf.

किंवा

ज्या व्यक्तींच्या दोन्ही कानाचा श्रवणऱ्हास हा 70 DB किंवा त्यापेक्षा अधिक असेल तर त्यांना Deaf म्हणून ओळखतात.

किंवा

Individuals with a hearing loss of 70DB or more in both ears are known as Deaf.

कर्णबधिरत्वाची लक्षणे.

जेव्हा बालकांचा जन्म होतो,तेव्हा बाळ मोठा आवाज झाल्यावर दचकने,घाबरणे,रडणे अशा प्रकारे आपली प्रतिक्रिया त्या मोठ्या आवाजाला देत असते,परंतु जर बाळाने अशी प्रतिक्रिया दिली नाही तर बाळाला काहीतरी ऐकण्याची समस्या आहे.



मुलं लहान आवाजाला कसा प्रतिसाद देतात हे पाहणे महत्वाचे आहे,म्हणजे लहान आवाजाला प्रतिसाद अजिबातच किना थोड्या प्रमाणात देणे.

आवाजाच्या दिशेने मान न वळवणे.

बाळ 6 ते 8 महिन्याचे झाले की ब्याबब्लींग थांबणे.

मुले आवाजाच्या खेळण्याचा वापर करताना आजिबात प्रतिक्रिया देत नसेल तर.

खुळखुळा,सारख्या खेळण्यात रस न दाखवणे

दीड वर्षाच्या मुलाला आई-बाबा,टाटा, अर्थपूर्ण शब्दांचा वापर करत नाही

साध्या सूचना जसे की "टाटा कर" हेसुद्धा समजत नसेल किंवा आवाज आला तर चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचे हावभाव दाखवत नसेल तर.

तुम्ही बोलत असेल तर तुमच्या चेहर्याचेच निरीक्षण करण्यावर मुलं जास्त भर देत असेल तर .

मुल लिपरीडिंग करत असेल तर .

पाच ते दहा फुटावरून बोलल्यास मूळ प्रतिसाद देत नसेल तर .

मुलाचे बोलणे हे दोष पूर्ण असते .

म्हणजेच मुलांना बोलणे मध्ये अडचण निर्माण होते,उदा :-उच्चार स्पष्ट नसतात,बोबडे बोलणे ,काही शब्द गाळणे, अधिक शब्द बोलणे, ही मुलं अभ्यासात मागे पडतात ,शेजारच्या मुलांच्या वहीत सारखे पाहून लिहतात.

सारखे डोळ्यांनी पाहणे यावर जास्त भर देणे. इत्यादी

श्रवणदोष (Hearing Loss) म्हणजे काय?

ऐकण्याची क्षमता किती आहे यावरून एखादी व्यक्ती कर्णबधिर आहे किंवा नाही ते ठरवता येते त्याची क्षमता डेसिबल (DB) या एककात मोजतात.

आपण जे बोलतो ते ऐकून त्या आवाजाला दोन पैलू असतात.एक आवाजाची पट्टी आणि दुसरी आवाजाची तीव्रता कोणता आवाज ऐकला? किती मोठा आवाज ऐकला?



असे वेगवेगळे दोन आवाजाची पैलू आपण लक्षात घेणे आवश्यक आहे.आवाजाच्या पट्टीला आवाजाची वारंवारिता म्हणतात. "वारंवारिता (Hertz)" या एककात मोजतात आवाजाची तीव्रता डेसिबल DB या एककात मोजतात.
कर्णबधिर व्यक्तींचा ऑडिओमीटर या उपकरणाच्या मदतीने किती ऐकायला येत आहे किंवा श्रवणचाचणी (Audiometry) करून किती प्रमाणात ऐकायला येतं हे मोजमाप करू शकतो.

जागतिक आरोग्य संघटने कर्णबधिरांच्या वेगवेगळ्या ऐकण्याच्या प्रकारावरून श्रवणदोषाचे वर्गीकरण काढले जाते. त्यासाठी बेरा चाचणी ही सुद्धा करता येते.

श्रवणदोषाचे वर्गीकरण.

0 ते 25 DB श्रवण दोष असेल तर म्हणजेच श्रवण दोष नाही

26 ते 40 DB श्रवणदोष

41 ते 55 DB मध्यम श्रवण दोष

55 ते 70 DB मध्यम ते तीव्र श्रवण दोष

91 DB च्या पुढे अतितीव्र श्रवण दोष असू शकतो.


कर्णबधिरत्व येण्याचे कारणे .

कर्णबधिर असल्याचे कारणे किंवा श्रवण दोष निर्माण होण्याची कारणे श्रवण दोषाचे प्रामुख्याने वेगवेगळी कारणे आहेत. अनुवंशिक कारणे आणि परिस्थितीजन्य कारणे .

कर्णबधिरत्व येण्याचे अनुवांशिक कारणे.अनुवांशिक कारणांमध्ये पूर्वी आई किंवा वडील यांच्या पिढीत कोणी एखाद्या व्यक्तीला कर्णबधिर हा दोष असेल तर त्याच्या पुढच्या पिढीमध्ये सुद्धा कर्णबधिर हे दिव्यांग।अपंगत्व घेऊन मूल जन्माला येऊ शकते.

  

जवळच्या नात्यात लग्न होणे आई-वडिलांच्या जवळच्या नात्यातील लागल्यामुळे त्यांच्या पोटी जन्म घेणारे बालक कर्णबधिर असू शकते.असेलच असे नाही परंतु शक्यता असते.

कर्णबधिरत्व येण्याचे परिस्थितीजन्य कारणे.

  • रक्तगट समस्या आई व वडील यांच्या रक्तगट एकच असेल तर हे अपंगत्व येऊ शकते.
  • चुकीचे औषध उपचार
  • कुपोषण
  • गर्भपाताचा अयशस्वी प्रयत्न
  • आईला गर्भावस्थेत असताना कावीळ होणे.
  • कांजण्या आणि गोवर होणे.
  • मद्यपान धूम्रपान क्ष-किरणांच्या तपासणीने इत्यादी .

कर्णबधिरत्व येण्याचे जन्मावेळेची कारणे.

कमी दिवसाचे व अशक्त बाळ जन्माला येणे.

जन्मानंतर ऑक्सिजनचा पुरवठा न होणे.

जन्मानंतर उशिरा रडणे.

बाराशे ग्रॅमपेक्षा वजन कमी असणे.

जन्मवेळ अपघात होणे.

कर्णबधिरत्व येण्याचे जन्मानंतरची कारणे.

जन्मानंतरच्या कारणांमध्ये कानामध्ये घशात अनैसर्गिक वाढ होणे.

जन्मानंतर लगेच कावीळ होणे.

खूप ताप येणे मेंदूत ताप जाणे.

कानाला दुखापत होणे.

खूप मोठा आवाज ,कानात डॉक्टर यांच्या सल्ल्याशिवाय औषध वापरणे.

कानात टोकदार वस्तु सतत घालणे,कानाचा पडदा तुटणे.

ध्वनिप्रदूषण, इत्यादी वेगवेगळी जन्मानंतर ची कारणे असू शकतात.

कर्णबधिर मुलांचे शिक्षण.

जेव्हा आपल्याला समजते की,आपले मूल किंवा शाळेतील विद्यार्थी कर्णबधिर आहे.तेव्हा आपण त्याच्या शिक्षणाविषयी सकारात्मक होऊन पुढे पाऊल टाकण्यासाठी प्रयत्न करावे.

कर्णबधिर विद्यार्थी (मुले) ही सुद्धा शिक्षण क्षेत्रात चांगले यश संपादन करू शकतात.जगात आपण अनेक ठिकाणी अनेक शाळेमध्ये पाहू शकता कि,कर्णबधिर विद्यार्थी(मुले) अनक चांगल्या ठिकाणी काम करत आहेत.



कर्णबधिर मुलांची बुद्धिमत्ता ही इतर विद्यार्थी (मुले) च्या बुद्धिमत्ते पेक्षा खूप चांगल्या प्रतीची असल्याने त्यांना शिक्षण देणे खूप महत्त्वाचे आहे.

कर्णबधिर मुल ही बौद्धिक दृष्ट्या ही चांगली असतात. फक्त कानांनी आवाज न आल्यामुळे या विद्यार्थ्यांचा भाषा आणि वाचा विकास होत नाही. हे आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या प्रकारे यश संपादन करू शकतात.त्यासाठी काही पुढील काही मुद्दे आपण पाहूया .


कर्णबधिर मुलांचे लवकरात लवकर निदान व उपचार.

जेव्हा असे समजेल की,आपल्या मुलाला ऐकायला येत नाही किंवा तो बोलत नाही,त्याच वेळी आपण तज्ञ डॉक्टर यांचा सल्ला घेऊन आपल्या मुलाची श्रवण चाचणी (Audiometry) करून घेणे आवश्यक असते.

Audiometry केल्यानंतर श्रवणालेख काढून त्याला किती प्रमाणात ऐकायला येते याची खात्री करून त्याची उर्वरीत श्रवणशक्ती किती आहे हे मोजूनआणि श्रवणर्हासानुसार श्रवण यंत्राची Hearing Aid ची निवड करून लवकरात लवकर निदान आणि उपचार करून घेणे आवश्यक असते.



काही पालक आपल्या मुलांना ऐकायला येत नाही किंवा बोलत नाही म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे घरगुती उपचार अथवा वेगवेगळ्या ठिकाणी अंधश्रद्धा मनात घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी आपला वेळ वाया घालतात.

कर्णबधिर मुलांची भाषा आणि वाचा विकास होण्याचे वय हे 0ते6 वर्ष आहे,म्हणून हे वय खूप महत्त्वाचे असून याच वयामध्ये मुलांची भाषा व वाचा विकास होत असतो. तोच वेळ वाया गेल्याने ही कर्णबधिर मुले इतर मुलांच्या तुलनेत माघे पडत असतात. म्हणून लवकरात लवकर निदान व उपचार करणे महत्त्वाचे असते.


कर्णबधिरांसाठी श्रवणयंत्राचे (Hearing Aid) महत्व.

कर्णबधिरांसाठी श्रवणयंत्र (Hearing Aid) हे खूप महत्त्वाचे आहे कर्णबधिर मुलांना श्रवणयंत्राचा लवकरात लवकर वापर केल्यास मुलांची भाषा व वाचा विकास होण्यास मदत होते.

कर्णबधिर मुलांचे श्रवणयंत्र (Hearing Aid) म्हणजे त्यांचे कान आहेत. ही गोष्ट कधीही विसरू नये.

श्रवण यंत्र (Hearing Aid) हे त्याच्या श्रवणर्हास नुसार निवडलेले असावी.

श्रवणयंत्र मध्ये वेगवेगळे प्रकार आता उपलब्ध आहेत.जेवढे चांगल्या प्रतीचे श्रवणयंत्र (Hearing Aid) वापराल तेवढा कर्णबधिरांना त्याचा फायदा होतो.

  

कर्णबधिरांना Hearing Aid (श्रवणयंत्र) चा नियमित वापर केल्याने त्यांच्या भाषा व वाचा विकासात झपाट्याने वाढ होते.

कर्णबधिरांसाठी श्रवणयंत्राचा वापर करणे खूप महत्त्वाचे आहे कारण सर्व Hearing Aid हे कर्णबधिरांसाठी कानाची भूमिका पार पाडतात.

लवकरात लवकर निदान आणि उपचार करून Hearing Aid (श्रवणयंत्र) नियमित वापर केल्यास कर्णबधिरत्व कमी करता येते.

कर्णबधिर मुलांसाठी योग्य शिक्षण पद्धती.

कर्णबधिर मुलांसाठी योग्य शिक्षण पद्धती कुठली असा प्रश्न पालकांच्या मनात येत असतो कर्णबधिर मुलांना शिक्षणासाठी वेगवेगळे मत प्रवाह आहेत.



1.विशेष शाळा (Special School for Hearing Impairment).

विशेष शाळा (Special School) कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी हे स्पेशल स्कूल विद्यार्थ्यांना शिकण्याची संधी निर्माण करून देते.

याठिकाणी विशेष शाळेमध्ये विशेष शिक्षक यांची नेमणूक करून उदा.कर्णबधिरांसाठी कर्णबधिरांच्या प्रशिक्षित शिक्षक त्यामध्ये (विशेष शिक्षणातील बीएड ,डीएड) धारक विशेष शिक्षक असतात.

विशेष शाळेमध्ये स्पेशल टीचर म्हणून काम करत असतात आणि विशेष शाळा किंवा स्पेशल स्कूल हे त्या-त्या दिव्यांग प्रवर्गानुसार वेगवेगळे असून कर्णबधिर यांची विशेष शाळा हे कर्णबधिरांसाठी प्रवेश देऊन कर्णबधिरांना त्या ठिकाणी शिक्षण दिले जाते.त्यांनाच विशेष शाळा म्हणतात.

कर्णबधिरांना शिक्षण देणार्‍या भारतामध्ये वेगवेगळ्या संस्था कार्यरत असून त्याठिकाणी हजारोच्या संख्येत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत .

कर्णबधिर मुलांसाठी विशेष शाळा असेल तर त्या ठिकाणी सर्व कर्णबधिर मुले हे शिक्षण घेतात. त्यामुळे इतर मुलांशी त्यांचा संपर्क येत नाही त्यामुळे त्यांच्या अनेक गोष्टींवर मर्यादा पडतात.



कर्णबधिरांच्या शाळेमध्ये कर्णबधिर मुलांसाठी त्यांचा ठरलेला अभ्यासक्रम असून तो अभ्यासक्रम प्रशिक्षित शिक्षक यांच्यामार्फत शिकवला जातो.

काही कर्णबधिर शाळेमध्ये फक्त साईन लँग्वेज-Sign language चा वापर होत असल्याने विद्यार्थी बोलण्याचा प्रयत्न करत नाहीत,त्यामुळे भाषा आणि वाचा विकास होत नाही.

कर्णबधिरांना शिक्षण देणाऱ्या वेगवेगळ्या संस्था सर्व जगभर असून या संस्था कर्णबधिरांना चांगल्या प्रकारे शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच या शाळेत शिकणारे विद्यार्थ्यांची गुणवत्ता ही चांगल्याप्रकारे आढळून येते.

आपण अनेक वेगवेगळ्या ठिकाणी पाहू शकतो की,विशेष शाळेमध्ये विशेष मुलांनी चांगल्या प्रकारे यश संपादन केलेले आहे.

परंतु या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा मला सांगावासा वाटतो की कर्णबधिर मुलांचा भाषा व वाचा विकास होणे हे खूप महत्त्वाचे असून,त्यासाठी विशेष शाळा ऐवजी समावेशित शाळा किंवा सर्वसामान्य मुलांबरोबर त्यांना शिक्षण मिळणे खूप महत्त्वाचे आहे.

परंतु हा प्रश्न ज्या त्या पालकाच्या सोयीवर अवलंबून असल्याने आपल्या पाल्यासाठी योग्य तो निर्णय पालक आपल्या स्तरावर घेत असतात.

2.समावेशित शिक्षण किंवा सर्वसामान्य शाळा.

सर्वच दिव्यांग विद्यार्थ्यांना सर्वसामान्य शाळेत प्रवेश देणे शासनाने बंधनकारक केलेले आहे "हक्काचे आणि सक्तीचे शिक्षण कायदा" यामुळे आपल्या घराजवळील शाळेत शिकण्याची दिव्यांग विद्यार्थ्यांना खूप मोठी संधी निर्माण झालेली आहे. सर्वसामान्य शाळेमध्ये हे विद्यार्थी शिक्षण घेताना आपण पाहात आहोत.

भारत सरकारच्या "समग्र शिक्षा अभियान" सारख्या महत्त्वपूर्ण योजने अंतर्गत "समावेशीत शिक्षण" हा खूप महत्त्वाचा उपक्रम सर्व देशभर राबवला जात आहे.

या उपक्रमांतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांना अध्यापन सहाय्यक व शैक्षणिक संदर्भ सेवा,सुविधा,सोयी सवलती देण्यासाठी विशेष शिक्षण बीएड,डीएड Special Education शिक्षण पूर्ण केलेले प्रशिक्षित "विशेष शिक्षक" यांची नेमणूक करून विद्यार्थ्यांना सर्वसामान्य मुलांसोबत शिक्षण देण्याची चांगली संधी निर्माण झालेली असून सर्व दिव्यांग विद्यार्थी याचा लाभ घेताना आपण पाहात आहोत.

  

सर्वसामान्य विद्यार्थ्यांसोबत शिक्षण घेताना या विद्यार्थ्यांबाबत जो न्यूनगंड आहे तो कमी होतो. तसेच समाजामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमात सर्वसामान्य मुलांसोबत मिसळून या मुलांमध्ये भाषा व वाचा विकास चांगल्याप्रकारे होतो.
म्हणून कर्णबधीर मुलांना सर्वसामान्य मुलांसोबत शिक्षण देणे खूप महत्त्वाचे आहे.

सर्वसामान्य मुलांसोबत शिक्षण घेताना आपल्यात काहीतरी व्यंग आहे ही भावना त्या विद्यार्थ्यांच्या मनात येत नाही तसेच त्यांचे समावेशन हे अगदी सहज रित्या होत असते.

शाळेमध्ये अडथळा विरहित वातावरण निर्मिती करून दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते, तसेच समाजात त्यांना वेगळ्या भावनेने पाहिले जात नाही.

म्हणून कर्णबधिर विद्यार्थीच नाही तर सर्वच दिव्यांग विद्यार्थ्यांना समावेशक शाळा किंवा सर्वसामान्य शाळेत प्रवेश घेणे फायद्याचे ठरते.

कर्णबधिर मुलांना स्पीचथेरपी वाचा उपचार प्रशिक्षण.

कर्णबधिर मुलांना. ऐकायला येत नसल्या कारणाने त्यांना आवाजाचा स्वतःचा फीडबॅक भेटत नाही. त्यामुळे त्यांच्या भाषेचे आणि वाची मध्ये दोष आढळून येतात.

  

भाषण आणि वाचातील दोष कमी करण्यासाठी वाचा उपचार थेरपी (Speech Therapy) खूप महत्त्वाची असून लहान वयातच स्पीच थेरपी देणे आवश्यक असते.

स्पीच थेरपी देण्यासाठी प्रशिक्षित स्पीच थेरपिस्ट म्हणून तज्ञ मार्गदर्शक असतात त्यांच्या सहाय्याने आपण आपल्या कर्णबधिरांच्या वाचा विकास चांगल्या प्रकारे करून घेऊ शकतो.म्हणून लहान वयातच वाचा उपचार Speech Therapy करणे आवश्यक आहे.

कर्णबधिर मुलांची संपर्क पद्धती।Contact Methods for Deaf Children(ads2)

कर्णबधिर मुलांची संपर्क पद्धती ही वेगवेगळ्या प्रकारे आढळून येते .

1.खुणांची पद्धत (Sign language)

यामध्ये वाचा चा उपयोग केला जात नाही.हाताच्या खुणाच्या व चेहऱ्यावरील हावभाव यांच्या साहाय्याने कर्णबधिर मुले किंवा व्यक्ती एकमेकांसोबत संवाद साधून आपले मनातील भावना एकमेकासोबत शेअर करतात.

2.करपल्लवी.

या संपर्क पद्धतीमध्ये हाताच्या बोटांनी निरनिराळी अक्षरे दर्शवली जातात.प्रत्येक अक्षराला विशिष्ट अशी हस्त चिन्हे वापरून करपल्लवी भाषा वापरून संवाद साधला जातो.

3.मौखिक पद्धत Oral method.

या पद्धतीमध्ये मुले वाचा चा वापर करून आपले विचार एकमेकासोबत व्यक्त करतात.

कर्णबधिर मुलांसाठी दृश्य अध्ययन शैली.



दृश्य अध्ययन शैलीचा अध्ययन अध्यापनात वापर करणे कर्णबधिर मुलांना ,विद्यार्थ्यांना खूप फायद्याचे आहे.

कारण ऐकू येत नसल्याने दृश्य अध्ययन शैली चा प्रभावी वापर केल्यास या मुलांना खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होतो.

हे शासनाच्या सुद्धा लक्षात आलेले आहे,त्यामुळे अध्ययन शैलीचा वापर आता करण्यात येतो,यात डोळ्याचा जास्तीत जास्त वापर करून चित्र,कृती ,बॉडी लॅंगवेज इत्यादि चा वापर केला जातो.

दोन शब्द !

कर्णबधिर च नाही तर इतर सर्व दिव्यांग विद्यार्थी आता शिक्षण घेऊ शकतात.त्यामुळे या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी त्यांच्या अडथळ्यावर मात करून त्यांना प्रोस्ताहण देणे आवश्यक आहे.

कर्णबधिर मुलांना आता वेगवेगळ्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध होत आहेत,वाढत्या तंत्रज्ञानाचा वापर करून कर्णबधिर मुलांना सहज शिकवता येऊ शकते.

  

प्रभावी श्रवणयंत्र व Cochlear Implant सारख्या शस्रक्रिया या कर्णबधिरांसाठी जीवनदायी ठरत आहेत. त्यांच्या दिव्यांग/अपंगत्वावर सहज मात करता येऊ शकते.

पोस्ट मध्ये काही बदल असेल किंवा आणखी काही माहिती जोडण्यासाठी नक्की कमेंट करावी.

पोस्ट मध्ये काही बदल असेल किंवा आणखी काही माहिती जोडण्यासाठी नक्की कमेंट करावी.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने