अपंगत्व (दिव्यांगत्व) येण्याचे कारणे व उपाय.
दिव्यांगत्व येण्याचे विविध कारणे आहेत, या वेगवेगळ्या करणाची आपण खालील मुद्द्याच्या आधारे माहिती घेऊया,
अपंगत्व येण्याचे कारणे
अपंगत्व (दिव्यांगत्व) येण्याचे विविध कारणे आहेत त्यापैकी जे कारणे मला माहिती आहेत, त्यांचा उल्लेख मी या ठिकाणी करणार आहे. दिव्यांगत्व किंवा अपंगत्व येण्याचे प्रमुख्याने मुख्य तीन टप्पे विचारात घेणे आवश्यक असते.
1.जन्मापूर्वी ची कारणे .
2.जन्मवेळी ची कारणे .
3.जन्मानंतरची कारणे .
1.अपंगत्व येण्याचे जन्मापूर्वी ची कारणे .
अ. व्यक्तीचा कौटुंबिक इतिहास.
प्रत्येक व्यक्तीला कौटुंबिक इतिहास असतो.व्यक्तीची अनुवंशिकता ही खूप महत्त्वाची आहे.कारण कुटुंबामध्ये पूर्वी जर एखादी दिव्यांग व्यक्ती जन्माला आलेली असली तर पुढील पिढीमध्ये त्या अपंगत्वाचे संक्रमण होते.
कारण अनुवंशिकता ही शास्त्रीयदृष्ट्या खूप महत्त्वाचे असून अनुवंशिक कारणांमुळे मग ते आईकडील किंवा वडिलांकडून त्यांच्या कुटुंबामध्ये पूर्वी जर कोणी दिव्यांग जन्माला आले असेल तर पुढील पिढीमध्ये सुद्धा दिव्यांग किंवा अपंगत्व असलेले मूल जन्माला येऊ शकते.येतेच असे नाही परंतु शक्यता नाकारता येत नाही.
मग या ठिकाणी असा प्रश्न उपस्थित होईल की अनेकांच्या कुटुंबात पूर्वी दिव्यांग व्यक्ति असू शकतात.तर त्याचे उत्तर असेल की आता वैद्यकीय तंत्रज्ञान इतके पुढे गेले आहे की वेळीच उपचार केल्याने अपंगत्व टाळता येऊ शकते. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही.
ब.रंगसूत्रे .
पुरुष व स्त्री यांच्यामध्ये 23 रंगसूत्राच्या जोड्या असतात. त्यातील पुरुषामध्ये 23 पैकी 22 जोड्या (X,X) स्वरूपाच्या असतात.या 22जोड्यांना अटोझोमल क्रोमोझोम असे म्हटले जाते. तर 23 वी जोडीही लिंग निश्चिती म्हणजे सेक्सडिटर माईन असते.ती (X,X) किंवा (X,Y)स्वरूपामध्ये असते.
परंतु स्त्रियांमधील 23 जोड्या या (X,X) स्वरूपाच्या च असतात.म्हणून मुलगा किंवा मुलगी जन्माला येणे हे पूर्णतः पुरुषाच्या 23 व्या रंगसुत्राच्या जोडीवर अवलंबून असते. कारण एक्स वाय(X,Y) ही रंग सूत्राची जोडी फक्त पुरुषाकडे असते.त्यामुळे होणारे किंवा जन्माला येणारे अपत्य हे पुरुषाच्या 23 व्या जोडीवर अवलंबून असते.
रंगसुत्रात काही बिघाड झाल्याने किंवा कमी अधिक काही गोष्टी घडल्या तर अपंगत्व येण्याची शक्यता नाकारू शकत नाही.यात स्री किंवा पुरुषा चा काही दोष नसून हे निसर्गावर अवलंबून असते. एखाद्याला दोष देणे योग्य नाही.
क.नात्यातील लग्न / रक्तगट .
जर एखाद्या स्त्रीचे अथवा पुरुषाचे विवाह हा अगदीच जवळच्या नात्यामध्ये झालेला असेल तर, त्यामुळेसुद्धा त्यांच्या कुटुंबात जन्माला येणारे आपत्य हे दिव्यांग म्हणून जन्माला येऊ शकते.येईलच असेही नाही परंतु शक्यता नाकारू शकत नाही म्हणून शक्यतो लांबच्या नात्यातील व्यक्ती सोबत विवाह करणे फायद्याचे ठरते.कारण समान रक्त सबंध असल्याने ही समस्या येते.
ड.आई वडिलांचे वय .
जर विवाहाचे वय जर अल्पवयीन असेल आणि कमी वयामध्ये विवाह झाला तर त्याचा परिणाम सुद्धा होणाऱ्या किंवा जन्मणाऱ्या अपत्त्यावर होतो. कारण जर स्री चे अथवा पुरुषाचे वय कमी असेल तर, शास्त्रीय दृष्टिकोनातून जन्माला येणार्या अपत्त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या अपंगत्व येऊ शकते. म्हणून शासनाने ठराविक वयाची अट विवाहासाठी लागू केलेली आहे.कारण अपत्याला जन्म देण्याइतकी स्री किंवा पुरुषाची वाढ झालेली नसल्याने पुढे या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.
इ.जन्मपूर्व अवस्थेतील वैद्यकीय उपचार किंवा अपुऱ्या सोयी सुविधा .
अपंगत्व येण्यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे जन्मपूर्व अवस्थेतील वेगवेगळ्या तपासण्या, त्यातील क्ष किरणांची तपासणी किंवा गर्भावस्थेतील मातेला होणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे आजार,विषबाधा,अमली पदार्थांचे सेवन, अनियमित रक्तदाब,शारीरिक अथवा मानसिक आघात (अपघात) .
गर्भपात करण्याचा अयशस्वी प्रयत्न करणे, मधुमेहासारखे आजार,रूबेला ची लागण होणे, संसर्गजन्य आजारांची लागण होणे, चुकीचे औषध उपचार डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधाचे सेवन करणे, तसेच गर्भवती अवस्थेत असताना स्री चा आहार हे सर्व घटक जन्मपूर्व अवस्थेमध्ये महत्त्वाचे असतात.
2. अपंगत्व येण्याचे जन्मवेळी ची कारणे.
जन्म होताना चुकीच्या डॉक्टरांचा सल्ला तसेच लवकर उपचार किंवा प्रसूती न होणे म्हणजे प्रसुतीला जास्त वेळ लागणे.तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय प्रसूती करणे.
ऑक्सिजनचा पुरवठा बाळाला व्यवस्थित झाला नाही तर होणारे बाळ हे दिव्यांग जन्माला येऊ शकते.मेंदूला इजा झाल्यास तसेच बाळाला जन्मावेळी डोक्याला मार लागणे, बाळ पडणे, म्हणजेच बाळाचा अपघात होणे हे जन्मावेळी टाळणे आवश्यक असते.
कमी दिवसाचे बाळ जन्माला येणे कमी वजनाचे बाळ जन्माला येणे. प्रसूतीचा कालावधी जर जास्त दिवस लांबला तर होणारे बाळ हे दिव्यांग असू शकते.म्हणजेच वेळेत प्रसूती होणे महत्वाचे असते.
एकापेक्षा जास्त बाळ जन्माला आल्यास त्यातील एखादे बाळ हे दिव्यांग असू शकते.होईलच असे नाही परंतु शक्यता नाकारता येत नाही.अवजार व हत्याराचा प्रसूती वेळी योग्य वापर न होणे.
तसेच बाळाला जन्मताच कावीळ होणे. रक्तस्राव जास्त होणे. प्रसूतीच्या वेळी अनियमित रक्तदाब असल्यास त्याचा परिणाम बाळावर होतो.
3.अपंगत्व येण्याचे जन्मानंतर ची कारणे.
जन्मानंतरच्या कारणांमध्ये प्रमुख्याने अपंगत्व येण्यामागे वेगवेगळी कारणे आहेत त्यामध्ये महत्त्वाचे म्हणजे बाळाला कावीळ होणे.
एखाद्या आजाराचा संसर्ग होणे.झटके येणे ,मेंदूला सूज येणे,लहान वयात मेंदूला इजा होणे विषबाधा होणे, योग्य आहार नसेल तर त्याचा परिणाम वाढ आणि विकासावर होतो.म्हणून लहान वयामध्ये जन्मानंतर च्या या कारणांमध्ये विविध गोष्टींचा समावेश होतो.
तसेच योग्य त्या वयामध्ये वेळोवेळी लसीकरण करून घेणे.मानसिक शारीरिक आघात,ताणतणाव यामुळे सुद्धा अपंगत्व येऊ शकते.
अपघात होणे हे एक अपंगत्व येण्याचे मुख्य कारण आहे.
जन्मानंतरच्या कारणांमध्ये विविध कारणे समाविष्ट होऊ शकतात.
जी कारणे मला माहिती आहेत,त्या कारणांचा मी या ठिकाणी उल्लेख केला आहे.या व्यतिरिक्तही अनेक कारणे अपंगत्व येण्यासाठी कारणीभूत असतात.
अपंगत्व टाळण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात?
गर्भधारणा च्या वेळी स्त्रीचे वय 35 वर्षांपूर्वी चे असेल किंवा 18 वर्षापेक्षा कमी नसेल तर गर्भधारणा टाळावी.
गर्भधारणेच्या वेळी पुरुषाचे वय 55 वर्षाच्या पुढे नसावे. जवळच्या नात्यात विवाह करू नये.करायचं असेल तर वैद्यकीय सल्ला घ्यावा.
माता पित्याकडून मुलांना ज्याप्रमाणे चांगल्या गोष्टीचा वारसा मिळतो. त्याप्रमाणे वाईट गोष्टीसुद्धा मिळत असतात. म्हणून कुटुंबातील यापूर्वी इतिहास जाणून घेणे महत्त्वाचे असते.व त्यावर उपचार करणे किंवा उपाय करणे आवश्यक असते.म्हणजे अपंगत्व टाळण्यासाठी योग्य त्या प्रकारेउपचार करता येतात किंवा तपासण्या करता येतात.
गर्भधारणेनंतर वैद्यकीय सल्ल्यानुसारच औषधे घेणे आवश्यक असते. मातेला गर्भावस्थेत असताना सकस व पूरक असा समतोल आहार घेणे गरजेचे असते. त्यासाठी आहाराचे समतोल राहील यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असते. ठराविक काळानंतर वेळोवेळी वैद्यकीय तपासणी किंवा चाचणी करून घेणे महत्त्वाचे असते.
धूम्रपान मद्यपान धूम्रपान थांबून किंवा अमली पदार्थाचे सेवन थांबवणे महत्त्वाचे असते.गर्भावस्थेत असताना जर वस्तू उचलणे, अपघात होणे, मानसिक ताण तणाव इत्यादी गोष्टी टाळणे आवश्यक आहे. तसेच पहिल्या तीन महिन्यांमध्ये गर्भावस्थेत असताना क्ष-किरणांचा संपर्क टाळावा.वेळेत प्रसूती होऊन द्यावी.
प्रसूती शक्यतो हॉस्पीटलमध्ये तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करणे योग्य असते.
बाळ जन्मल्याबरोबर रडले नाही तर मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. म्हणून जन्म झाल्याबरोबर बाळ रडणे आवश्यक आहे.
आई-वडिलांचा रक्तगट शक्यतो एक असेल तर त्यासंबंधी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक असते.प्रसूती झाल्यानंतर बाळाला कुठल्या प्रकारचा संसर्ग होणार नाही याकडे लक्ष देणे आवश्यक असते.तसेच बाळाचा अपघात होणार नाही.
बाळाला कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. बाळाचे लसीकरण, गोवर, कांजण्या लसीकरण वेळीच करणे आवश्यक असते.
बाळाला एखाद्या वेळी खूप ताप आला असेल तर त्यावेळी दुर्लक्ष करणे हे धोक्याचे ठरू शकते.बाळाला फिट्स येत असतील तर तज्ञ डॉक्टरांचा वेळीच सल्ला घेणे आवश्यक असते.तसेच बाळाच्या सकस आहार आणि समतोल आहार याकडे लक्ष देणे महत्वाचे असते.
अपंगत्व असलेले मूल जन्माला आले तर काय करावे?
1.दिव्यांगत्वाचा।अपंगत्वाचा स्वीकार करा.
जन्माला आलेल्या मुलाला अपंगत्व आहे हे तज्ञ डॉक्टर यांच्याशिवाय ठरवू नये .
त्या संबंधित तज्ज्ञांनी सांगितले की तुमचे बाळाला अपंगत्व आहे,तर त्याचा हसत हसत स्वीकार करा.
दिव्यांग मुलाचे अपंगत्व स्वीकारा आपले मनोधैर्य खचून जाऊन न देता,त्याचा स्वीकार केला तर तेच मुल तुमचा पुढील आयुष्याचं नक्कीच आधार होणार हे लक्षात ठेवा.कारण जगात अनेक दिव्यांग व्यक्तींचे कार्य लक्षात असू द्या.
आपले मूल दिव्यांग झाले असेल किंवा त्याला एखाद्या अवयवाला अपंगत्व आलेलं असेल परंतु त्याचे किंवा तुमचे मन दिव्यांग होऊ देऊ नका.
दिव्यांग मुलाच्या विकासासाठी आई वडील,मित्र,समाज, इ घटक यांनी सन्मान देणे आणि त्याच्या जीवनात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशील असणे गरजेचे आहे.
दिव्यांग व्यक्तींना एक समाजाचा आधारस्तंभ बनऊ शकतो.
म्हणून प्रथम कुटुंबात त्याचा अपंत्वाचा स्वीकार केला गेला पाहिजे.
2.शीघ्र हस्तक्षेप करा.
बालकाला अपंगत्व आलेले आहे हे लक्षात येताच ताबडतोब तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि वेळीच त्यावर उपाययोजना करा. तपासणी करून त्याचे अपंगत्व कमी कसे करता येईल यासाठी प्रयत्नशील राहा.
वाढ व विकास याकडे प्रामुख्याने लक्ष देऊन वेळोवेळी औषध उपचार करून त्याच्या आहाराकडे लक्ष देऊन त्याचा विकास घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील राहा. शीघ्र हस्तक्षेप म्हणजे 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांचा विकास करणे. 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांना शीघ्र हस्तक्षेप निदान आणि उपचार तंत्र राबवले तर बालक जसे पुढे मोठे मोठे होत जाते तसे त्याचे अपंगत्व आहे कमी कमी होण्यास मदत मिळते.म्हणून दिव्यांग किंवा अपंगत्व आलेल्या बालकांना शीघ्र हस्तक्षेप हे खूप महत्त्वाचे उपचार तंत्र आहे.
3.दिव्यांग मुलाला शाळेत प्रवेश
दिव्यांग मुलांना सर्वसामान्य मुलांसोबत शाळेत प्रवेश द्यावा. सर्व सामान्य मुलांसोबतच त्यांना प्रवेश देणे आता RTE Act या शासनाच्या कायद्यानुसार बंधनकारक आहे. मोफत आणि सक्तीचे शिक्षण हा कायदा करण्यात आल्यामुळे दिव्यांग मुलांना सर्वसामान्य मुलांसोबत शिकण्याची संधी निर्माण झालेली आहे.
तसेच RTE ACT नुसार हे सर्व शाळांना व समाजाला बंधनकारक आहे. दिव्यांग च नाही तर कोणतेही 18 वर्षे वयाखालील बालकांना कोणीही शिक्षणापासून वंचित ठेवू शकत नाही.शिकणे हा त्यांचा अधिकार आहे.त्यामुळे यात दिव्यांग अपंगत्व बालकांचा सुद्धा समावेश आहे.हा कायदा सर्वांसाठी समान आहे.
अपंग मुलांचा विकास हा सर्वसामान्य मुलांसोबत लवकर होतो.असे शासनाच्या लक्षात आल्याने शासनाने समग्र शिक्षा अभियान अंतर्गत समावेशित शिक्षण हा उपक्रम राबवला आहे.
सर्वसामान्य मुलांसोबत दिव्यांग मूल शाळेत सहज शिकू शकते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील न्यूनगंड कमी होण्यास मनात मदत होते आपण वेगळे आहोत ही भावना दिव्यांग मुलांच्या मनात येत नाही त्यामुळे त्यांची वाढ व विकास होण्यास मदत होते म्हणून दिव्यांग मुलांना शिक्षण प्रवाहात टिकून ठेवणे व त्यांना प्रोत्साहन देणे हे एक प्रकारे अपंगत्वावर मात केल्यासारखेच आहे.
दिव्यांग मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवू नका. तसेच त्याला वेळोवेळी संधी देण्याचा प्रयत्न करून व्यवसाय पूर्व प्रशिक्षण देऊन त्याला सक्षम नागरिक बनवण्यासाठी व स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्नशील राहा.