अभ्यासातील इंटरनेट चे महत्व आणि वापर.
अभ्यासासाठी इंटरनेट चा प्रभावी वापर |
अभ्यासासाठी इंटरनेट(Internet) चा प्रभावी वापर कसा करावा?
अभ्यास करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात.सध्याचे जग हे धावते आणि तंत्रज्ञानाचे जग असून प्रत्येकाला वेळेची मर्यादा आहे.तसेच कोरोना सारखी महामारी पसरल्यामुळे जगातील सर्व जनजीवन विस्कळित झाले .या अशा संकटांचा सामना सर्वांना करावा लागला.परंतु मानवाने एवढी प्रगती केली आहे की तंत्रज्ञान वापरून अनेक संकटांवर मात केलेली आपण पाहत आहोत.
अर्थातच एकीकडे मानवाने प्रगती जरी केलेली असेल तरी याचे दुष्परिणाम देखील सजीव सृष्टीवर होताना आपण पाहत आहोत.आपला विषय हा अभ्यास करताना इंटरनेट(Internet) चा प्रभावी वापर कसा करावा हा असून आपण काही मुद्द्याच्या सहाय्याने माहिती घेऊया.
इंटरनेट (Internet) कशाला म्हणतात.
इंटरनेट (Internet) ला मराठीमध्ये "आंतरजाल"असे म्हणतात.हे एका प्रकारचे नेटवर्क चे जाळे आहे.इंटरनेट हे जगभरातील सर्व डिजिटल उपकरणे,टॉवर्स,कृत्रिम उपग्रहांच्या माध्यमातून जोडले गेलेले आहे.त्यामुळे संदेशवहन करण्यासाठी इंटरनेट(Internet) हे सध्याचे जगातील मुख्य साधन म्हणून वापरले जाते.जवळजवळ मानवी जीवन हे इंटरनेट(Internet) वर अवलंबून आहे असे म्हटले तरी आता नवल वाटणार नाही.
इंटरनेट मुळे जग हे एकमेकांच्या अगदी जवळ येण्यास मदत झाली.1969 साली अमेरिकेत इंटरनेट चा जन्म झालेला आहे.जगभरात पसरलेली माहिती आपल्याला एकाच ठिकाणी इंटरनेट च्या मदतीने गोळा करता येते.
इंटरनेट(Internet) चा वापर सर्वच विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर होत असून शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा इंटरनेट हे खूप महत्त्वाचे साधन आहे. इंटरनेटचा वापर करून आपण शिक्षण सहजपणे घेऊ शकतो .
कोरोना महामारी च्या काळात शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शिक्षण इंटरनेटच्या माध्यमातून सुरू होते.याचा फायदा किंवा इंटरनेटचे महत्त्व कोरोना महामारी च्या काळामध्ये जगाला समजलेले आहे.
इंटरनेटमुळे शिक्षणात नवीन क्रांती घडून आलेली आहे.भारतासारख्या मोठे क्षेत्रफळ असणार्या देशात तसेच दुर्गम भागात सुद्धा आता इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला असून,"ऑनलाइन शिक्षण" ही संकल्पना नव्याने उदयास येऊ लागली आहे.
यापूर्वी इंटरनेट हे खूप महागडी सेवा म्हणून पाहिले जात असे. परंतु आता इंटरनेट साठी जास्त पैसे खर्च करावे लागत नाहीत.ते सहज उपलब्ध होते.त्यामुळे इंटरनेटचा वापर अगदी खेडेगावातील शाळेत सुद्धा होऊ लागला आहे.
शिक्षण क्षेत्रामध्ये इंटरनेटचा खूप उपयोग करून घेता येऊ शकतो. इंटरनेट मुळे शिक्षण घेणे खूप सोयीचे आणि सोपे झालेले आहे. शिक्षण क्षेत्राला इंटरनेटचा खूप फायदा होताना आपण पहात आहोत.
1.इंटरनेट चा शाळेतील वापर.
इंटरनेटचा(Internet) अभ्यासासाठी प्रभावी वापर करण्यासाठी आपल्याकडे काही साधने आवश्यक असतात. त्यामध्ये संगणक(Computer), मोबाईल(Mobile), लॅपटॉप(Laptop), टीव्ही (T V)वेगवेगळ्या साधनांचा वापर करून आपण इंटरनेटचा आपल्या अभ्यासामध्ये उपयोग करून घेऊ शकतो.
इंटरनेट (Internet) हे सर्वच शाळेत आता सहज उपलब्ध आहे.शाळेत वेगवेगळ्या शिक्षण संस्था,ह्या वेगवेगळया प्रकारे प्रोजेक्ट तयार करण्यासाठी,प्रयोग तयार करण्यासाठी,रिसर्च करून माहिती घेण्यासाठी ,अभ्यास करताना नोट्स काढण्यासाठी ,अध्यापनात एखादी माहिती मुद्दा समजाऊन सांगण्यासाठी इंटरनेट विद्यार्थ्यांसाठी वापरले जाते.विविध शैक्षणिक Computer Course साठी इंटरनेट वापरले जाते.
शाळेत शिक्षकांना एखादी माहिती इंटरनेट च्या माध्यमातून सहजपणे उपलब्ध करून Videos च्या स्वरुपात उपलब्ध करून देता येते. तसेच एखाद्या विषयाबद्दल अधिक माहिती हवी असल्यास Google Search (गूगल सर्च इंजिन) च्या मदतीने ती माहिती उपलब्ध करता येते. एखादी संकल्पना प्रभावी समजाऊन सांगण्यासाठी शिक्षकांना शाळेत इंटरनेट सहाय्य करते.
ऑनलाइन शिक्षण पद्धत ही कोरोना महामारी च्या काळात खूप उपयोगी आली. कारण कोरोना महामारी मध्ये लोकडॉन असल्या कारणाने कोणालाही घराच्या बाहेर जाण्यास तसेच सार्वजनिक ठिकाणी जाण्यास बंदी असल्याने शाळा,महाविद्यालय सर्व बंद असल्याने मुलांच्या अभ्यासाचा प्रश्न निर्माण झाला होता.
परंतु इंटरनेट(Internet) सारख्या प्रभावी माध्यमाचा वापर करून ऑनलाइन शिक्षण देण्याचा चा फायदा मुलांना अभ्यास करताना झाला.संगणक,लॅपटॉप किंवा मोबाईलचा वापर करून जगातील कोणत्याही ठिकाणावरून शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांसह इंटरनेटच्या माध्यमातून संपर्क साधू शकतो.म्हणून प्रत्येक शाळेत इंटरनेट असणे गरजेचे आहे.
What s App, Zoom(झूम),Google Meet (गुगल मिट), व्हिडिओ कॉल, व्हिडिओ, YouTube सारख्या टूल्स चा वापर करून विद्यार्थी सहजपणे आपल्या घरी बसल्या जाग्यावर शिक्षण घेऊ शकतात. ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी आपल्याकडे इंटरनेट कनेक्टिव्हिटी आवश्यक असते.इंटरनेट सुविधा पुरवणार्या Idea, Jio, Vodaphone सारख्या कंपन्या नेटवर्क देताना आपण पाहत आहोत.
ऑनलाइन शिक्षण म्हणजेच जे शिक्षण आपण शाळेत जाऊन प्रत्यक्ष ब्लॅक बोर्ड किंवा शिक्षकांच्या प्रत्यक्ष अध्ययन-अध्यापन आतून शाळा-महाविद्यालयांमध्ये घेतो तेच शिक्षण आपण संगणक,कॉम्प्युटर,मोबाईल आणि इंटरनेटच्या माध्यमातून घरी बसल्या बसल्या सहजपणे घेऊ शकतो यालाच ऑनलाईन शिक्षण असे म्हणतात. ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी वेगवेगळे सॉफ्टवेअर उपलब्ध असतात.त्याचा वापर करून आपण आपले ऑनलाईन शिक्षण घेऊ शकतो.
2.अभ्यासासाठी Google (गुगल) चा वापर.
गुगल सर्च इंजिन हे जगातील सर्वात मोठे आणि सर्वात प्रभावी असे सर्च इंजिन समजले जाते. गुगल सर्च इंजिन हे एक सर्वसामान्य माणसालासुद्धा उपयोगी ठरणारा घटक असून गुगल कंपनी ही सर्व जगभर पसरलेली असून आज प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये तसेच संगणकामध्ये गुगल सर्च इंजिनचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे.
इंटरनेटचा वापर करून आपण गुगल सारख्या ठिकाणी आपल्याला हवे असलेले कन्टेन्ट शोधून त्याचा अभ्यास करू शकतो. तसेच हवी असलेली माहिती हव्या त्या वेळी आपल्या सोयीनुसार वापरून अभ्यास करू शकतो. गुगल च्या साह्याने आपण कुठल्याही प्रकारची माहिती ही ताबडतोब सर्च करून इंटरनेटचा उपयोग करून आपण उपलब्ध करून घेऊ शकतो अथवा इतरांकडून माहिती प्राप्त करून घेऊ शकतो.
म्हणून वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था, विद्यार्थी,पालक, मोठ्या मोठ्या कंपन्या याठिकाणी गुगल सारख्या सर्च इंजिनचा वापर अभ्यासात तसेच नवीन नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी उपयोग केला जातो. म्हणून गुगल हे एक अभ्यास करण्यासाठी जगातील सर्वात मोठे प्लॅटफॉर्म समजले जाते. जीमेल ही गुगलची सर्वात मोठी ईमेल करण्यासाठी व वापरण्यात येणारे सेवा आहे.
3.अभ्यासासाठी YouTube चा वापर.
YouTube (यू ट्यूब) च्या मदतीने आपण आपला अभ्यास सहजपणे करू शकतो.YouTube हे एक ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी प्रभावी गूगल(Google)चे साधन आहे.यात वेगवेगळ्या विषयासंबधि videos आपल्याला पहायला मिळतील. हे गूगल चे मोफत Tools असून आपण त्याच्या सहाय्याने शिक्षण घेऊ शकतो.पाहिजे असलेली माहिती यूट्यूब सर्च बॉक्स मध्ये टाईप करून आपण त्या महितीचा videos पाहू शकतो.
हे दृश्य आणि श्राव्य स्वरुपात माहिती प्रसारित करण्याचे महत्वाचे साधन आहे.YouTube च्या सहाय्याने ऑनलाईन लाईव्ह क्लास सुधा घेण्याची सुविधा आहे.तसेच कमेंट करण्याची सुविधा त्यात दिली गेलेली आहे. याशिवाय इतर खूप प्रकारे options त्यात आहेत.तसेच वारण्यास खूप सोपे आहे.
YouTube(यू ट्यूब)चा वापर तुम्ही तुमच्या मोबाईल,स्मार्टटीव्ही, स्मार्टफोन,Computer,LCD वर सुद्धा करू शकता फक्त त्या उपकरणांना इंटरनेट जोडण्याची सुविधा असावी.
4.अभ्यासासाठी PDF File(पी डी एफ) चा वापर.
PDF हे सर्वात जास्त वापर होत असलेले एक Tools असून ,PDF( पि डी एफ) म्हणजे पोर्टेबल फॉर्मेट डॉक्युमेंट्स असे म्हटले जाते.हे टूल्स आपण एखादा मजकूर जर word, excle , power point स्वरूपात लिहिलेला असेल तर त्याची pdf file करून ती इतर ठिकाणी शेअर करता येणे सहज शक्य असते.pdf file ही आपण What's App ,Email, Facebook इत्यादी ठिकाणी शेअर करू शकतो.
तसेच pdf स्वरूपातील माहिती आपण एखाद्या गूगल ड्राईव्ह सारख्या ऑनलाईन स्टोरेज मध्ये साठवून ठेऊन वेळ असेल तेव्हा तिचे वाचन करू शकतो.तसेच आपण लिहलेले माहिती आपण pad स्वरूपात वाचण्यास अधिक सोपे करू शकतो.वेगवेगळ्या शैक्षणिक माहित्या pdf file मध्ये साठवून त्याच माहितीचा अभ्यासात उपयोग करून घेता येतो.
5.अभ्यासासाठी गुगल मीट.
Google Meet हे गुगलने मोफत उपलब्ध करून दिलेला प्लॅटफॉर्म असून, गुगल मीट च्या साह्याने अनेक व्यक्ती एकाच वेळी मीटिंग,चर्चासत्र किंवा शिकवण्यासाठी,अध्ययन अध्यापनात प्रभावी वापर म्हणून गुगल मीट चा उपयोग केला जातो.
कोरोना महामारी च्या काळात ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी गूगल मीट चा सर्वात जास्त वापर झालेला आढळून येतो. गुगल मीट हे मोफत सॉफ्टवेअर असून ते गुगल सर्च इंजिन सारख्या प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनीचे सुरक्षित व वापरण्यास सोपे आहे .
गूगल मीट च्या साह्याने आपण एका ठिकाणावरून दुसरीकडे चालले असलेले क्लास लिंक च्या साह्याने जॉईन होऊन करता येतात यामध्ये अनेक व्यक्तींना एकावेळी जोडण्याची संधी किंवा ऑप्शन्स दिलेले असतात.म्हणून त्याच्या साह्याने आपण इंटरनेटच्या मदतीने गूगल मीट हे सॉफ्टवेअर अभ्यासासाठी वापरू शकतो.
6.अभ्यासासाठी झुम (Zoom) चा वापर.
झूम हे ऑनलाईन अध्ययन अध्यापन करण्यासाठी एक प्रभावी तसेच वेगवेगळे मोठे. चर्चासत्र गुगल मीट सारखेच सॉफ्टवेअर असून हे सुद्धा वापरण्यास सहज सोपी आणि मोफत आहे झूम हे ऑनलाइन अध्ययन अध्यापनात खूप प्रभावी साधन असून त्याचा वापर सुद्धा आपण घर बसल्या ऑनलाईन क्लास करण्यासाठी करू शकतो.
हे गुगल मीठ सारखेच असून यामध्ये विविध प्रकारचे ऑप्शन दिलेले आहेत आपण याचा उपयोग अभ्यासात किंवा कोरणा मारामारीचा काळात उपयोग केला असेल.
अगदी दुसऱ्या देशातून सुद्धा आपण गूगल मीठ झूम यासारख्या टूल्सचा ऑनलाईन क्लास घेण्यासाठी वापर करू शकतो यामध्ये एका सोबत अनेक व्यक्तींना जॉईन होण्याची व सोबत शिकण्याची संधी सुद्धा मिळते त्यामुळे झूम हे एक ऑनलाईन शिकण्यासाठी प्रभावी सॉफ्टवेअर आहे.
7.अभ्यासासाठी शैक्षणिक वेबसाईट.
शैक्षणिक वेबसाईट मध्ये वेगवेगळ्या प्रकारे अभ्यासक्रम अपलोड करून त्याद्वारे सुद्धा ऑनलाईन इंटरनेटच्या सहाय्याने घरबसल्या अभ्यास करण्याची सोय उपलब्ध आहे. यामध्ये काही शैक्षणिक वेबसाईट या पैसे भरून किंवा ठराविक शुल्क आकारून आपल्याला त्यामध्ये अभ्यास करता येतो.
तसेच काही वेबसाइट या मोफत असून आपण त्या इंटरनेटच्या माध्यमातून सहजपणे सर्च करून त्यावर अभ्यास करू शकतो. शैक्षणिक वेबसाईट्स ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षणासाठी संधी निर्माण करतात.
प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण तसेच उच्च माध्यमिक शिक्षण वेगवेगळे वोकेशनल कोर्स तसेच वेगवेगळ्या इंजिनिअरिंग, मेडिकल च्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या शैक्षणिक साईट्स इंटरनेटवर मोफत उपलब्ध असतात.म्हणून अभ्यास करण्यासाठी वेबसाईट या महत्त्वाच्या असून आपल्याला त्या मोबाईल लॅपटॉप किंवा संगणकाच्या साह्याने अभ्यास करण्यासाठी त्याचा उपयोग करून घेता येतो.
इंटरनेटच्या साहाय्याने अभ्यास करण्यासाठी वेगवेगळे सोशल मीडिया, साईट्स व त्याचे ॲप्स उपलब्ध आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सध्याच्या काळात उपयोग होणारे फेसबूक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप इत्यादी सॉफ्टवेअर आपल्याला अभ्यास करण्यासाठी उपयोगी ठरत आहेत.
इंटरनेटने सर्वांचे जागणे सहज आणि सोपे केलेले आहे. त्यामुळे इंटरनेट हा जीवन जगण्याचा एक अविभाज्य घटक ठरत आहे. वेगवेगळ्या डिजिटल साधनांच्या साह्याने इंटरनेट ॲक्सेस करून त्यावर वेगवेगळ्या माहिती अपलोड केली जात आहेत आणि त्याचा वापर internet मुळे करणे सहज शक्य व सोपे झालेले आहे.
आमचा What's App group जॉईन करू शकता: