गणित विषयाचा अभ्यास करण्यासाठी महत्वाचे मुद्दे.

गणित विषयाचे महत्त्व.

गणित हा विषय शालेय जीवनात महत्वाचा तर आहेच परंतु दैनंदिन जीवनामध्ये मानवाला प्रत्येक गोष्टींमध्ये गणिताची आवश्यकता भासते. म्हणून मानवी जीवनात गणित या विषयाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सकाळी झोपेतून उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत माणूस दिवसभर दिवसातून खूप वेळेस गणिती क्रिया मनातल्या मनात तरी करत असतो.  

गणित विषयाचा अभ्यास करण्यासाठी महत्वाचे मुद्दे.The study of mathematics
गणित

गणित हा विषय व्यवहारासाठी जास्त उपयोगी पडणारा विषय असून,गणिताशिवाय व्यवहार ज्ञान किंवा कोणताही व्यवहार पूर्ण होत नाही.आपण दिवसभर मोजमाप,तर्क,अंदाज लावत असतो.म्हणजे गणिती क्रियाच करत असतो.

गणित हा विषय सर्व विषयांचा मूळ आधार आहे.जो व्यक्ती गणित विषयात हुशार किंवा गणिती क्रिया करण्यात हुशार असतो,तो जीवनात अनेक संकटांवर मात करू शकतो.

गणित या विषयाने मानवी जीवनात सुसूत्रता आणली आहे.म्हणून शालेय जीवनात गणित विषय महत्वाचा समजला जातो.

गणित विषयाची ओळख करून घ्या.

जसे आपण प्राथमिक शाळेत प्रवेश करतो,तसा आपला आणि गणित विषयाचा जास्त संबंध येऊ लागतो.मित्र मैत्रिणी सोबत नकळतपने आपण गणित विषयाशी मैत्री करत असतो.शालेय जीवनात सामुदायिक खेळ खेळताना आपण गणिताची सुरवात कधी करतो समजून येत नाही.

अगदी छोट्या छोट्या गोष्टी मध्ये गणित आहे.त्यामुळे गणित विषयाची ओळख आवर्जून करून घेणे महत्वाचे वाटत नाही.परंतु काही गणितीय क्रिया जशा आपल्याला अवघड आणि क्लेशदायक वाटायला सुरवात होते. तेव्हा गणिताची ओळख आपल्याला पटायला लागते.

गणिताचा क्रमबद्ध अभ्यास करा.

गणित विषयाचा अभ्यास करताना क्रमबद्धपणे अभ्यास करणे हेच सोयीचे असते.कारण जसे जसे आपण क्रमाक्रमाने गणित शिकू तसे आपली गणिताची पायरी पक्की होत जाते. म्हणून गणित हा एक असा विषय आहे की तो प्राथमिक शाळेतील प्रवेश केल्यापासून पुढे आपल्याला टप्प्याटप्प्याने समजून घेऊन वेगवेगळ्या उदाहरणाच्या सहाय्याने गणित विषयाचा अभ्यास करावा लागतो.

गणित विषयातील पहिला टप्पा म्हणजे गणन पूर्वतयारी होय. गणन पूर्वतयारी मध्ये आपण छोट्या छोट्या गोष्टी किंवा गणितातील संकल्पना विद्यार्थ्यांना समजून सांगणे अपेक्षित असते.त्यात विद्यार्थ्यांना जवळ-दूर,आत-बाहेर, डावा-उजवा,कमी-जास्त,लहान-मोठा,कमी किती ने कमी,जास्त किती ने जास्त इत्यादी तुलनात्मक शब्द समजून सांगणे आवश्यक असते. यालाच गणन पूर्वतयारी असेही म्हटले जाते.

दुसऱ्या टप्प्यामध्ये संख्याज्ञान या संख्याज्ञान टप्प्यांमध्ये वेगवेगळ्या प्रत्यक्ष वस्तू किंवा अंक लेखन तसेच संख्या लेखन  करुन गणित पेटीतील विविध साहित्याचा वापर करणे, तसेच आपल्या आजूबाजूला परिसरातील वेगवेगळ्या गणित समजवण्यासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंची जमवाजमव करून त्यातून आपण मोजणी,मोठेपणा,जास्त कमी, लहान ज्ञान मुलांना देऊ शकतो.

माळेतील मण्यांचा वापर करून आपण एकक,दशक,शतक इत्यादी संकल्पना शिकू शकतो.तसेच वेगवेगळ्या वस्तूंचा संचय करून नाणी-नोटा इत्यादीचा अभ्यास किंवा सराव मुलांना देऊ शकतो.हे पालक किंवा शिक्षकांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. 

संख्या मधील क्रिया हा गणितातील तिसरा टप्पा असून यामध्ये प्रथम बेरीज म्हणजे मिळवणे, वजाबाकी, गुणाकार,भागाकार करताना वेगवेगळ्या प्रकारे उदाहरणाच्या सहाय्याने त्यांची संकल्पना समजावून सांगणे गरजेचे असते.संख्यावरील क्रिया करत असताना वेगवेगळ्या वस्तूचा दृश्य स्वरूपात वापर करणे सोयीचे ठरते. बेरीज संकल्पनेचा अर्थ म्हणजे मिळवणे.वजाबाकी कशी करावी?याची माहिती विद्यार्थ्यांना समजून सांगणे.

तसेच वेगवेगळ्या खेळाच्या साह्याने बेरीज-वजाबाकी ही चांगल्या प्रकारे समजावून सांगता येऊ शकते गुणाकार भागाकार त्यासाठी आवश्यक पाढे पाठांतर आणि संख्या ज्ञान करून घेणे आवश्यक असते.

विद्यार्थ्यांना पाढे पाठांतर करून त्यांचे महत्त्व सांगून गुणाकार भागाकार शिकवणे सोयीचे असते तसेच विद्यार्थ्यांना शाळेमध्ये नकली नाणी-नोटा यांच्या माध्यमातून गुणाकार भागाकार शिकवणे.समान वाटणी करणे.गुणाकाराची मांडणी भागाकाराची मांडणी अनेक संकल्पना शिकवता येऊ शकतात.

लांबी,वस्तुमान,धारकता यासाठी वस्तुमान लांबी धारकता मोजण्याचे साधन शाळेमध्ये असणे आवश्यक असते.मुलांना स्वतःला प्रत्यक्ष कृतीयुक्त पद्धतीने मोजमाप कौशल्य शिकवण्यास त्याचा फायदा जास्त होतो. वेगवेगळ्या उपक्रमातून लांबी मोजणे,वस्तुमान तसेच धारकर मोजमापाचे कृतीयुक्त पद्धतीने उपक्रम घेणे आवश्यक असते.

तसेच पुढील टप्प्यामध्ये दिनदर्शिकाघड्याळ,कालमापन यासारख्या संकल्पना विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून देणे गरजेचे असते.त्यासाठी घड्याळाची प्रत्यक्ष प्रतिकृती अथवा प्रत्यक्ष घड्याळा चा वापर कालनिर्णय चा वापर त्यामध्ये वेगवेगळ्या तारखा तसेच घड्याळ शिकवताना घड्याळातील तासकाटा व मिनिटकाटा,सेकंड काटा इत्यादी समजावून सांगणे आवश्यक असते.

त्यामध्ये भूमितीय संकल्पना सुद्धा त्यांना स्पष्ट करून सांगणे गरजेचे असते.उदाहरणार्थ घड्याळाचे काटे यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे निर्माण होणारे कोन हे प्रत्यक्ष भूमितीय संकल्पना समजून सांगणे आवश्यक असते.पुढे परिमिती,क्षेत्रफळ कोणत्याही बंदिस्त आकृतीने व्यापलेले क्षेत्र म्हणजे क्षेत्रफळ व प्रत्यक्ष परिमिती मोजून मुलांना क्षेत्रफळ व परिमिती या संकल्पना कृतीतून समजावून सांगता येतील.

वेगवेगळ्या घरातील किंवा शाळेतील साहित्य तसेच वस्तू यांचे मोजमाप करून मीटर,सेंटीमीटर इत्यादी मोजमापे विद्यार्थ्यांना शिकवणे आवश्यक असते.तसेच वर्तुळ या संकल्पनेचा वर्तुळाचा व्यास,त्रिज्या परीघ असतात.  त्याचे मोजमाप कसे करायचे हेसुद्धा समजावून सांगणे आवश्यक असते.

त्यानंतर पुढील वेगवेगळ्या उदाहरणांच्या साहाय्याने सराव करून घेणे महत्त्वाचे असते.गणित विषयाची ही प्राथमिक स्वरूपाची माहिती सांगण्याचा मी याठिकाणी प्रयत्न केला आहे.गणित हा विषय खूप मोठा आणि विस्तृत असून तो थोडक्यात सांगणे कठीण आहे. 

गणित विषयाला जास्त वेळ द्या.

गणित या विषयाचा इयत्ता पहिली पासूनच जास्त अभ्यास मुलांनी केला तर गणित विषय सहज आणि सोपा वाटेल म्हणून शाळेत प्रवेश केल्यापासूनच गणिताविषयी मुलांना अभ्यासाची सवय लावणे आवश्यक असते. गणित विषयावर जास्त प्रभुत्व बनवण्यासाठी सराव करणे आवश्यक असते.

प्राथमिक शिक्षणातच अंक लेखन वाचन पाठांतर वेगवेगळी उदाहरण सोडवणे यांचा जास्त सराव करून घेणे महत्त्वाचे ठरते जेणेकरून जसे विद्यार्थी पुढील वर्गामध्ये जातील तसे त्यांना गणितामध्ये अडचणी निर्माण होणार नाहीत. म्हणून गणित विषयाला जास्त वेळ देणे आणि सराव करत राहणे महत्वाचे ठरते. गणित हा असा विषय आहे की ज्याचा जेवढा जास्त अभ्यास करायला तेवढे तुम्ही गणितामध्ये यश संपादन करू शकता .

गणितातील उदाहरणे सोडवण्याचा सराव करा.

गणित या विषयांमध्ये प्राथमिक शिक्षण पासूनच संख्याकिय व लेखी स्वरूपाचे उदाहरणे अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत.

गणितातील बेरीज,वजाबाकी,गुणाकार,भागाकार या संकल्पना प्रथम समजावून घेणे आवश्यक असते.त्यानंतर गणिताचे वेगवेगळी उदाहरणे सोडवणे आणि त्यांचा वारंवार सराव करीत राहणे फायद्याचे ठरते.तोंडी स्वरूपाची गणिते यांचा सराव केल्यास जास्त फायदा होतो.म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे गणिते नियमित सोडवणे आवश्यक असते.

गणिताचे सूत्रे पाठ करा.

गणित या विषयांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सूत्र असतात.त्या सूत्राच्या सहाय्याने जर गणिते सोडवली तर गणित सोडवणे सोपे आणि सुलभ असते.परंतु गणिताचे सूत्रे समजावून घेणे आणि त्यांचे पाठांतर करणे आवश्यक असते. गणित हा एक असा विषय आहे जो सूत्रांवर आधारित असतो आणि हे सूत्र किंवा नियम हे बदलत नाहीत.

म्हणून एकदा गणिताचे सूत्रे पाठ केल्यानंतर त्याचा उपयोग आपण शालेय जीवनाबरोबरच आयुष्यभर प्रत्येक ठिकाणी व्यवहार ज्ञानामध्ये सुद्धा करू शकतो.ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे.त्यासाठी गणिताची सूत्रे पाठांतर करणे ही खूप महत्त्वाची आहे.

गणिताचे सत्राच्या साह्याने आपण मोठी उदाहरणे सहज सोडू शकतो.म्हणून गणिताचे सूत्रांचे चार्ट बनवून त्यांचे पाठांतर करून त्याचा उदाहरणांमध्ये वापर करणे आणि सराव करणे फायद्याचे ठरते.

गणित विषयाची मनातील भीती दूर करा.

गणित विषय हा खूप विद्यार्थ्यांना अवघड वाटणारा विषय असतो.कारण गणित विषयाची पूर्वतयारी व्यवस्थित न झाल्याने संख्याज्ञान,संख्यालेखन,संख्यावाचन,संख्यापाठांतर तसेच पाढेपाठांतर या गोष्टी प्राथमिक शिक्षणामध्ये महत्त्वाचे असल्याने त्यांचा जर वेळोवेळी सराव केला नाही तर पुढील शिक्षणामध्ये गणित या विषयाच्या अडचणी निर्माण होतात.

म्हणजेच गणित हा विषय अवघड वाटू लागतो,परंतु गणित या विषयाचा अभ्यास तुम्ही कधीही करू शकता.सराव करून तुम्ही गणिते सोडवण्याचा नियमित नक्कीच फायदा होतो.म्हणून गणितापासून पळ  काढण्यापेक्षा गणिते सोडवून त्याचा अभ्यास करणे महत्त्वाचे असते.

गणिताविषयी मनामध्ये कुठलीही भीती न बाळगता आपण गणित समजावून घेऊन त्याचा सतत सराव करणे गरजेचे असते.म्हणून गणितापासून पळ काढण्यापेक्षा गणिताला समजून घेण्याची गरज असते.

आपण शालेय जीवनामध्ये परीक्षा देत असतो.गणिताच्या पेपरच्या दिवशी एखादे गणित आपल्याला अवघड वाटले तर,आपण हे गणित मला वर्गात शिकवलीच नाही असं म्हणत असतो.परंतु जे गणित परीक्षेला विचारले असते. त्याची रीत हीच वर्गामध्ये शिक्षकांनी शिकवलेले असते.परंतु आपण त्याचे सूत्र किंवा पाढे पाठांतर न केल्याने ते गणित आपल्याला अवघड वाटत असते.म्हणून गणित समजून घेणे खूप महत्त्वाचे असते.

वर्गात किंवा शाळेत ग्रुप मध्ये गणिते सोडवण्याचा सराव करा.

गणित या विषयाचा शाळेत किंवा वर्गात सामुदायिक अभ्यास करणे सुद्धा फायद्याचे ठरते.पाच-सहा मुलांचा गट करून गणिताचे उदाहरणे सोडवणे आणि त्याचा अभ्यास करणे सोयीचे ठरते.जेणेकरून आपल्याला गणित सोडवताना ज्या ठिकाणी अडचण निर्माण होईल.

त्या ठिकाणी आपण इतरांनी गणित सोडवण्यासाठी काय केले याची क्रिया तपासून घेऊन आपल्या चुका दुरुस्त करू शकतो.त्यामुळे मित्रांसोबत गणिते सोडवणे आणि सराव करणे फायद्याचे होते.गणित हा खूप कठीण विषय आहे हे मनातून काढून टाकली आवश्यक असते.

आमचा What's App group जॉईन करू शकता:

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने