ख्रिसमस नाताळ मराठी निबंध.
Christmas Essay In Marathi वाचन मित्र या वेबसाईट वर आपले स्वागत आहे.आज आपण "ख्रिसमस नाताळ" या सणाची माहिती देणारा निबंध याविषयी लिहणार आहोत.
ख्रिसमस नाताळ |
ख्रिसमस सणावर मराठी निबंध।Christmas essay in Marathi
ख्रिसमस नाताळ हा दरवर्षी हिवाळ्यात डिसेंबर महिन्यात येणारा सण असून,हा सण ख्रिश्चन धर्मात मोठ्या आनंदाने साजरा केला जातो.आपल्या भारतात ख्रिश्चन धर्मियांची संख्या जरी खूप कमी असली तरी हा सण सर्व धर्मीय लोक एकत्र येऊन साजरा केला जातो.या सणाला संपूर्ण जगभरात खूप महत्व असून ख्रिसमस नाताळ हा ख्रिश्चन धर्मातील सर्वात मुख्य आणि सर्वात मोठा सण आहे जसे हिंदू धर्मात दीपावली चा सण खूप मोठा आहे.तसाच ख्रिश्चन धर्मात या सणाला अधिक महत्व आहे.
Join : Whats App Channel
25 डिसेंबर या दिवशी दरवर्षी हा सण येतो.या दिवशी भगवान येशू यांचा जन्म झाला होता.भगवान येशू यांना देवाचे पुत्र मानले जाते.म्हणून त्यांचा जन्म दिवस म्हणून सर्व भारतभर हा सण साजरा करतात.ख्रिसमस नाताळ हा सण साजरा करण्याचे महत्व व कारण म्हणजे भगवान येशू यांनी ख्रिश्चन धर्मातील लोकांना जीवन जगण्यासाठी शिकवण दिली.ख्रिश्चन लोकांना दुःख व पीडा पासून मुक्त केले.असे म्हणतात की भगवान येशू यांचा जन्मावेळी समाजात अनिष्ट प्रथा,हिंसाचार,राग,द्वेष सर्व ठिकाणी पसरला होता.
येशू अनेक लोकांचे दुःख दूर करील समाजाला नवीन दिशा देऊन लोकांना चांगला मार्गाने कसे जगावे याची शिकवण देईल व समाजाचा उद्धार करेल यासाठी देवाने येशूला धरतीवर पाठवले होते.म्हणून त्यांची कृतज्ञता म्हणून हा सण साजरा करतात.
ख्रिसमस नाताळ या सणाला ख्रिसमस वृक्षाला सजवतात.या सणाचा तो वृक्ष महत्वाचा घटक आहे. पूर्वीपासूनच ही प्रथा सुरू आहे.बऱ्याच काळापासून देवदार झाडाला ख्रिसमस ट्री म्हणून सजवले जाते व त्या झाडाची पूजा केली जाते.असे सांगितले जाते की ख्रिसमस झाड हे भगवान येशूचे प्रतीक आहे.हे झाड वाईट विचारांपासून मानवाला दूर ठेवते आणि सर्वांना प्रेरणा ,शक्ती देते.
ख्रिसमस नाताळ या सणाचे महत्व असणारा आणि सर्वांना आकर्षित करणारा सांताक्लॉज Santa Claus होय.सांताक्लोज Santa Claus सर्वांना आवडतो.सांताक्लॉज ला मराठीत नाताळ बाबा असेही म्हणतात.लहान मुले सांताक्लॉज Santa Claus ला पाहण्यासाठी खूप उस्तुक असतात.सांताक्लॉज हा एक बुटका,वृध्द,पांढरी दाढी केस असलेला,मखमली लाल रंगाचे कपडे परिधान केलेला ,तसेच डोक्यात लाल रंगाची टोपी व डोळ्याला चष्मा लावलेली व्यक्ती असते.जिच्याकडे लहान मुलांना देण्यासाठी भेटवस्तू असतात.म्हणून लहान मुलांना तो खूप आवडतो .