सिंहगड किल्ला संपूर्ण माहिती मराठी.

सिंहगड किल्ल्याची संपूर्ण माहिती मराठीत.

सिंहगड किल्ल्याची संपूर्ण माहिती मराठीत
 सिंहगड किल्ला 

सिंहगड किल्ला पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील डोणजे गावांमध्ये असून या किल्ल्याला "कोंढाणा किल्ला" असेही म्हणतात. सिंहगड किल्ल्याला जाण्यासाठी पुण्यापासून तीस ते पस्तीस किलोमीटर चे अंतर पार करावे लागते आणि मुंबईपासून हा किल्ला 180 किलोमीटर लांब असून सिंहगड हा किल्ला मध्यम चढाई श्रेणीचा किल्ला आसून गिरीदुर्ग या प्रकार मध्ये त्याचे वरील वर्गीकरण करण्यात आलेले आहे.

Join : Whats App Channel

सिंहगड किल्ला हा सह्याद्री पर्वत रांगेतील भुलेश्वर रांगेवर  किल्ला आहे. सिंहगड किल्ल्याची उंची समुद्र समुद्रसपाटीपासून चार हजार चारशे फूट उंच असून या किल्ल्यावरून राजगड,पुरंदर,विसापूर,लोहगड हे भाग दिसतात. सिंहगड या किल्ल्याला जुने नाव "कोंढाणा" असून हा किल्ला महाराष्ट्र मध्ये यादव व शिलाहार यांनी बांधलेला असावा असा इतिहासकारांनी अंदाज लावला आहे.

सिंहगड किल्ला माहिती.

  • किल्ल्याचे नाव -सिंहगड किल्ला 
  • जिल्हा- पुणे 
  • तालुका- हवेली 
  • गाव -डोणजे 
  • समुद्रसपाटीपासून उंची- चार हजार चारशे फूट
  • प्रकार -गिरीदुर्ग 
  • पर्वतरांगा - डोंगरावरील भुलेश्वर रांग किल्ल्यावरील ठिकाणे तानाजी मालुसरे स्मारक, राजाराम यांचे स्मारक ईश्वर मंदिर अमृतेश्वर मंदिर देवटाके तानाजी कडा कल्याण दरवाजा उदयभानचे स्मारक आणि टिळक बंगला.

सिंहगड कोंढाणा किल्ल्याचा इतिहास.

सिंहगड किल्ला मराठा साम्राज्याची ओळख दर्शवणारा किल्ला आहे.हा किल्ला महाराष्ट्रातील यादव तसेच शिलाहार यांनी बांधलेला असावा असे इतिहासकारांच्या मध्ये म्हटले जाते. हा किल्ला नागनाथ  यांच्या ताब्यात होता.हे महादेव कोळी लोकांचे राजे होते.

त्यावेळी मुहम्मद तुघलक हा दिल्लीचा सुलतान होता. त्याने 1930 मध्ये दक्षिणेत स्वारी केली आणि दख्खनच्या भागात कोळी राजाचे वर्चस्व असल्याने कोळी साम्राज्यावर आक्रमण करून स्थानिक महादेव कोळी राजा नाग नायक यांच्यात मोठी युद्ध झाले. राजा नागनायक  पुढे जनतेला घेऊन त्यांनी किल्ल्यात आश्रय केला. तब्बल नऊ महिने पेक्षा अधिक काळ या किल्ला लढवाला. त्यांचा  पराक्रम पाहून सुलतान चकित झाला. सुलतान दिल्लीला निघून गेला.

पूर्वी हा किल्ला आदिलशाहीत होता दादोजी कोंडदेव हे आदिलशाही आदिलशहाकडून सुभेदार म्हणून नेमले गेले होते. इसवी सन 1647 मध्ये त्यांनी गडावर आपले लष्करी केंद्र बनवले. इसवी सन 1649 मध्ये शहाजी राजांच्या सुटकेसाठी शिवाजी राजांनी हा किल्ला परत आदिलशहाला दिला.पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये कोंढाण्याचा समावेश देखील होता. 

मोगलांतर्फे उदेभान राठोड हा कोंडाण्यावरचा अधिकारी होता.मूळचा राजपूत असल्याने उदयभान राठोड यांनी मुस्लीम धर्म स्वीकारला होता.सिंहगडचे मूळ नाव कोंढाणा होते आणि शिवाजी महाराजांच्या काळात त्यांचे विश्वासू सरदार आणि बालमित्र तानाजी मालुसरे आणि त्यांच्या मावळ्यांनी मावळे प्रांतातून भरती झालेल्या सैनिकांनी हा किल्ला एका चढाई दरम्यान जिंकला होता.या  लढाईत तानाजींना वीरमरण आले आणि प्राणाचे बलिदान देऊन हा किल्ला जिंकल्यामुळे शिवाजी महाराजांनी "गड आला पण सिंह गेला" हे वाक्य उच्चारले तेव्हापासून कोंडाणा किल्ला "सिंहगड" असे नाव प्रसिद्ध झाले. 


मार्च 1670 मध्ये मराठा साम्राज्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला परत मिळवण्यासाठी अत्यंत तळमळ व शूर योद्धा तानाजी मालुसरे यांनी मार्च 1670 रोजी लढाई केली होती घोरपडे नावाच्या यशवंती नावाच्या घोरपडीच्या  मदतीने किल्ल्याकडे जाणारा एक उंच डोंगर रात्रीच्यावेळी चढायला होता. त्यानंतर तानाजी यांची साथीदार आणि मोगल सैन्य यांच्यात भयंकर युद्ध झाले. 

या युद्धात तानाजी मालुसरे यांनी आपला जीव जाईपर्यंत किल्ल्याचा ताबा मोगलांना घेऊ दिला नाही. त्यांचा भाऊ सूर्याजी यांनी कोंढाणा किल्ला ताब्यात घेतला.ज्यास "सिंहगड" म्हटले जाते. तानाजी मालुसरे यांच्या मृत्यूची बातमी समजताच छत्रपती शिवाजी महाराजांनी "गड आला पण सिंह गेला" या शब्दांमध्ये शोक व्यक्त केला होता युद्धात तानाजीच्या योगदानाच्या स्मरणार्थ गडावर  शूर वीर तानाजी मालुसरे यांचा पुतळा बसवण्यात आला आहे.

सिंहगड किल्ल्यावर बघण्यासारखे ठिकाणे:

1.कल्याण दरवाजा 

सिंहगडाच्या पश्चिमेस हा दरवाजा आहे. कोंढणपुर वरून पायथ्याच्या कल्याण गावातून आल्यास ह्या दरवाज्यातून आपला प्रवेश होतो.हे दोन दरवाजे आसुन वरच्या दरवाज्याच्या दोन्हीकडील बुरुजांच्या भिंतीत अर्धवट बाहेर आलेला हत्ती व माहूत अशी दगडी शिल्पे दिसून येतात श्री शालिवाहन शके 1672 श्रीमंत बाळाजी बाजीराव पंडित प्रधान असा शिलालेख लिहिलेला आढळतो.

2.दारूचे कोठार 

दरवाजा मधून आत प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला जी दगडी इमारत दिसते तिला दारूचे कोठार असे म्हणतात.11 सप्टेंबर 1751 मध्ये या कोठारावर वीज  पडली.ह्या अपघातात गडावरील त्यावेळच्या फडणीस यांचे घर उध्वस्त होऊन घरातील सर्व माणसे मरण पावली.

3.कोंढाणेश्वर मंदिर 

हे शंकराचे मंदिर असून ते यादवांचे कुलदैवत होते.आत एक पिंडी व सांब असणारे हे मंदिर यादवकालीन आहे.

4.देवटाके

तानाजी स्मारकाच्या मागून डाव्या हाताच्या छोट्या तलावाच्या बाजूने डावीकडून गेल्यावर देवटाके मंदिर लागते भैरव हे कोळ्यांचे दैवत आहे.यादवांच्या अगोदर कोळ्यांची वस्ती येथे होती.मंदिरात भैरव आणि भैरवी या दोन मुर्त्या दिसतात.भैरव देवाच्या हातात राक्षसाचे मुंडके आहे.

5.तानाजी मालुसरे स्मारक

अमृतेश्वराच्या मागच्या बाजूने वर गेल्यावर डाव्या बाजूला तानाजी मालुसरे यांचे स्मारक दिसते. तानाजी मालुसरे स्मारक समितीच्या वतीने हे बांधण्यात आलेले असून माघ वद्य नवमी दिनांक 4 फेब्रुवारी 1672 या दिवशी झालेल्या लढाईत तानाजी मालुसरे यांना वीरमरण आले. दरवर्षी माघ वद्य नवमीस येथे मंडळातर्फे तानाजीचा मालुसरे यांचा स्मृतिदिन साजरा केला जातो.

6.उदयभानचे स्मारकही 

दरवाजाच्या मागच्या बाजूस वर असलेल्या टेकडीवर  आणि येथे जो चौकोनी दगड आहे तेच उदेभान राठोडचे स्मारकचिन्ह म्हणून ओळखले जाते. मोगलांतर्फे उदेभान हा सिंहगडचा अधिकारी होता.

7.तानाजी कडा 

झुंजार बुरूजावरून मागे येऊन तटाच्या भिंतीच्या बाजूने पायवाटेने तानाजीच्या कड्याकडे जाता येते. हा कडा गडाच्या पश्चिमेस आहे. येथूनच तानाजी मालुसरे लढाईच्या वेळेस मावळ्यांसह वर चढले होते 

8.राजाराम स्मारक 

राजस्थानी पद्धतीची रंगीत देवळासारखी जी घुमटी दिसते तीच छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी.मोगली फौजेला सतत अकरा वर्षे टक्कर देणाऱ्या राजाराम महाराजांची वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी शनिवार दिनांक दोन मार्च इ.स.सतराशे या दिवशी सिंहगडावर निधन झाले.पेशव्यांतर्फे या स्मारकाची उत्तम व्यवस्था ठेवली जायची.

9.टिळक बंगला

रामलाल नाईक यांच्याकडून खरेदी केलेल्या जागेवर ह्या बंगल्यात बाळ गंगाधर टिळक येत असत. 1995 साली महात्मा गांधी व लोकमान्य टिळक यांची भेट यांच्या बंगल्यात झाली.

सिंहगड किल्ल्यावर कसे जावे लागते. 

सिंहगड किल्ला हा महाराष्ट्र राज्यातील,पुणे जिल्ह्यातील हा एक महत्त्वाचा किल्ला असून त्या ठिकाणी जाण्यासाठी पुणे स्वारगेट ते सिंहगड अशी बस सेवा सुरू आहेत.तुम्ही गाडीने किल्यावर पोहचू शकतात.

अशा प्रकारे सिंहगड किल्ल्याची संपूर्ण माहिती आपण पाहिली  जर माहितीमध्ये काही त्रुटी आढळून आल्या तर नक्की आम्हाला Contact us वरून संपर्क करू शकता.धन्यवाद..


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने