छत्रपती शिवाजी महाराज(Sivaji Maharaj) मराठी निबंध.
Information About Sivaji Maharaj स्वतंत्र साम्राज्याचे स्वप्न साकार करणारे स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज हे एक थोर कर्तृत्ववान पुरुष होते.त्यांनी शून्यातून स्वराज्य निर्मिती केली ही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.छत्रपती शिवाजी महाराज आदर्शवत स्वराज्य कारभार करण्यात यशस्वी ठरलेले महाराष्ट्राचे पहिले छत्रपती आहेत.
शिवरायांचे बालपण:
शिवरायांचा जन्म फाल्गुन, वद्य तृतीया, सन 1551 म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 रोजी राजमाता जिजाबाई च्या पोटी जुन्नर तालुक्यातील शिवनेरी गडावर झाला.त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले तर आईचे नाव जिजाबाई भोसले असे होते.शहाजी राजे हे त्याकाळी सरदार म्हणून कार्यरत होते .
छत्रपती शिवाजी महाराज हे अति संस्कारित असे घडले होते.बालपणाची सर्व वर्षे ही नीतिमत्ता.राज्यव्यवस्था.युद्धकला.गनिमी कावा आणि घोडेस्वारी शिकण्यात गेली.कधीकधी आसपास राहणारे मावळ्याची मुले शिवरायांबरोबर खेळत असत.मावळे हेच शिवरायांचे प्रथम सवंगडी होते.
माता जिजाऊ रामायण-महाभारत तसेच इतर भारतीय महापुरुषांच्या कथा बाल शिवाजी ना सांगत असत.त्यातूनच मग पराक्रम आणि प्रजादक्ष गुण लहानपणीच शिवरायांच्या अंगी बळावले होते.त्यांचे वडील शहाजीराजे सतत मोहिमांवर असत,पण वेळ मिळाल्यास ते शिवरायांना वाचन,युद्धकला,घोडेबाजी शिकवत असत.
शिवाजी महाराज यांनी स्वराज्यासाठी केलेले कार्य:
शिवरायांचे लग्न किशोरवयात झाले होते.जिजाऊंनी फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील सईबाई भोसले घराण्याची सून म्हणून पसंत केले.शिवराय मोठे होताना त्यांना परकीय सत्तांचे सर्व सामान्य रयतेवर होणारा छळ अनुभवास येत होता.मुस्लिम राज्यकर्ते हिंदू धर्मीय जनतेला त्रास देत असत.जनतेवर अन्याय,जुलूम जबरदस्ती करत.त्यामुळे त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य निर्मितीचे शपथ घेतली.
आदिलशाही,निजामशाही आणि मुघलसाम्राज्य यांच्याविरोधात शिवरायांना लढावे लागणार होते.स्वराज्य निर्मितीची मुहूर्तमेढ म्हणून त्यांनी किल्ले तोरणा अत्यंत लहान वयात जिंकला.त्यानंतर स्वराज्यावर आलेल्या प्रत्येक संकटाला अत्यंत धैर्याने तोंड देण्यात महाराज यशस्वी ठरले.अफजल खानाचा वध,शाहिस्तेखानाची बोटे कापणे या प्रसंगातून त्यांचा पराक्रम दिसून येतो.स्वकीय शत्रूंचा देखील शिवरायांनी चांगलाच धडा शिकवला.
याव्यतिरिक्त पुरंदरचा तह,दिल्लीतील औरंगजेब भेट आणि तिथून सुटका या बिकट प्रसंगातून संयमाने धैर्याने केलेला मुकाबला सर्वज्ञात आहे.शिवरायांनी स्वराज्य निर्मिती करता आली ती म्हणजे त्यांचे प्रामाणिक मावळे आणि योग्य साथीदाराच्या सोबतीने प्रत्येक प्रसंगात मावळे जिवाची बाजी लाऊन लढले आणि शिवरायांसाठी पर्यायाने स्वराज्यासाठी प्राणाचे मोल चुकवले.तानाजी मालुसरे,बाजीप्रभू देशपांडे,प्रतापराव गुजर,मुरारबाजी,येसाजी कंक,संताजी घोरपडे,धनाजी घोरपडे, इत्यादी स्वराज्याच्या धारातीर्थी पडले.
सन 1674 मध्ये शिवरायांचा राज्याभिषेक करण्यात आला.आता संपूर्ण महाराष्ट्राचे महाराष्ट्रातील रयतेला राजा छत्रपती मिळाला होता.छत्रपतींची प्रशासन व्यवस्था आजही संपूर्ण जगप्रसिद्ध आहे. त्यांनी आपल्या स्वराज्य कारभार चालवण्यासाठी विशिष्ट अभ्यासपूर्वक नियोजन केलेले दिसून येते.राज्यकारभार व्यवस्थित चालण्यासाठी शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ स्थापन केले.स्वतंत्र स्वराज्याचे चलन सुरू केले.आरमार व्यवस्था सुयोग्य करवसुली,गड-किल्ले सुरक्षा आणि विविध पर्यावरणीय मोहिमा राबवल्या.
शिवाजीराजे असताना त्यांच्या पाठीमागे छत्रपती संभाजी महाराज घडवण्यात शिवराय आणि राज माता जिजाऊ यांना यश आले.तसेच स्वराज्याचे शाखा संपूर्ण दक्षिण भारतात पसरवण्यात छत्रपती शिवाजीराजे सफल झाले होते. आता शिवरायांचे स्वराज्य अस्तित्व मान्य केले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांची गाथा आणि पराक्रम सर्वत्र दुमदुमत होता.अखेर रायगडावर 3 एप्रिल 1680 रोजी अशा नरवीर युगपुरुषाची प्राणज्योत मालवली.असा हा प्रजादक्ष राजा राष्ट्रपुरुष शिवाजी महाराज स्वतःच्या कर्तृत्वाने आणि पराक्रमाने छत्रपती म्हणून अनंत काळासाठी अजरामर झालेले आहे.
(वरील पोस्ट मध्ये काही बदल अथवा सूचना असल्यास कमेंट करावी.)