मशरूम ची माहिती.
मित्रांनो पावसाळा जवळ येत आहे.असा इशारा देणारर्या अनेक गोष्टी आहेत,परंतु आज आपण अशा एका गोष्टीची माहिती घेणार आहोत ते म्हणजे मशरूम.मशरूम Mushrooms हे पावसाळ्यात वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला छत्रीच्या आकारात वाढलेले दिसून येतात.
आळंबी ची माहिती |
मशरूम Mushroomsला मराठीत आळंबी असे म्हणतात.हा मांसल व छत्रीच्या आकाराच्या कावकाचा अर्थात याला छत्रकवक किंवा भूछत्र असेही म्हणतात.सामन्यात गवताळ प्रदेश व जंगलमध्ये रानावनात हे आळंबी वाढताना आपण पाहतो.
मशरूम मध्ये मुख्यत दोन भाग असतात. एक भाग जो जमिनीखाली वाढतो त्याला कवकजाल असे म्हटले जाते.दूसरा भाग असतो त जमिनीच्या वरील भागात वाढतो त्याला फलकाय म्हणतात.
मशरूम Mushrooms मध्ये हरितद्र्व्य क्लोरोफिल याचा अभाव असतो. त्यामुळे ते स्वत: अन्न तयार करत नाहीत,तर जमिनीतील नुट्रेंस पासून अन्न घटक शोषून घेतात. मशरूम चा जमीनिखालील भाग अन्नघटक शोषून घेण्यास मदत करतो. हा भाग अनेक वर्षे जीवंत राहतो. मशरूमचा दूसरा भाग अर्थात फलकाय छत्रीसारखा दिसतो व तो भाग काही दिवसच राहतो परंतु,जमीनिखालील भाग खूप दिवस राहतो.परंतु फलकाय छत्रीसारखा दिसणार्या भागात बिजाणुंची वाढ होत असते व त्यापासून नवीन मशरूम तयार होतात.
मशरूमच्या जमिनीखाली असणार्या भागात अनेक पांढरे व पिवळे तंतु असत्तात,मशरूम च्या वाढीसाठी हे अन्न व पाणी हे घटक शोषून घेतात व Mushrooms वाढीसाठी मदत करतात.मशरूमचा वरचा भाग घट्ट विणलेल्या तंतूचा बनलेला असतो. यालाच देठ असतो व त्यालाच गोल टोपी असते, मशरूमच्या अनेक जातीत वेगवेगळ्या आकाराचे मशरूम आढळून येतात.
मशरूमच्या अनेक जाती मृत पावणार्या पदार्थावर जगतात व वाढतात. जसे की मृत गवत व वनस्पति,पडलेला वृक्ष,जुनी लाकडे इत्यादी. तर काही जिवंत वनस्पती वर व त्यांच्या मुळांवर वाढतात. पक्व झालेल्या मशरूम पासून लक्षावधी बिजणू म्हणजेच स्पोल्स विखुरले जातात. वार्याने हे बिजणू दूर अंतरावर पसरतात, त्यापैकी काही मोजकेच बिजाणू अंकुरण्यासाठी पुरेसे ओलसर किंवा आदर्ता असणार्या जागेत पोहचतात व अंकुरित होतात.यापासून Mushrooms तयार होतात. बिजणू हवेत विखुरल्यावर फलकाय मरतात. परंतु जमिनीखाली कवकजाल मात्र अनेक वर्ष टिकून राहतात.
मशरून हे विविध प्रकारचे व विविध रंगाचे व आकाराचे असतात. बहुतांश मशरूम रंगाने पांढरे ,पिवळे,नारंगी किंवा कार्डे असतात. मशरूम मध्ये विषारी आणि बिनविषारी असे दोन प्रकार असतात.म्हणून काळजीपूर्वक त्यांची परीक्षा केल्याशिवाय आळंबी न खाण्याचा सल्ला दिला जातो. बिनमशरूमच्या अनेक जाती आहेत.तसेच विषारी मशरूमच्या जाती आपल्याला पाहायला मिळतील.विषारी आणि बिनविषारी याची ओळख पटल्यानंतर च तिचा वापर करावा.
कीटक आणि लहान प्राणी यांचे आळंबी हे अन्न आहे.मशरूमचा वापर त्याची विशिष्ट चव व विविध गुणधर्म यानुसार खाण्यात केला जातो.दिवसेंदिवस त्याची मागणी वाढत चालली आहे.अनेक देशात वेगवेगळ्या प्रकारच्या आळंबी ची लागवड केली जाते. जो एक महत्वाचा उद्योग म्हणून ओळखला जातो.भारतात हिमाचल प्ररदेशात ,उत्तराखंड,पंजाब,हरियाणा ,उत्तर प्रदेश,महाराष्ट्र जम्मू कश्मीर इ राज्यात व्यापारी स्थरावर मशरूम शेती केली जाते.
🔰मशरूमचा वापर
❏अनेक रेसिपी ,सॅलड सुफ यामध्ये करतात. मशरूमच्या अनेक वेगवेगळ्या भाज्या बनवता येतात.
❏मशरूम मध्ये अनेक जिवनसत्व,व गुणधर्म असतात.
❏विषारी अळंबी toxin ची निर्मिती करतात. त्यामुळे ते खने प्राणघातक ठरू शकते. म्हणूनच रानात मिळणारी मशरूम खात असाल तर त्याविषयी पूर्ण माहिती घ्यावी आणि नंतरच खावी.
आमचा What's App group जॉईन करू शकता: