लोकमान्य टिळक (Lokmanya Tilak) : जीवन परिचय, बालपण, शिक्षण आणि कार्य

लोकमान्य टिळक यांच्या कार्याविषयी माहिती.

Lokmanya Tilak Information in Marathi : 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच !' हे साऱ्या जगाला ठणकावून सांगणारे लोकमान्य टिळक यांच्या विषयी आपण या पोस्ट मधून माहिती घेणार आहोत.




लोकमान्य टिळक यांचा जीवन परिचय:

लोकमान्य टिळक यांचे पूर्ण नाव काय होते?

लोकमान्य टिळक यांचे पूर्ण नाव केशव उर्फ बाळ गंगाधर टिळक असे होते. 

Join Our Whats App Channel

लोकमान्य टिळक टिळक यांचा जन्म कधी व कोठे झाला?

लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव येथे झाला.


लोकमान्य टिळक यांचे शिक्षण कोठे झाले?

लोकमान्य टिळक यांचे शिक्षण पुणे येथे झाले.

 

लोकमान्य टिळक यांचे बालपण व शिक्षण:


स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!

 

या मंत्राने हिंदुस्थानातील लाखो मने संजीवीत करणारे केशव उर्फ बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव येथे झाला. लोकमान्य टिळक यांच्या वडिलांचे नाव गंगाधर रामचंद्र टिळक असे होते. लोकमान्य टिळक यांच्या आईचे नाव पार्वतीबाई असे होते.


त्यांचे शिक्षण पुण्यात झाले. प्रखर बुद्धीचा निर्भय विद्यार्थी अशी त्यांची बालपणापासूनच ख्याती होती. गणित आणि संस्कृत या दोन विषयात लोकमान्य टिळक नेहमी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होत. बी ए चे शिक्षण त्यांनी 1877 साली पूर्ण केले. तसेच 1879 मध्ये त्यांनी LLB शिक्षण पूर्ण केले. वयाच्या 23 व्या वर्षी ते वकील झाले.


लोकमान्य टिळक लहान असताना अंकगणिताचा तासाला सरांना त्यांनी विचारले होते. मराठीत 21 हा आकडा आपण उच्चारतो तेव्हा प्रथम 1 आणि 20 नंतर असा क्रम असतो, इंग्लिश मध्ये मात्र Twenty प्रथम आणि One नंतर असे होते हा फरक कशामुळे पडतो? टिळक हे कॉलेज च्या शिक्षणासाठी पुण्याला आले.


तेव्हा त्यांच्या किरकोळ शरीरयष्टी कडे पाहून मित्र त्यांची चेष्टा करत.मग मात्र सुदृढ प्रकृती होण्यासाठी टिळकांनी एक वर्ष अभ्यास बाजूला ठेवून व्यायाम केला.या दनगट प्रकृतीमुळे त्यांनी देश सेवा करताना शारीरिक कष्टांना हसत हसत तोंड दिले.त्यांच्या सिंहगर्जनेने दुर्बल मानसिकतेचा काळू नष्ट झाला.


लोकममान्य टिळक यांचे कार्य

लोकमान्य टिळक स्वातंत्र्य लढ्याचे सेनानी झाले असून देशासाठी तन-मन-धनाने देशाची सेवा केली.पण टिळकांनी जे केले त्याला तोड नाही.अमोघ वाणी, ज्वलंत लेखणी आणि अचाट करणी त्यांच्याकडे होती.त्यांच्या राष्ट्रीय व सामाजिक कार्यामुळे जनतेने त्यांना लोकमान्य ही पदवी दिली त्यांच्या सिंहगर्जनेने दुर्बल मानसिकतेचा काळू नष्ट झाला. 


लोकमान्य टिळक यांचे सामाजिक आणि शैक्षणिक कार्य महान आहे.त्यांनी भारतात शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून 1880 मध्ये न्यू इंग्लिश स्कूल ची स्थापना केली.मराठी भाषेतून केसरी आणि मराठा हे वृत्तपत्र सुरू केले.त्यांनी 1882 साली डोंगरी येथे 101 दिवसाचा तुरुंगवास भोगला. 


लोकमान्य टिळकांना हिंदुस्तानी असंतोषाचे जनक असे म्हटले जाते.लोकमान्यांनी जनतेच्या मनात निखारे फुलवले,अंगार पेटवला,स्वदेशी राष्ट्र,स्वराष्ट्र,स्वराज्य,ब्रिटिशांची झोप उडवली,केसरीतील जहाल लेखनाबद्दल त्याच्यावर राजद्रोहाचा खटला भरून त्यांना सहा वर्ष काळ्यापाण्याची शिक्षा झाली.


1908 साली त्यांना मंडाले येथे कारागृहात ठेवण्यात आले,तेथे त्यांनी गीतारहस्य ग्रंथ लिहिला.लोक जागृतीसाठी,व लोकांनी एकत्र यावे यासाठी 1884 साली पुण्यात डेक्कन एड्युकेशन सोसायटी ची स्थापना केली.1885 साली लोकमान्य टिळक यांनी Ferguson collage ची लोकमान्य टिळक यांनी स्थापना केली.


त्यांनी महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव सुरु केले.देशभक्तीपर व्याख्याने व गाण्यातून लोकांना स्वराज्य मिळवण्याची स्फूर्ती दिली.ब्रिटिश सरकारच्या अन्यायाविरुद्ध बोलताना त्यांनी सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय असे ठणकावून सांगणारे लोकमान्य टिळक केसरी च्या माध्यमातून आपले विचार मांडत असत.

(ads2)

टिळक यांनी स्वराज्याचा मुद्दा ब्रिटिश सरकरविरुद्ध लावूनच धरला,लोकांमध्ये जंनजागृती केली.धाडस निर्माण करण्यासाठी कायम प्रयत्न कर्त राहिले.1905 मध्ये वंगभंग आंदोलन लोकमान्य टिळक यांनी केले.1909 साली त्यांनी स्वराज्य,स्वदेशी,राष्ट्रीय शिक्षण,आणि बहिष्कार ही चतुरसूत्री ब्रिटिश सरकारविरुद्ध मांडली.लोकमान्य टिळक हे जहालमतवादी नेते म्हणून ओळखले जातात. 


लोकमान्य विवेकनिष्ठ व विचारी,तत्त्वज्ञ होते. लोकमान्य टिळक यांनी ओरायन,पंचांग,व आर्टिक होम इन वेदाज हा ग्रंथ त्यांनी लिहिला.लाल-बाल-पाल एक अशा देशाच्या प्रथम पंगतीच्या नेत्यात त्यांची गणना होते.हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी त्यांनी लखनऊ करार घडवून आणला.


विद्वान पत्रकार जहाल देशभक्त असे लोकोत्तर पुरुष म्हणून त्यांचा गौरव होता.अशी ही स्वातंत्र्याची स्फूर्ती देवतेचे 1 ऑगस्ट 1920 साली सरदार गृह, मुंबई येथे निधन झाले.लोकमान्य टिळक यांचे कार्य भारताला स्वातंत्र्य मुळवून देण्यासाठी महत्वाचे असून, त्यांचे विचार देशातील जनता कधीही विसरू शकणार नाही. त्यांच्या संपूर्ण कार्याला सलाम!


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने