वेदांची माहिती मराठी.

वेद म्हणजे काय।What is Ved.

Ved information in Marathi :  हिंदू धर्मात वेदाला खूप महत्व असून,सर्वात प्रथम वेद या शब्दाचा अर्थ जाणून घेऊया. संस्कृतमध्ये विद् म्हणजे जाणणे होय,वेद हा शब्द या पासून तयार झालेला आहे.



Table Of Contents :

Table Of Content(toc)


वेद म्हणजे जाणणे होय.


वेद हे भारतीय संस्कृतीचे मूळ आधार ग्रंथ मानले जातात. हिंदू धर्मात वेदाला विशेष महत्व आहे.वेदाची व्याख्या खालील प्रमाणे सागितली जाते.



मंत्राब्राम्हणयोर्वेदनामध्येयम म्हणजे वेद होय .


वेदाला प्राचीन साहित्य मानतात.या वेदांची निर्मिती ही अनेक ऋषी मुनींनी केलेली आहे असे म्हणतात.वेदालाच संहिता असेही म्हणतात.वेदांची निर्मिती ही परमेश्वराने ही पृथ्वी निर्माण करायच्या आधी तयार केलेले आहे.असे म्हटले जाते.


चारही वेद मानव कल्याणासाठी तयार करण्यात आलेले आहेत असे समजले जाते.याची सुरुवात आणि शेवट नाही,तसेच जे जगात नाही ते वेदात आहे असे म्हणतात.ऋग्वेद,यजुर्वेद,सामवेद,अथर्ववेद हे चार वेद असून यांनाच संहिता असे म्हणतात.चार वेदांची संहिता आरण्यके,ब्राह्मणे आणि उपनिषदे असे उपविभाग आहेत. उपनिषिदे हे शेवटी येत असल्याचे त्याला वेदांत असे म्हणतात .




वेद हे सर्वात प्राचीन साहित्य समजले जाते .वेदांमधील काही सूक्त स्रियांनी रचलेली आहेत.वैदिक संस्कृती ही वेदांशी जोडली गेलेली असून,वेदाला ब्रह्माचे रूपे म्हणजेच मत,चित्त,आनंद असे वेदात सांगितले आहे,म्हणून वेदाला ब्रम्ह असे म्हणतात.वेदांची निर्मिती कशी झाली यामध्ये अनेक मतभेद आहेत .


1.ऋग्वेद।Rigveda Information In Marathi

ऋग्वेद हा वैदिक संस्कृती मधील सर्वात जुना व पवित्र ग्रंथ समजला जातो.ऋग्वेद संस्कृत वाड्मायातील पहिला ग्रंथ आहे.ऋग्वेदात एकूण 10 मंडले आहेत आणि 1028 सूक्ते आहेत.यामध्ये निसर्गातील शक्तिंना देवता मानले जाते, ऋग्वेदाचे कडवी आहेत,त्यांना ऋचा असे म्हणतात.ऋग्वेद हा पद्यमय आहे. ऋग्वेदात 10589 मंत्र आहेत.ऋग्वेदात 10642 मंत्र आहेत.


2.यजुर्वेद।Yajurveda Information In Marathi

हिंदूंच्या चार वेदांपैकी यजुर्वेद हा दुसरा वेद समजला जातो.यजूर्वेदा ची निर्मिती कधी झाली याविषयी वेगवेगळे मते मतांतरे आहेत.यजुर्वेद हा यज्ञात वैदीक काळामध्ये आहुती देण्यासाठी वापरत असत.यात विविध मंत्र आहेत.धनुर्वेद या यजुर्वेदाचा उपवेद समजला जातो.


3.सामवेद।Samveda Information In Marathi

हिदूंच्या चार वेदांपैकी तिसरा वेद म्हणजे सामवेद होय. साम म्हणजे गायन आणि वेद म्हणजे ज्ञान होय.हा वेद ब्रह्मदेवांनी लिहिला असे समजले जाते.


4.अथर्ववेद।Atharvaveda Information In Marathi

अथर्ववेद हा वेदातील शेवटचा व चौथ्या क्रमांकावर येणारा वेद असून आयुर्वेद हा अथर्ववेदाचा उपवेद मानला जातो.धन्वंतरी यांनी आयुर्वेदाची रचना केली आहे असे मानले जाते.अथर्ववेदात जीवनातील अडचणी,औषधी वनस्पती,तत्वज्ञान आणि जीवनातील विविध संकटे याविषयी माहिती आहे.

( वरील सर्व माहिती ही शैक्षणिक दृष्टिकोनातून लिहिली गेलेली आहे,माहितीमध्ये काही तफावत आढळल्यास कमेंट करण्यात यावी.)

आमचा व्हॉट्स ॲप चॅनल फॉलो करा!

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने