कीर्तन म्हणजे काय मराठी माहिती.

कीर्तन: कीर्तनाचे प्रकार, महत्व, वाद्ये, प्रसिद्ध कीर्तनकार.

या लेखामध्ये आपण कीर्तन म्हणजे काय,कीर्तनकार कोणाला म्हणतात,कीर्तनाचा उगम,कीर्तनाचे प्रकार,कीर्तनाचे फायदे महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध कीर्तनकार इ. विषयी माहिती घेऊया.कीर्तनसाधारणपणे रात्री सांगितले जाते,तसेच कीर्तन हे जवळजवळ तीन ते चार तास सांगितले जाते. 


कीर्तन म्हणजे काय

Table Of Content :

Table Of Content(toc)


कीर्तन म्हणजे काय?

कीर्तन म्हणजे काय तर,कीर्तन हे एक हिंदू धर्मीय लोकांचे भक्तिमार्गाचे साधन मानले जाते,भारतात खूप पूर्वीपासून कीर्तन ही लोकशिक्षण,जनगृती करण्याचे साधन मानले जाते.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात सुद्धा कीर्तनाने स्वराज्य स्थापन करण्यासाठी उपयोगी पडले,कारण अनेक लोकांना एकत्रित करण्याचे काम कीर्तनाने साध्य केले.  


कीर्तनकार कोणाला म्हणतात?

जी व्यक्ति कीर्तन सांगते,त्या व्यक्तीला कीर्तनकार असे म्हणतात.शक्यतो महाराष्ट्रात संत,महात्मे,साधू,ऋषि,ठराविक व्यक्ती कीर्तन सांगतात. त्यामुळे त्यांना कीर्तनकार असे संबोधण्यात येते. 


कीर्तनाचा उगम,कीर्तनाचा इतिहास मराठी माहिती.

कीर्तनाचा इतिहास हा खूप जुना आहे,भारतात कीर्तन हे प्राचीन काळापासून अस्तीत्वात होते.तसेच कीर्तन भारतातील सर्वच भाषमध्ये आढळून येते. 


भारतात नारदमुनी यांनी कीर्तनाची सुरुवात केली असे आढळून येते.त्यानंतर महर्षि व्यास यांनी कीर्तन केले,महर्षि व्यास यांनी शुक ला कीर्तन शिकवले व कीर्तनाचा सर्व भारतभर प्रचार आणि प्रसार झाला.महाराष्ट्रात कीर्तन ची परंपरा खूप जुनी आहे.


कीर्तनाचे विविध प्रकार:


वारकरी कीर्तन: 

वारकरी कीर्तन हे वारकरी संप्रदाय यामध्ये खूप प्रसिद्ध आहे.संत नामदेव महाराज,संत तुकाराम महाराज असे विविध वारकरी संप्रदाय असणारे संत महाराष्ट्रात होऊन गेलेले आहेत.वारी करणार्‍याला वारकरी म्हणतात. वारकरी हे वारीला जाताना म्हणजे महाराष्ट्रात जसे पंढरपूर हे श्री विठ्ठलाचे सर्वात मोठे वारकरी  संप्रदाय यांचे त्रिर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे.


अनेक वारकरी त्याठिकाणी पायी दिंडी मध्ये कीर्तन भजन करत जात असतात. तेव्हा त्याठिकाणी वारकरी या संप्रदाय यांची महती सांगून ज्या रचना सांगितल्या जातात.त्यांना वारकरी कीर्तन असे म्हणतात.


वारकरी कीर्तनात प्रामुख्याने अभंग,टाळ,मृदंग,टाळ्या यांच्या संगीतमय नादात हे कीर्तन संगितले जाते. वारकरी कीर्तन शक्यतो मंदिरांसमोर मोठ्या लोकसमुदाय यांच्यासमोर सदार केले जाते.


संत नामदेव, तुकाराम महाराज ,संत ज्ञानेश्वर महाराज यांनी खूप कीर्तने केलेली आपण ऐकून आहोत.तसेच त्यांनी वारकरी संप्रदाय वाढवण्यासाठी अनेक अभंगरचना केलेल्या आढळून येतात. 


रामदासी कीर्तन: 

रामदास स्वामी यांनी ही रामदासी कीर्तन परंपरा सुरू केली असे संगितले जाते.रामदासी कीर्तन समर्थाच्या रचनावर आधारित आहे. रामदासी कीर्तनात श्रीधरस्वामी,केशवस्वामी,रंगनाथस्वामी,अशा रामदासी परंपरा असणार्‍या यात वेगवेगळ्या संतांच्या रचनाचा अंतर्भाव दिसून येतो,रामदासी कीर्तन हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तन प्रकार आहे. रामदासी कीर्तन प्रकार आजही गुरुकुल पद्धतीने शिकवल जाते. याव्यतिरिक्त कीर्तनाचे अनेक प्रकार आहेत. 


कीर्तनाचे महत्व मराठी माहिती.

  • कीर्तन हे एक लोकशिक्षणाचे,जनजागृतीचे  प्रभावी साधन आहे.
  • कीर्तनामुळे लोकांना भक्तिमार्गावर तसेच समाजाला एक विशिष्ट दिशा देण्याचे साधन मानले जाते.
  • लोकांपर्यंत लवकर व प्रभावीपने पोहचण्यासाठी महत्वाचे साधन आहे. 
  • कीर्तन हे पूर्वीच्याकाळी अध्यात्म,भक्तिमार्ग,चांगली शिकवण,लोकांपर्यन्त लवकर पोहचण्याचे साधन म्हणून प्रसिद्ध होते,अलीकडील काळात कीर्तनाचे महत्व कमी होत चालले आहे.  
  • छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात मुघली सत्तेविरुद्ध जनजागृती करणे,हिंदुधर्माची शिकवण आणि महत्व पटवून देण्यासाठी कीर्तनाने खूप महत्वाची भूमिका बजावली आहे.
  • आजही हिंदू धर्मात कीर्तनाला सर्वात उच्च स्थान आहे. 
  • हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचे पवित्र कार्य कीर्तनाने पार पाडले आणि हिंदू धर्माची शिकवण जगाच्या कानाकोपर्‍यात पोहचवण्याचे कार्य अनेक कीर्तनकारांनी कीर्तन सांगून केलेली आहेत. 
  • संत नामदेव,संत जनाबाई, संत ज्ञानेश्वर महाराज,संत निवृत्ती महाराज,संत चोखामेळा,संत बहिणाबाई,संत तुकाराम ,संत गाडगेबाबा इ. अनेक संतांनी लोकशिकवण लोकांना कीर्तनाच्या माध्यमातून दिले. 
  • ब्रिटिश सरकार विरोधात सुद्धा लोकांमध्ये ब्रिटीशांविरोधात चळवळ उभा करण्याचे व लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचे काम कीर्तनातून संतांनी पार पाडले. 
  • कीर्तन हे एकाच वेळी अनेक लोकांपर्यंत पोहचण्याचे साधन आहे. 


कीर्तनासाठी आवश्यक असणारी वाद्ये:

  • कीर्तन करण्यासाठी महाराष्ट्रात खालील वाद्ये वाजवली जातात. मृदंग,तबला,पेटी,विना,टाळ,चिपळ्या,झांज हे वाद्ये ज्या त्या संकृतीप्रमाणे भाषेप्रमाणे,वाजली जातात. या व्यतिरिक्त आणखी काही वाद्ये समाविष्ट असू शकतात. 


महाराष्ट्रातील इतिहासातील प्रसिद्ध कीर्तनकार:

  • संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज ,संत रामदास ,संत जनाबाई,संत मुक्ताबाई,संत चोखामेळा ,संत निवूत्ती महाराज,संत बहिणाबाई,संत गाडगेबाबा इ.या सर्व संतांनी हिंदू धर्माची शिकवण,लोकशिकवण,व जनजागृती करण्याचे कार्य केले. 
  • संगीत,अभिनय,काव्य,व क्वचित नृत्य,यांच्यासह भक्तीरसपूर्ण विविध कथा,अभंग,रचना यांच्या माध्यमातून एकपात्री निवेदन सादर करणे म्हणजे कीर्तन होय.
  • जे संत,महाराज कीर्तन सांगून लोकांना मार्गदर्शन करतात,भक्तिमार्गाची शिकवण  देतात त्यांना कीर्तनकार असे म्हणतात.कीर्तन हे एक भक्तिमार्गाचे साधन आहे.भारतात कीर्तनाचे आता वेगवेगळ्या सांप्रदायामुळे वेगवेगळे प्रकार पडतात. जसे 
  • नारदीय कीर्तन.
  • वारकरी कीर्तन.
  • रामदासी कीर्तन.
  • राष्ट्रीय कीर्तन.
  • संयुक्त कीर्तन.
  • जुगलबंदी कीर्तन  
याव्यतिरिक्त आणखी काही कीर्तनाचे प्रकार असू शकतात.


आमचा What's App group जॉईन करू शकता:

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने