संत नामदेव महाराज: जीवनपरिचय, कौटुंबिक माहिती, आख्यायिका, साहित्य, समाधी.

संत नामदेव महाराज यांची कौटुंबिक माहिती.

संत नामदेव महाराज हे संत ज्ञानेश्वरांच्या कालखंडामध्ये होऊन गेले.वारकरी संप्रदायाचे संत नामदेव महाराज एक प्रचारक आणि प्रसारक होते.नामदेव महाराजांचे जीवनामध्ये ते आद्य प्रणेते होते. पांडुरंगाला बोलायला लावणारे नामदेव विठ्ठलाचे निस्सिम भक्त होते.

संत नामदेव महाराज संपूर्ण माहिती व कार्य मराठी
संत नामदेव महाराज

संत नामदेव महाराज संपूर्ण माहिती व कार्य मराठी.

  • संत तुकाराम महाराज यांचा जीवन परिचय.
  • संत नामदेव महाराजांचे संपूर्ण नाव - नामदेव दामा शेटी.
  • संत नामदेव महाराजांचा जन्म - 26 ऑक्टोंबर 1270.
  • संत नामदेव महाराजांचे गाव - नरसी ब्राम्हणी (मूळ गाव सांगितले जाते).
  • संत नामदेव महाराजांची आईचे नाव - गोणाई.
  • संत नामदेव महाराजांच्या वडिलांचे नाव - दामा शेटी.
  • संत नामदेव महाराजांच्या पत्नी चे नाव - राजाई.
  • संत नामदेव महाराजांचे मुले - नारायण,महादेव,गोविंद,विठ्ठल, लिंबाई.
  • संत नामदेव महाराजांचा संप्रदाय - नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, वैष्णव संप्रदाय.
  • संत नामदेव महाराजांचे गुरू - विसोबा खेचर.
  • संत नामदेव महाराजांचे शिष्य - चोखामेळा.
  • संत नामदेव महाराजांची साहित्य रचना - शब्द किर्तन,अभंग गाथा,अभंग भक्ती ,कविता.

संत नामदेव महाराज हे वारकरी संप्रदायाचे महान प्रचारक असून संपूर्ण भारतामध्ये त्यांनी वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करण्याचे काम केले.संत नामदेव महाराज हे कीर्तनकार होते.भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत घेऊन जाण्याचे कार्य त्यांनी केले.संत नामदेव यांचे वडील दामाशेटी हे संत नामदेवांचे वडील होते.त्यांचा व्यवसाय कपडे शिवणे म्हणजेच शिंपी होते.सध्याच्या हिंगोली जिल्ह्यातील नरसी-बामणी हे संत नामदेवांचे जन्म गाव म्हणून ओळखले जाते.

संत नामदेव यांना एकूण ऐंशी वर्षांचे आयुष्य लाभले.त्यांचे बालपण हे पंढरपूर मध्ये गेले.त्यांनी लहानपणापासूनच विठ्ठलाची भक्ती केली.संत गोरा कुंभार यांच्याकडे  निवृत्तीनाथ,ज्ञानेश्र्वर महाराज,सोपानदेव मुक्ताबाई,संत नामदेव, चोखामेळा,विसोबा खेचर आदी संतांचा मेळा जमला होता.

त्यावेळी संत ज्ञानेश्र्वरांच्या विनंतीवरून गोरोबाकाकांनी उपस्थितांच्या आध्यात्मिक तयारीविषयी आपले मतप्रदर्शन केले होते. या प्रसंगानंतरच संत नामदेवांना विसोबा खेचर हे आध्यात्मिक गुरू म्हणून लाभले. 

संत नामदेव यांच्या परिवारामध्ये त्यांची पत्नी राजाई ,मोठी बहीण आऊबाई, नारा विठा गोंदा महादा हे त्यांचे चार पुत्र व एक मुलगी लिंबाई असा त्यांचा परिवार होता. त्यांचे कुटुंबही मोठे होते. एकूण पंधरा माणसे त्यांच्या कुटुंबामध्ये होते.स्वतःला नामाची दासी म्हणून संबोधणारे संत जनाबाई यांच्या परिवारातील एक सदस्य होत्या.संत नामदेवांनी 2500 अभंग लिहिले असून त्यांनी इतर या भाषेमध्ये सुद्धा काही अभंगरचना केली आहे.

संत नामदेव महाराज यांच्याविषयी आख्यायिका:

संत नामदेव महाराज लहान असताना त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितले होते की, 

आज देवाला प्रसाद तूच दाखवायचा, त्यादिवशी नामदेवांनी नुसता नेवैद्य दाखविला नाही तर देवा पुढे वाट बघत बसले , हा देव माझा प्रसाद खाईल, त्या अत्यंत निरागस अपेक्षाला मान देऊन प्रत्यक्ष विठ्ठल प्रकट झाले व नामदेवांनी दिलेला प्रसाद त्यांनी ग्रहण केला. " 

असे सांगितले जाते की,

कुत्र्याने चपाती पळवली,त्याला ती कोरडी खाऊ लागू नये म्हणून संत नामदेव महाराज यांनी तुपाची वाटी घेऊन त्याच्या मागे लागले होते." 

संत नामदेव महाराज हे सतत विठ्ठलाचे भक्ती करत असत.एकदा महाशिवरात्रीच्या निमित्ताने संत नामदेव औंढा नागनाथ मंदिरामध्ये दर्शनासाठी गेले असता तेथे भजन-कीर्तन न करण्याठी पुजाऱ्यांनी त्यांना विनवले त्यांच्या विनंतीस मान ठेवून नामदेव महाराजांनी मंदिराच्या मागच्या बाजूला बसून दर्शनासाठी नागनाथाची आळवणी करून नामदेवाचे भक्ती बघून त्यांना दर्शन देण्यासाठी देवाने पूर्वभिमुख असलेले दर्शन मंदिर फिरून पश्चिमाभिमुख केले. ते आजतागायत तसेच आहे असे सांगितले जाते.

संत नामदेव यांचे सामाजिक।सांप्रदायिक कार्य:
संत नामदेव महाराज यांनी उत्तर भारतामध्ये जवळजवळ 54 ते 55 वर्ष समाज जागृतीसाठी व आध्यात्मिक कार्यासाठी झटत राहिले.संत नामदेव महाराज यांनी संत ज्ञानदेव,संत तुकाराम,संत रामदास व संत एकनाथ यांसोबत आपले अध्यात्मिक कार्य केले.

भागवत धर्माची शिकवण त्यांनी उत्तर भारता पर्यंत पोहचवली.तेथे त्यांनी पंजाब, राजस्थान,गुजरात, अध्यात्मिक कार्य केले.त्याठिकाणी संत नामदेव महाराज यांचे मंदिरे आहेत.विख्यात संत नरशी मेहता हे गुजरात मधील असून त्यांनी आपल्या काव्यात संत नामदेव महाराज यांचा उल्लेख केला आहे.तसेच राजस्थान मधील संत मिराबई यांनी आपल्या काव्यात नामदेवाने घराचे छप्पर शाकारले असे म्हटले आहे.

संत नामदेव महाराज समकालीन संत होते.भागवत धर्माची शिकवण त्यांनी महाराष्ट्राच्या बाहेर पोहचवण्याचे व समाजाला भक्ती मार्गाने जाण्याची शिकवण दिली.त्या काळात मुस्लिम राज्यकर्ते समजला त्रास देत होते,अशा काळात त्यांनी समाजाला दिशा देण्याचे काम केले. 


कर्मकांडापासून लोकांना मुक्त करण्याचा प्रयत्न केला.दुःखी लोकांना उपदेश करून नामस्मरण करण्यास सांगितले.

" विठ्ठल आवडी प्रेमभावे, आधी रचली पंढरी. मग वैकुंठ नगरी. "

"पंढरीचा महिमा त्यांनी "देह जावो अथवा राहो,माझे तीर्थ पांढरी ."

असे ते सांगतात.नामदेवांनी विठ्ठल विषयीची भावना श्रद्धा आणि प्रेम हे आपल्या अभंगातून मांडलेली आहे संत नामदेव महाराज यांनी त्यांच्या रसाळ वाणी जीवन अर्थपूर्ण भंगाची सांगणाऱ्या कितीतरी कथा प्रचलित आहेत.

भागवत धर्माचे आद्य प्रचारक म्हणून संत नामदेव महाराजांनी जवळजवळ पन्नास वर्ष भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार केलेला आढळून येतो अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराष्ट्राची भावनिक एकात्मता जपण्याचे काम त्यांनी केले पंजाबमधील शीख बांधवांना त्यांनी भक्तिमार्ग शिकवला.

संत नामदेव महाराज यांच्याशी संबंधित असलेले साहित्य:

  • नामदेव गाथा
  • नामदेव चरित्र
  • संत नामदेव कवित्व आणि संतत्व
  • चरिरांतनाचा ज्ञानदीप
  • श्री नामदेव महाराज चरित्र
  • संत नामदेव महाराज यांच्याशी संबंधित अनेक साहित्य असून ते वाचण्यासारखे आहे.

संत नामदेव महाराज यांची समाधी:

संत नामदेव महाराज यांनी वयाच्या 80 व्या वर्षी समाधानाने आपला देह ठेवला, संत नामदेव महाराजांचा मृत्यू शनिवार, 3 जुलै 1350 रोजी झाला.पांडुरंगाच्या दर्शनाला येणार्‍या भक्त यांच्या पायाची धूळ माझ्या मस्तकी लागावी म्हणून त्यांनी पंढरपूर येथे विठ्ठल मंदिराच्या महादरवाजा च्या पायरीखाली त्यांची समाधी बांधण्यात आली त्या जागेला पायरीचा दगड असे ओळखले जाते. दुसरी समाधी पंजाब मधील घुमान येथे आहे. 

या लेखाच्या माध्यमातून आपण संत नामदेव महाराज यांची मराठी माहिती घेतली,अधिक माहितीसाठी तुम्ही antnamdev maharaj wikipedia in marathi वर माहिती घेऊ शकता. 

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने