26 जानेवारी।प्रजासत्ताक दिनाची माहिती.
26 जानेवारी |
प्रजासत्ताक(26 जानेवारी) म्हणजे काय?
प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता होय.
26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट हे दिवस भारतीयांसाठी खूप महत्वाचे असून या दिवसाला विशेष महत्व आहे,कारण 26 जानेवारी हा दिवस भारतात प्रजासत्ताक दिन हाणून साजरा केला जातो आणि 15 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र दिन म्हणून साजरा केला जातो.या दोन्ही ही दिवसाला भारताचे राष्ट्रीय सण म्हणून ओळखले जाते.या दोन्हीही दिवसाचे महत्व वेगवेगळे आहे,आता आपण प्रजासत्ताक दिनाचे महत्व जनयन घेऊया.
प्रजासत्ताक दिन म्हणजे प्रजेची सत्ता स्थापन झालेला दिवस होय.
1930 साली 26 जानेवारी या दिवशी लाहोर येथे कोंग्रेस चे अधिवेशन सुरू असताना पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संपूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. याच दिवशी तिरंगा ही फडकण्यात आला,म्हणून हाच दिवस राज्यघटना आमलात आणण्याचे ठरवले.राज्यघटनेचा मसुदा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीने तयार केला आणि तहे संविधान म्हणून 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकृत करण्यात आले.
26 जानेवारी या दिवासपपासून भारताच्या लोकशाहीचे पर्व खर्या अर्थाने सुरू झाले म्हणून 26 जानेवारी 1950 हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करण्यात येतो.या दिवसापासून भारतात लोकशाही ला सुरवात झाली. याच दिवशी भारताचे एक स्वतंत्र संविधान आमलात आणले गेले.
लोकशाही म्हणजे लोकांचे लोकांसाठी लोकांनी चालवलेले राज्य होय.
इंग्रजांनी भारतावर सुमारे दीडशे वर्षे राज्य केले. व्यापारी म्हणून भारतात वसाहती स्थापन केल्या आणि भारतात आपला पाय ठेऊन सत्ता स्थापन केलेल्या इंग्रजांना देशातून हाकलून लावणे देशाची इंग्रजांकडून होणारी देशाची लूटमार थांबवणे आवश्यक होते.
भारतीयांच्या लक्षात आलेले होते ती आपल्याला सुखाने समाधानाने जगाचे असेल तर इंग्रज सरकारला विरोध करणे आणि त्यांना भारतातून हुसकून लावणे हाच एक पर्याय आहे.मग त्यात मरण आले तरी चालेल.त्यासाठी भारतातील जनतेमध्ये जागृती निर्माण करणे आणि इंग्रज सरकार विरोधात उभा करण्याचे काम काही भारतीय शूर वीरांनी केले.
इंग्रजांना वेगवेगळ्या मार्गाने विरोध करून त्यांना कोणत्याही प्रकारचे बळी न पडता,त्यांच्या विरोधात उभा राहण्यासाठी संपूर्ण देशभर चळवळी केल्या गेल्या त्यात अनेकांना वीरमरण आले.परंतु भारतीयांनी हार मानली नाही, शेवटी इंग्रज सरकारला गुढगे टेकावे लागले.
15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वतंत्र मिळाले.म्हणून या दिवसाला स्वतंत्र दिन म्हटले जाते. भारताला स्वतंत्र मिळण्यासाठी अनेक नेते आणि सर्वसामान्य जनतेला आपल्या प्राणाचे बलिदान द्यावे लागले आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही. त्यात भारतीयांना खूपच हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या.
स्वातंत्र्य मिळाल्या नंतर तब्बल 2 वर्ष 11 महीने 18 दिवस भारताची राज्यघटना तयार करण्याचे काम सुरू होते. 26 जानेवारी 1950 रोजी भारत देश एक प्रजासत्ताक आणि सार्वभौम देश म्हणून ओळखला जाऊ लागला. म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून सर्व भारत भर मोठया आनंदाने राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो. प्रजासत्ताक दिनाला गणतंत्र दिन म्हणून ओळखले जाते तसेच सुवर्णदिन म्हणून सुद्धा ओळखले जाते.
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी संपूर्ण देशभर आनंदाचे वातावरण असते.या दिवशी सर्व सरकारी कार्यालये,सर्व शाळा महाविद्यालयात तिरंगा हा भारताचा राष्ट्रीय ध्वज असून या दिवशी राष्ट्रध्वजाचे आरोहण केले जाते.तिरंग्याला मानवंदना दिली जाते.तसेच सामूहिक राष्ट्रगीत म्हटले जाते. शाळेत विविध सांकृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात,स्पर्धा चे आयोजन केले जाते,भाषण,संगीत,खेळाच्या स्पर्धा,इत्यादि कार्यक्रम घेऊन,देशभक्ती आणि राष्ट्र प्रेम व्यक्त केले जाते.
26 जानेवारीला भारताची राजधानी असलेल्या दिल्ली मध्ये दिवसभर विविध कार्यक्र्म साजरे केले जातात.दिल्लीच्या राजपथावर विविध संचलन आयोजित केले जाते, मुख्य संचनलाला सुरवात करण्या अगोदर आपल्या देशासाथी बलिदान देणार्या हुतात्मे आणि सैनिक यांच्या स्मारकला आणि अमर ज्योति जवान ला आपल्या देशाचे पंतप्रधान पुष्पचक्र अर्पण करतात. देशासाठी प्राणाची आहुति देणार्या सैनिकांना शांततेत श्रद्धांजली अर्पण करतात.
अशा प्रकारे सर्वच शहीद जवानांना आदरांजली वाहून झाल्यावर पंतप्रधान राजपथाच्या मुख्य मंचावर विराजमान होतात. सर्व देशावासीयांना शुभेछा देतात आणि देशाला उद्देशून भाषण करतात. भारताच्या राष्ट्रपतींच्या उपस्थितीत राष्ट्रगीत गाईले जाते. राष्ट्रपति यांच्या उपस्थितीत तोफेची सलामी दिली जाते. देशातील वीर जवानांना शौर्य गाजवणार्या जवानांना अशोकचक्र व किर्तिचक्र देऊन सन्मानित केले जाते.
या दिवशी विविध देशातील परराष्ट्र अध्यक्ष यांना पाहुणे म्हणून आमंत्रित केले जाते. आपल्या देशाचे तिन्ही दलाचे संचलन राजपथावर केले जाते.तीनही सेनामार्फत राष्ट्रपतींना मानवंदना दिली जाते. विशेष म्हणजे या दिवसाची तयारी अगदी शिस्तीत केली जाते.
ज्याप्रमाणे भारताचे राष्ट्रपति तीनही सेना दलाची मानवंदना स्वीकारतात त्याच प्रमाणे देशातील प्रत्येक राज्यात देखील राज्यपाल फौजांची मानवंदना स्वीकारतात.संपूर्ण देशभर आनंदाचे वातावरण असते.
26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. या दिवशी शाळेत झेंडा वंदन झाल्यावर खाऊ वाटप केला जातो, आणि सर्व शाळा महाविद्यालयांना राष्ट्रीय सण म्हणून सुट्टी असते.