बीए फुल फॉर्म इन मराठी।BA Full Form In Marathi.
बीए (BA) फुल फॉर्म इन मराठी आपण या लेखात BA चा Full form तसेच बी ए म्हणजे काय? याविषयी माहिती घेऊया. BA नंतर नोकरीच्या संधीविषयी माहिती घेऊया. बीए (BA) पदवी हा एक अभ्यासक्रम असून बी ए पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आवश्यक पात्रता विषयी माहिती या पोस्ट मधून आपण घेणार आहोत.
![]() |
बीए फुल फॉर्म इन मराठी |
BA Full Form.
Bachelor’s of Arts हि 12 वी नंतर कला शाखेतील पदवी आहे.
BA Meaning in Marathi.
- बीए (BA) ही एक कला शाखेतील पदवी अभ्यासक्रम आहे.
- म्हणजेच कला शाखेतील तीन वर्षाची पदवी अभ्यासक्रम पूर्ण करणे म्हणजे BA अभ्यासक्रम पूर्ण केला असे म्हणतात.
- Bachelor of Arts (BA) हा अभ्यासक्रम साधारण 3 वर्षांचा असतो. FYBA, SYBA, TYBA काही विद्यापीठांमध्ये हा 4 वर्षांचा देखील असू शकतो. एफ वाय बी ए, एस वाय बी ए, टी वाय बी ए हे तीन वर्ष मिळून Bachelor of Arts (BA) पूर्ण केले जाते.
बीए (BA) साठी आवश्यक पात्रता किंवा निकष.
बीए (BA) हा एक पदवी अभ्यासक्रम आहे.बीए (BA) साठी सर्वप्रथम मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून 12 वी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
12 वी Arts शाखेतून उत्तीर्ण असेल तर, चांगलेच परंतु सायन्स व कॉमर्स शाखेतील विद्यार्थी देखील पुढे बीए (BA)साठी प्रवेश घेऊ शकता.
प्रत्येक विद्यापीठामध्ये नियम वेगळे असू शकतात. परंतु अनेक विद्यापीठामध्ये 12 वी वाणिज्य किंवा विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झालेले असले तरी बीए (BA) मधे प्रवेश मिळतो.
बीए (BA) साठी अजून एक आवश्यक अट म्हणजे मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून BA बारावीच्या वर्गात किमान 40 % गुण मिळवणे आवश्यक असते.
प्रत्येक विद्यापीठाचे नियम वेगळे असू शकतात.पण काही प्रसिद्ध विद्यापीठामध्ये कला शाखेत पदवी घ्यायची असेल तर, 90 % पेक्षा जास्त गुण असावे लागतात.
प्रवर्गानुसार SC किंवा ST किंवा OBC किंवा भिन्न पात्रता असलेल्या विद्यार्थ्यांना यात काही सवलत मिळते.
बीए (BA) अभ्यासक्रम स्वरुप कसे असते.
बीए (BA) हा 3 वर्षांचा अभ्याक्रम असतो.यात सत्र परीक्षा असतात.काही ठिकाणी पहिल्या वर्षी वार्षिक परिक्षा आणि नंतरच्या 2 वर्षी सत्र परीक्षा होऊ शकते.प्रत्येक सत्राला विषय बदलले जातात. प्रत्येक सत्रात आपण आपल्या आवडीने विषय निवडू शकतो.
ज्या विषयात बीए (BA) पदवी प्रदान करायची आहे.तो विषय तिसऱ्या वर्षी म्हणेच शेवटचे 2 सत्र निवडायचा असतो. त्या विषयातील वेगवेगळ्या शाखा तिसऱ्या वर्षी शिकवल्या जातात.
प्रत्येक सत्राला अंतिम परीक्षा होते आणि प्रत्येक सत्र परीक्षेचं गुण हे पदवी निकालात गृहीत धरले जातात.
बीए (BA) केल्यावर नोकरी,किंवा व्यवसायाच्या संधी.
बीए (BA) पदवी ही विषयांवर अवलंबून असते आणि म्हणूनच त्याच्यातील नोकरी किंवा व्यवसाय याच्या शाखा देखील विषयावर अवलंबून असतात. आपण ज्या विषयात पदवी घेऊ तसे व्यवसाय आणि नोकरीचे क्षेत्र ठरते.
सर्वसामान्यपणे बीए (BA) केल्यानंतर विद्यार्थ्यांना सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील नोकऱ्या मिळू शकतात. व्यक्ती खाजगी कंपनीसाठी बी पी ओ, स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन फर्म्स ,कन्सल्टिंग फर्म्स , पत्रकारिता इ. काम करू शकतात.
तसेच सरकारी क्षेत्रात, रेल्वे खाते , बँकिंग क्षेत्रात ,लष्करी विभाग इत्यादी क्षेत्रात काम करू शकतात. तसेच वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा सुद्धा देऊ शकतात.
बँकिंग क्षेत्रातील परीक्षा, रेल्वे क्षेत्रातील परीक्षा आणि MPSC,UPSC परीक्षा,महाराष्ट्र पोलीस भरती साठी अर्ज करू शकतात.
या क्षेत्रातील परीक्षा देऊन आयएएस ,आयएफएस आणि आयपीएस सारख्या नोकर्या मिळवता येऊ शकतात.
एफ वाय बी ए (FYBA) म्हणजे काय?
एफ वाय बी ए (FYBA) म्हणजे First Year Bachelor of Arts होय. म्हणजे मराठीमध्ये बीए (BA) चे पहिले वर्ष होय.
एस वाय बी ए (SYBA) म्हणजे काय ?
एस वाय बी ए (SYBA) म्हणजे Second Year Bachelor of Arts होय.
म्हणजे मराठीमध्ये बीए (BA) चे दुसरे वर्ष होय. बीए (BA) च्या पदवी अभ्यासक्रमातील एस वाय बी ए (SYBA) हे दुसरे वर्ष असून एस वाय बी ए (SYBA) उत्तीर्ण झाल्यावर तुम्ही पुढील वर्षात म्हणजे टी वाय बी ए (TYBA) मध्ये प्रवेश घेऊ शकता.
टी वाय बी ए (TYBA) म्हणजे काय ?
टी वाय बी ए (TYBA) म्हणजे Third Year Bachelor of Arts होय.
म्हणजे मराठीमध्ये बीए (BA) चे तिसरे वर्ष होय. बीए (BA) च्या पदवी अभ्यासक्रमातील टी वाय बी ए (TYBA) हे तिसरे वर्ष असून Bachelor of Arts ( BA) पदवी अभ्यासक्रमातील शेवटचे वर्ष असते.
टी वाय बी ए (TYBA) उत्तीर्ण झाल्यावर तुमचे Bachelor of Arts ( BA) पदवी अभ्यास पूर्ण झाला असे समजले जाते. वरील तीनही वर्षासाठी खालील काही विषय समविष्ट असतात,काही विद्यापीठामध्ये या व्यतिरिक्त विषय देखील असू शकतात.
बीए (BA) च्या अभ्यासक्रमातील समाविष्ट विषय .
- मराठी
- हिंदी
- इंग्रजी
- अर्थशास्त्र
- इतिहास
- भूगोल
- तर्कशास्त्र
- शारीरिक शिक्षण
- राज्यशास्त्र
- सामाजिक शास्त्र
- योगा
- सार्वजनिक प्रशासन
- मानसशास्र
बीए (BA) अभ्यासक्रम केल्यानंतर विद्यार्थ्यांना होणारा फायदा
बीए (BA) पदवी अभ्यास पूर्ण केल्यावर ,विद्यार्थी वर सांगितल्याप्रमाणे विविध ठिकाणी नोकरी साठी पात्र नोकरी साठी अर्ज करू शकतात किंवा बीए (BA) पूर्ण केलेल्या कोणत्याही क्षेत्रात पदव्युत्तर पदवी सारख्या उच्च शिक्षणासाठी जाऊ शकतात.
कला शाखेची पदवी यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी विविध क्षेत्रात करिअरच्या दृष्टीने किंवा पुढील शिक्षण पूर्ण करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलू शकतात.