Vocational Education : व्यवसायिक शिक्षण घेणे काळाची गरज! जाणून घ्या संपूर्ण माहिती.

व्यवसायिक शिक्षण।Vocational Education म्हणजे काय?


व्यावसायिक शिक्षण काळाची गरज आहे.विद्यार्थी शाळेत जाण्याचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे त्याला लिहता,वाचता येणे,तो साक्षर होणे याबरोबरच त्याला त्याच्या वैयक्तिक जीवनात स्वावलंबी होणे हे सुद्धा खूप महत्वाचे आहे.


Vocational Education : व्यवसायिक शिक्षण घेणे काळाची गरज! जाणून घ्या संपूर्ण माहिती.
Vocational Education


व्यावसायिक शिक्षण,व्यावसायिक शिक्षणाचे सूत्र,व्यावसायिक शिक्षणाची गरज व महत्व:

भारतासारख्या विस्तृत आणि महान लोकसंख्या असणार्‍या देशात व्यावसायिक शिक्षण खूप महत्वाचे आहे.कारण सध्या ची बेरोजगारी पाहता व्ययसायिक शिक्षण किंवा व्यवसाय पूर्व प्रशिक्षणाची खूप गरज निर्माण झालेली आहे.

Join Our Whats App Channel

चाकाचा शोध लागला आणि मानवाची प्रगति सुरू झाली आज आपण पाहतो आहोत की मानवाने माहिती तंत्रज्ञानात किती प्रगती केलेली आहे.त्यामुळे अनेक बेरोजगारांना रोजगार मिळू लागला आहे.शाळेत फक्त नोकरी मिळावी या उद्देशाने न जाता,आपल्याला व्यवसाय करण्यासाठी आवश्यक आहे.


ते ज्ञान शाळेतून मिळणे अपेक्षित आहे.आपल्याकडे असणारी गुणवत्ता जर आपण योग्य त्या ठिकाणी वापरली तर नक्कीच बेरोजगारी कमी होईल आणि देशाची प्रगती होईल असे वाटते. 


व्यावसायिक शिक्षणाची व्याख्या:

 

व्यावसायिक शिक्षण म्हणजे माध्यमिक व उच्चमाध्यमिक ,महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील नोकरी,रोजगार किंवा व्यवसायासाठी दिले जाणारे गुणवत्ता पूर्ण शिक्षण किंवा प्रशिक्षण होय .


व्यावसायिक शिक्षणाचे सूत्र:

व्यावसायिक शिक्षण यशस्वी होण्यासाठी काही सूत्र.

  • 1.व्यावसायिक शिक्षणात फक्त कौशल्या हस्तगत करण्यावर भर न देता त्या कौशल्याची पार्श्व्भुमी समजून घेणे महत्वाचे असते. 
  • 2.व्यायसायिक शिक्षणात तत्व व मर्म यांची सांगड असावी प्रत्यक्ष आत्मसात केलेले कौशल्य हे व्यवहारात उपयोग करता येणे महत्वाचे आहे. 
  • 3.व्यवसाय करणार्‍याला सक्ती नको प्रत्येकाची आवड निवड ही वेगवेगळी असते.
  • 4.व्यवसाय करणार्‍याच्या अंगी आवश्यक ती शारीरिक व मानसिक क्षमता असावी. 
  • 5.व्यावसायिक शिक्षणासाठी वापरण्यात येणारी यंत्र समग्री ही अद्ययावत असावी. खूपच जुने यंत्र असल्याने ते नवीन कामगारांना वापरणे अशक्य होते म्हणून त्या त्या वेळी प्रशिक्षांची नेमणूक करून त्यांना प्रशिक्षण देणे आवश्यक असते. 
  • 6.व्यावसायिक शिक्षण हे सामाजिक गरज ओळखून ठरवणे आवश्यक असते. 
  • 7. व्यावसायिक शिक्षण घेताना अभ्यास क्रमाची दिशा अगोदरच ठरवणे आवश्यक असते. 
  • 8.ज्या त्या वयाच्या विद्यार्थ्यांना त्यांना झेपेल असे टप्याटप्याने हे शिक्षण मिळणे आवश्यक असणे गरजेचे आहे. 
  • 9.व्यावसायिक शिक्षणात सक्ती नसावी.व्यवसाय शिक्षण मिळण्यासाठी शाळा व महाविद्यालयीन स्तरावर नियोजन असणे आवश्यक असते. त्यासाठी विशिष्ट प्रशिक्षित अध्यापक वर्ग असणे गरजेचे आहे.
  • 10.इतर शिक्षणसोबत व्यावसायिक शिक्षणाची जोड लावणे व त्याचे एकाच ठिकाणी शिक्षण मिळणे आवश्यक असणे महत्वाचे ठरेल. 


व्यावसायिक शिक्षणाची गरज व महत्व:


व्यावसायिक शिक्षणाची गरज निर्माण होण्याचे कारण म्हणजे जागतिक लोकसंख्या वाढ होय.कारण आपण सध्या पाहतो आहोत की अनेक सुशिक्षित बेकार रोजगार नसल्याने संकटाचा सामना करत आहेत.काही विद्यार्थ्यांकडे गुणवत्ता आहे. परंतु त्याचा उपयोग योग्य त्या ठिकाणी होत नाही. 

मिळालेले शिक्षण व असलेली पात्रता यांचा उपयोग फक्त नोकरी मिळवण्याच्या उद्देशाने न करता वेगवेगळ्या व्यावसायिक क्षेत्रात होणे अपेक्षित आहे.तसेच जसे आपण प्रत्येकजण प्राथमिक शिक्षण पूर्ण करतो तसेच आपण व्यावसायीक शिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे. कारण व्यावसायिक शिक्षणामुळे आपला उदरनिर्वाह चालणार आहे.


व्यावसायिक शिक्षणामुळे कुटुंबाच्या व देशाच्या प्रगतीला हातभार लागतो.व्यावसायिक शिक्षणामुळे अनेकांना त्या व्यवसायात रोजगार निर्मिती होण्यास मदत मिळेल उदा. रिलायन्स उद्योग हा भारतातील महत्वाचा उद्योग समूह आहे त्यातून अनेक लोकांना रोजगार मिळाला आहे अशा प्रकारे उद्योगात यशस्वी होण्यासाठी जर व्यावसायिक शिक्षण शाळा महाविद्यालय स्तरावर मिळाले तर देशाची प्रगती होण्यासाठी खूप मदत होईल. 


शिक्षण पद्धतीत प्रत्येक विद्यार्थी हा जीवनात यशस्वी होईलच याची शास्वती नाही कारण प्रत्येक 
विद्यार्थी हा वेगवेगळ्या बुद्धिमत्तेचा असून त्यांची परिस्थिति वेगवेगळी आहे. त्यांच्या बुद्धिमत्तेचा विचार करून त्या त्या पद्धतीचे निजोजाण करून योग्य तो व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यक्रम राबवणे गरजेचे असेल असे वाटते. 


भारतासारख्या देशात कृषि क्षेत्र जास्त आहे.त्यामुळे कृषि हा घटक लक्षात घेऊन त्यावर आधारित व्यवसाय करून त्या प्रकारचे व्यावसायिक शिक्षण मिळणे आवश्यक आहे. त्याचा फायदा देशाच्या अर्थव्यवस्थेला होईल यात शंका नाही. 


आज शेतकर्‍यांच्या पिकांना बाजारभाव हा चिंतेचा विषय आहे. त्यांच्या पिकावर आधारित उद्योग व्यवसायाची निर्मिती झाली तर परकीय चलन मिळणे सहज शक्य आहे,परंतु त्यासाठी आवश्यक ते शिक्षण व प्रशिक्षण आणि त्याचा व्यवहारात प्रत्यक्ष वापर होणे आवश्यक आहे. 


Marathi Information About Vocational Courses List after 10th and 12th:

  • फिजिओथेरपी टेक्निशियन.
  • स्पोर्ट न्यूट्रिशियन.
  • ॲनिमेशन .
  • रोबोटिक .
  • पब्लिक एडमिनिस्ट्रेशन.
  • रिटेल बिजनेस.
  • ऑडिओ टेक्नोशियन.
  • ऑफिस असिस्टंटशिप.
  • ज्वेलरी डिझाईन.
  • हॉटेल रिसेप्शन अँड बुककिपिंग.
  • हाऊसकिपिंग.
  • रेस्टॉरंट अँड काऊंटर सर्व्हिस.
  • मार्केटिंग आणि सेल्समेनशिप.


व्यवसायिक अभ्यासक्रमाचे फायदे:

  • व्यवसायिक अभ्यासक्रम पूर्ण केल्याने एखाद्या व्यक्तीची त्या विशिष्ट क्षेत्रातील रोजगारक्षमता वाढू शकते. कारण ते त्यांना त्या व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व कौशल्य शिकवले जातात.
  • पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यापेक्षा व्यावसायिक अभ्यासक्रम करणे सहसा स्वस्त असते. त्यामुळे, शिक्षणासाठी जवळ पैसे नसणाऱ्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमाचा लाभ घेता येईल.
  • 10वि,12वी नंतर व्यावसायिक अभ्यासक्रम केल्याने विद्यार्थ्यांना वास्तविक जीवनाचा उद्योग धंद्याचा अनुभव मिळतो. 
  • सद्यस्थितीतील बाजाराविषयी ज्ञान, बाजारातील ट्रेंड अधिक चांगल्या प्रकारे समजतात.
  • सोयीस्कर आणि सुलभ शिक्षण प्रक्रियेमुळे ते ऑनलाइन देखील घेतले जाऊ शकतात.


आमचा What's App Channel जॉईन करू शकता:

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने