10 भारतीय प्रसिद्ध नृत्य प्रकार.
10 भारतीय शास्त्रीय, लोकनृत्य प्रकार माहिती मराठी.
नाट्य म्हणजे काय?
नाट्य व नृत यांचे मिश्रण म्हणजे नृत्य होय.
एखादा कलाकार एखादी कथा नाट्याद्वारे सादर करत असेल तर त्याला नाट्य असे म्हणतात आणि नृत्यामध्ये तालाचा वापर केला जातो.भारत हा विविधतेने नटलेला देश आहे.
भारतातील वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे सण,सांकृतिक परंपरा,भाषा,तसेच राहणीमानातील विभिन्नता आढळून येते,कारण भारत हा एका मोठा क्षेत्रफळ असणारा व विस्तृत असा देश असून या ठिकाणी आहार,पोशाख यामध्ये सुद्धा भिन्नता आढळून येते.
त्यामुळे भारतात नृत्य ,कला ,संकृती मध्ये सुद्धा बदल आढळून येतो.भारतात वेग वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे लोक नृत्य व शास्त्रीय नृत्य प्रकार आढळून येतात.
काही जण म्हणतात त्याप्रमाणे,भारत देशात विविधतेत एकता आढळून येते.देशातील विविध प्रदेशातील विविध नृत्य प्रकारांसाठी जगात प्रसिद्ध आहेत.भारतातील काही शास्त्रीय आणि सर्वात लोकप्रिय नृत्य Information In Marathi माहिती पुढीलप्रमाणे घेऊ.
भारतीय शास्त्रीय नृत्य व लोकनृत्य प्रकार:
1.भरतनाट्यम नृत्य माहिती मराठी.
भरतनाट्यम नृत्यप्रकार तमिळनाडू मध्ये प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे.भरतनाट्यम नृत्य प्रकारामध्ये नटराज हे या नृत्याचे मूळ दैवत मानले जाते.कल्पकता आणि नवनिर्मिती हा कलेचा आत्मा असून भारतीय शास्त्रीय नृत्य प्रकारातील एक प्रसिद्ध नृत्य प्रकार म्हणून भरतनाट्यम नृत्य प्रकार आहे.
हा नृत्य प्रकार दक्षिण भारतात जास्त प्रमाणात प्रसिद्ध असून तेथील मुख्य नृत्य प्रकार आहे. भरतनाट्यम नृत्य प्रकार हा भरतमुनी यांच्या नाट्यशास्र या ग्रंथावर आधारित आहे.
भरतनाट्यम नृत्यप्रकार मध्ये भाव,रस,ताल,कथानक,कल्पकता आणि नाट्यमय पद्धतीने सादर केले जाते. भरतनाट्यम नृत्य प्रकार मध्ये आत्मिक सुख मिळत असते.या नाट्यात कर्नाटकी संगीताची साथ आवश्यक असते.
भरतनाट्यम हा भारतातील विशेषत: देशाच्या दक्षिणेकडील प्रदेशांमध्ये सर्वात लोकप्रिय आणि व्यापकपणे मान्यताप्राप्त शास्त्रीय नृत्य प्रकार मानला जातो.अलरिपू,वर्णम पदम,तिल्लम हे याचे अंग आहेत.
भरतनाट्यम डान्स प्रकार त्याच्या सुंदर शरीराच्या हालचाली आणि हावभावांसाठी ओळखला जातो.भाव ,राग,ताल हे मुख्य घटक यात असून भ म्हणजे भाव,र म्हणजे राग,त म्हणजे ताल नाट्य म्हणजे अभिनयासह सादर केलेले नृत्य होय.भरतमुनी हे या नाट्य प्रकारचे जनक मानले जातात.
भरतनाट्यम नृत्य प्रकार हे मुख्यतः धार्मिक आणि अध्यात्मिक कल्पना व्यक्त करते,विशेषत: हिंदू धर्माच्या विविध प्रकार जसे की शक्ती, शैव, इ.भरतनाट्यम हे नृत्यप्रकर पी चिदंबरम या मंदिरामधील मूर्ति हे मूळ प्रेरणास्रोत समजले जाते.
इतर शास्त्रीय नृत्य प्रकारांप्रमाणे हा प्रकार आसून शक्यतो जास्तीत जास्त भरतनाट्यम नृत्य प्रकार बहुतांशी स्त्रिया सादर करतात.भरतनाट्यम नृत्य प्रकार शास्त्रीय कर्नाटक संगीताच्या खगोलीय स्वरांवर सादर केले जाते.
2.कथ्थक नृत्य माहिती मराठी.
कथ्थक संपूर्णपणे भिन्न नृत्य प्रकार आहे. भारत देशाच्या वेगवेगळ्या प्रदेशात खूप प्रसिद्ध आहे. कथ्थक नृत्य हे मूळ उत्तर भारतातील भक्ती चळवळीदरम्यान निर्माण झालेले आहे.परंतु ते मुघल काळात विशेषत: उत्तर प्रदेश आणि संपूर्ण उत्तर भारतात दरबारी नृत्य म्हणून लोकप्रिय झाले.कथक नृत्य प्रकार याचा उगम आर्य आणि द्रविड यांच्या काळात झाला आहे.कथ्थक नृत्य उत्तरप्रदेश मधील प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे.
कथक हे नाव 'कथा' या हिंदी शब्दावरून आले आहे, ज्याचा अर्थ कथा आहे. हे हाताच्या हालचालींद्वारे कथाकथनाच्या स्वरूपात सादर केले जाते. याला कधीकधी प्रेमाचे नृत्य असेही संबोधले जाते आणि ते पुरुष आणि स्त्रिया दोघेही एकत्र सादर करू शकतात.
घोट्याच्या घंटा किंवा घुंगरू हा नृत्य प्रकाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि त्याचा हिंदी सिनेमा (बॉलिवूड) आणि संगीतातही मोठ्या प्रमाणावर वापर होतो.
कथक नृत्य हे शास्त्रीय नृत्य प्रकार पैकी एक नृत्यप्रकार असून, कथ्थक उत्तर प्रदेशमधील महत्त्वाचा व प्रसिद्ध नृत्यप्रकार आहे. या न्रूत्य प्रकारात भावप्रधान व चमत्कारप्रधान यांचा समावेश होतो .
कथक हा नृत्य प्रकार अभिजात नृत्य प्रकार म्हणून ओळखला जातो. यामध्ये नायक आणि नायिका असतात. विविध वाद्य वापरून नर्तकांची जुगलबंदी यामध्ये पाहायला मिळते. नृत्य, गायन करणारा व कथा सांगणारा अभिनयाचा समावेश यामध्ये होतो.
कथकली नृत्य ,नृत्य संगीत व कथकली नृत्य या तीन कलांनी बनलेले आहे. या नृत्यप्रकारात या तीनही गोष्टींचा समावेश होतो. या नृत्यप्रकारात नाचणारा गायन न करता नर्तक त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव हातांच्या हावभावांची व नृत्य सादर करत असतो.हे एक वैशिष्ट्यपूर्ण नृत्य प्रकार आहे.
हे नृत्य संगीतमय करण्यासाठी दोन संगीतकाराच्या आवश्यकता असते. या नृत्य प्रकारांमध्ये पुरुष हा स्रियांची भूमिका वेशभूषा परिधान करून पार पाडतात.यात विविध आकर्षक मुकूट घालतात.गळ्यात वेगवेगळे दागिने घालतात.चेहऱ्याची सजावट केली जाते. वेगवेगळ्या चेहऱ्यावरील हावभाव करून नृत्य सादर केले जाते.हे नृत्य शक्यतो रात्री सादर केले जाते.
3.लावणी नृत्य -महाराष्ट्र.
लावणी हा नृत्यप्रकार महाराष्ट्रातील खूप प्रसिद्ध नृत्यप्रकार आहे.लावणी नृत्य हा नृत्यप्रकार महाराष्ट्रातील पारंपरिक नृत्यप्रकार असून,लावणी सादर करण्यासाठी ढोलकी हे प्रमुख वाद्य आहे.लावणी नृत्यप्रकार नृत्य आणि संगीत यांचे एकत्रित सादरीकरण केले जाते.
लावणी नृत्य प्रकाराचा उगम बलाढ्य मराठा साम्राज्याच्या काळात झाला आहे.देशातील बहुतांश नृत्यप्रकारांप्रमाणे हा अधिक महिला-केंद्रित नृत्य प्रकार आहे.लावणी हे नाव लावण्य या शब्दापासून बनले आहे ज्याचा अर्थ सौंदर्य आहे. नृत्य प्रकार पारंपारिक संगीत आणि विविध देवतांच्या कथांचे मिश्रण आहे.
खासकरून १८ व्या शतकात मराठा साम्राज्याच्या आक्रमकांविरुद्धच्या संघर्षाच्या वेळी मराठी लोकांसाठी हा नृत्य प्रकार मनोबल वाढवणारा मानला जातो आणि आज मराठी संस्कृती आणि चित्रपटसृष्टीतही त्याचा मोठा वाटा आहे. नटसम्राट या मराठी चित्रपटातील 'अप्सरा अली' हे गाणे, जिथे तुम्ही नृत्याचा साक्षीदार होऊ शकता असे सर्वात प्रसिद्ध गाणे आहे.
लावणीचे प्रकार:
- शृंगारी लावणी.
- निर्गुण लावणी.
- फडाची लावणी.
- बैठकीची लावणी.
लावणी हे नृत्य 18 व्या व 19 व्या शतकात युद्ध भूमीत थकलेल्या सैनिकांची करमणूक म्हणून व सैन्याचे मनोबल वाढवण्यासाठी लावणी हे नृत्य उदयास आले होते.
लावणीत सादर केलेले गाणे हे भावनिक,तसेच कामुक असते.लावणी सादर करण्यासाठी स्री असते.तिने नऊवारी साडी परिधान केलेली असते.पायात पैजण नाकात नथ,केसाला मोगराचा गजरा,अंगावर दागिने परिधान केलेली असतात.शक्यतो लावणी सादर करणारी स्री तरुण आणि सुंदर असते.
4.कथकली नृत्य मराठी माहिती.
कथकली हा भारतीय शास्त्रीय नृत्यांच्या पारंपारिक प्रकारांपैकी एक आहे आणि हे मुख्यतः नृत्य कलेद्वारे विविध धार्मिक देवतांच्या कथाकथनाशी संबंधित आहे.कथकली देशाच्या स्थानिक भाषांमध्ये स्वतःला कथाकार म्हणून अनुवादित करते.कथकली नृत्य प्रकार केरळ मधील प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे.
कथकली नृत्य हे रामायण आणि शिव कथांच्या कथांमधून उद्भवते.यात आकर्षक चेहऱ्याच्या हालचाली तर शास्त्रीय नृत्य प्रकारांपेक्षा वेगळे ते पुरुषांद्वारे सादर केले जाते.
5.बिहू नृत्य-आसाम.
बिहू हे एक लोकनृत्य आहे.हे नृत्य आसाम मधील प्रसिद्ध असणारे बिहू या सणाच्या वेळी बिहू नृत्य केले जाते.
बिहू या नृत्यप्रकारात प्रामुख्याने युवक व युवती सहभागी होतात.आसाममधील बिहू उत्सवादरम्यान हा नृत्य प्रकार अधिक लोकप्रिय आहे.बिहू सण वसंत ऋतुच्या सुरूवातीस साजरा केला जातो आणि आसामच्या वारसा आणि संस्कृतीमध्ये त्याचे विशेष स्थान आहे.
बिहू नृत्यातून आपल्या मनातील आशय व्यक्त केला जातो.गाणे गायीले जातात.या प्रकारांमध्ये जलद गतीने हालचाल केली जाते.चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारचे सादरीकरण केले जातात.
बिहू नृत्य हे नृत्य वेगळ्या झाडांच्या सानिध्यात व व्यासपीठावर सादर केले जाते.या नृत्यामध्ये पारंपारिक आसामी पोशाखात तरुण पुरुष आणि महिला दोघांनी सादर केलेल्या हाताच्या वेगवान हालचाली,जलद पावले आणि नितंबांचे तालबद्ध डोलणे यांचा समावेश नृत्यात असतो,तसेच जड पोशाखांचा समावेश या नृत्यात असतो.ज्यात फेस मास्क आणि बॉडी पेंट्सचा समावेश असतो.
बिहू नृत्य सादरीकरण करतांना सामान्यतः हिरव्या रंगात वेशभूषा असते.या नृत्य प्रकाराची उत्पत्ती बाबत अधिक माहित नाही,परंतु काही नोंदीवरून असे आढळून आले की, ते आसाम समुदायातील लोकांनी सादर केलेल्या 'बिसू' नृत्यातून घेतले आहे.
6.गरबा नृत्य माहिती मराठी.
गरबा नृत्य भारतातील सर्वात लोकप्रिय नृत्य प्रकारांपैकी एक म्हणजे गरबा नृत्य होय. हे केवळ देशभरातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहे. बॉलीवूडमध्ये भांगडा नंतर प्रदर्शित होणाऱ्या नृत्य प्रकारांपैकी हा एक प्रकार आहे.
गरबा नृत्य हे गुजरातच्या 'नवरात्री' उत्सवात अधिक लोकप्रिय आहे. हे दुर्गा देवीला समर्पित नृत्य आहे.हे देशातील इतर भागांमध्ये तसेच मुंबई प्रमाणेच मुख्यतः गुजराती व्यापारी समुदायांमुळे लोकप्रिय आहे.
गरबा नृत्य प्रकार प्रामुख्याने गुजरात राजस्थान या राज्यांमध्ये जास्त प्रचलित असून गरबा नृत्य हे एक लोकनृत्य आहे.त्याचे मूळ उगमस्थान गजरात मध्ये झालेले असून गरबा नृत्य नवरात्रीच्या मध्ये केले जाते.कधी कधी नवरात्रीच्या वेळी देवीला वंदन करण्यासाठी पुरुष सहभागी होतात.
महिलांच्या सर्जनशीलतेचा हा नृत्य प्रकार संबंधित असून नवरात्रामध्ये गरबा नृत्य केले जाते. त्या काळामध्ये दिवा प्रज्वलित केला जातो आणि सभोवताली स्रिया गरबा नृत्य करतात. भारतात साधारण हे नृत्य 1980 पासून सार्वजनिक स्वरूपात केली जाऊ लागल. या नृत्यात स्रि व पुरुष एकत्र नाच करतात.देवीची आराधना म्हणून हा नृत्य प्रकार प्रसिद्ध आहे.
7.ओडिसी नृत्य माहिती मराठी.
ओडिसी नृत्य |
ओडिसी नृत्य प्रकार ओरिसा राज्यातील ओडिसी नृत्य हे एक प्रसिद्ध नृत्य प्रकार असून ओडिसी नृत्य हे एक शास्त्रीय नृत्य आहे.ओडिसी नृत्य प्रकार देखील भारताच्या आठ शास्त्रीय नृत्य प्रकारांमध्ये भारत सरकारने सूचीबद्ध केला आहे. आणि हा भारतातील सर्वात प्राचीन नृत्य प्रकारांपैकी एक आहे जो अजूनही टिकून आहे.
ओडिसी नृत्य ओडिशा मधील उदयगिरी येथे या नृत्य प्रकाराचे उगम झाला असे मानले जाते. इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात खारवेल राजा येथे राज्य करीत असताना तो स्वतः हे नृत्य करत होता, या राजाने प्रजेच्या मनोरंजनासाठी तांडव व अभी नही हे नृत्य प्रयोग सादर केल्याचा उल्लेख उदगीर येथील हाती गुंफेच्या शिलालेखात आढळून येतो. हा नृत्यप्रकार तांडव व अभिनय यातून वेगवेगळ्या प्रकारात केला जातो.
ओडिसी नृत्य प्रकार प्रामुख्याने स्त्रिया सादर करतात आणि ते प्रामुख्याने धार्मिक कथा आणि विशेषत: हिंदू धर्मातील वैष्णव धर्माच्या आध्यात्मिक कल्पना व्यक्त करतात.
ओडिसी नृत्याचा प्रकार मुख्यतः प्राचीन मंदिरांमधून घेतला गेला आहे.कारण नृत्यातील बहुतेक हावभाव आणि हालचाली भारतातील प्राचीन मंदिरांशी संबंधित शिल्प आणि मूर्तींपासून प्रेरित आहेत.
ओडिसी नृत्य करणाऱ्या नर्तकाच्या अंगाला केशर लावली जाते.सरपटणाऱ्या प्राण्यांचा सारखी नक्षी कपाळावरून खाली कालापर्यंत काढली जाते,भुवयांच्या मध्यभागी कुंकुमतिलक असतो.हनुवटीवर छोटा तिळ असतो.डोळे भुवया यांना काजल लावले जाते.पट्टी साडी परिधान केली जाते.नऊवारी साडी परिधान करून ही नृत्य केले जाते. अंगावर वेगवेगळ्या प्रकारचे दागिने परिधान केले जातात.
पायात घुंगरू व कमरेला बेंगपटिया,मनगटात कर कंगन,हातात ताईत व गळ्यात माळा व पदक असतात.या नृत्यप्रकारात भरतनाट्यम कथ्थक या नृत्य प्रकाराचे मिश्रण आढळून येते.
8.कुचीपुडी नृत्य माहिती मराठी.
कुचीपुडी हा नृत्यप्रकार आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध नृत्य प्रकार असून हा संपूर्ण दक्षिण भारतात प्रसिद्ध आहे. या नृत्याचे नाव कृष्णा जिल्ह्यातील देवी तालुक्यातील कुचीपुडी या गावावरून पडलेले आहे.हे नृत्य पारंपरिक पद्धतीतील ब्राह्मण पूर्वी करत होते.हे नृत्य केवळ पुरुष द्वारे केली जाते.कुचीपुडी 15 ब्राह्मण कुटुंबं पाच शतकाहून अधिक काळ परंपराही चालवलेली होती. यात आता सगळ्यांना सामावून घेतले जाते.
कुचीपुडी नृत्य हे नृत्यपारंपरिक पद्धतीने केली जाते. रंगमंचावर पारंपरिक पूजा केल्यानंतर प्रत्येक कलाकाराला पात्र परिचय करून दिला जातो.त्यानुसार नृत्य केले जाते.कर्नाटक संगीतातील गवणे, मृदंग,बासरी,तंबूरा इत्यादी वाद्य वापरुन नृत्य केले जाते.नर्तक पारंपरिक दागिने परिधान करतात. भारत सरकारने भारतातील आठ शास्त्रीय नृत्य प्रकारांमध्ये याचाही समावेश केला आहे.
कुचीपुडी नृत्य हे भारतातील सर्वात कठीण नृत्य प्रकार देखील मानले जाते. हे केवळ नृत्य म्हणून मानले जात नाही तर देवांना समर्पित संपूर्ण धार्मिक प्रक्रिया म्हणून त्यात पवित्र पाणी शिंपडणे, अगरबत्ती जाळणे, देवाची प्रार्थना करणे इत्यादी काही विधी समाविष्ट आहेत.
कुचीपुडी नृत्ययात गायन आणि नृत्य या दोन्हींचाही समावेश असतो, त्यामुळेच त्यासाठी दोन्ही कौशल्ये आवश्यक असतात. भूतकाळात हे मुख्यतः मंदिरांमध्ये पुरुष पुजारी करत असत परंतु कालांतराने ते बहुतेक स्त्रिया करतात.
9.मणिपुरी नृत्य माहिती मराठी.
मणिपुरी नृत्य हा नृत्य प्रकार ईशान्य भारताचे प्रतिनिधित्व करतो.जो इतर भारतीयांसाठी संस्कृती आणि परंपरांनी समृद्ध आहे.मणिपुरी नृत्य हे मणिपूर राज्याचे आहे,हे नृत्य भारतातील आठ शास्त्रीय नृत्यशैलींमध्ये सरकारद्वारे सूचीबद्ध केलेले आहे.
राधा आणि कृष्ण या देवतांच्या प्रेमसंबंधांची कथा सांगण्यासाठी हा नृत्य प्रकार सादर केला जातो,जो देशभरात 'रासलीला' म्हणून प्रसिद्ध आहे. इतर शास्त्रीय नृत्यांप्रमाणे हे देखील मुख्यतः स्त्रिया शास्त्रीय संगीत वाद्यांचा वापर करतात.
मनिपुरी नृत्य एक अभिजात भारतीय नृत्य प्रकार आहे, हे नृत्य मणिपूर राज्यात प्रसिद्ध आहे,तसेच तेथील भौगोलिक परिस्थितीचा परिणाम यानंतर झालेला दिसून येतो.
मनिपुर प्रदेशात प्रचलित असलेल्या अनेक विविध स्थानिक लोकांना त्याचा समावेश या प्रकारात होतो.हे नृत्य मणिपुरी धार्मिक नृत्य म्हणून ओळखले जाते,भक्तीचे साधन म्हणून हे मनिपुरी मधील लोकांनी जतन करून ठेवलेले आहे.मनिपुर बरोबर आसाम पश्चिम बंगाल त्रिपुरा या राज्यातही मणिपुरी नृत्य प्रसिद्ध आहे.मणिपुरी नृत्यातील भाषेची अस्मिता यात आहे.
10.भांगडा नृत्य मराठी माहिती.
भांगडा नृत्य पंजाब राज्यातील प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे.जो भारताबाहेर विशेषतः परदेशी लोकांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहे.हे बहुतेक बॉलीवूड आणि पंजाबी सिनेमा आणि संगीत उद्योगाद्वारे लोकप्रिय झाले आहे.
भांगडा नृत्य हे मुख्यतः विविध पारंपारिक पंजाबी सण जसे की बैसाखी, लोहरी इत्यादींमध्ये प्रचलित आहे.हे सामान्यतः पुरुष आणि स्त्रिया दोघेही करतात.जरी हा शास्त्रीय नृत्य प्रकार मानला जात नसला तरी तो तुलनेने नवीन नृत्य प्रकार आहे.
भांगडा नृत्य हा नृत्याचा एक मोठा आवाज आणि हृदय हालचाल करणारा प्रकार आहे आणि तो बहुतेक पारंपारिक भारतीय ढोल (ड्रम) वाद्य म्हणून सादर केला जातो. याला कधी कधी गिड्डा असेही म्हणतात.
हे नृत्य पंजाब राज्यातील शीख बांधवांमध्ये प्रसिद्ध आहे.हे नृत्य पुरुष व स्रिया एकत्रित करू शकतात.हे नृत्य करताना पंजाबी कपडे किंवा वेशभूषा करून केले जाते.
अशा प्रकारे आपण भारतीय प्रसिद्ध 10 शास्त्रीय नृत्य मराठी माहिती,भारतीय लोकनृत्याचे प्रकार माहिती मराठी मध्ये अभ्यासली आहे,वरील माहिती मध्ये काही बदल अथवा दुरूस्ती असल्यास नक्की कळवा तसेच माहितीमध्ये आणखी भर टाकण्यासाठी आमच्याशी संपर्क करू शकता.
आमचा What's App group जॉईन करू शकता: