डिजिटल जगात मुले आणि पालक यांनी घ्यावयाची काळजी.

डिजिटल जगात मुले आणि पालक यांनी घ्यावयाची काळजी 

डिजिटल जगात मुले आणि पालक यांनी घ्यावयाची काळजी

सध्याचे जग हे झपाट्याने बदलत असताना वाढता स्मार्ट फोन चा वापर,नवीन नवीन गॅजेट्स,सोशल मीडिया,कृत्रिम बुद्धिमत्ता इ.गोष्टी लक्षात घेताना पालकांसमोर पालकत्व निभावणे हे एक आव्हान होऊन बसलेले आहे. असे म्हणायला काही हरकत नाही.

जरी नव्या पिढीला नवीन तंत्रज्ञान आणि प्रगती करणे आवश्यक असले ,तरी आपण त्याचा वापर कसा करतो यावर प्रतिकूल आणि अनुकूल या गोष्टी अवलंबून आहेत.आपले मूल नवीन तंत्रज्ञान शिकत आहे,त्यामागचे फायदे आणि तोटे काय असू शकतात हे सुध्दा लक्षात घेणे आता पालकांना गरजेचे आहे.त्यासाठी त्यापासून होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी मुलांना शिकवले पाहिजे.

☉गॅजेट्स चा वापर मुलांसाठी आवश्यक झाला आहे का?

ऑनलाईन पद्धतीने कामे करण्याचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेले असून त्यामुळे ऑनलाईन कामे करताना मुलांपासून पालक,शिक्षक यांना वेगवेगळ्या गॅजेट्स चा वापर वाढत चालला आहे.मुलांना सुद्धा शिकण्यासाठी वेगवेगळ्या गॅजेट्स चा वापर करावा लागतो,परंतु त्याचा वापर ते योग्य पद्धतीने करतात किंवा नाही याकडे लक्षं पालक यांनी वेळोवेळी दिले पाहिजे.

काही मुलांना वेगवेगळ्या स्मार्टफोन वरील ऑनलाईन गेम खेळण्याची सवय लागते अशा वेळी पालकांनी त्याबाबत आपल्या मुलांना योग्य तो वेळीच सल्ला दिला तर मुलांचा वेळ वाया जाणार नाही,मुलांना या गॅजेट्स चा वापर हा योग्य त्या वेळी करून द्यायला काही हरकत नाही परंतु अभ्यासात व्यत्यय येईल अशा वेळी मुलांना समजून सांगण्याची पालकांची जबाबदारी असली पाहिजे. 

एखाद्या मुलाकडे चांगली बुद्धिमत्ता असेल तर त्याचा तंत्रज्ञानाचा वापर प्रगतीसाठी करता येईल आणि वाईट बुद्धी असेल तर ती फसवणुकी साठी सुद्धा वापरता येईल यात तंत्रज्ञानाचा दोष नाही.त्यामध्ये सर्वस्वी जबाबदार आपण आहोत.सध्याचा काळ पाहता तंत्रज्ञानाचा वेग गोंधळून टाकणारा झालेला आहे. 

सोशल मीडिया स्मार्ट गॅजेट बरोबर आता कृत्रिम बुद्धिमत्ता सेवेत दाखल झाली आहे. सरकारी कामकाज, उद्योग जगत आणि समाजावर गेल्या वीस वर्षात तंत्रज्ञानाचा प्रभाव वाढल्याने इंटरनेट आणि सोशल मीडिया ने आपल्यावर आता आपला ताबा आधीच घेतलेला आहे.कृत्रिम बुद्धिमत्ता आणि स्वयंचलित (ऑटोमेशन )यांचा आता नंबर आहे.

या काळात बोलबाला आहे तो डिजिटल तंत्रज्ञानाचा, बहुतेक सामाजिक आणि सांस्कृतिक संघटनानी हे तंत्रज्ञान आत्मसात केल्याचे दिसते. मुलाचे शारिरीक आणि मानसिक विकासावर डिजिटल मीडियाचा प्रभाव जास्त प्रमाणात झालेला आपण पाहू शकतो. 

तसेच पालकत्व निभवण्याची नवी आव्हानही मुलांच्या आई-वडिलांवर निर्माण झालेली आहे. त्यामुळे डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभाव वाढत चाललेला असताना निष्क्रिय बसणे पालकांना परवडणारे नसून नव्या जगात वावरण्यासाठी मुलांना तयार करताना या जगातील काही गोष्टी हानिकारक आहेत त्या त्यांना जाणीव करून देणे आवश्यक आहे. सध्याची डिजिटल युग पालकत्व याबाबत काही गोष्टी चा विचार करणे आवश्यक आहे.

☉मुलांसाठी स्क्रीन टाईम ठरवून देणे 

सध्या शिक्षणासाठी नवीन गॅझेट चा वापर अपरिहार्य झाल्यामुळे मुलांना ते द्यावे लागते. पण त्याचा स्क्रीन टाईम मर्यादित असणे पालकांच्या हातात आहे.त्यासाठी गॅजेट्स वापरायची वेळ निश्चित करणे आवश्यक आहे. मुलांचा अभ्यास झाल्यानंतर झोपण्यापूर्वी एक तास आधी असे काही उपाय करता येतील अभ्यासासाठी वापर झाल्यानंतर मुले पुन्हा गॅजेट वापरणार नाहीत हे पाहायला हवे.तसेच त्यांच्यावर लक्ष देणे आवश्यक असते.

आपल्याकडे कोणी पाहुणे आलेले असताना जेवण करताना ही मुले स्मार्टफोन हातात घेऊन एकीकडे जेवण आणि एकीकडे मोबाईल पाण्याची सवय मुलांना लागलेली दिसून येते.याची दक्षता घ्यायची आहे. त्यामुळे त्यांच्या अतिवापराचे संभाव्य दुष्परिणाम होऊ शकतात.

मानव समाजप्रिय असल्यामुळे तो नेहमी इतर व्यक्तींच्या समाजात संपर्कात राहतो. सामाजिक दृष्ट्या सक्रिय झालेले लोक निरोगी आणि दीर्घायुषी असल्याचे अनेक संशोधनात सिद्ध झाले असले तरी, समाजात वावरताना काही जीवनमूल्य शिकवणे आवश्यक आहे.

तुमच्या मुलांना ती शिकवणे आवश्यक आहे,एकमेकांसोबत संभाषण,आदर,प्रेम,प्राण्यांविषयी तसेच सभोवताली असणारा नसर्ग याची जाणीव आणि अभ्यास तसेच ओळख करून द्यावी.आपल्या काय जबाबदाऱ्या आहेत त्यासाठी आपण कसे वागले पाहिजे.योग्य आणि अयोग्य याविषयी समजावून सांगणे आवश्यक आहे.

☉मुलांचे वय विचारात घेऊन गॅजेट्स चा वापर करा

इलेक्ट्रॉनिक गॅजेट चा वापर फायद्याचा असतो तसेच त्याचे तोटे सुद्धा असतात त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्यासाठी मुलांची वय हा महत्त्वाचा घटक ठरतो मुलांचे वयानुसार त्यांना डिजिटल डिवाइस ची ओळख करून देणे आवश्यक असतो मूल शाळेत जाण्यापूर्वी त्याला ती डिवाइस देऊ नका मुलं शाळेत जाऊ लागल्यावर आणि त्याला थोडा समज आल्यावर हळू त्याला डिवाइस ची ओळख करून देणे सुद्धा सुरू करा.

वेगवेगळे गॅजेट्स,डिवाइस वापराबाबत मुलांशी चर्चा करा.आपली मुले कोणत्या डिवाइस वापर करत आहेत. यावर वेळोवेळी लक्ष ठेवा आणि त्यांच्याबरोबर वेळोवेळी बोला. मुले आणि पालक संयुक्तपणे वापरता येणारे अनेक अँड्रॉइड ॲप्लिकेशन आता उपलब्ध बसून मुलांबरोबर ती वापरल्यास एकमेकांमधील नाते दृढ होईल आणि मुली अशा दोघांमध्ये आवडणारे गेम्स डाऊनलोड करून ती खेळण्याचा आनंद घेता येतो.

स्वातंत्र्याचा आदर करा तुमच्या मुलांना स्वयंपूर्ण करण्यासाठी त्यांना स्वातंत्र्य द्या ठराविक काही गोष्टीमध्ये मुलांना स्वातंत्र्य दिल्यास त्यांच्या मनावर दडपण येत नाही .परंतु स्वातंत्र्य कोणत्या गोष्टी मध्ये द्यायचे हे आपण त्यांच्या वयानुसार ठरवली पाहिजे.

डिजिटल जगातील धोके आणि त्यापासून सावधगिरी कशी वाढवावी यासाठी त्यांना वेळोवेळी माहिती दिली पाहिजेआणि त्यांना जागृत ठेवले पाहिजे.आपल्या मुलांशी संवाद आवश्यक आई-वडील आणि मुलं यांच्यामध्ये वेळोवेळी संवाद होणे आवश्यक आहे सध्या आपण अनेक मुले हे वेगवेगळ्या प्रकारच्या गेम्स खेळताना तासनतास मोबाईल मध्ये हरवून गेलेले दिसतात,त्यामुळे मुले आणि आई वडील यांच्यातील संवाद होत नाही.

कधीकधी पालक हे नोकरीनिमित्त बाहेर जातात अशावेळी आपल्या मुलांची सोबत साधने सुद्धा आवश्यक आहे ही गोष्ट विसरू नये. तसेच आई वडील आणि मुल मुले यांच्यामध्ये खुल्या पद्धतीने संवाद होणे आणि मुलांना येणाऱ्या अडचणी सोडवणे आवश्यक आहेत.

मुलांची मनस्थिती जाणून घेणे त्यांच्या मनातील विचार त्यांना व्यक्त करायला लावू नये त्यांचा भावना घरचा वेळोवेळी जाणून घेणे आवश्‍यक असते.त्यासाठी संवाद खूप महत्त्वाचा आहे.या विषयावर लिहण्यासारखे खूप आहे वेळोवेळी नक्कीच अपडेट होत राहील यात काही शंका नाही धन्यवाद . 

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने