DIKSHA: Educational Android App, फिचर्स, शालेय विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अँड्रॉइड ॲप.

DIKSHA Educational Android App विषयी संपूर्ण माहिती.

DIKSHA।दीक्षा शैक्षणिक अ‍ॅप विषयी संपूर्ण माहिती।Complete information about Diksha Educational App
DIKSHA।दीक्षा

DIKSHA: Educational Android App Full From: 

DIKSHA चे पूर्ण नाव Digital Infrastructure For School Education.असे आहे.

DIKSHA: Educational Android App हा भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद एनसीईआरटी यांचा एक महत्त्वपूर्ण उपक्रम असून, कोविड 19 च्या साथी मध्ये अनेक शालेय विद्यार्थी व शिक्षक आणि पालक यांना दीक्षा ई-लर्निंग प्लॅटफॉर्म उपयोगी पडला आहे.

DIKSHA Educational Android App हा अँड्रॉइड ॲपच्या माध्यमातून व Diksha Web Portal ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. यापासून शालेय शिक्षणासाठी डिजिटल पायाभूत सुविधा दीक्षा या भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद यांच्या सहकार्याने हा उपक्रम सुरू आहे.

DIKSHA Educational Android App ची पार्श्वभूमी :

5 सप्टेंबर 2017 रोजी भारत भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी  दीक्षा ॲप लॉन्च केले.भारतीय सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांनी तसेच CBSE , NCRTE आणि कोट्यवधी विद्यार्थी आणि शिक्षक ,पालक यांना फायदा होतो आहे. या मध्ये कोणालाही विनामूल्य प्रवेश मिळू शकतो.यासाठी दीक्षा DIKSHA Web या पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक असते.वापरकर्त्यांना त्यांच्या प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी हे मदत करते.

DIKSHA Educational Android App चे वैशिष्ट्ये:

DIKSHA।दीक्षा या पोर्टल चा वापर  विद्यार्थी ,शिक्षक ,पालक यांना खूप महत्वाचा असून शासनाने DIKSHA।दीक्षा ॲप चा वापर करण्यासाठी सूचना निर्गमित केलेल्या आहेत.

अध्ययन अध्यापन व पालकांना त्याचा वापर करण्यासाठी व त्याविषयी प्रबोधन केले जात आहे,कारण DIKSHA। दीक्षा ॲप हे स्मार्टफोन मध्ये सहज आणि सुलभ पणे वापरता येते तसेच त्यामध्ये खालील काही महत्वाचे घटक समाविष्ट असून त्याचा विद्यार्थी ,पालक व शिक्षक आणि शाळा यांना खूप फायदा होत आहे.

DIKSHA Educational Android App चे वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.

  • DIKSHA Educational App मध्ये एकापेक्षा अधिक वेगवेगळ्या भाषा चा समावेश असून सध्या त्यामध्ये 18 पेक्षा जास्त भाषांना आणि NCERT,CBSC आणि संपूर्ण भारतातील विविध अभ्यासक्रमांवर उपयोगी आहे. 
  • DIKSHA।दीक्षा हे ओपन सोर्स टेक्नॉलॉजी सनबर्ड वर बनवलेले असून, जे मेड इन इंडिया आणि मेड फॉर इंडिया आहे. 
  • DIKSHA।दीक्षा हे इंटरनेट स्केल तंत्रज्ञानाचा समावेश यात होतो. 
  • DIKSHA।दीक्षा हे अध्ययन अध्यापन करण्यासाठी खूप महत्वाचे आहे.तसेच Online Education मधील महत्वपूर्ण असा प्लॅटफॉर्म आहे. 
  • वर्गातील संसाधने।Class Resources बाबत माहिती समावेश केलेला आहे. 
  • शिक्षक प्रशिक्षण सामग्री।Teacher training materials
  • मूल्यमापन सहाय्यक।Assessment Assistant 
  • शिक्षक प्रोफाइल।Teacher profile
  • बातम्या आणि घोषणा।News and announcements 
  • शिक्षक समुदाय।Teacher community
  • पायाभूत सुविधा।Infrastructure
  • पाठ योजना।Lesson plan and
  • शिक्षक साधनेTeacher tools 
  • स्पष्टीकरण सामग्री।Explanatory material
  • सराव आणि गृहकार्य।Practice and homework
  • प्रश्न।Questions and bank  
  • परीक्षेची तयारी।Exam preparation
  • मूल्यांकन प्रश्नमंजुषा।Evaluation Quiz
  • DIKSHA।दीक्षा ॲप मध्ये विविध बोर्ड आणि भाषांमधील विद्यार्थ्यांसाठी पुस्तके उपलब्ध आहेत.
  • DIKSHA।दीक्षा अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाणाऱ्या विषयांवर सुद्धा शिक्षकांसाठी प्रशिक्षणाचे मॉड्यूल तयार केलेले करण्यात आलेले आहे.
  • DIKSHA।दीक्षा मध्ये मानसिक आरोग्य आणि सर्वसमावेशक शिक्षण व विशेष गरजा असणार्‍या विद्यार्थ्यांसाठी विषयी माहिती समाविष्ट केलेली आहे. 

DIKSHA Educational Android App चे महत्व:

DIKSHA Educational Android App हे भारत सरकारचे शालेय शिक्षण,पायाभूत शिक्षण कार्यक्रमांसाठी विकसित केले गेले आहे. विद्यार्थी आणि शिक्षक,पालक तसेच  दिव्यांग विद्यार्थ्यासाठी सुद्धा सर्वसमावेशक शिक्षणात समर्थन देते.सध्या सुरू असलेल्या covid-19 साथीच्या आजारा दरम्यान दीक्षा ॲप चे खूप महत्त्व वाढले असून,दीक्षा ॲप्स चा वापर संपूर्ण भारतभर करण्यात येतो. 

DIKSHA Educational App वापरण्यासाठी शासनाने विविध शाळा, महाविद्यालये, यांना दीक्षा ॲप्स चा वापर करण्यास बंदी आदेश निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.सरकारने शिक्षण क्षेत्रासाठी ही विद्या लॉकडाऊन  पॅकेजमध्ये दीक्षा चा समावेश केलेला आहे. हे सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना नाविन्यपूर्ण राज्य कार्यक्रमाद्वारे घरबसल्या शिकणे आणि शिक्षणामध्ये सक्षमता आणण्यासाठी,तसेच विविध सुविधा देण्यासाठी भारतातील विविध शिक्षकांनी विद्यार्थ्यांना याचा खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होतो.

DIKSHA Educational Android App कसे वापरावे?

  • सर्वात प्रथम दीक्षा ॲप वापरण्यासाठी आपल्याकडे अँड्रॉइड मोबाईल असणे आवश्यक आहे.
  • Diksha।दीक्षा ॲप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करण्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जावे लागेल.
  • गुगल प्ले स्टोअर वर गेल्यानंतर त्या ठिकाणी सर्च बॉक्समध्ये Diksha Platform For School Education असे सर्च बॉक्स मध्ये शोधा.
  • एकदा इन्स्टॉल केल्यानंतर दीक्षा ऍप उघडा तुमची पसंतीचे भाषा निवडून कंटिन्यू वर क्लिक करा.
  • तुम्ही शिक्षक आहात की विद्यार्थी आहात किंवा  पालक आहात ते सिलेक्ट करून घ्या.
  • तुमचे बोर्ड निवडा त्यानंतर तुमचे शिकण्याचे माध्यम आणि वर्ग  यासाठी Dropdown Menu मधून योग्य ते ऑप्शन निवडा कंटिन्यू वर क्लिक करा.  
  • आता पुढे आपले राज्य आणि जिल्हा  निवडा. 
  • त्यानंतर तुम्हाला त्यातील तुमच्या अभ्यासासाठी मटेरियल उपलब्ध होईल. 
  • DIKSHA।दीक्षा वापरण्यासाठी DIKSHA।दीक्षा इ-लर्निंग पोर्टल सुद्धा वापरण्यात येते.  
  • आपल्याला आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून इन्स्टॉल करून  घ्या. 
  • DIKSHA Educational App ई-लर्निंग पोर्टलचा वापर कसा कराल ?
  • गूगल मध्ये  जाऊन सर्च बॉक्समध्ये https://diksha.gov.in/ या वेबसाईटवर क्लिक करून त्यामध्ये रजिस्टर करून तुम्ही वापरू शकता. 

DIKSHA Educational Android App Download करण्यासाठी.

Link -https://diksha.gov.in/ DIKSHA: Educational Android App तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये सहजतेने वापरू शकता. 
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने