प्रदूषण म्हणजे काय।प्रदूषणाचे प्रकार।प्रदूषण मराठी निबंध.

प्रदूषण म्हणजे काय।प्रदूषणाचे प्रकार।प्रदूषण मराठी निबंध.


प्रदूषण म्हणजे काय।प्रदूषणाचे प्रकार।प्रदूषण मराठी निबंध
प्रदूषण 


Table Of Contents :

Table Of Content(toc)

प्रदूषणाची व्याख्या:

घातक,दूषित,किंवा तत्सम पदार्थांचा होणारा निचरा,ज्यांचा मानवी क्रिया प्रक्रिया वर परिणाम होतो,त्याला प्रदूषण असे म्हणतात. 


Table Of Content

Table Of Content (toc)


प्रदूषणाचे प्रकार:

प्रदूषणाच्या प्रकाराविषयी सांगायचे झाले,तर जसे नवीन नवीन शोध व तंत्रज्ञान प्रगत होत चालले आहे,त्यामुळे प्रदूषणाच्या प्रकारात वाढ होऊ लागली आहे.सामान्यपणे जलप्रदूषण,वायूप्रदूषण,ध्वनिप्रदूषण या मुख्य प्रकारासोबत आता मृदाप्रदूषण,किरणोस्तोर्गी,इ.प्रदूषणाचा अंतर्भाव यात होऊ लागला आहे. 


जलप्रदूषण म्हणजे काय।जलप्रदूषण होण्याचे कारणे:

जलप्रदूषण म्हणजे नद्या,समुद्र,भूमिगत जलसाठे,विहिरी,तलाव,पाणवठे,इठिकाणी मानवी हस्तक्षेप वाढल्याने,घरगुती वापरतील सांडपाणी,कारखाने,औद्योगिकीकरण यामुळे पाण्यात मिसळणारे विषारी पदार्थ यामुळे पाणी सजीवांना उपयोगी राहिलेले नाही.


तसेच पाण्यात मिसणारे विषारी घटक यामुळे पाण्यातील सजीवांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.यालाच जलप्रदूषण असे म्हणतात.अधिक उत्पादन मिळावे म्हणून शेतकरी सुधा आता आपल्या पिकासाठी वेगवेगळ्या रासायनिक खते,कीटकनाशके इ.वापर करत असल्याने ते जमिनीत मिसळतात आणि तसेच पाणी यामध्ये मिसळून ते नदी,नाले,तलाव यात जलप्रदूषण वाढू लागते. 


जलप्रदूषण थांबवण्यासाठी उपाय:

जलप्रदूषण थांबवण्यासाठी सांडपाण्याची व्यवस्था तसेच बंदिस्त खड्डे,केमिकल युक्त पाणी हे नदीपात्रात न सोडता किंवा जळसाठयात न सोडता,ते निर्धोक करणे आवश्यक आहे. त्यामुळे पाण्यातील जलचर प्राणी यांचा जीवाला हानी पोहचणार नाही. 


कारखान्यातील निघणारे सांडपाण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे. पर्यटन स्थळे,व तेथील नद्या आणि जळसाठे यात कचरा न टाकता त्याठिकाणी पर्यटक यांना शिस्त लावणे,जन जागृती करणे आवश्यक आहे.


विषारी घटक असणारे पाणी सार्वजनिक नदी ,नाले,विहीर,तलाव,समुद्रात न सोडता,त्यांचे संरक्षण करणे आवश्यक आहे. या सर्व गोष्टी मुले पाण्याचे प्रदूषण थांबवता येईल. 


वायूप्रदूषण म्हणजे काय? 

हवेचे प्रदूषण होण्यासाठी सर्वात मोठे कारण म्हणजे वाढलेली वाहनांची संख्या,मोठे मोठे कारखाने,तसेच औद्यागिकीकरण यामुळे हवेत विषारी वायु मिसळले जात आहेत आणि त्यामुळे हवा प्रदूषित होत आहे.


सजीवांना जगण्यासाठी आवश्यक असणारा ऑक्सीजन हा कमी होत आहे,तसेच जंगलतोड,वाढती लोकसंख्या आणि या लोकसंख्या साठी घरे,बांधकाम ,यामुळे जंगलतोड मोठ्या प्रमाणात होत आहे.


वृक्षारोपण कमी होत असून,पावसाचे प्रमाण कमी होताना दिसते.हवेत कार्बनडायओक्साईड वाढत आहे,त्यामुळे पृथ्वीवरील तापमानात वाढ होत चालली आहे.कचरा पेटवून त्यातील विषारी घटक हवेत मिसळत आहेत,त्यामुळे वायु प्रदूषणात वाढ होताना दिसत आहे. या सर्व गोष्टी सजीव सृष्टी ला घातक आहेत.


ध्वनीप्रदूषण म्हणजे काय।ध्वनिप्रदूषणाचे कारणे:

ध्वनीप्रदूषण निर्माण होण्यासाठी वाढते वाहने,तसेच त्यांचा कर्कश आवाज,कारखाने,वाढते उद्योगधंदे,मोठे फटाके,सतत होणारे युद्ध,त्यात वापरण्यात येणारे स्फोटके,इ .यामुळे ध्वनीप्रदूषण सातत्याने वाढत चालले आहे. 


ध्वनीप्रदूषण वाढल्याने अकाली कर्णबधिरत्व येणे ,ऐकायला कमी येणे,कानाचे विविध आजार यामध्ये वाढ होताना दिसून येते,तसेच पशू ,पक्षी,व अन्य सजीव यांच्यावर परिणाम झालेला आहे.


ध्वनीप्रदूषण थांबवण्यासाठी उपाययोजना:

ध्वनीप्रदूषण हे वाढत्या वाहनाचा वापर,हॉर्न च्या आवाजाला ठराविक मर्यादा लावणे आवश्यक आहे.



तसेच अलीकडील काळात लग्न समारंभ,इतर सांस्कृतिक कार्यक्रमात वेगवेगळे मोठे स्पीकर,डी.जे.सारखे साधने वापरतात.त्यावर बंदी आणणे आवश्यक आहे. 


ध्वनीप्रदूषण वाढण्यासाठी वाढती कारखानदारी तसेच,मोठे औद्योगिक संस्था,याठिकाणी ठराविक मर्यादा लावणे आवश्यक आहे. 


मृदाप्रदूषण म्हणजे काय।मृदाप्रदूषणाचे कारणे:

मृदाप्रदूषण हे अलिकडील काळात वाढती समस्या आहे.कारण वेगवेगळे रासायनिक प्रयोग करून वेगवेगळे रसायनिक खते,कीटकनाशके यामुळे मृदा म्हणजे माती ही नापीक होऊ लागली आहे. 


वाढत्या रासायनिक खताचा अतिवापर,रासायनिक औषधे,तसेच वाढते कारखाने व त्यातील निघणारे सांडपाणी मातीत सोडले जाते,त्यमुळे मृदेमध्ये असणारे नैसर्गिक घटक नष्ट होत असून,त्याचा परिणाम पिकांच्या वाढीवर आणि उत्पन्नावर दिसून येत आहे. मृदा नापीक होत चालली आहे,यालाच मृदा प्रदूषण असे म्हणतात. 


मृदाप्रदूषणावरील उपाययोजना:

मृदाप्रदूषण होणे म्हणजे मातीची गुणवत्ता कमी होणे आणि माती नापीक होणे असे म्हणता येईल.शेतकरी वेगवेगळे औषध फवारणी करतात,तसेच वेगवेगळे रसायनिक खते पिकाला वापरतात,त्यामुळे ते सर्व जमिनीत जिरते आणि त्याचा परिणाम मातीवर होतो. 


वेगवेगळ्या रसायनिक द्रव्य असणारे पाणी,कारखान्यातील सांडपाणी जमिनीवर सोडले जाते,त्यामुळे जमिनीतील पिकाला आवश्यक असणारे गुणधर्म नष्ट होतात,पिके अशा जमिनीत जोमात येत नाहीत,पर्यायाने उत्पादन घटते आणि लोकांवर उपासमारीची वेळ येते. 


प्रदूषण मराठी निबंध:

मृदा प्रदूषण रोखण्यासाठी रसायनिक खतांचा अतिवापर टाळावा.तसेच वेगवेगळे औषधे आणि रसायनिक द्रव्ये मोकळ्या जमिनीवर सोडू नये अथवा ते निर्धोक करणे आवश्यक आहे. त्यामुळे मृदा प्रदूषण रोखता येऊ शकेल. 


प्रदूषण ही आजच्या काळातील एक गंभीर समस्या बनली आहे.वाढती लोकसंख्या व वृक्षतोडऔद्योगिक कचरा नैसर्गिक साधन संपत्तीचा अती वापर अशा अनेक कारणांमुळे प्रदूषण वाढतआहे.प्रदूषणाचे तीन मुख्य प्रकार आहेत. ते म्हणजे हवाप्रदूषण,ध्वनी प्रदूषण आणि जल प्रदूषण त्याचबरोबर मृदा प्रदूषण अनेक प्रदूषणाचे प्रकार आहेत.जगात दरवर्षी प्रदूषणामुळे अनेक लोकांचा मृत्यू होतो.


अशा प्रदूषणाचा परिणाम फक्त मानवी जीवनावर होत नाही तर आपल्या पृथ्वीवरील पशु पक्षी प्राणी कीटक जीवजंतू सूक्ष्मजीव वनस्पती प्राणी इत्यादी सर्व होतो. प्रदूषण निर्माण झाल्यामुळे नैसर्गिक सृष्टीचा ऱ्हास होत चालला आहे.


प्रदूषणातील मुख्य प्रकारांपैकी जलप्रदूषण हे कारखान्याचे रासायनिक दूषित पाणी नदीत मध्ये सोडले जाते.त्यामुळे पाणी प्रदूषित होते.हवा प्रदूषण गाड्याचा वाढता वापर व त्यातून निघणारा धूर,कारखान्यातील धूर, प्लास्टिक वापर झाल्यामुळे,कारखानदारी व वाढते उद्योग यामुळे हवेचे प्रदूषण होते.


मोठा आवाज म्हणजे ध्वनिप्रदूषण गाड्यांचा मोठा आवाज,कारखान्यातील यंत्रांचा आवाज,गाड्यांचे हॉर्न या सर्वांमुळे ध्वनिप्रदूषण होते.प्लास्टिक आपल्या शरीरासाठी घातक आणि प्रदूषण निर्माण करणारा महत्त्वाचा घटक आहे.


या प्रदूषणामुळे रक्तदाब वाढतो,डोकेदुखी सुरू होते,पोटाचे विकार होऊ शकतात,अलीकडच्या वर्षात प्रदूषणाचा दर अगदी वेगाने वाढत आहे,लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे.


लोकांच्या स्थलांतराची वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत आहे.औद्योगिकरणाचे प्रमाण वाढले आहे.त्यातून तयार होणारा कचरा सरळ माती पाणी व हवेत मिसळला जातो.


मनुष्या पृथ्वीवरील एक अविभाज्य घटक झालेला आहे.त्यामुळे निसर्गाचा समतोल राखणे मानवाच्या हातात आहे, निसर्गाचे सौंदर्य टिकून ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करणे गरजेचे आहे.


आजच्या काळात सरकारने प्रदूषण मुक्ती चे अनेक नियम राबवले आहेत.प्लास्टिक बंदी,ओला कचरा, सुका कचरा वेगळा करून टाकायला हवा.अशा नियमाचे पालन आपण प्रामाणिकपणे करणे गरजेचे आहे.


आपली नैसर्गिक सृष्टी प्रदूषणमुक्त होण्यासाठी आपण प्रयत्न करणे गरजेचे आहे.नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर प्रमाणात करणे आवश्यक आहे.प्रवासासाठी खाजगी वाहनाने अतिरिक्त सार्वजनिक वाहनाचा वापर करणे आवश्यक आहे.


असे अनेक उपाय करून आपला निसर्ग आपणच वाचवला पाहिजे तरच पृथ्वीवरील येणारी पुढची पिढी स्वच्छ आणि निरोगी वातावरणात वावरू शकेल आणि आरोग्यदायी जीवन जगू शकेल.


वाचा: 

ताज्या बातम्या..

करिअर संधी..

पदभरती..

शैक्षणिक बातम्या..

सरकारी योजना..

शासन निर्णय..


नवीन नवीन पोस्ट्स मिळवण्यासाठी आमचा What's app group join करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने