गणेशोत्सव: महत्व, पूजा, विसर्जन.

गणेश चतुर्थी ची माहिती मराठी।गणेशोत्सव माहिती मराठी.

गणेश चतुर्थी ची माहिती मराठी।गणेशोत्सव माहिती मराठी

Table Of Content :

Table Of Content (toc)


वक्रतुंड महाकाय 
सूर्य कोटी समप्रभ:
निर्वीघ्नम कुरुमे देव 
सर्व कार्येषु सर्वदा। 


कोणतेही काम सुरु करताना आपण गणेश या देवतेचे पूजन करूनच  सुरुवात करत असतो.म्हणून गणेश मनाची देवता समजली जाते.गणेश म्हणजे जो गणांचा पती म्हणजे मालक (स्वामी) आहे त्याला गणपती म्हणतात.एकूण आपण तीन गण मानतो देवगण, मनुष्यगण ,राक्षसगण या तीनही गणांचा ईश म्हणजे गणेश होय. गणपतीला अनेक नावे आहेत जसे गजानन,वक्रतुंड,गणपती,गणेश,विनायक,मंगलमूर्ती,विघ्नहर्ता,एकदंत इत्यादि. 


गणेशोत्सव महत्व:

गणरायाचे आगमन भाद्रपद शुध्द चतुर्थीस म्हणजे इंग्रजी कालगणनेप्रमाणे ऑगस्ट,सप्टेंबर या कालावधीमध्ये ते घराघरात गणपतीची लहान मूर्ती आणली जाते आणि दहा दिवस मोठे भक्तिभावाने त्याचे पूजन केले जाते.गणेशोत्सव हा हिंदू धर्मीयांचा एक सार्वजनिक सण आहे.हिंदू धर्मात गणपतीला फार महत्त्वाचे स्थान आहे.सर्व प्रकार च्या कामाच्या अगोदर सर्वप्रथम गणपतीचे पूजन केले जाते.शिव-पार्वतीचा पुत्र गणपती हे विद्येचे दैवत मानले जाते. 


गणेश चतुर्थी हिंदू धर्माचा एक महत्त्वपूर्ण सण आहे.या सणाला विनायक चतुर्थी असेही म्हणतात.संपूर्ण भारत देशात गणेश चतुर्थी आनंदात व उत्साहात साजरी केली जाते.दरवर्षी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण या या सणाची आतुरतेने वाट बघत असतात.गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्थी पर्यंत सुमारे अकरा दिवस हा सण साजरा केला जातो.घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळांमध्ये गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली जाते.


गणेशोत्सव हा सण अकरा दिवस चालणारा सण आहे.अकरा दिवस श्री गणेशाची पूजाअर्चा केली जाते.सार्वजनिक मंडळामार्फत विविध कार्यक्रम व स्पर्धेचे आयोजन केले जाते घरोघरी मंगलमय वातावरण असते घरोघरी नवीन नवीन पदार्थ बनवले जातात सकाळ संध्याकाळ गणपतीची आरती केली जाते.


आरतीला नातेवाईक शेजारी मित्रमंडळी बोलावले जातात हसत खेळत हे दहा दिवस निघून जातात आणि शेवटी तो दिवस येतो तो म्हणजे अनंत चतुर्दशी चा या दिवशी गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत सगळे बाप्पा ला निरोप देतात.


गणेश चतुर्थीचा म्हणजेच गणेशोत्सव हा 1892 साली लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक स्वरूपात साजरा करायला सुरुवात केली.लोकांनी एकत्र यावे आणि एकोप्याने आनंदाने साजरा करावा हा त्यामागचा हेतू होता.घराघरांमध्ये गणपतीची सुंदर आरास केली जाते.त्याचबरोबर सार्वजनिक मंडळे हे आकर्षक देखावे वापरतात. गणपती बसल्यानंतर पाच दिवसांनी गौरीचे आगमन होते.


गौरीच्या दिवशी सर्व स्रीया हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात.गणेशोत्सवाच्या अकरा दिवसांमध्ये वेगवेगळ्या गावात तसेच मंडळांमार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.गौरी गणपतीची आरास करून त्यांना सजवून तसेच वेगवेगळे गोध धोड पदार्थ बनवून आरास केली जाते.


गणेशोत्सव साजरा करताना ऐतिहासिक,पौराणिक,सामाजिक,पोवाडे,लोकगीते असे विविध कार्यक्रम केले जातात.अकरा दिवस रोज सकाळ संध्याकाळ गणपतीची आरती केली जाते.गणपतीला वेगवेगळ्या पदार्थाचा नैवेद्य दाखवला जातो.अशा प्रकारे गणपती दिवसात सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते.


अनंत चतुर्थी।गणपती विसर्जन.

आकारव्या दिवशी अनंत चतुर्थी असते,म्हणजे या दिवशी गणपती बप्पाला निरोप देण्याचा दिवस असतो.काही लोक दिवसांनी पाच दिवसांनी तर, काही सात किंवा काही अकरा दिवसांनंतर गणपतीचे विसर्जन केले जाते.ज्या दिवशी गणपतीचे विसर्जन केले जाते त्या दिवसाला अनंत चतुर्थी म्हणतात.या दिवशी सार्वजनिक गणपतीचे विसर्जन करताना  मिरवणूक काढून वाजत गाजत गणपतीचे विसर्जन केले जाते.


पूर्वी गणपती बाप्पाच्या शाडूच्या मातीपासून गणपतीच्या मूर्ती बनवल्या जात होत्या. पण आजच्या काळात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनविल्या जातात.पण या मूर्ति पाण्यात विरघळत नसल्यामुळे तसेच मूर्तीचे रंग पाण्यात मिसळल्यामुळे पाणी प्रदूषण होत आहे.त्यामुळे शाडूच्या मूर्ती वापरण्यासाठी आपण प्रोत्साहन दिले पाहिजे आणि आपण व प्रदूषण मुक्त वातावरणात गणेशोत्सव साजरा केला पाहिजे. 

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने