शिक्षण आणि संस्कार मराठी निबंध.
शिक्षण आणि संस्कार दोन्ही मानवी जीवनातील अत्यावश्यक गोष्टी आहेत.संस्कार जिवणाची पायाभरणी मजबूत करतात व शिक्षणामुळे मानवी जीवनाची उत्तुंग इमारती उभी राहणे शक्य होते.जीवनाची गाडी सार्थकतेच्या दिशेने जायचे असेल तर तिला शिक्षण आणि संस्कार दोन्ही मानवी जीवनात अत्यावश्यक गोष्टी आहेत.
शिक्षण आणि संस्कार.
शिक्षण या शब्दाचा व्यापक अर्थाकडे पाहून विचार केला तर शिक्षणातून संस्कार होतात असा भास होतो व संस्कारातून शिक्षण होत असल्याची जाणीव होते."विद्या फुकाची आहे." या एकाच वाक्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण व संस्कार या दोन गोष्टी तील अद्वितीय संबंध स्पष्ट केलेला आहे.जिजाऊंनी शिवबाला रामायण-महाभारताच्या चे धडे शिकवले शिक्षणाबरोबरच देशप्रेमाचा संस्कार केला.
कर्मवीरांनी अनेक मुलांना शिक्षण दिले परंतु शिक्षणाबरोबरच स्वदेश स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद असा सर्व प्रतिष्ठेचे संस्कारही दिला. शाहूंनी शिक्षणासोबतच कला संस्कृतीचा वसा कोल्हापूरच्या मातीला बहाल केला.
मुलांची पहिली गुरु ही माता असते. मुलांच्या हाताला धरून त्याला चालायला शिकवणारी मातेने आपल्या मुलाला जीवनाच्या मार्गावरून चालताना उपयोगी पडतील अशी संस्कार दिले पाहिजेत.
शालेय शिक्षणातून माणसाच्या जीवनाला आकार यावा अशा सार्थ पेक्षा आहे आणि म्हणूनच शालेय शिक्षणात विद्यार्थ्यांमध्ये संस्कार होणे अभिप्रेत आहे.शाळेच्या परिपाठात उन्सद विचारांनी सदाचाराचा संस्कार होतो.इतिहासाच्या पानापानातून राष्ट्रभक्तीची संस्कार होतो.
भाषा विषयातून अभिव्यक्तीचा आणि गणितातून व्यवहारी वृत्ती संस्कार होतो.म्हणून शिक्षकांनी शिक्षणाच्या प्रवाहाबरोबर विद्यार्थ्यांना संस्काराची व शालेय शिक्षणाबरोबरच मानवी जीवनाशी संबंधित मानवी मूल्ये समाजातील अनेक गोष्टी मानवी मनावर परिणाम करत असतात.
उच्चशिक्षित तरुण आज समाजामध्ये विघातक कृत्य करताना दिसतात.बेकरी वाढत चालली आहे.तरुण वर्ग खूप मोठा असून त्यांच्या हाताला काम मिळणे आवश्यक आहे. म्हणून व्यावहारिक शिक्षणाला संस्काराची जोड देणे गरजेचे आहे.तसेच झाल्यास शिक्षणाचा मूळ उद्देश सार्थ ठरेल व मानवी जीवन सफल होईल.
नवीन नवीन पोस्ट्स मिळवण्यासाठी आमचा What's app group join करा.