संत गाडगेबाबा: जीवन परिचय, कार्य, अनमोल विचार.

संत गाडगेबाबा यांचे जीवनचरित्र.

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संत गाडगेबाबा हे एक थोर संत होते व समाज सुधारक होते.आपल्याला अनेक थोर संत लाभलेले आहेत त्यातलेच एक महान संत म्हणजे संत गाडगे महाराज होय.

संत गाडगेबाबा माहिती मराठी

संत गाडगेबाबा यांचा जीवन परिचय:

संत गाडगे महाराज यांचे मूळ नाव डेबूजी होते,परंतु सर्वजण त्यांना गाडगेबाबा म्हणत.संत गाडगेबाबा यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे झाला होता.त्यांच्या वडिलांचे नाव झिंगराजी आणि आईचे नाव सखुबाई होते गाडगे बाबांचा जन्म अत्यंत गरीब कुटुंबांमध्ये झाला होता.

त्यामुळे त्यांना लहानपणापासूनच गरीबाची जाणीव होती.त्यांच्या वडिलांच्या अकाली मृत्यूमुळे ते आपल्या आई सोबत मामाकडे राहत होते.तेथे ते शेतात फार कष्ट करायचे,ते शेतातील सर्व कामे गुराढोरांना सांभाळणे हे सर्व अगदी प्रामाणिकपणे नीटनेटके करत असत.त्यानंतर त्यांचा विवाह झाला.

त्यांना मुले झाली परंतु आजूबाजूची अस्वच्छता,अंधश्रद्धा,व्यसनाधीनता,गरिबी या सगळ्या गोष्टी पाहून त्यांच्या मनाला प्रचंड वेदना होत आणि त्यानंतर एके दिवशी त्यांनी गृहत्याग केला.

संत गाडगेबाबा यांचे कार्य:

संत गाडगेबाबा यांचे कार्य खूप महान होते. संत गाडगे महाराज यांनी काही वर्षे अज्ञातवासात राहिले.त्यांनी गावोगावी फिरून गावे स्वच्छ करायला सुरुवात केली.ते स्वतः निरक्षर असले तरीही त्यांनी शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेतले होते.ते एक महान आणि बुद्धिजीवी व्यक्ती होते.त्यांचे एकमेव ध्येय म्हणजे लोकसेवा होते.त्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य सामाजिक प्रबोधनासाठी खर्च केले.

संत गाडगेबाबा आपल्या अंगावर नेहमी फाटकी गोधडी घेत असत. त्यांच्याजवळ नेहमी झाडू आणि हातामध्ये एक गाडगे असे, म्हणून लोक त्यांना गाडगे बाबा म्हणत असत.विशेष म्हणजे डोक्यावर खापराच्या तुकड्याची टोपी,एका कानामध्ये कवडी तर दुसऱ्या कानामध्ये फुटके बांगडीची काच, एका हातात झाडू तर दुसऱ्या हातामध्ये फुटके गाडगे आणि अंगावरची गोधडी पाहून लोक त्यांना गाडगे बाबच म्हणायचे.

त्याची कीर्तन ऐकताना मात्र कोणत्याही प्रकारच औपचारिक शिक्षण न घेता,एखाद्या अतिशय उच्च शिक्षण घेतलेल्या व्यक्तीलाही लाजवेल असं तत्वज्ञान त्यांच्या कीर्तनातून मांडायचे.

लहानपणापासूनच कष्टाचे अतिशय आवड असल्यामुळे त्यांना स्वच्छता करताना पाहून इतर लोक जागे व्हायचे आणि मग तेही गाडगेबाबा सोबत स्वच्छता करत आणि बघता बघता संपूर्ण गाव अगदी लख्ख होऊन जायचा.ते गावोगावी जाऊन भजन ,कीर्तन, प्रवचन करून शिक्षणाचे महत्त्व लोकांना पटवून देत असत.

दिवसभर झाडूने गाव स्वच्छ करत आणि संध्याकाळी त्याच गावांमध्ये कीर्तन करत असत.देव हा दगडात नसून माणसात असतो.त्यामुळे आपण माणूस घडवणे हे आपले एकमेव ध्येय असावे.त्यासाठी शिक्षणाची साथ द्यावी.असे त्यांचे मत होते. तहानलेल्यांना पाणी,भुकेलेल्यांना अन्न, गरजूंना मदत,निरक्षरांना शिक्षण देण्यातच खरी देवाची सेवा आहे असे ते आपल्या प्रवचनातून लोकांना सांगत असत.

संत गाडगेबाबा यांच्या कीर्तनातील त्यांचे उपदेश सर्वसामान्यांना उपयुक्त ठरतील असेच होते.माणसाने स्वच्छता राखावी, चोरी करू नये ,दारू पिऊ नये असे उपदेश ते आपल्या कीर्तनातून लोकांना करत असत.महाराष्ट्रातील अनेक धर्म स्थळांच्या ठिकाणी यात्रेकरूंची हाल होत म्हणून त्यांनी त्यांच्या सोयीसाठी धर्मशाळा बांधल्या.

अनाथ अपंगांसाठी त्यांनी अनेक वेगवेगळ्या प्रकारे कार्य केले,देवाच्या नावावर होणारे पशुबळी थांबवले. शिक्षण प्रसार व म्हणून खूप शिक्षण संस्थांना त्यांनी मदत केली.संत गाडगेबाबा म्हणजे एक लोक जागृती साधणारे होते.

संत गाडगेबाबा त्यांनी अनेक सामाजिक संस्थांची स्थापना केली.यात्रेकरूंसाठी धर्मशाळा,मोठे मोठे दवाखाने तसेच गोशाळा बांधल्या. त्यांनी स्थापन केलेले "गाडगे महाराज मिशन" आजही समाजसेवेत आहे.आधुनिक भारताला अभिमान वाटावा असे संत गाडगे बाबा चरित्र आहे. 

आयुष्यभर लोकजागृती व लोकसेवेचे कार्य त्यांनी केले,आजही अनेक सामाजिक संस्था त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेत आहेत. संत गाडगेबाबा या महान आणि थोर समाजसुधारक व महान संत यांचे अमरावतीजवळ 20 डिसेंबर 1956 ला त्यांचे निधन झाले. 

संत गाडगेबाबा यांचे अनमोल विचार. 

अडाणी राहू नका,मुलाबाळांना शिकवा. 
आईवडिलांची सेवा करा. 
जो वेळेवर जय मिळवतो तो जगावर जय मिळवतो. 
दगडाधोंड्याची पूजा करण्यात वेळ आणि शक्ति वाया घालवू नका. 
दान घेण्यासाठी हात पासरू नका दान देण्यासाठी हात पसरवा. 
दुखाचे डोंगर चढल्याशिवाय सुखाचे किरण दिसत नाहीत. 
देवा धर्माच्या नावाखाली मुक्या प्राण्यांचा बळी देऊ नका. 
शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे. 
हुंडा देऊन किंवा घेऊन लग्न करू नका. 

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने