मकर संक्रांती मराठी माहिती।मकर संक्रांती निबंध मराठी.

मकर संक्रांती मराठी माहिती.

हिंदू धर्मात प्रत्येक सणाला वेगवेगळ्या प्रकारे महत्व असून प्रत्येक सणाचे विशिष्ट वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळते. हिंदू संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासून मकर संक्रांती हा सण साजरा होतो. 

मकर संक्रांती मराठी माहिती
मकर संक्रांती

मकर संक्रांती हा सण दरवर्षी 14 जानेवारी किंवा 15 जानेवारीला येत असतो. सूर्यदेवाला तीळ वाहून सूर्याची पूजा केली जाते. मकर संक्रांती या सणाविषयी आपण काही ठराविक मुद्द्याच्या आधारे माहिती घेऊया.

मकर संक्रांती महत्त्व मराठी माहिती.

मकर संक्रांतीच्या Makar Sankranti सण हा जानेवारी महिन्याच्या 14 किंवा 15 तारखेला येणारा सन आहे. या दिवशी सूर्य,धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो.एका राशी पासून दुसऱ्या राशी पर्यंत सूर्याचे संक्रमण संक्रांती असे म्हणतात एका संक्रांतीपासून दुसऱ्या संक्रांती च्या दरम्यान काळाला सौर महिना म्हणतात जर एकूण बारा सूर्य संक्रांती आहेत.

परंतु त्यापैकी मेष कर्क तुला आणि मकर संक्रांती ह्या मुख्य आहेत म्हणजेच मकर संक्रांती सणाची थेट पृथ्वीच्या भूगोल आणि सूर्याच्या स्थानाची संबंध आहे जेव्हा जेव्हा सूर्य मकर राशीचा उष्णदेशीय उलट तो तसा दिवस 14 किंवा 15 तारखेचा असतो आणि लोक हा मकर संक्रांतीचा उत्साह म्हणून साजरा करतात.आणि यापुढे सूर्याचे उत्तरायणात हालचाल सुरू होते.

मकर संक्रांतीच्या दिवशी शुद्ध तूप आणि शाल यांचे धान केल्यास मोक्ष प्राप्ती होते.महाभारत काळात सुद्धा भीष्मपितामह यांनी आपला देह त्याग करण्यासाठी या दिवसाची निवड केली होती.गीतेत सांगितले आहे की जो माणूस उत्तरायणात शुक्लपक्ष देहत्याग करतो त्याला मुक्ती मिळते.

Join : Whats App Channel

मकर संक्रांतीपासून सूर्य उतरणार आणि उत्तरायण मध्ये प्रवेश करतो.म्हणून हा दिवस लोक आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात.मकर संक्रांतीच्या दिवशी लहान मुले पतंग उडवतात आणि आनंद व्यक्त करतात.परंतु मला वाटते की पंतंग आकाशात उडवल्याने अनेक पक्षी मृत्यूमुखी पडतात म्हणून आपण या दिवशी पतंग न उडवता सण साजरा करावा. 

मकर संक्रात शास्त्रीय कारण.

मकर संक्रांतीचे शास्त्रीय कारण म्हणजे सूर्य उत्तरायण झाल्याने हवामानात वेगवेगळे बदल व्हायला सुरुवात होते. थंडीने गारठलेल्या लोकांना सूर्यदेवाच्या उत्तरायण झाल्याने थंडी कमी होण्यासाठी मदत होते. भारतासारख्या देशामध्ये सण उत्सवाचे सर्व मुहूर्त शेतीवर अवलंबून असतात कारण भारत देशांमध्ये शेती हा प्रमुख व्यवसाय असून मकर संक्रांतीच्या काळात शेतकऱ्याचे शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारे धनधान्य पिकलेली असते. त्यामुळे शेतकरी सुखी झालेला असतो.

मकर संक्रांतीच्या पूजेसाठी लागणारे साहित्य मराठी माहिती.

मकर संक्रांतीच्या पूजा करण्यासाठी जेव्हा विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये सर्व महिला एकत्र जमतात.त्या पूजेसाठी मातीचे छोटे  खन,(कुंभारकडून आणलेले मातीचे भांडे) गव्हाच्या ओंब्या,ऊसाचे छोटे छोटे तुकडे,बोर,ज्वारीचे कणीस ,भुईमूग शेंगा तसेच हळदीकुंकू, अगरबत्ती, तीळ गुळ इत्यादी साहित्य ताटात भरून ते मंदिराच्या ठिकाणी सर्व महिलांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वाण वाटून एकमेकींना शुभेच्छा देतात. 

महाराष्ट्र मध्ये विवाहित महिलांसाठी हा सण खूप महत्त्वाचा समजला जातो.या दिवशी विवाहित महिला पूजा पूर्ण होईपर्यंत उपवास करतात. रथसप्तमीपर्यंत वेगवेगळे प्रकारचे वानांची वाटप एकमेकींना करतात.

मकर संक्रांतीची पूजा मराठी माहिती.

महाराष्ट्रात मकर संक्रांतीच्या सणाला महिलांचा सण म्हणून खास ओळख आहे.मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यासाठी महिलांची आठ दिवस अगोदरच तयारी सुरू होते.सर्वप्रथम पूजा सुरू करण्यापूर्वी म्हणजे संक्रांतीचा अगोदर दोन तीन दिवस ब्राम्हणाला सार्वजनिक ठिकाणी म्हणजे मंदिर ,किंवा ज्या ठिकाणी गावातील महिला मंडळी एकत्र जमा होता येईल अशा ठिकाणी ब्राम्हणाला बोलावले जाते.

ब्राम्हण सर्व महिलांना मकर संक्रांत सांगतो.म्हणजेच मकर संक्रांत ची पूजा करण्याची वेळ व मुहूर्त पंचांग पाहून सांगतो.असे सांगीतले जाते की सर्व विवाहित महिलांनी मकर संक्रांत ऐकावी म्हणून सर्व महिला एकत्र जमून ब्राह्मण सांगण त्या ठिकाणी त्या वेळेत पूजा करण्याबाबत माहिती घेतात.मकर संक्रांत सांगायला आलेल्या ब्राह्मणाला गूळ,धान्य तसेच पैशाच्या स्वरूपात दान केले जाते.

ब्राह्मण सर्व महिलांना एकत्रित मकर संक्रांत सांगून पूजा कशी करायची? संक्रांतीच्या दिवशी कपडे कोणत्या रंगाचे परिधान करायचे? याबाबत मार्गदर्शन करतो.पुण्यकाल मुहूर्त आणि महापुण्य काल मुहूर्त जाणून घ्यावा लागतो.हे जाणून घेण्यासाठी ब्राह्मण ठराविक ठिकाणी वाड्या-वस्त्या तसेच शहरात एखाद्या मंदिराच्या ठिकाणी हे मुहूर्त सांगत असतात.

मकर संक्रांती ला तिळाचे महत्व मराठी माहिती.

मकर संक्रांती तिळाला खूप महत्त्व आणि मागणी असते.कारण मकर संक्रांती चा सण थंडीत मध्ये येत असतो आणि या थंड वातावरणापासून शरीराचे रक्षण व्हावे वेगवेगळ्या आजारापासून मुक्ती मिळावी यासाठी तसेच शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी आहारात तिळगुळ वापरले जातात.

तीळ हा आरोग्य सही आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त पदार्थ असून काळे तीळ आणि पांढरे तीळ असे दोन प्रकार असतात.ते उष्ण असल्याने शरीरामध्ये उष्णता प्राप्त करून देतात.त्यामुळे थंडीमध्ये तीळ खाण्याला जास्त प्राधान्य दिले जाते.

मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशीपासून स्वयंपाकामध्ये तेलाचा वापर केला जातो.तसेच आंघोळीच्या पाण्यात तिळ टाकून आंघोळ केली जाते मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याला तीळ वाहिले जातात आणि सूर्याची पूजा केली जाते.कारण तीळ शरीराला उष्णता निर्माण करून थंडीपासून शरीराचे रक्षण होण्यास मदत करतात.

तसेच आहारामध्ये त्यांचा वापर केल्याने शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते. या दिवशी सर्व महिला एकत्र जमून हळदी कुंकू चा कार्यक्रम करतात. त्यामुळे मकरसंक्रांतीला  तिळाचे खूप महत्त्व आहे.

Join : Whats App Channel

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने