Savitribai Phule//सावित्रीबाई फुले यांचा जीवन परिचय.
सावित्रीबाई फुले माहिती |
सावित्रीबाई फुले निबंध मराठी।सावित्रीबाई फुले यांची ओळख.
सावित्रीबाई फुले (सावित्रीबाई फुले Information In Marathi) या पहिल्या महाराष्ट्रातील,शिक्षिका,मुख्याध्यापिका,महिला समाजसुधारक,कवयित्री,शिक्षणासाठी झटणार्या पाहिल्या महिला होत्या.आशिया खंडात "पहिली मुलींची शाळा" Savitribai Phule।सावित्रीबाई फुले यांनी सुरू केली होती. महाराष्ट्रात स्रियांच्या शिक्षणासाठी त्यांनी खूप मोठे कार्य केलेले आहे.त्या भारतातील "पहिल्या मुख्याध्यापिका" होत्या.त्यांनी विधवांना होणारा त्रास संपुष्टात आणला.
- नाव :सावित्रीबाई फुले
- जन्म :3 जानेवारी 1831 नायगांव, जिल्हा.सातारा.
- कार्य : भारतातील पहिली महिला शिक्षिका कवयित्री,मुख्याध्यापिका, महिलांसाठी विविध कार्य
- मृत्यू :10 मार्च 1897
- वडील : खंडोजी नेवसे पाटील
- आई : लक्ष्मीबाई
Savitribai Phule//सावित्रीबाई फुले या एक शिक्षणप्रसारक होत्या.महिला समाजसुधारक म्हणून त्यांनी महाराष्ट्रात खूप महत्वपूर्ण कामगिरी केलेली असून त्यांना त्यांचे पती ज्योतीराव फुले यांनी खूप सहकार्य केले. सावित्रीबाई चा विवाह ज्योतीराव फुले यांच्याशी अवघ्या 9 व्या वर्षी झाला.
ज्योतीरावांचे वय त्यावेळी 13 वर्षाचे होते. म्हणजे त्यांचा बालविवाह झालेला होता.सावित्रीबाईंचे सासरे हे गोविंदराव फुले होते.पुण्यात पेशव्यांकडून फुलबागेची जमीन त्यांना भेटली आणि ते तिथेच फुलांचा व्यवसाय करू लागले आणी त्यावरून त्यांचे नाव फुले पडले.
ज्योतीराव यांना लहानपणी आईचे प्रेम मिळाले नाही. यांचा सांभाळ त्यांची मावस बहीन सगुणाआऊ यांनीच त्यांचा सांभाळ केला. त्या इंग्रज अधिकारी यांच्या मुलाच्या दाई म्हणून काम करायच्या.
त्यामुळे त्यांना इंग्रजी भाषा बोलता यायची.त्यांनी आपल्या ज्ञांनाचा उपयोग ज्योतीराव यांना प्रेरणा देण्यासाठी केला. ज्योतीराव हुशार होते शिक्षणाची त्यांना आवड होती.विवाहानंतर सावित्रीबाईंनी आपल्याला ख्रिष्ती मिशनार्यांकडून मिळालेले पुस्तक सासरीघेऊन आल्या.
ज्योतीराव यांनी स्वत शिकून सावित्रीबाईना शिकवले.कारण त्यावेळी भारतात खूप शिक्षण ही दुर्मिळ गोष्ट होती.शिक्षणासाठी किंवा लिहण्यावाचण्यासाठी कोणत्याही सुविधा नव्हत्या. एखाद्या विषयाचे वचन करायचे झाल्यास गावातील लिहता वाचता येणार्या माणसांचा शोध घ्यावा लागत असे.
अशा परिस्थिति असताना ज्योतिराव फुले यांच्याशी सावित्रीबाई चा विवाह झाला.त्यावेळी ज्योतिराव फुले यांनी सावित्रीबाई फुले यांना घरी लिहायला वाचायला शिकवले व त्या साक्षर केले. म्हणून एक स्री शिकली तर काय होते याची जाणीव Savitribai Phule//सावित्रीबाई फुले यांना होती.
Savitribai Phule//सावित्रीबाई फुले यांचे कार्य:
सावित्रीबाईंचे शिक्षित व्हावे एक स्रि शिकली तर सर्व कुटुंब शिकते,अशी त्यांची भावना होती.म्हणून त्यांनी स्रि शिक्षणाचे महत्व लक्षात घेऊन त्यासाठी कार्य हाती घेतले. ज्योतीराव फुले यांनी सावित्रीबईला सहकार्य केले.
सावित्रीबाई फुले यांनी देशात स्री शिक्षणाचा पाया रचला होता.स्री पुरुषाचे भेदभाव त्यांना मान्य नव्हते.त्यावेळी सती प्रथा,बालविवाह,अनिष्ट प्रथा,अज्ञान,कर्मकांड,जातीभेद,संपूर्ण देशभर पसरलेले होते.ज्योतिराव फुले हे सामाजिक कार्य करत असताना त्यांना त्यांच्या कामात मदत करत होत्या.त्यांना पाठिंबा देत होत्या.ज्योतिराव फुले यांच्या सामाजिक कार्यात सावित्रीबाई फुले यांचा मोलाचा वाटा आहे.
हिंदू धर्मात स्री ला फक्त चूल आणि मूल एवढेच काम असायचे त्यांच्यावर खूप बंधने असायचे.समाजात कुठीही नैतिकता राहिली नव्हती.सतीची चाल प्रचलित होती.मग सावित्रीबाई फुले यांनी स्री वर होणारे अन्याय व अत्याचार कसे दूर करता येतील यासाठी काम करायला सूरवात केली.महिलांमध्ये साक्षरता निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
पहिली मुलींची शाळा.
इ.स. 1848 साली पुण्यात पहिली मुलींची शाळा सावित्रीबाई फुले यांनी सुरू केली.ज्योतिराव फुले यांनी त्यांना खूप सहकार्य केले.सावित्रीबाईंना खूप संघर्ष करावा लागला.याठिकाणी प्रथम सुरू केलेल्या शाळेत 9 मुलींचा प्रवेश करण्यात आला.सावित्रीबाई फुले यांनी मुख्याध्यापक म्हणून काम पाहिले.
Savitribai Phule//सावित्रीबाई फुले पहिल्या स्री शिक्षिका म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.पुढे शाळेत मुलींची संख्या वाढत राहिली.सावित्रीबाई फुले यांना समाजाकडून खूप त्रास सहन करावा लागला.शाळेत निघाल्यावर त्यांना शेण, माती,दगड,फेकून मारण्यात आला.परंतु त्या आपल्या ध्येय पासून विचलित झाल्या नाहीत.त्यांच्या मध्ये आत्मविश्वास असल्याने त्यांनी अनेक कठीण कठीण प्रसंगांचा सामना केला व महिलांच्या शिक्षणाची ज्योत पेटवत ठेवली.
आपले पती "ज्योतिबा फुले" यांच्या मदतीने कुणाचेही कुठल्याही प्रकारचे मदत किंवा आर्थिक साहाय्य न घेता 1 जानेवारी 1848 पासून 15 मार्च 1852 पर्यंत मुलींच्या शिक्षणाकरिता त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी 18 शाळा सुरू केल्या. 1849 ला पुणे येथे उस्मान शेख या मुस्लिम बांधवांच्या घरी मुस्लिम महिलांना आणि लहान मुलांना शिक्षित करण्याच्या उद्देशाने त्यांनी शाळा सुरू केली.
इ.स. 6 नोव्हेंबर 1852 मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांचे कार्याचा सन्मान व गौरव केला.केवळ शिक्षणासाठी च नाही तर समाजातील विविध चालीरीती प्रथा बंद केल्या.बालकांच्या हत्या थांबवल्या.वेगवेगळ्या आश्रम तयार केले.दलीत आणि समाज यातील दरी नष्ट करण्यासाठी ,भेदभाव नष्ट विशेष कामगिरी केली.
सावित्रीबाई फुले यांनी "काव्यफुले","ज्योतिबा ची भाषणे","बावन्नकशी","सुबोध रत्नाकर" इत्यादी ग्रंथ कविता लिहिलेले आहेत. Savitribai Phule//सावित्रीबाई फुलेएक लेखिका व कवयित्री होत्या जोतीरावांच्या परभणीतून त्यांनी आपल्या कार्याची वाटचाल सुरु ठेवली. इ.स.1896 मध्ये दुष्काळ पडला व पुण्यात प्लेग सारखी भयानक साथ पसरली त्यावेळी त्यांनी रुग्ण सेवा दिली.
सावित्रीबाई फुलेंनी दीन दुबळ्यांना,शेतमजुरांना,अनाथांना,विधवांना आधार दिला.उपेक्षितांच्या जीवनात नवीन चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला.तसेच "बालविवाह" विरुद्ध आवाज उठवून "बालहत्या" ला प्रतिबंध करून त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आश्रम सुरु केले.
महात्मा फुले यांच्या निधनानंतर त्यांनी "सत्यशोधक समाज" ची धुरा समर्थपणे सांभाळली हळदीकुंकू,चहापान असे विविध कार्यक्रम घेऊन स्रियांना एकत्रित करून त्यांना मार्गदर्शन केले. "महाराष्ट्रातील स्त्री मुक्ती आंदोलन"ची पहिली अग्रणी म्हणून सावित्रीबाईचा गौरव केला जातो" .
Savitribai Phule//सावित्रीबाई फुले यांचे निधन.
इ.स.1897 मध्ये पुण्यामध्ये प्लेगची साथ पसरली. या साथीमध्ये सावित्रीबाई फुले यांनी रुग्णांची सेवा करत असताना त्यांना प्लेगच्या साथीने ग्रासले, शेवटी 10 मार्च 1897 रोजी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे निधन झाले.
Savitribai Phule//सावित्रीबाई फुले यांची क्रांतीज्योती अजूनही सुरू आहे,आणि यापुढे अशीच राहील.भारतीय महिलांसाठी त्यांचे कार्य खूपच प्रेरणादायी असून आज आपण पाहत आहोत त्यांनी तयार केलेली शिक्षण सेवा महिलाना जगण्याचा आधार,मान ,समाजातील सन्मान मिळवून देणाराच नाही तर जगाला दिशा दाखवणारा ठरला आहे.
भारतीय स्रियांचा प्रगतीचा आढावा घेतला तर जगातील सर्व क्षेत्रात स्रिया आघाडीवर असून त्यांना समाजात मान सन्मान मिळवत आहेत. त्यांनी दिलेले विचार आणि शिक्षण यांचा सन्मान करून यापुढेही असेच त्यांच्या विचारांची ज्योत तेवत ठेऊया अशी सर्वांना विनती धन्यवाद.