क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती: बालिका दिन मराठी भाषण

बालिका दिन कधी साजरा केला जातो?

Savitribai Phule : भारतीय स्रियांना शिक्षणाची दरवाजे खुली करून देणाऱ्या भारतातील पहिल्या स्री शिक्षिका, भारतीय शिक्षणाची गंगोत्री क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना त्रिवार अभिवादन..


क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती: जागतिक बालिका दिन मराठी भाषण
बालिका दिन 


भारतीय स्रियांना शिक्षणाची दरवाजे खुली करून देणाऱ्या भारतातील पहिल्या स्री शिक्षिका, भारतीय शिक्षणाची गंगोत्री क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना त्रिवार अभिवादन..


महाराष्ट्र शासनाने 3 जानेवारी हा दिवस जागतिक बालिका दिन म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती म्हणून साजरा करण्यात येतो. बालिका दिवस हा महाराष्ट्रात सर्वत्र साजरा करण्यात येतो.


असे म्हटले जाते कि प्रत्येक यशस्वी पुरुषामाघे एक स्रीचा हात असतो. अगदी त्याच पद्धतीने क्रांतिसूर्य ,समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांना त्यांच्या कार्यात साथ दिली ती त्यांच्या पत्नीने सावित्रीबाई फुले यांनी. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या स्री शिक्षिका होत्या.


सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या ठिकाणी झाला.


सावित्रीबाई फुले यांचा विवाह अवघ्या नवव्या वर्षी  ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. त्यावेळी त्या पूर्णपणे निरक्षर होत्या.


विवाहानंतर सावित्रीबाई फुले यांना  ज्योतिबा फुले यांनी लिहायला वाचायला शिकवले. व त्या ठिकाणापासूनच स्री शिक्षणाचा पाया रचला गेला. आज प्रत्येक क्षेत्रात स्रिया या पुरुषाच्या खांद्याला खांदा लाऊन काम करताना दिसत आहेत. स्रियांची हि प्रगती होण्याचे श्रेय हे सावित्रीबाई यांना जाते.


पूर्वी मुली शिक्षणापासून वंचित ठेवल्या जात होत्या. चूल आणि मुल हेच स्रियांचे कामे होते. त्यांना घराच्या बाहेर पडण्यास परवानगी नसे. अशा कठीण प्रसंगी मुलींना शिक्षण मिळावे म्हणून 1 जानेवारी 1848 रोजी मुलींसाठी पहिली शाळा पुणे जिल्ह्यात भिडेवाडा या ठिकाणी सुरु केली. मुलीना शिकवण्यासाठी महात्मा फुले यांनी प्रथम सावित्रीबाई यांना शिक्षित केले.


सावित्रीबाई स्वत: मुलीना शिकवत या सर्व गोष्टी त्या वेळी समाजाला मान्य नव्हत्या. त्या शाळेत असताना लोक त्यांना त्यांच्या अंगावर शेण,दगड,फेकून मारत. त्यांचा अपमान करत. लोकांनी कितीही विरोध केला तरी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले माघे हटले नाहीत. त्यांनी आपले स्री शिक्षणाचे कार्य सुरूच ठेवले.


सावित्रीबाई फुले यांनी आपले आयुष्य स्रीयांच्या शिक्षणासाठी वेचले. त्यामुळे अंधश्रद्धा नष्ट झाली. अनिष्ट रूढी बंद झाल्या.अज्ञान दूर होण्यास मदत झाली. स्रियांचे जीवनमान उंचावले. 


अशा या थोर समाजसेविकेचा मृत्यू देखील समाजसेवा करताना झाला. 1897 मध्ये पुण्यात प्लेग ची साथ आली रुग्णाची सेवा करताना त्यांना प्लेग ची लागण झाली. 10 मार्च 1897 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अशा थोर व्यक्तिमत्वास माझे कोटी कोटी प्रणाम.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने