महात्मा ज्योतीबा फुले यांच्या विषयी माहिती मराठी।महात्मा फुले निबंध मराठी.

महात्मा फुले यांच्या विषयी माहिती मराठी।महात्मा फुले निबंध मराठी.

महात्मा फुले यांच्या विषयी माहिती मराठी।महात्मा फुले निबंध मराठी


Mahatma Jyotiba Phule Information In Marathi महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी कटगुण जिल्हा सातारा येथे झाला. महात्मा ज्योतिबा फुले यांचे मूळ गाव कटगुण होते,ते गाव सातारा जिल्ह्यात आहे.महात्मा ज्योतिराव फुले यांचे गोरे हे मूळ आडनाव होते.कटगुणहून त्यांचा परिवार पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे आला.जोतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या आईचे नाव चिमणाबाई होते. 

महात्मा ज्योतिराव फुले यांना महात्मा ही पदवी का देण्यात आली तर धार्मिक क्षेत्रात केलेल्या कार्यामुळे त्यांना महात्मा ही पदवी देण्यात आली.आधुनिक विचारवंतांनी त्यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग असे गौरविले आहे. ज्योतिरावांचे आजोबा माधवराव पेशव्यांच्या दरबारात सजावटीचे काम करत असत.माधवराव पेशव्यांनी खुश होऊन त्यांना 35 एकर जमीन फुलांच्या व्यवसायासाठी दिली होती. 

ज्योतीबांच्या वडिलांनी व दोन्ही काकांनी मीळून शेवटच्या पेशव्यांच्या महालात माळी विणण्याचे काम केले होते. तसेच त्यांच्या वडिलांचा फुलं विक्रीचा व्यवसाय होता,त्यामुळे फुले म्हणून ते ओळखण्यात येऊ लागले.आजोबांच्या मृत्यूनंतर ही जमीन त्यांच्या काकाने रानोजी नी हडपली म्हणून गोविंदरावांनी भाजीपाल्याचा व्यवसाय सुरू केला होता. 

ज्योतिबा नऊ महिन्याचा असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले होते.वयाच्या बाराव्या वर्षी 1840 साली ज्योतिरावांचे लग्न धनकवडी झगडे पाटील घराण्यातील सावित्रीबाई सोबत झाले.मुन्शी व ख्रिस्ती धर्मोपदेशक मी लेजंट यांच्या सांगण्यावरून 1842 ला माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूल मध्ये त्यांनी प्रवेश घेतला.बुद्धी अतिशय तल्लख होती.

त्यामुळे पाच-सहा वर्षातच 1847 मध्ये त्यांनी इंग्रजी अभ्यासक्रम पूर्ण केला 847 आली लहुजी वस्ताद साळवे यांच्याकडून दांडपट्टा चालवण्याचे व इतर शारीरिक शिक्षण घेतले याच वेळी 1847 मध्ये वाचण्यात आलेल्या थॉमस पेन यांच्या "राईट ऑफ द मॅन" या ग्रंथातील विचारांचा प्रभाव पडून फुलेंनी महाराष्ट्रातील समाजात परिवर्तन घडवण्याची ठरवले.

महात्मा फुले यांच्या कार्याची माहिती.

1848 मध्ये एका ब्राह्मण मित्राच्या लग्नात त्यांचा लग्नातील उच्चवर्णीय मंडळीकडून अपमान झाला.हेच त्यांच्या जीवनातील महत्वाचे वळण ठरले.येथे त्यांना भारतातील जाती व्यवस्था ची जाणीव झाली."शिवाजी महाराजांचे चरित्र" व  "राईट ऑफ मॅन" या ग्रंथाचा त्यांच्यावर विशेष प्रभाव पडला.1854 साली महात्मा फुलेंनी "स्कॉटिश मिशन" च्या शाळेत अर्धवेळ शिक्षकाची नोकरी धरली. 1858 ज्योतीबांनी शाळांच्या व्यवस्थापन मंडळातून निवृत्ती घेतली.फुले एक व्यापारी सुद्धा होते. 

1882 मध्ये त्यांनी स्वतःला एक व्यापारी,एक शेतकरी व एक शासकीय कंत्राटदार असे म्हटले.आठशे सत्तर च्या दशकात भारतातील पहिली दगडी बांधकाम असलेले खडकवासला धरण बांधत असताना, त्याला मालाचा पुरवठा करण्याचे काम कंत्राटदार या नात्याने फुले फुले यांनी केले.1863 साली त्यांनी पोलादी वस्तूचा पुरवठा करण्याचे व्यापार सुरू केला होता.त्यांनी एक एप्रिल अठराशे एकोणनव्वद रोजी "सार्वजनिक सत्यधर्म" हा ग्रंथ डाव्या हाताने लिहून पूर्ण केला.या ग्रंथाचे प्रकाशन महात्मा फुले यांच्या मृत्यूनंतर "यशवंत फुले" यांनी केले.जोतिरावांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले.

ऑगस्ट1848 साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा भरून तेथील शिक्षकांची जबाबदारी सावित्रीबाई वर सोपवली.फुले यांनी सात सप्टेंबर 1851साली बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात व रस्ता पेठेत मुलींच्या शाळेची सुरुवात केली. 1852 मध्ये वेताळ पेठेत मुलींची शाळा स्थापन करण्यात आली.त्यांनी नेहमीच "विधवा पुनर्विवाह" चा पुरस्कार केला.तसेच उच्चवर्णीय विधवांसाठी 1854 साली पुनर्विवाह सुरू केले. 1860 झाली त्यांनी विधवा विवाह सुरू केले. 

महात्मा फुले यांनी नेहमीच विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार करून तसेच उच्चवर्णीय विधवांसाठी 1854 झाले एक विधवा घर सुरू केले,1860 साली त्यांनी विधवा विवाहास सहाय्य केले. 1863 झाली आपल्या घराशेजारी "बालहत्या प्रतिबंधक" गृहाची स्थापना केली.म्हणूनच फुलेंना समाजाच्या पापाचे प्रायचित्त फेडणारा समाज सुधारक असे म्हणतात.या उपक्रमाचे अनुकरण म्हणून लोकहितवादी लाल शंकर उमाशंकर व न्यायमूर्ती रानडे यांनी पंढरपूर येथे एक "बाल हत्या प्रतिबंधक समिती" स्थापना केली 8 मार्च 1864 रोजी फुलेंनी पुण्यात गोखले यांच्या वाड्यात एक अठरा वर्षाच्या विधवेचा पुनर्विवाह त्याच्या जातीतील वधूराशी लावला.

फुलेंनी बहुपत्नीत्व विरोध केला.त्यांनी बालविवाहास विरोध केला,महात्मा फुले यांनी सती प्रथेला विरोध केला.यशवंतराव फुले यांना लहानपणी दत्तक घेतले. पेशव्यांच्या काळात दलितांची स्थिती अतिशय दयनीय झाली होती.दुसऱ्या बाजीरावाच्या काळात तर दलितांवर प्रचंड अत्याचार झाले होते.महात्मा फुले यांच्या शाळेतील मुक्ता साळवे नावाचा अकरा वर्षाच्या महिलेने दलितांवर होणाऱ्या अत्याचारावर "कोणता तो धर्म" नावाचा निबंध लिहिला.तो पुढे प्रचंड प्रसिद्ध झाला.

1848 साली फुलेंनी मराठा मुलांसाठी स्वतंत्र शाळा काढली होती.त्यानंतर 1851 मध्ये फुलेंनी अस्पृश्यांसाठी पहिली शाळा काढली.पण सनातनी मंडळी येथे शाळा बंद पडली.पण त्यानंतर फुलांनी पुण्याच्या वेताळ पेठेत सदाशिव बल्लाळ गोवंडे यांच्या वाड्यात 15 मार्च 1852 रोजी दुसरी शाळा स्थापन केली.

16 नोव्हेंबर 1852 रोजी महात्मा फुलेंचा मेजर कँडी यांच्याकडून शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश सरकारतर्फे विश्रामबाग वाड्यात सत्कार करण्यात आला.अस्पृश्य समाजातील लोकांसाठी फुले यांनी स्वतःच्या घराची दारे व 1868 दुष्काळात पाणी भरण्यासाठी स्वतःच्या घरातील हौद खुला करून दिला.

सत्यशोधक समाजाचे कार्य:

सत्यशोधक समाज 23 सप्टेंबर 1973 रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.यावेळी त्यांचे 14 सदस्य होते.यापैकी दोन स्त्रिया होत्या.पुरोहितांकडून होणाऱ्या अन्यायापासून अत्याचारापासून व गुलामगिरीतून तथाकथित शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.सत्यशोधक समाज तत्त्वानुसार यात राजकारणावर बोलण्यास बंदी होती.दिनबंधू  या सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते.

सत्यशोधक समाजाचे कार्य दिनबंधू या वृत्तपत्रातून प्रकाशित होत असे. सत्यशोधक समाजाची पहिली शाळा बिल्लार मराठ्यांनी येथे स्थापन केली.महात्मा फुले पासूनच प्रेरणा घेऊन हमीद दलवाई यांनी मुस्लीम सत्यशोधक समाजाची स्थापना केली.तर नारायण मेघाजी मेघाजी लोखंडे यांनी मिल भारतातील पहिली मजूर संघटनेची स्थापना केली.समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.शिक्षणाचे महत्त्व पटवून देणार्या त्यांच्या कविता एक कवितेच्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत. 

विद्येविना मती गेली,मतीविना नीती गेली,नीतीविना गती गेली,गतीविना वित्त गेले,वित्ताविना शूद्र खचले,इतके अनर्थ एका अविद्येने केले.

सत्यशोधक समाज चे घोषवाक्य काय होते?


"सर्व साक्षी जगत्पती।त्याला नकोच मध्यस्ती।" 

हे समाजाचे घोषवाक्य होते.
सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली.1887 साली सत्यशोधक समाजातर्फे पारंपारिक विवाह पूर्व पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली.नवा पुरोहित वर्ग निर्माण करून व तूर या गावी या पद्धतीने लग्न लावून दिले.मराठी मंगलाष्टके रचली महात्मा फुले एकेश्वरवादी होते.त्या ईश्वराला त्यांनी निर्मिक असे म्हटले आहे. 


सत्यशोधक सत्यधर्म स्पष्ट करताना ते म्हणतात,

"सत्य सर्वांचे आदी तर, "सर्व धर्मांचे माहेर" 

सार्वजनिक सत्यधर्म हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो.या समाजाचे मुखपत्र म्हणून दिन बंधू हे साप्ताहिक चालविले जात असे.सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर 1891 मध्ये प्रकाशित करण्यात आला.

अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा महात्मा म्हुले यांनी मार्टिन ल्युथर किंग, शिवाजी महाराज व संत तुकाराम यांच्या कडून मिळाली होती.1875 साली त्यांनी शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध अहमदनगर येथे खत संबंधी एक बंड घडवून आणले.1877 चा दुष्काळ वेळी पुण्यातील दुष्काळ व पीडित मुलींसाठी धनकवडी येथे कॅम्प भरला होता.

इ.स.1875 मध्ये न्यायमूर्ती रानडे यांच्या पुण्यात स्वामी दयानंद सरस्वती यांची हत्तीवरून मिरवणूक काढण्यासाठी ज्योतिबा यांचे सहकार्य घेतले होते.नांगर चालणार नाही तर जमीन विकणार नाही.हे आंदोलन मुलीने दोन वर्षे चालवले.तसेच भारतीय शेतकऱ्यांना बंदुकीची परवानगी देण्यात यावी अशी मागणी करणारा पहिला समाजसुधारक म्हणून महात्मा फुले यांची ओळख आहे. हंटर कमिशनसमोर साक्ष नोंदवताना फुले म्हणाले, "गरीब जनतेकडून वसूल केला जाणारा सारा उच्चवर्णीयांच्या शिक्षणावरच खर्च होतो. " कनिष्ठ वर्गाच्या शिक्षणाकडे या साऱ्यांचा उपयोग केला गेला पाहिजे. 

बारा वर्षाखालील मुला-मुलींना प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत दिले पाहिजे.सरकारने शिक्षणाच्या बाबतीत मांडलेल्या सिद्धांताला सर्वप्रथम फुले यांनी विरोध केला आणि शिक्षणाला तिसरे नेत्र म्हटले आहे.महाविद्यालयातील दिले जाणारे शिक्षण दैनंदिन जीवनातील व्यवहारात उपयोगी पडणाऱ्या नसून केवळ कारकून आणि शिक्षण तयार होऊन करणारे आहे.अशी फुले यांनी महाविद्यालयीन शिक्षणावर टीका केली.फुले म्हणतात "शील संवर्धन, सत्यनिष्ठा,नीतिमत्ता,व्यवहारज्ञान यांच्या शिक्षणात भर दिली पाहिजे. 

1888 साली इंग्लंडच्या राणीचा पुतळा "ड्युक ऑफ कॅनॉट" यांची भेट आणि सत्कार समारंभ आयोजित केला गेला होता.या समारंभाला फुले यांनी शेतकऱ्यांना पारंपरिक वेशात हजेरी लावली.ब्रिटिशांना भारतीय शेतकऱ्यांची अवस्था दाखवण्यामागचाउद्देश यामागचा होता.पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही फुले आणि आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव साजरा करते.फुले यांच्या आयुष्यावर लिहण्यासारखे खूप आहे,कारण त्यांचे कार्य महान आहे. 

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने