होळी सणाची माहिती मराठी।होळी सणाविषयी मराठी निबंध.
फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होळी हा सण साजरा केला जातो.या सणा विषयी अनेक कथा जोडलेल्या आहेत. होळीच्या दिवशी रात्री होळी पेटवली जाते.यामागे एक आख्यायिका आहे.भारतातल्या वेगवेगळ्या भागांत फाल्गुन पौर्णिमेला होळी लोकोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
होळी उत्सवाला होलिकादहन किंवा होळी शिमगा, हुताशनी महोत्सव अशी वेगवेगळी नावे आहेत.या होळीच्यासणाला वसंतोत्सव आणि दुसऱ्या दिवशी सुरू होणाऱ्या वसंत ऋतूच्या आगमनानिमित्त वसंतोत्सव असेही म्हणतात.
Join : Whats App Channel
होळी सणाची कथा:
होळी सणा विषयी अनेक कथा जोडलेल्या आहेत.होळीच्या दिवशी रात्री होळी पेटवली जाते.होळी पेटवण्यामागे एक आख्यायिका आहे.हिरण्यकश्यप नावाचा राजा होता.जो स्वतःला देवतांची अवेहलणा करायचा.तसेच त्याने देवांचा देव भगवान विष्णूचे नाव देखील ऐकून घ्यावेसे वाटत नव्हते.परंतु त्याचा पुत्र भक्त प्रल्हाद हा भगवान विष्णूचा परमभक्त होता.
त्यामुळे हिरण्यकश्यप ला आपला पुत्र भक्त प्रल्हाद याचा खूप राग येत असे कारण तो सतत नारायण नारायण म्हणत असे.हिरण्यकश्यप वेगवेगळ्या प्रकारे त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत असे कारण त्याला घाबरवल्याने तरी तो नारायण नारायण जप करणार नाही व असेल करून तो देवाचे नाव घेणे सोडून देईल परंतु भक्त प्रल्हाद कोणालाही घाबरत नव्हता.
भक्त प्रल्हाद त्याच्या भक्तीत लीन होत असे. हिरण्यकश्यप राजा त्याला खूप कंटाळून राजाने एकदा एक योजना बनवली आणि त्यानुसार आपली बहीण होलिका जिला वरदान मिळाले होते की,ती आगीवर विजय प्राप्त करू शकते.तसेच कोणतीही आग तिला जाळू शकत नाही.
हिरण्यकश्यप राजाने होलिकेला भक्त प्रल्हादाला घेऊन अग्नीत बसण्यास सांगितले.प्रल्हाद आपल्या आत्या सोबत अग्नीच्या चितेवर बसला व भगवान विष्णूच्या नामस्मरणात तल्लीन झाला आणि थोड्याच वेळात होलिका आरडा ओरडा करून रडायला लागली.आणि एक आकाशवाणी झाली की,ज्यानुसार होलिकेला आठवलं की तिला वरदान असे सांगितले होते,की ज्यावेळी ती तिच्या वरदानाचा दुरोपयोग करेल तेव्हा ती स्वतः जळून राख होईल.भक्त प्रल्हाद ला आग काही करू शकली नाही. मात्र होलिका जळून भस्म झाली.
अशा प्रकारे त्या दिवशी लोकांनी होळीचा उत्सव साजरा केला आणि तो दिवस होळी म्हणून ओळखू लागले. होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाचा दिवस असतो.याला धुळवड असेही म्हणतात.एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण करणे,सर्वांनी एकत्र येऊन बंधूभाव आणि एकतेचे प्रतीक म्हणून याकडे पाहिले जाते.या दिवशी लोक आपसातील भेदभाव भांडण विसरून एकत्र येऊन हा सण साजरा करतात.होळी फाल्गुन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच होळीपौर्णिमाच्या दिवशी येते.होळीच दुसरं नांव म्हणजे हुताशनी पौर्णिमा होय.
होळीची पुजा कशी करतात।होळी कशी पेटवतात?
होळी हा सण शहरात तसेच खेड्यापाड्यातून मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो.होळी साठी होळी पेटवण्यासाठी लागणारे लाकडे गोळा करणारी पोरं "होळी रे होळी पुरणाची पोळी" असे आरडा ओरडा करून होळी पेटवतात.
शक्यतो देवळासमोर किंवा सोयीच्या ठिकाणी पौर्णिमेच्या सायंकाळी होळी पेटवावी.दिवसा होळी पेटवू नये.शक्यतो ग्रामदेवतेसमोर होळी उभी राहावी सर्वप्रथम मध्ये एरंड,माड,पोफळी अथवा ऊस उभा करावा नंतर त्याच्या भोवती गोवर्या व लाकडे शंकूच्या आकाराचा ढीग करून होळीभोवती सुरेख रांगोळी काढावी.