गुढीपाडवा सण: पूजा, महत्व,आख्यायिका, गुढी उभारण्याचे कारण.

गुढीपाडवा सणाची संपूर्ण माहिती मराठीत.


गुढीपाडवा हिंदू धर्मियांच्या नव्या वर्षातील पहिल्या दिवसाला गुढीपाडवा म्हणतात.

 

महाराष्ट्राचे सांस्कृतिक वर्ष याच दिवशी म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदेला आरंभ होते.हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी नवे काम करण्यास सुरवात शुभारंभ करतात.नवीन वर्षाचे प्रत्येक धर्मात जसे स्वागत केले जाते तसेच हिंदू धर्मात सुद्धा या दिवसाचे स्वागत केले जाते.


Join : Whats App Channel


असे संगितले जाते की पैठणच्या शालिवाहन राजाने शक लोकांचा पराभव करून महाराष्ट्र राज्य सुखी स्वतंत्र केले.तो हा दिवस शालिवाहन शक आरंभाचा दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदा हा आर्याचा एक महत्त्वाचा मांगल्याचा सण या दिवशी ब्रह्मदेवाने चराचर सृष्टी निर्माण केली.


गुढी कशी उभारतात।गुढीपाडव्याची पुजा कशी करतात? 

गुढीपाडव्याच्या दिवशी घरातील लहान मोठे मंडळी लवकर उठून स्नान करतात,नवीन पोशाख परिधान करतात.एक मोठ्या बांबूच्या काठीला एक लहानसे कास्य धातूचा तांब्या,तसेच बांबूच्या वरच्या टोकाला झेंड्याप्रमाणे उंच रंगबिरंगी विशेषता तांबडे वस्त्र व साखरेच्या पाकाचे माळ (गाठी),तसेच लिंबाची छोटी फांदी ,विविध प्रकारच्या फुलांच्या माळा लिंबाच्या झाडाची पाने व अलंकार घालून या दिवशी गुढी उभारून तिची पूजा करतात,पुजा झाल्यावर कडू लिंबाच्या पानात मिरी व गूळ घालून बारीक कुटून प्रसाद म्हणून भक्षण करतात. सूर्यास्ताच्या वेळी गुढी उतरवितात.


गुढी पाडव्याचे महत्व:

या दिवशी साडे तीन मुहूर्तापैकी एह मुहूर्त असतो असे संगितले जाते.म्हणजे गुढीपाडव्याचा दिवस शुभ दिवस असतो,या मुहूर्त पासून केलेले कार्य यशस्वीपणे पार पडते.अशी लोकांची भावना असते.हा दिवस अभिमानाचा आणि आत्मविश्‍वासाचा संस्कार रुजविणारे माणसाच्या मनातील सद्भाव विवेक जागृत ठेवण्याचा दिवस म्हणजे गुढीपाडवा.या दिवशी एकमेकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतात.


सर्वांना नवे वर्ष सुखाचे जावो ही प्रार्थना करतात. या गुढीपाडव्याच्या दिवशी मुहूर्त समजून अनेक नवीन गोष्टीची खरेदी करतात.तसेच नवीन कामाला सुरवात करणे शुभ मानले जाते. 


गुढीपाडव्याची कथा:

गुढीपाडव्याच्या वेगवेगळ्या कथा प्रचलित आहेत.जेव्हा श्री राम हे चौदा वर्षाचा वनवास पूर्ण करून,रावणाचा वाढ केला आणि अनेक संकटावर विजय मिळवला होता.त्यानंतर ते आयोध्येत आले होते तेव्हा आयोध्येतील सर्व लोकांनी प्रभू श्री राम यांचे स्वागत करण्यासाठी प्रत्येकाच्या घरावर आणि दारात गुढी उभारून आंनद व्यक्त केला होता.हा दिवस विजयाचा,विजयाचा प्रतीक मानला जातो. 


गुढीपाडव्याची दुसरी एक कथा अशी सांगितली जाते की ,भारतावर शक या राजाचे राज्य होते.शक हे अत्यंत दुष्ट होते त्यांनी भारतात उत्पाद माजवला होता. शकाचा पराभव करण्यासाठी एक कुंभार समजाचा मुलगा होता,शालिवाहन ,शालिवाहन यानी तब्बल 6000 सैनिकांचे मातीचे पुतळे बनवले. 


या पुतळ्यात प्राण निर्माण करून या सैनिकांच्या साहय्याने,या शक राजाचा पराभव केला होता. तो जो काही विजय मिळवला होता त्यामुळे गुढी उभारली जाते. अशी आख्यायिका आहे.गुढी ला वेगवेगळे नवे आहेत. 


गुढी उभारण्यामागील शास्रीय कारण .

आपण गुढीची पुजा करतो त्यावेळी आपण जो प्रसाद म्हणून कडूनिंबाचे पाने,गूळ ,ओवं,मीठ घालून तयार करतो.या पदार्थ सेवन केल्याने आपल्या शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते,तसेच आपले पित्त कमी होते,कर्ण गुढीपाडवा हा सण उन्हाळ्यात येणारा सण आहे.म्हणजेच हिंदू धर्मात जे विविध सण साजरे करतात,त्यामागे काहीतरी वैज्ञानिक कारण असते हे आपल्याला माहिती नसते हे आपण लक्षात घेतले पाहिजे. 

Join : Whats App Channel


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने