To Improve Children's Communication/Conversation -Marathi.
भाषण/संभाषण |
भाषण/संभाषण:
Communication/Conversation।भाषण/संभाषण सुधारण्यासाठी.
एखाद्या व्यक्तिला चांगल्या प्रकारे भाषण,संभाषण किंवा संवाद करण्यासाठी आपले भाषण संभाषण कौशल्य सुधारणे आवश्यक असते.कारण चांगले संभाषण जर आपल्याकडे असेल तर आपले व्यक्तिमत्व इतरमध्ये प्रभावी दिसते त्यामुळे आपल्याला संभाषण किंवा भाषण संभाषण करता येणे आवश्यक असते.
हे सर्व आपण आपल्या घरात,कुटुंबात शिकत असतो.परंतु अनेक लोकांना आपल्या मुलांना वेळेअभावी आपल्या मुलांना वेळ देता येत नाही. त्यामुळे त्यांना त्यांना योग्य प्रकारे Communication/Conversation भाषण/संभाषण करता येत नाही.
मुळात Communication/Conversation भाषण/संभाषण साधण्याची कला ही लहानपणापासून च आपल्या कुटुंबात होत असते.आपण जसे मोठे होत जातो तसे तेथील वेगवेगळ्या भाषा,विचार,व्यक्ति,समाजाचा प्रभाव आपल्या Communication/Conversation भाषण/संभाषण यावर पडत असतो.
भाषा व वाचा दोषपूर्ण असेल तर लवकर तज्ञ डॉक्टर यांचा सल्ला घेणे आवश्यक असते.वाचा दोषपूर्ण असेल तर भाषण सुद्धा दोषपूर्ण होते.
Communication।Conversation।भाषण।संभाषण सुधारण्यासाठी काही मुद्दे:
वैद्यकीय तपासणी।Medical examination.
आपल्या मुलाची वाढ व विकास योग्य त्या टप्प्याने सुरू आहे का?ची खात्री करावी.जर काही दोष दिसून येत असतील तर वैद्यकीय तपासणी करून घ्यावी कारण बालकांमध्ये टंगटाय असतात,शश्राक्रिया करून ते पूर्ववत करता येते.
जर लवकर उपचार केले नाहीत तर त्याचा परिणाम वाचेवर होतो आणि संवाद साधण्यास अडचणी येतात.ऐकणे,बोलणे,या गोष्टी सर्वसामान्य आहे का याची वेळीच खात्री करा.वेळीच उपचार केल्यास दोष कमी करता येतो.भाषण ,संभाषण प्रभावी होण्यासाठी मदत होते.
ऐकणे।Hearing.
Communication/Conversation भाषण/संभाषण या क्रियेतील सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे ऐकणे होय.आपल्याला जर चांगल्या प्रकारे श्रवण करता आले तर त्याचा प्रभाव आपल्या वाणीवर पडतो.
चांगले ऐकणे हे सुद्धा एक कौशल्य आहे.कान हा भाषण संभाषण क्रियेतील महत्वाची भूमिका पार पडतो.आपल्याला जर कानाने कमी ऐकायला येत असेल तर आपल्याला समोरच्या व्यक्तिला काय प्रतिसाद द्यायचा हे कळत नाही.
मुलांना ऐकायला कमी येते का? त्याला काही प्रमाणात ऐकायला कमी येत असेल तर श्रवण चाचणी करून श्रबण यंत्र नियमिळ वापरा, लहान मुलांना वेगवेगळे आवाज ,तसेच नवीन व्यक्तींशी संवाद साधायला लावा.त्याचे मत मांडू द्या.कुठे चुकत असल्यास त्याला सांगा.
तसेच भाषण/संभाषण साधण्यात आडथळा येतो.आपण कधी पहिले असेल कर्णबधिर व्यक्तीचा भाषण संभाषण करताना अडचणी येतात.दोषपूर्ण ऐकणे म्हणजे दोषपूर्ण भाषण संभाषण होय.कारण ऐकायला न आल्याने त्यांचा भाषा व वाचा विकास कमी झालेला आढळून येतो.
त्यांचा विकास करण्यासाठी त्यांना श्रवण यंत्र बसवले जाते.म्हणजे भाषण/संभाषण यामध्ये ऐकणे हे खूप महत्वाचे असते.मुलांना चांगल्या प्रकारे ऐकायला दिले तर शब्दसंग्रह -Vocabulary वाढून भाषण/संभाषण चांगल्या प्रकारे करता येते.
शब्दसंग्रह।Vocabulary.
शब्दसंग्रह Vocabulary हे वेगवेगळ्या भाषेत वेगवेगळ्या प्रकारे असतात.आपल्याकडे जेव्हढे जास्त शब्दसंग्रह -Vocabulary असेल तेव्हढी आपले भाषण संभाषण करण्याचे कौशल्य प्रभावी असते.
कारण भाषण संभाषण करण्यासाठी आपल्याकडे शब्द महत्वाचे असते.शब्दसंग्रह Vocabulary वाढवण्यासाठी आपल्याला आपल्या कुटुंब,मित्र,नातेवाईक यांची महत्वाची भूमिका असते.
बर्याच मुलांना लवकर बोलता येत नाही कारण त्यांच्या कानावर जर वेगवेगळे शब्द पडत नसतील त्याचा अर्थ लवकर कळत नसेल तर त्या मुलांना लवकर बोलता येत नाही.तसेच त्यांचे भाषण संभाषण दोषपूर्ण असते.
त्यासाठी आपल्या कुटुंबात ज्यावेळी लहान मुलाची वाढ व विकसा म्हणजे 0 ते 6 वर्ष वयोगटातील सर्व बालकांशी जास्त बोलणे गप्पा मारणे ,नवीन शब्द शिकवणे आवश्यक असते.
आपण आपल्या कुटुंबात जी भाषा वापरतो तीच भाषा मूल लहान वयात शिकत असते.कारण तेच शब्द त्याला समजत असतात.
वाचन/लेखन।Reading And Writing.
आपण जसे लहान वयात प्राथमिक शाळेत जातो.तेव्हा आपल्याला शाळेत शिक्षक सुद्धा नवीन नवीन शब्द शिकवतात. दररोज काहीतरी वाचन,लेखन करण्याचा प्रयत्न करा.वाचनात वर्तमान पत्र,गोष्टीचे पुस्तके,कथा,कादंबरी,वापरा.आपले जेव्हढे जास्त वाचन असेल,तेव्हढे आपले Communication/Conversationभाषण/संभाषण कौशल्य चांगल्या प्रकारे करता येते.
कारण वाचनातून शब्दसंग्रह वाढण्यास मदत मिळते.लेखन जेव्हढे जास्त तेव्हढे वाचन जास्त होते,व शब्दसंग्रह वाढण्यास मदत होते.लेखन करणे तसेच नवीन शब्दाचा अर्थ जाणून घेणे हे शब्दसंग्रह वाढवण्यासाठी महत्वाचे आहे.जास्तीत जास्त वाचन लेखण करा.
बोलण्याचा सराव करा।Practice speaking.
बोलण्याचा जास्तीत जास्त सराव करत रहा.आपल्या कुटुंबातील व्यक्तिसोबत बोला.तसेच मित्र,शाळेत गेल्यावर वर्गात सामूहिक किंवा समुदायात बोलण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. आपल्या बोलण्यातीत चुका दुरुस्त करा.परणतु बोलण्याचा प्रयत्न करत रहा.
आरशासमोर उभा रहा म्हणजे तुम्ही कसे बोलता तुम्हाला तुमच्या बोलण्यातील चुका सुधारणा करण्यासाठी आरसा हे खूप महत्वाचे साधन आहे.आपल्याला जे बोलायचे आहे ते मुद्दे अगोदर लक्षात घ्या.जेणेकरून आपले भाषण संभाषण चांगल्या प्रकारे होईल.प्रत्येक गोष्टीवर आपले मत व्यक्त करण्याचा जसा जमेल तसा प्रयत्न करत रहा.
टीव्ही/मोबाईल चा उपयोग करा।Use TV / Mobile.
टीव्ही/मोबाईल मधील कार्यक्रम पहिल्याने आपण दृश्य आणि श्रवण करत असतो.त्यातील वेगवेगळ्या कार्यक्रमाचा लाभ आपले संवाद व संभाषण कौशल्य सुधारण्यास उपयोग होतो.
मोबाईल मधील विविध लेख वाचन केल्याने तुम्हाला सराव होईल,वेगवेगळे लेख वाचन केल्यास तुमची Vocabulary सुधारण्यास मदत मिळते नाविन शब्दाचे अर्थ सापडतात.त्यामुळे आपल्याला मोबाईल व टीव्ही आपले संभाषण सुधारण्यासाठी महत्वाचे आहेत.
आत्मविश्वास।Self-confidence.
कोणत्याही कामात आपला Self-confidence खूपच महत्वाची भूमिका पार पडतो.म्हणून आपण नक्कीच चांगल्या प्रकारे भाषण संभाषण करणार आहोत याची खात्री बाळगा.आपला Self-confidence कमी होऊ देऊ नका.एकदा चुकल तरी दुसर्या वेळेला सुधारणा करा."चुका आणि शिका" हे तत्व लक्षात ठेवा.
समुदायासमोर Self-confidence बोलल्यास तुमचा प्रभाव वाढण्यास मदत होते.तुमचे व्यक्तिमत्व सुधारण्यास मदत मिळेल,कारण Communication/Conversation हे व्यक्तिमत्व चा भाग आहे.
समुदायात सहभागी व्हा।Get Involved In The Community.
आपले Social Skill Developed करण्यासाठी समुदाय महत्वाचा आहे.समुदायात गेल्यावर आपले नवीन लोकांशी संपर्क वाढतो.तसेच आपल्या भाषण संभाषणात प्रगती होते.शाळेत वेगवेगळ्या संस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रयत्न करा.
लहान मुलांना सामुदायिक ठिकाणी कार्यक्रमात घेऊन गेल्याने त्यांच्या मनातील भीती कमी होईल व त्यांना बोलण्याची आपल्या मनातील भावना व्यक्त करण्याची संधि मिळेल.नवीन व्यक्तींचा परिचय होऊन संवाद साधता येईल.लहान मुलांना बोलण्यासाठी प्रवृत्त करा प्रोस्ताहन द्या.