Marathi Story -वाचन मित्र-लोभी सावकार

Marathi Story -वाचन मित्र गोष्ट क्रं.1

लोभी सावकार

Image source:prahaar.in

    एका गावात एक  खूप श्रीमंत सावकार राहत होता.आता तो खुपच म्हातारा झाला होता.सतत आजारी असायचा, आपल्या नंतर आपल्या कुटुंबाचे कसे होणार?अशी चिंता त्याला कायम लागलेली असायची आणि चिंता अधिक पैसे मिळवली तर दूर होईल असे त्याला वाटायला लागले. कितीही पैसे मिळवले तरी ते कमीच पडत आहेत. असं त्याला वाटायचं त्याच्या एका मित्राने त्याला एका ऋषीकडे जायची सांगितले.

     फळांची एक टोपली घेऊन सावकार ऋषीकडे आला.त्यावेळी ऋषि ध्यान लावून बसलेले होते.सावकारांनी ऋषींना नमस्कार केला व फळांची टोपली पुरे ठेवीत म्हणाला महाराज माझी ही छोटीशी भेट स्विकारा. ऋषींनी डोळे उघडून त्या सावकाराकडे एक टोपलीकडे पाहिले. झोपडीच्या कोपर्‍यात ठेवलेल्या एका फळाच्या टोपलीकडे इशारा करीत ऋषि त्या सावकाराला म्हणाले, 

बाळा, "भगवंताने माझ्यासाठी भोजनाची व्यवस्था केली आहे."तेव्हा मला आता या टोपली ची गरज नाही.परंतु तू इथे कशासाठी आला आहेस? माझ्याकडून काही मदत हवी आहे का? असेल तर ते जरूर सांग. 

     ऋषीच्या बोलण्याने सावकाराचे डोक्यात लख्ख प्रकाश पडला.त्याचा विवेक जागा झाला.त्याने पाहिल ऋषी जवळ फळांची टोपली असताना त्याला दुसर्‍या टोपलीची इच्छा झाली नाही.ते मात्र माझ्याकडे नाही , इतकी संपत्ती असतानाही अधिक पैशाची इच्छा ठेवत आलो. माझ्यानंतर कुटुंबाचे कसे होणार? अशी काळजी करत बसलो व त्यामुळे दुःखी झालो. त्या ऋषींना पुन्हा एकदा मनापासून नमस्कार करून म्हणाला, महाराज मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे.खरे सुख हे समाधान मानण्यात आहे.त्यागात असते,लोभीपणात नसते. 

तात्पर्य - खरे सुख हे समाधानी राहण्यात असते,लोभीपणात नसते. 

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने