Marathi Story -वाचन मित्र-नष्ट होणारी विद्या शिकून काय करू?

Marathi Story -वाचन मित्र गोष्ट क्रं.2

नष्ट होणारी विद्या शिकून काय करू?

image source:www.bhaskar.com

     एकदा मगध राजा वनविहारासाठी निघाला होता.सोबत खूपच जवळचे मंत्री होते.ते फिरत फिरत खूप दूर निघून गेले.त्यांना सरोवराच्या किनाऱ्याला एक साधू ची सुंदर झोपडी दिसली.ती जागा राजाला खूप आवडली.ते दुरूनच बघून परतले.राजाने विचार केला की,साधू फार अभावात जगत असेल? म्हणून त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी राजाने काही धन साधूला पाठवले.साधुनी ते दानाचा स्वीकार न करता परत केले.काही दिवसांनी जास्त धन पाठवले गेले. परंतु ते सुद्धा परत केले.मंग राजा स्वतः गेला आणि साधूला विचारले. तुम्ही माझी भेट स्वीकार का केली नाही? साधू म्हणाला, "माझ्या गरजा पूर्ण होतील एवढे धन माझ्याकडे आहे.

" राजाने त्या झोपडीत इकडे तिकडे बघितले, तिथे फक्त एक आसन आणि पांघरायला एक वस्त्र होते.ठेवायला कपट सुद्धा नव्हती. 

    राजा म्हणाला मला इथं तर काही दिसत नाही?साधुनी राजाला जवळ बोलून कानात सांगितले, "मी रसायने विद्या जाणतो.कोणत्याही वस्तूला हात लावला तरी ती वस्तु सोनेत रुपांतरीत करतो.आता राजा अस्वस्थ झाला.त्याची झोप उडाली धनसंपत्तीच्या इच्छेने आता राजने कशीबशी रात्र काढली आणि सकाळ होताच साधूकडे गेला व म्हणाला, "महाराज कृपया मला ती विद्या शिकवा म्हणजे मी राज्याचे  कल्याण करूं शकेल. 

साधू म्हणाला ठीक आहे," मी तुला विद्या शिकवतो ,

परंतु त्यासाठी तुला वेळ द्यावा लागेल.वर्षभर रोज माझ्याकडे यावे लागेल ?

मी जे सांगेन ते नीट लक्ष देऊन ऐकावे लागेल? वर्ष पूर्ण होताच विद्या शिकवीन. 

राजा दररोज त्याच्याकडे येऊ लागला.साधूच्या सहवासात राहण्याचा प्रभाव त्याच्यात दिसू लागला. वर्षभरात राजाने विचार पूर्ण बदलले.साधूने एक दिवस विचारले, 

"ती विद्या शिकायची आहे? गुरुदेव आता तर मी स्वतः एक रसायन बनलोय. नष्ट होणारी ती विद्या शिकून काय करू?

तात्पर्य - अशी गोष्ट शिकण्यावर भर द्या की ती तुम्हाला चिरकाल टिकेल.तात्पुरत्या सुख देणार्‍या गोष्टीकडे आकर्षित होऊ नका. 

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने