Marathi Story -वाचन मित्र गोष्ट क्रं.3
तेनाली रामाची युक्ती!
image source:pinterest.com |
एकदा एका रात्री कृष्णदेवराय यांना स्वप्न पडलं!त्यात त्यांनी सुंदर महाल पाहिला,त्यांची दारे रत्नजडित होती.त्या महालात विशेष प्रकाश योजना होती.जेव्हा पाहिजे तेव्हा प्रकाश आणि नको असेल तेव्हा अंधार.सुख संपन्नतेने सजलेला महाल म्हणजे एक आश्चर्यकारक होतं.
राज्याला जाग येताच, राजानी राज्यात सकाळी सकाळी दवंडी पिटवली,
"जो कोणी मला अशा प्रकारचा महाल बनवून देईल, त्याला एक लाख सुवर्णमुद्रा बक्षीस देण्यात येतील."
काहींनी राजाला सल्ला दिला.महाराजांचा महाल फक्त स्वप्नातच राहू शकतो.काहींनी त्याचा लाभ करून घेतला आणि असामान्य महाल बांधण्यासाठी भरपूर धन लुटले.महाल बांधून देण्याचं कबूल करून ती माणसं गायब झाली. यात राजाची खूप धनसंपत्ती वाया जात होती.दरबारातल्या मंत्र्यांना राजाचे नुकसान होते म्हणून वाईट वाटत होतं.
ही गोष्ट राजाला सांगायला कोणी धजावत नव्हते.एकता एकच व्यक्ती राजाला समजून सांगू शकत होती ती म्हणजे तेनालीराम. परंतु तो काही दिवसांसाठी बाहेरगावी गेला होता.एक दिवस दरबारात एक म्हातारा आला व रडू लागला राजने त्याला रडण्याचं कारण विचारलं व त्याची अडचण दूर करण्याचं आश्वासन दिलं. त्यावर तो म्हणाला, "महाराज माझी सर्व संपत्ती लुटली गेली,
राजांनी विचारलं कोणी लुटली ?
तुझा कोणावर संशय आहे? त्यावर तो म्हणाला,
"महाराज काल रात्री मला स्वप्न पडलं स्वप्नात तुम्ही व तुमचे सर्व मंत्री माझ्या घरी येऊन माझी तिजोरी लुटली." त्यावर राजा चिडला व म्हणाला, हे कसे शक्य आहे?
हे तर तुझे स्वप्न होतंआणि स्वप्न कधी सत्यात असतात का?
त्यात दिसलं तर तसं कधी घडतो का?
त्यावर त्या म्हाताऱ्याने आपली नकली दाढी काढली व मूळ रूपात आला. तो तेनाली रामा होता.
राजाला म्हणाला, "महाराज अशक्य स्वप्न सत्यात उतरत नाहीत." हेच मला तुम्हाला सांगायचं होतं.
राजाला आपली चूक कळली. तेनाली रामा ने योग्य सल्ला दिल्याबद्दल त्याला बक्षीस देऊन त्याचा गौरव केला.
तात्पर्य -अशाच माणसाची संगत ठेवा.जे तुमच्या हिताचा विचार करून, तुम्हाला योग्य सल्ला देऊ शकतील.